तुझे माझ्या आयुष्यात येणे
जणू सुकलेल्या फुलाने नव्याने बहरणे.
तुझे माझ्या आयुष्यात येणे
जणु कोमेजलेल्या मनाने स्वप्नात नव्याने रमणे.
तुझे माझ्या आयुष्यात येणे
जणु आयुष्याला नवी उमेद घेऊन चैतन्याने जगणे.
तुझे माझ्या आयुष्यात येणे
जणु विखुरलेल्या माझ्या स्वप्नांना हळुवार सावरणे.
तुझे माझ्या आयुष्यात येणे
जणु माझ्या अबोल गाण्याला सूर मिळणे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा