Login

तुझेच सोबती भाग २

कुटुंबाची सोबत असणा-या एका मुलीची कथा
मागील भागात.

आजचा तिचा वाढदिवस दणक्यात साजरा केला गेला. त्या चाळीतल्या एकाने तर त्याच्या घरातला मोठा स्पीकर बाहेर काढून त्यावर गाणी लावली. त्यावर चाळीतल्या सगळ्या मुलांनी उड्या मारून घेतल्या होत्या.

यावर्षी राधाला मिळालेल्या भेटवस्तूंपैकी तिच्या घरच्यांनी दिलेली भेटवस्तू तिला खूपच आवडली होती.

आता पूढे.

तिच्या काका, आत्या, मामा आणि मावशी या सगळ्यांनी मिळून तिच्या क्लासची फी भरली जाईल इतकी रक्कम तिला दिली होती. ते बघून तिचे डोळे भरून आले. ते घेण्याआधी तिने तिच्या आई वडिलांकडे पहिले.

“त्याच्याकडे काय बघत आहेस?” तिचे मोठे काका “हे आम्ही देत आहोत. तो तर काय आतापासून आमच्यापासून लपवू लागला आहे. मग म्हटलं आम्हीच आमच्या लेकीकडे बघतो.”

“तस नाही अप्पा’ राधा जरा चाचरत बोलली. “पण आपल्या सर्वांची परिस्थती सारखीच आहे.”

“हो,” मोठे काका “पण एक फरक आहे. आपल्या पिढीतली तू पहिली मुलगी आहेस आणि तूच आजवर प्रत्येक वर्षी पहिला नंबर काढत आहेस.”

“म्हणून आम्हाला वाटत,” आत्या “की तू अजून पुढे जावस.”

“आमची चिऊ पण बोलते,” छोटे काका “की आम्ही राधाताई सारखे हुशार होणार.”

एवढ सगळ ऐकून राधा भारावून गेली होती. मग तिच्या वडिलांनी तिला ते पैसे घ्यायला लावले.

हा सगळा प्रकार तिच्या वर्गातले तिचे मित्र आणि मैत्रीणही बघत राहिले. काहींना त्यांच्या घराची आठवण आली, तर काहींना राधाच्या कुटुंबाचा हेवा वाटला. कारण स्वतःच्या हातच राखून दुसऱ्याला देणे, हे सर्वांनाच जमत नाही.

वाढदिवस झाल्यावर जेवणासाठी मिसळ पावचा बेत होता. त्यावरही सगळ्यांनी चांगलाच ताव मारला आणि जो तो जाच्या त्याच्या घरी निघून गेले.

ती रात्र राधाच्या घरचे पाहुणे त्यांच्याकडेच मुक्काम थांबले होते. त्यांच्यासाठी चाळीतली एक रिकामी खोली साफ करून दिली होती. जिथे घरातली सगळीच मुल आणि मुली झोपायला गेले. बऱ्याच दिवसांनी जमलेली ती सगळीच अशी थोडीच लगेच झोपणार होती. राधाच्या घरी मोठी माणसं आणि त्या दुसऱ्या खोलीत राधा आणि तिची सगळीच भावंड असे रात्री उशीरपर्यंत गप्पा मारत राहिले.

दुसऱ्या दिवशी राधा लवकरच शाळेत गेली. तर तिथेही काल राधाच्या घरी झालेल्या पार्टीचाच विषय चालू होता. तिला भेटलेले पैसे बघून काहींना खूपच कौतुक वाटल. तर काहींना आश्चर्य वाटल. तर काहींनी तिच्याकडे पैसे नाहीत म्हणून दिले अस बोलून कुत्सित हसले. कारण तिने नववी पर्यंत कोणताही क्लास न लावता पहिला नंबर काढलेला होता. त्यामुळे तिच्यावर जळणारी मुलही बरीच होती.

पण राधाने या सगळ्यांकडे सरळ दुर्लक्ष केल होत. कारण बाहेर कोणीही काहीही बोलल तरी तिचं कुटुंब तिच्यासोबत होत. म्हणून तिला ह्या गोष्टींचा काही फरक पडला नव्हता.

ह्यामुळे ती जळणारी मुल अजूनच राधावर राग राग करू लागली होती. राधाच्या मैत्रिणींनाही हि गोष्ट माहिती असल्याने त्यांनी कधीच राधाच्या अभ्यासाच्या वह्या ग्रुप सोडून इतर कोणालाच दिल्या नव्हत्या. कारण मागे दोन वेळेस राधाची घरच्या अभ्यासाची वही पूर्ण असूनही कोणीतरी ती परत न दिल्याने राधाला तिच्या शिक्षकांचा खूपच ओरडा खावा लागला होता. तेव्हापासून राधा आणि तिचा तो ग्रुप ह्याबाबत जरा सांभाळूनच होता.

दिवसांनी परत त्यांचा पळण्याचा वेग धारण केला. यंदाच्या सहामाही परीक्षेत राधा तिच्या वर्गात नेहमीप्रमाणेच पहिली आली. तिचं सगळ्या शिक्षकाकडून कौतुक झाल. एवढच काय? आंतर शालेय झालेल्या एका वक्तृत्व स्पर्धेतही तिचा दुसरा क्रमांक आला होता. तिच्या मोठ्या काकांचा मुलगा हा शिक्षक व्हायच्या मार्गावर होता. त्याच वक्तृत्व चांगल होत. मग त्यानेच तिची सगळी तयरी करून घेतली होती.

एके दिवशी शाळेतून घरी आल्यावर राधाने तिची बॅग उघडून जेवणाचा डब्बा तिच्या आईकडे दिला. दुपारच जेवण झाल्यावर अभ्यास करायचा म्हणून तिने आता लगेच तिची वही आणि पुस्तक बाहेर काढल. कारण संध्याकाळी परत क्लास होता. नंतर वेळ मिळणार नव्हता. म्हणून ती दुपारीच तिच्या शाळेचा अभ्यास आटपून घेत होती.

वही बाहेर काढून ठेवताना तिच्या त्या वहीतून एक कागद बाहेर पडला. तस तिने तो सहज उचलून पहिला आणि तिला धक्काच बसला. तिला बसल्या जग्गीच घाम फुटला. कारण त्या कागदावर तिच्या नावच प्रेमपत्र होत. ज्यावर पाठवणाऱ्याच नाव नव्हत. ते बघून ती आतून खूपच घाबरून गेली. ती भीतीने थरथर कापायला लागली. चेहऱ्यावर घाम जमा व्हायला सुरवात झाली.

हा कागद घरच्यांना सापडला तर त्यांना काय वाटेल? खूप मार पडेल. आई बाबांना बोलणी बसतील. काय करू? असे नाना विचार तिच्या डोक्यात थैमान घालायला लागले. तिला इतक पण भान राहील नव्हत की तिची आई तिला कधीची आवाज देत होती. ती एकदमच जवळ येउन आवाज देऊ लागली तेव्हा ती तिच्या विचारातून बाहेर आली आणि एकदमच दचकली.

“काय गं?” आई तिला अस घाबरलेलं बघून काळजीने विचारू लागली. “काय झाल? आवाज देत आहे कधीची तुला.”

“क.. का.. काही नाही.” राधा स्वतःला सावरत बोलली. “ती वही सापडत नव्हती ना. मग वाटल की राहिली की काय कुठे?”

“आता सापडली ना?” आई हलकेच हसत बोलली. “चल तो डबा काढून दे आणि जेवायाला चल.”

राधाने तिची मान खालीवर करत ती येत असल्याच सांगितलं. तिची आई तिथून गेल्यावर तिने दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला नॉर्मल करत ती जेवायला निघून गेली.

क्रमशः

अष्टपैलू लेखक स्पर्धा

🎭 Series Post

View all