तुझाच मी भाग एक
लघुकथा
लघुकथा
"ती कुठेय?.... मला सर्वप्रथम तिला पाहायचय."
आज इतक्या दिवसांनी नीरजला जग बघायला मिळणार होते. पण त्याला प्रथम जिला पाहायचं होतं ती.. साधना... तिथे नव्हती. तो आपल्या मित्राला रोहनला तिच्याबद्दल विचारात होता.
सहा महिन्यांपूर्वी........
नीरज मल्टिनेशनल कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर होता. उंच गोरापान, सुदृढ बांधा, घारे डोळे... त्याचे आईवडील गावीच राहायचे. ऑफिसला जाण्यासाठी तो रोज ज्या बसस्टॉप वर उभा राहायचा तिथे साधनाही असायची. तिने पाहिले होते त्याला .... तसा लक्षवेधीच होता तो! उंच, गोरा रंग, कुरळे केस, घारे डोळे तो हसला कि त्याच्या गालावर खळी पडायची..... एकदम ग्रीक गॉड वाटायचा.... आणि साधना सर्वसामान्यच होती..गव्हाळ रंग... किरकोळ बांधा...पण तिचे डोळे खूप बोलके होते... टपोरे... पाणीदार.... त्यामुळे खूप गोड दिसायची ती!
बस स्टॉपवरच्या कॉलेज मधल्या मुली त्याच्याकडे बघून आपसात काहीतरी बोलायच्या आणि खुदुखूदू हसायच्या.... साधनाच्याच कॉलेजमधील होत्या त्या... म्हणजे साधना ज्या कॉलेज मध्ये प्रोफेसर होती तिथल्या ....
साधनाचे त्यांच्याकडे लक्ष जायचे....
तो मात्र इकडे तिकडे न बघता स्वतःच्याच तंद्रित असायचा... कानाला इअरफोर लावून काहिबाही ऐकत असायचा.
साधनाचे त्यांच्याकडे लक्ष जायचे....
तो मात्र इकडे तिकडे न बघता स्वतःच्याच तंद्रित असायचा... कानाला इअरफोर लावून काहिबाही ऐकत असायचा.
एक दिवशी साधना बसस्टॉपवर बसची वाट बघत होती... तो समोरून येत आहे हे तिने पाहिले.
बस आली आणि तो रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला होता... बसला बघत घाईघाईत रस्ता ओलांडताना त्याला एका कारने ठोकले. तो जमिनीवर कोसळला. तशी चुकी त्याचीही होती... रस्ता ओलांडतानाही इअरफोन कानाला लावून होता तो... बघ्यांची गर्दी झाली. बसच्या रांगेमधील प्रवासी त्याच्याकडे एकनजर पाहून बसमध्ये चढले..... हो प्रवासीच ते!... वेळ, काळ आणि प्रवासी कोणासाठी थांबत नसतात...
थांबतात आणि मदत करतात त्यांना माणसं म्हणतात....
काहीजण मोबाईल मध्ये शूट करत होते.... काही कुतूहल म्हणून बघत होते... मदत करायला कोणीही पुढे सरसावत नव्हते.
खांद्यावरची पर्स सावरत साधना धावतच त्याच्याजवळ गेली.... तिने रिक्षाला थांबवले. एकदोन माणसांच्या मदतीने ती नीरजला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. डॉक्टरांना विनंती करून हॉस्पिटलच्या फॉर्म वर तिनेच सही केली व निरजवर ताबडतोब उपचार करावयास सांगितले... आपल्या बँक अकाउंटमधून पैसे काढून तिने हॉस्पिटलमध्ये जमा केले. तीळ तीळ जमा करून साठवलेले पैसे कोण्या अनोळख्यासाठी वापरताना तिने क्षणाचाही विचार केला नाही. कारण त्या वेळी माणुसकी तिच्यासाठी जास्त महत्वाची होती.
तिने नीरजच्या फोन वरून emergency नंबर dial केला पण फोन काही लागला नाही. त्याला शुद्ध येईपर्यंत ती तिथेच बसून राहिली.
साधारण सहा तासांनी त्याला शुद्ध आली. पण त्याला काही दिसत नसल्याचे त्याने डॉक्टरांना सांगितले.
डॉक्टरांनी साधनाला आत बोलावून घेतले आणि त्याच्या दृष्टीहीनतेची कल्पना दिली... डॉक्टरांनी तिला त्याची समजुत काढावयास सांगितले... ती त्याच्याशी काय बोलणार?... अनोळखी होती ती दोघं!... ती त्याच्या रूममध्ये आली..तो निराश बसला होता.... ती त्याच्याकडे पाहत होती... तिला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली....
डॉक्टरांनी साधनाला आत बोलावून घेतले आणि त्याच्या दृष्टीहीनतेची कल्पना दिली... डॉक्टरांनी तिला त्याची समजुत काढावयास सांगितले... ती त्याच्याशी काय बोलणार?... अनोळखी होती ती दोघं!... ती त्याच्या रूममध्ये आली..तो निराश बसला होता.... ती त्याच्याकडे पाहत होती... तिला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटली....
इतक्यात नर्स तिथे आली. तिने साधनाची ओळख सांगितली,
"नीरज,... या साधना मॅडम... यांच्यामुळेच तुमचा जीव वाचला."
"नीरज,... या साधना मॅडम... यांच्यामुळेच तुमचा जीव वाचला."
नीरजच्या डोळ्यावर पट्टी होती. आजूबाजूच्या वातावरणाचा अंदाज घेत तो म्हणाला,
"Thank you... साधना मॅडम.... जीव वाचला.. पण...". पुढे काही न बोलता तो उदास झाला.
"काळजी करू नका.. नीरजजी.. सर्व होईल ठीक... डाक्टरांनी गरजेचे रिपोर्ट काढले आहेत.. काहीतरी उपाय नक्की निघेल." त्याच्या बेडजवळच्या खुर्चीवर बसत ती म्हणाली.
नीरजजवळ साधना आहे हे पाहून नर्स तिथून निघून गेली.
"साधना मॅडम, माझ्या पॉकेटमध्ये माझे डेबिट कार्ड आहे मी तुम्हाला पिन सांगतो... तुम्ही तुमचे पैसे काढून घ्या... "
"नीरजजी माझ्या पैशांची काळजी करू नका... तुम्ही बरे व्हा... अजून पैसे लागले तर मी तुम्हाला नक्की सांगेन..... पण मला एक विचारायचे होते.... तुमच्या फॅमिलीला कळवायचे आहे का ?... तुम्ही नंबर सांगा मी फोन करून सांगते."
"नको.. नको.. माझे आईबाबा गावी असतात... बाबा आजारी असतात... एकटी आई त्यांना सोडून इथे येऊ शकणार नाही... मी माझ्या मित्राचा रोहनचा नंबर सांगतो... तुम्ही त्याला कॉल करा आणि बोलवून घ्या."
नीरजने सांगितलेल्या नंबरवर साधनाने कॉल केला तर तिला समजले कि रोहनला कामानिमित्त सहा महिन्यांसाठी हैदराबादला पाठविले आहे. तिने तसे नीरजला सांगितल्यावर नीरजला आठवले,
"अरे हो... रोहनने तसे सांगितले होते मला... या accident मुळे बहुतेक माझ्या स्मृतीवर पण परिणाम झाला आहे.......... माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला...... Thank you once again... तुम्ही जा मॅडम... मी घेईन माझी काळजी आणि शिवाय इथे डॉक्टर नर्सेस आहेत..... माझ्या मेडिक्लेम ऑफिसरशी बोलेन मी....he will manage the expenses."
त्याच्या हतबलतेची तिला दया आली होती..... दया ही प्रेमाची पहिली पायरी असते ना!.... त्याला असे एकटे सोडून जावेसे तिला वाटत नव्हते....जवळचे कोणीही त्याच्यासोबत नव्हते .... आणि त्यात दृष्टी गेलेली..
साधनाने घरी फोन करून सर्व हकीकत सांगितली. तिच्या घरचे खूप समजूतदार होते... घरच्यांनी तिला प्रोत्साहनच दिले. सुरुवातीचे चार दिवस तिने कॉलेजमधून सुट्टी घेतली आणि नंतर ती कॉलेजला जायच्या आधी सकाळी आणि कॉलेज सुटल्यावर दुपारी त्याच्याजवळ राहू लागली. ती दोघं निरनिराळ्या विषयांवर गप्पा मारू लागले. एकमेकांना कधी स्वतःचे लहाणपणाचे गमतीदार प्रसंग सांगू लागले.. तर कधी त्यांचे वेगवेगळे अनुभव सांगू लागले.
त्याला सारखे सारखे हॉस्पिटलचे जेवण खावे लागते म्हणून ती त्याच्यासाठी सकाळचा नाश्ता आणू लागली. नाश्ता संपेपर्यंत ती त्याच्याजवळच थांबत असे. तिला सकाळी कधी यायला उशीर झाला कि तो बेचैन होतं असे. तिचा आवाज ऐकल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हसू यायचे.
सुरुवातीला दृष्टीहिनतेमुळे त्याला स्वतःच्या हाताने जेवता यायचे नाही तेंव्हा साधना त्याला आवडीने भरवायची.. त्याचे तोंड पुसायची. तिच्या स्पर्शाची तिच्या सोबतीची त्याला सवय झाली होती... सहवासाने प्रेमाचा रंग गहिरा झाला होता. तिने त्याला आजूबाजूच्या परिस्थितीचा अंदाज घेऊन चालायला शिकविले.
नीरज आता ठीक झाला होता. त्याच्या डोक्यावरची जखमही बरी झाली होती. महिन्याभरात त्याला घरी पाठविण्यात आले. खरी अडचण यावेळेला आली. त्याला डोळ्यांशिवाय घरी वावरायची सवय नव्हती.. कॉलेज सुटल्यावर दिवसभर साधना त्याच्याबरोबर राहायची.... पण रात्रीचे काय? शेवटी एक अविवाहित तरुणी एका अविवाहित तरुणाबरोबर राहणार तरी कशी? मग तिने त्याच्या शेजारील काकूंसोबत बोलून त्याच्यासाठी जेवणाचा डबा लावला आणि रात्री त्यांच्या मुलाला नीरजसोबत राहवयास सांगितले.
नीरजचे साधनावर प्रेम जडले... त्याच्याजागी कोणीही असते तर हेच झाले असते.. तिच्याशिवाय त्याला करमेनासे झाले. तिच्या सोबतीसाठी तो आसक्त असायचा. तिचे हसणे, तिचा आवाज, तिचा स्पर्श, तिचा गंध सगळे सगळे त्याला आवडू लागले होते.
साधनाचीही हीच अवस्था होती. पण तिला वाटायचे कि निरजवर कुठलीही मुलगी फिदा होईल... तिला तो आवडतो कारण तो आहेच तसा... हॅंडसम... अगदी प्रत्येक मुलीच्या मनातल्या स्वप्नातल्या राजकुमारासारखा.... पण पण त्याच्या देखणेपणाला साजेसे माझे रूप नाही.. उद्या दृष्टी आल्यावर आपल्याला बघून त्याचा अपेक्षाभंग होणार हे नक्कीच!
क्रमशः
*******
दुसरा आणि अंतिम भाग लगेचच पोस्ट करत आहे. दोन्ही भाग वाचून प्रतिक्रिया नक्की लिहा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा