Login

तुझी माझी प्रीत

दोन जीवांची प्रीतीची गोष्ट सांगणारी प्रेममय कविता

सांजवेळी या
निळया आभाळी
तुझ्यासाठी घेतला
रवीराजाला ओंजळी

पाहून ते प्रिया माझी
गेली अशी हरखून
हर्ष व्यक्त करी
कर मुखवरी ठेवून

हसून विचारे मी
आवडली का तुला भेट?
म्हणे ती भिडली की रे,
काळजाला थेट

वृक्ष माडांचेही दोन्ही
हळूच वाकून पाही
म्हणतात जसे आम्ही असू
तुमच्या प्रेमाचे ग्वाही

तुझी माझी प्रीत
जाऊ दे अशीच बहरून
ओंजळ सुखाची
राहू दे अशीच भरून

©️ जयश्री शिंदे