मागील भागात.
राधाच्या आईचे डोळेही आता भरून आले होते. ती पण तर कालपासून तिच्यासोबत बोलली नव्हती.
“आता सांग कधीपासून चालू आहे हे?” लहान काका
“मी नाही काही केल.” राधा अजूनच जोरात रडायला लागली.
तिचा आवाज ऐकून त्यांच्या शेजारच्या मावशीही लगेच त्यांच्या घरात आल्या. राधाला अस रडताना बघून त्यांनाही लगेच भरून आल.

आता पूढे.
“राधा का रडत आहे अशी?” त्याही राधाजवळ येत विचारू लागल्या.
“अगं येडपट.” लहान काका आता जरा वैतागून बोलले. “हा कागद कोण आणि कधीपासुन पाठवत आहे? ते विचारत आहे.”

“कोण ते माहिती नाही.” राधा तिचे हुंदके आवरत बोलली. “आणि माग्च्च्या महिन्यापासून तो कागद येत आहे.” नंतर ती हळूच बोलली.
“आणि तू आता सांगत आहेस?” आत्या आठ्या पाडून बोलली.
“मी घाबरली होती.” राधा “शप्पथ घेऊन सांगते, त्याच्याबद्दल मला काहीच माहिती नाही. माझ अस काहीच....” राधा पुन्हा रडायला लागली.
“तरी तेच.” मोठे काकांच्या चेहऱ्यावरही आता आठ्या आल्या. “आम्ही बोललो का की तू काही केल आहेस? तुला कधीपासून हा त्रास होत आहे? ते विचारत आहे फक्त.”
आता राधा तिच्या मोठ्या काकांकडे गोंधळून बघू लागली. ते काय बोलत होते? तेच तिला समजत नव्हत.
तेवढयातच राधाच्या मोठ्या काकांचा मोठा मुलगा तिथे पोहोचला. त्याच्यासोबत राधाच्या वर्गातली काही मुल आणि त्यांचे आई वडीलही होते. त्यांना बघून घरातले सगळेच गोंधळले.
काल राधाच्या बॅगमधून तिचा जेवणाचा डब्बा काढताना राधाच्या आईला परत तो कागद सापडला होता. त्यातही राधाबद्दल जरा नको ते शब्द वापरले होते. ते बघून राधाच्या आईला खूपच टेन्शन आल. त्यांनी लगेच तो कागद राधाच्या वडिलांना दाखवला. तसा त्यांनाही धक्काच बसला.
मुलांवर शिक्षणावर रक्ताच पाणी करून खर्च केला आणि त्यांनतर त्यांना अस काही बघायला मिळाल्यावर त्यांना टेन्शन येण स्वाभाविक होत. त्यांना काहीच सुचल नव्हत म्हणून त्यांनी त्यांच्या भावाला फोन करून सगळ त्याच्या कानावर टाकल. वडिलानंतर तेच तर त्यांचा भक्कम आधार होते. मग त्यांनीच त्या कागदाचा फोटो मागवून घेतला आणि त्यांच्या मोठ्या मुलाकडे दिला. जो नुकताच पोलीस विभागात पी एस आय म्हणून कामाला लागला होता. तो अगदीच तिसऱ्या क्रमांकाने पास झालेला असल्याने त्याला त्यांच्या रहात्या भागातच पहिली पोस्टिंग मिळाली होती.
त्याला जसा तो कागद मिळाला. तसा तो कागद घेऊन तो सरळ राधाच्या शाळेत पोहोचला. त्या कागदावरचा मजकूर वाचून त्याचा रागही शिगेला पोहोचला होता. राधा एकतर त्यांच्या पिढीतली पहिली मुलगी होती. तिच्यावर आधीच त्यांचा खूप जीव होता आणि तेवढाच विश्वासही होता. म्हणून त्याने तिच्या बोलण्याधीच पहिले तिचा वर्ग गाठला.
तो जाऊन मुख्याधापाकाच्या खोलीत बसला. पोलिसाला आलेलं बघून तो मुख्याध्यापकाही जरा घाबरलाच. राधाच्या भावाने सर्वात आधी तो कागद त्यांच्या समोर ठेवला आणि राधाच्या वर्गातल्या सर्व मुलांच्या वह्या मागून घेतल्या. ज्या वहीवरची अक्षर जुळली त्याच मुलाला त्यांनी बोलावून घेतले. राधाच्या भावाने जरा पोलिसी रुबाबात विचारले असता तो घाबरून पोपटासारखा बोलू लागला. त्यानेही दुसऱ्या एका मुलाच्या सांगण्यावरून ते लिहील असल्याच सांगितलं. मग त्या मुलाला बोलावण्यात आले.
तो मुलगा जरा रुबाबात आला आणि त्याने अस काहीच न सांगितल्याच बोलू लागला. तस ज्या मूलाने ते लिहील होत तो त्या मुलाला जागीच भांडू लागला.
“त्याच्या फक्त बोलण्यावरही मी तुला आत टाकू शकतो.” राधाचा भाऊ रागात कडाडला.
तसा तो रुबाबात बोलणारा मुलगा आता घाबरून जाऊन ते त्यानेच केल असल्याच कबुल झाला. तिच अस नेहमीच वर्गात पहिलं येण त्याला खटकल होत. तिच्यामुळेच त्याचा पहिला नंबर येत नाही अस त्याला वाटत होत. स्पर्धेतही पाहिलं येणही त्याला खटकू लागल होत. म्हणून तिचं अभ्यासावरून मन भरकटून जाव किंवा तिची शाळा तरी सुटावी म्हणून त्याने हा सगळा उद्योग केला होता.
ते सगळ बघून त्या वर्गाची वर्गशिक्षिका आणि मुख्याधापक धक्क्यातच गेले होते. आपल्या शाळेच नाव खराब होऊ नये म्हणून ते आता राधाच्या भावाला ते प्रकरण तिथेच थांबवण्याची विनंती करू लागले. ते बघून राधाच्या भावाला अजूनच राग आला.
“तुमच्या आशा वागण्यानेच अशा मुलाचं फावत.” राधाचा भाऊ “आता शाळेतली मुल आहेत म्हणून मी काही तक्रार फाईल करत नाहीये. पण ह्यांच्या पालकांना बोलावून घ्या. हिच्या घरी जो निर्णय होईल तो तुम्हाला कळवला जाईल.”
मग त्या मुख्याध्यापकांनी त्या मुलांच्या पालकांना बोलावून घेतलं आणि ते आता राधाच्या घरी पोहोचले होते.
त्या मुलाला बघून राधाच्या अंगात कुठून बळ आल काय माहित? ती सरळ त्याच्याजवळ गेली आणि त्याला तिच्या दोन्ही हातांनी मारू लागली. त्या मुलाच्या आईने तिला अडवल तेव्हा ती शांत झाली.
राधाच्या मोठ्या काकाच्या मोठ्या मुलाने शाळेतल सगळ काही त्यांना सांगितलं.
“बोला आता काय करायचं?” मोठे काका त्या मुलांच्या आई वडिलांकडे बघत बोलले.
“टाळी एका हाताने वाजत नाही.” त्या मुलाचे वडील आता जरा चिडून बोलले.
“माझ्या मुलीबद्दल एक शब्दही काढलात तर याद राख.” मोठे काका कडाडले.

क्रमशः
अष्टपैलू लेखन स्पर्धा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा