मागील भागात.
“काय गं?” आई तिला अस घाबरलेलं बघून काळजीने विचारू लागली. “काय झाल? आवाज देत आहे कधीची तुला.”
“क.. का.. काही नाही.” राधा स्वतःला सावरत बोलली. “ती वही सापडत नव्हती ना. मग वाटल की राहिली की काय कुठे?”
“आता सापडली ना?” आई हलकेच हसत बोलली. “चल तो डबा काढून दे आणि जेवायाला चल.”
राधाने तिची मान खालीवर करत ती येत असल्याच सांगितलं. तिची आई तिथून गेल्यावर तिने दीर्घ श्वास घेतला आणि स्वतःला नॉर्मल करत ती जेवायला निघून गेली.

आता पूढे.
तो कागद तर तिने वेळ काळ बघून कधीच फाडून फेकून दिला. मनात ज्याने कोणी ठेवला होता त्यालाही खूप भांडून घेतलं. पण पुढचे तीन ते चार दिवस ती सतत तणावात राहीली. घरच्यांनी तिला याबद्दल विचारलं पण होत. पण तिने दुसर काहीतरी कारण सांगून सध्या त्यावर पांघरून घातलं होत.
परत काही दिवस शांततेत गेले. नंतर पुन्हा तिच्या वहीमध्ये तसाच एक कागद तिला सापडला. ती परत घाबरून गेली. कारण तो कागद कधी ठेवला जात होता? ते तिलाच समजत नव्हत. या कागदावर तर तिच्या सौंदर्याच वर्णनही केले होत. मग तिने तो कागद घेऊन तिच्या मैत्रिणींसोबत चर्चा केली. पण त्यानंही काहीच कल्पना नव्हती. आता राधाला खूपच रडायला यायला लागलं.
तिच्या मैत्रिणीनी तिला त्याबद्दल शाळेत तक्रारही करायला सांगितली. पण त्या कागदावर कोणाचाही नाव नसल्याने सगळे मलाच भांडतील, मलाच चुकीच ठरवतील हा विचार करून तिने घाबरून तक्रार करायलाही तिने नकार दिला.
परत एक आठवडा व्यवस्थित गेला. मग राधा जरा निवांत झाली. सगळ काही ठीक चालू असल्याचे बघून राधा नेहमीसारखी वागू लागली. मग तिने नंतर काही बॅगेतून सामान काढताना काही खबरदारी घेतली नव्हती.
एके दिवशी राधा तिच्या क्लासवरून परत आली असताना, तिला तिच्या घरातलं वातावरण वेगळच भासल. घरात तिच्याशी कोणीच बोलत नव्हत. प्रतिक तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता. पण आईने त्यालाही थांबवलं होत.
राधाला आता खूपच भीती वाटायला लागली. तिचे वडीलही तिच्यावर खूपच चिडलेले दिसले. त्या दिवशीच्या रात्रीची जेवण खूपच शांततेत गेली. राधाने जरा धाडस करून बोलण्याचा प्रयत्न केला. पण कोणीही तिच्याशी बोलले नाही. राधा आता आतून खूपच हवालदिल झाली.
‘परत तर कोणी तो कागद तर नाही?.....’ हा विचार करूनच तिच्या अंगावर सरकन काटा आला. तिच्या हृदयाची स्पंदने खूपच जोरजोरात धावायला लागली. डोळे तर कधीच अश्रुंनी भरून वाहायच्या तयारीत होते.
“उद्या बोलूया.” आईच्या ह्या दोन शब्दांनी ती गपचूप जाऊन झोपी गेली.
‘उद्या काय होणार?’ ह्या विचाराने तिची झोप तर खूप लांब पळून गेली होती. पहाटे केव्हातरी तिचा डोळा लागला. म्हणून तिला जागही उशिराच आली. त्यात तिला कोणी उठावलेही नव्हते.
आज कोणीच उठवयाला आल नाही, हे बघून राधाला तिची भीती खरी वाटायला लागली. आजची शाळा मात्र बुडाली होती.
‘माझी शाळा तर बंद नाही करणार ना?’ हा विचार तिच्या मनात चमकून गेला. शांत झालेले तिचे डोळे परत भरून आले. आता तिला राहावलच गेल नाही.

‘माझी काही चुकी नाही तर मी का त्याची शिक्षा भोगू?’ राधा मनातच विचार करत तिच्या बिछान्यातून तडक उठली आणि आतल्या खोलीकडून बाहेरच्या खोलीकडे जाऊ लागली. जशी ती बाहेर आली तशी ती थबकलीच. कारण बाहेरच्या खोलीत तिचे दोन्ही काका आणि आत्या येऊन बसल्या होत्या. राधाला आलेलं बघून त्यांच्या गप्पा थांबल्या गेल्या.
राधाचे लाल झालेले डोळे बघून कोणीही सहज सांगू शकत होत की ती रात्रभर झोपलीच नव्हती ते. तिच्या आत्याने तिला तिच्या जवळ बोलावले. तशी राधा मान खाली घालूनच तिच्या आत्याजवळ गेली. तिने राधाचे भरून आलेले डोळे पुसले.
तेवढयातच राधाच्या मोठ्या काकांनी एक कागद बाहेर काढला आणि राधासमोर धरला. तो कागद आणि त्यावरच अक्षर बघून राधा थरथरायला लागली. आता तिला किती बोलणी आणि मार बसेल ह्या विचारानेच तिच्या शरीरात कंपने जाणावयाला लागली.
तिला इतक घाबरलेलं बघून आत्याने तिच्या हाताला आपल्या हातात घेऊन धीर दिला. तशी राधाची कंपन जरा कमी झाली. ती आता कोणाकडेही वर मान करून बघत नव्हती.
“म.... म.... मी..” राधा थरथरत बोलू लागली. “मी नाही.. नाही ... काही... काही माहित.”
“मग एवढी घाबरते कशाला?” मोठे काका जरा कडक आवाजात बोलले.
तसे तिच्या डोळ्यातले धरून ठेवलेले अश्रू लगेच गालावर ओघळले. ते अश्रू तिने हलकेच तिच्या उलट्या हाताने पुसले.
“कधीपासून चालू आहे हे?” लहान काका
“मी नाही ना काही केल.” राधा आता रडतच बोलू लागली.
“अरे बाळा,” राधाने रडलेले बघून तिच्या आत्याने लगेच तिला जवळ घेतलं. “आम्ही अस कुठे बोलत आहोत की तू काही केल आहेस.”
“मग कालपासून आई बाबा माझ्याशी बोलले पण नाहीत.” राधा हुंदके देत बोलली. “मी विचारत पण होती.”
“आता हा असा कागद सापडल्यावर ते काय करणार होते?” मोठे काका “त्याला काही सुचल नाही म्हणून त्याने लगेच आम्हाला फोन करून बोलावून घेतलं. म्हटलं आधी तिला विचार, लगेच तिला भांडत बसू नकोस. म्हणून तो शांत बसला.”
राधाच्या आईचे डोळेही आता भरून आले होते. ती पण तर कालपासून तिच्यासोबत बोलली नव्हती.
“आता सांग कधीपासून चालू आहे हे?” लहान काका
“मी नाही ना काही केल.” राधा अजूनच जोरात रडायला लागली.
तिचा आवाज ऐकून त्यांच्या शेजारच्या मावशीही लगेच त्यांच्या घरात आल्या. राधाला अस रडताना बघून त्यांनाही लगेच भरून आल.

क्रमशः
अष्टपैलू लेखक स्पर्धा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा