मागील भागात.
राधाच्या मोठ्या काकाच्या मुलाने शाळेतल सगळ काही त्यांना सांगितलं.
“बोला आता काय करायचं?” मोठे काका त्या मुलांच्या आई वडिलांकडे बघत बोलले.
“टाळी एका हाताने वाजत नाही.” त्या मुलाचे वडील आता जरा चिडून बोलले.
“माझ्या मुलीबद्दल एक शब्दही काढलात तर याद राख.” मोठे काका कडाडले.

आता पूढे.
“स्वतःच्या मुलाची चुकी लपवताना लाज नाही वाटत? तुमच्या मुलाने पाठवलेला कागद तूम्ही वाचला नाही का?”
मोठे काका रागातच बोलत होते.
मग तेही शांत झाले.
“आधीच मुलांवर लक्ष ठेवलं असत तर अशी वेळच आली नसती.” मोठे काका पून्हा बोलायला लागले. “जिथे गरज आहे तिथेच पाठीशी घाला. चूक असेल तर पहीले कान धरा. नाहीतर मूलांना वाईट वळणावर जायला वेळ लागत नाही.”
मोठे काका बोलून परत शांत बसले. थोडावेळ कोणी काहीच बोललं नाही.
“एकतर शाळा बदलायची नाहीतर वर्ग तरी.” आत्यांनी शांतता झालेली बघून त्यातल्या त्यात मधला मार्ग सुचविला. कारण काहीतरी उपाय काढावा तर लागणारच होता.
आतापर्यंत तर सगळ्या चाळीत ही बातमी पसरली की राधाला कोणीतरी त्रास देत होत आणि ते तिच्या घरी आले आहेत. तसे ते सगळेच राधाच्या घरी जमा व्हायला लागले. तिथल वातावरण आता तापू लागल.
राधासाठी एवढे सगळेच गोळा होऊन आले पाहिल्यावर त्या मुलांची भीतीने गाळणच उडाली. मुलच काय तर त्यांचे आई वडीलही क्षणभर भांबावले. जो येईल तो त्यांना रागात जाब विचारू लागला. मग राधाच्या आईने बाकी सगळ्यांना कसेतरी आवरले.
“हिच्यासाठी एवढी माणस जमा झाली.” मोठे काका त्या मुलांच्या आई वडिलांकडे बघत अभिमानाने बोलले. “तरी तुम्हाला तिच्यावर शंका घ्यायची आहे? पण एक लक्षात ठेवा. काही झाल तरी तिचं हे कुटुंब तिच्या पाठीशी ठामपणे उभ राहील. कारण ती कधी अशी चूक करूच शकत नाही ज्याने आमची मान खाली जाईल.”
राधा तर तिच्या काकांच्या बोलण्याने भारावून गेली होती. ती आधी मनाने घाबरून गेली होती की आपल्याला किती मार बसेल? आपल्याला मिळालेले पैसे बाबांना परत करावे लागतील. माझ्यामुळेच त्यांनाही मान खाली घालावी लागेल. अशा एका ना अनेक विचारांनी ती थरथरली होती. पण तिच्या मोठ्या काकांच्या बोलण्याने आता तिला बराच धीर मिळाला. आपण उगाच घाबरून लपवत बसलो. हे आधीच सांगीतल असत तर. हा विचार तिच्या मनात उभारला. कुटुंबाने तिच्या पाठीशी उभ रहात तिला भक्कम साथ दिली होती. ते बघून ती तिच्या मोठ्या काकांना जाऊन बिलगली होती.
त्या मुलांनी लागलीच राधाची सर्वांसमक्ष माफी मागितली. पण ती काहीच बोलायच्या मनस्थितीत नव्हती. मग तिच्या मोठ्या काकांनीच त्यांना जायला सांगितले. ते जातानाही जरा घाबरतच गेले. कारण सगळी चाळ तिथे त्यांनाच रागात बघत होती.
मोठ्या काकांच्या मोठ्या मूलाने लगेच राधाच्या शाळेत फोन करून त्यांचे वर्ग बदलायला लावले. लहान म्हणून माफही केल गेल आणि शिक्षा म्हणून त्यांना राधाच्या घरातच कान पकडून उठाबशाही काढायला लावल्या होत्या. त्यांचे वर्गही बदलायला लावले.
राधाचे मित्रही आता तिथे येऊन पोहोचले होते. कारण शाळेत पोलीस आल्याने ती चर्चा रंगली चांगलीच होती. मग राधाच्या आईने त्यांनाही ह्याबद्दल विचारल. तेव्हा तिच्या मैत्रिणीनेही 'आम्ही राधाला तक्रार करायला सांगितली होती. पण तिनेच घाबरून नाही केली.' अस सांगून दिल. मग ते सगळेच राधाकडे बघू लागले. राधा परत मान खाली घालून बसली.
“तू आधीच सांगितलं असत तर ही वेळच आली नसती.” राधाच्या काकांचा मोठा मूलगा तिच्याजवळ जात बोलला.
“मी घाबरून गली होती. मलाच ओरडा पडणार, माझी शाळा सुटणार अस वाटायला लागल होत.” राधाचा आवाज परत भरून आला.
तस तिच्या आईने तिला जवळ घेतलं. “मला माहित होत की तू अस काहीच करणार नाहीस. फक्त आधी का सांगितलं नाही? म्हणून आम्हाला राग आला होता.”
“नाही, तू माझ्याशी बोलली पण नाहीस.” राधा रुसून जात तिच्या आत्याला जाऊन बिलगली. “किती घाबरली होती मी.”
“बोलायचं ना ओ तिच्याशी.” शेजारच्या मावशी आता लटक्या रागात राधाच्या आईला भांडू लगली. “उगाच रडवलं आमच्या पोरीला.”
“नाही काही सुचत अशा वेळेला बाळा.” आत्याने राधाला प्रेमाने समजावलं. “उगाच तुला काही वेगळ वाटायला नको म्हणून. पण मग तुला ती ओरडली का?”
राधा मानेने नाही बोलली.
“मग आल की यातच सर्व.” आत्या “एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ हे कुटुंब आपल्या मुलांच्या पाठीशी सदैव उभ होत आणि असेल. कारण तुम्ही चुकीच काही करणार नाही हा आमचा विश्वास आहे.”
तेव्हा कुठे राधा तिच्या आई वडिलांना जाऊन बिलगली. नंतर राधाच्या ग्रुपनेही तिची भेट घेतली.
“बोलली होती ना की सांग कोणालातरी.” राधाची मैत्रीण जरा चिडून राधाला बोलली. “चूक नसताना उगाच घाबरत बसलीस.” नंतर तिनेही राधाला हलकेच मिठी मारली.
नंतर तेही त्यांच्या घरी निघून गेले. सगळ काही निवांत झालेल बघून चाळीतले शेजारीही राधाला प्रेमाने समजावत आपापल्या घरी गेले.
राधा बराच वेळ आपल्या आईच्या कुशीत बसून राहिली.
दुसऱ्याच दिवशी त्या मुलांचे वर्ग बदलण्यात आले. त्यांनी परत कधी राधाचा रस्ता अडवला नाही. कारण त्या दिवशी त्यांनी तिच्या पाठीशी असलेल मोठ्ठ कुटुंब पाहील होत. राधा परत तिच्या अभ्यासाला जोमाने लागली आणि दहावीच्या परीक्षेत शाळेत पाहिल्या क्रमांकाने आलीच. पण तिच्या जिल्ह्यातूनही तिसऱ्या क्रमांकाने आली. तिच्या पाठीशी असलेल्या तिच्या कुटुंबाचा विश्वास तिने सार्थ ठरवला होता.

समाप्त.
अष्टपैलू लेखन स्पर्धा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा