Login

तुझी साथ हवी मला... भाग 45

विकासच्या पार्टीचे मुले चौकशी करत होते, तिकडे आदेशच्या ऑफिस मध्ये कोण आला आहे, विकास साहेब विचारत आहेत,


तुझी साथ हवी मला... भाग 45

©️®️शिल्पा सुतार
.........

अभिजीत काव्या छान बोलत होते,

"तुला माहिती आहे का अभिजीत आज आदेश नाराज होता",.. काव्या.

"का काय झालं आता, मीटिंगचं काम झालं नाही का",.. अभिजीत.

"तुला तेच दिसतं का फक्त अभिजीत, ती प्रिया त्याला भेटायला येत नाही म्हणून नाराज आहे तो",.. काव्या.

आता अभिजीत हळूच हसत होता,.. "काय झालं आता प्रियाला? भांडले की काय ते, खूप त्रास असतो मुलांना, काय करणार माझा भाऊ बिचारा ",

" थांबणार का जरा अभिजीत, आणि एवढा काय त्रास झाला तुला माझ्या सोबत, नंतर बघते, प्रियाच्या घरचे म्हणत आहेत लग्न करून घ्या असं फिरणं चांगलं नाही, म्हणून प्रिया आदेशला भेटायला येत नाही ",.. काव्या.

" मग काय प्रॉब्लेम आहे, करून घ्या म्हणा लग्न ",.. अभिजीत.

" आपल्या घरच्यांनी अजून काही ठरवलं नाही हाच प्रॉब्लेम आहे ",.. काव्या.

" असं आहे तर आता आदेशने तुला हे सगळ्यांना सांगायला सांगितला आहे का, त्याची असिस्टंट ",.. अभिजीत.

" नाही आदेश किती चांगला आहे तो काहीच म्हणत नव्हता, मीच विचारलं त्याला आणि अभिजीत तू आदेश वर एवढा राग का करतो काढतो, किती साधा आणि चांगला मुलगा आहे आदेश",.. काव्या.

"तो आत्ता तसा दिसतो आहे तुला, त्याआधी इतके वर्ष तो काय होता हे माहिती नाही, आम्हाला सगळ्यांना घरच्यांना माहिती आहे",.. अभिजीत.

" काही का असेना आदेशला काही म्हणायचं नाही, एकदम चांगला मुलगा आहे आदेश ",.. काव्या.

" चांगलं आहे तुम्ही दोघं एका टीम मध्ये",.. अभिजीत.

" हो मग आम्ही एका डिपार्टमेंट मध्ये आहोत ना ",.. काव्या.

" आपण काय फक्त गप्पा मारत बसणार आहोत का",.. अभिजीतने उठून काव्याला जवळ घेतलं,

" ते सांग आधी माझ्या मुळे काय त्रास झाला तुला? म्हणे मुलांना खूप त्रास असतो मुलीं मुळे ",.. काव्या.

" खूप त्रास झाला ",.. अभिजीत.

" काय पण ",.. काव्या.

" नंतर सांगतो आता वेळ नाही ",.. त्याने लाइट ऑफ़ केला.
.........

सकाळी चहा नाश्ता झाल्यानंतर सगळेच ऑफिसला निघाले, एका गाडीत पुढे आदेश बसला होता, ड्रायव्हर गाडी चालवत होता, काव्या आणि अभिजीत मागे होते,

अभिजीत शांत बसूनही मेल बघत होता, काव्या आणि आदेश नेहमीप्रमाणे खूप बोलत होते,

आशाताईंनी सगळ्यांना डबे आणून दिले, आजी बाहेरपर्यंत आल्या होत्या. त्या छान बोलत होत्या सगळ्यांशी.

"आता आम्ही दोघीच राहिलो ऑफिसला यायचं, आम्ही पण आता सुरुवात करणार आहोत कामाला",.. आशा ताई.

" चालेल आई आजी आपल्या तिघींचं एक डिपार्टमेंट",.. काव्या.

"बापरे मग तर ते हेड डिपार्टमेंट असेल सगळेच बॉस एका जागी",.. आदेश.

"नुसतं नावाला आम्हाला बॉस म्हणायचं तुम्ही दोघेच बॉस आहात",.. आशा ताई.

" हो बरोबर आहे",.. काव्या.

" तुला व्हायचं आहे का वहिनी बॉस",.. आदेश.

"नाही काही येत नाही आहे अजून, खूप काम शिकायचं आहे मला",.. काव्या.

" ती आहे बॉस अभिजीतची म्हणजे ऑफिसची मेन बॉस",.. आजी.

" बरोबर आजी",.. सगळे हसत होते,

" लवकर या घरी तिघांनी",.. आशा ताई.

" बाबा केव्हा येतील ऑफिस मध्ये ",.. अभिजीत.

अकरा वाजता.

ते निघाले

"दादा तू आज हेल्प करणार ना आम्हाला",.. आदेश.

"हो पण बारा नंतर येईल मी त्याआधी मला माझे काम आहेत",.. अभिजीत.

"ठीक आहे तोपर्यंत मी सगळे काम करतो",.. आदेश.

सगळे ऑफिसमध्ये आले, नेहमीप्रमाणे पवार सर सगळ्यांना काम देत होते,

"माझं काम काय आहे",.. काव्या.

"तेच एन्ट्री घ्यायच काम आहे यावेळी ",.. पाच मिनिटांनी पवार सरांनी काव्याला बरेच जुने रेकॉर्ड आणून दिले,.." याच्या सगळ्या व्यवस्थित एंट्री घ्याव्या लागतील तुम्हाला मॅडम, नीट बघून घ्यायच्या एन्ट्री ",

"ठीक आहे ",.. काव्या कामाला लागली.

बारा नंतर अभिजीत या डिपार्टमेंट मध्ये आला, बरेच जण कामात इनवॉल होते, त्यामुळे ते सगळे जण बाहेर बसूनच काम करत होते,

काव्याला नव्हतं ते काम त्यामुळे ती तिचं तिचं काम करत होती, अभिजीत आला तर तिचं लक्षच नव्हतं,.." काय चाललं आहे मॅडम?",

ती दचकून बघत होती,.. "एवढं घाबरण्यासारखं काय आहे माझ्यात, इथे काय करणार आहे मी तुला" ,

"तसं नाही अभिजीत मी जरा माझ्या कामाचं बघत होती, बऱ्याच एन्ट्री वेगळ्या वेगळ्या आहेत, मला डिस्टर्ब करू नको, आणि काहीही बोलू नकोस, हे ऑफिस आहे",.. काव्या.

" बापरे बिझी दिसत आहेत मॅडम" ,.. अभिजीत तिच्या जवळच बसलेला होता.

" काय आहे? इथून जा अभिजीत ",.. काव्या.

" का तुझ लक्ष विचलित होतं का मला बघून, बसू दे ना मला इथे तुझ्या जवळ, बघु दे काय काम करते तू ",.. अभिजीत.

काव्या हसत होती,.." पुरे आता अभिजीत कोणी ऐकलं, सगळे इकडे बघत आहेत, तुम्ही लोक उद्याचे मीटिंग काम करत आहात ना तो ग्रुप तिकडे आहे तू तिकडे जाऊन काम कर",

" तू नाही का त्या ग्रुप मध्ये ",.. अभिजीत.

नाही.

" आदेशला सांगतो थांब तुला घ्यायला ",.. अभिजीत.

" नको अभिजीत मला माझं हेच इंट्रीच काम आधी शिकू दे",.. काव्या.

" तू पण चल तिकडे थोड्या वेळ ",.. अभिजीत.

" ती काय प्रेक्षणीय जागा आहे का काहीही, मी काय करू तिकडे येवून तेवढ्या वेळात माझ बरच काम होईल ",.. काव्या.

" ठीक आहे मग मी मदत करणार नाही तुमच्या डिपार्टमेंटला, तू आलीस तरच काम होईल",.. अभिजीत.

" चल बाबा चल.. याला काय अर्थ आहे, काय करणार आहे मी तिथे",.. काव्या.

दोघेजण त्या ग्रुप मध्ये आले, जोरात काम सुरू होतं, अभिजीत काव्या शेजारी शेजारी बसले होते, दोघ अजूनच एकमेकांशीच बोलत होते, अभिजित काहीही करत नव्हता,

पवार सर आदेश कडे बघत होते,

" वहिनी तू आहे का या ग्रुपमध्ये",.. आदेश.

नाही... काव्या उठून उभी राहिली मी जाते.

काव्या जाणार होती तर अभिजीत तिच्याकडे बघत होता,.. "मी काम करणार नाही आधीच सांगतो",

काय करावं असं काव्याला झालं होतं, अभिजीत सगळ्यांसमोर नीट सांगतही नव्हता आणि आदेश तिला जागेवर जायला सांगत होता, शेवटी तीने आदेशला इकडे बोलवलं, ... "अभिजीतला सांग काहीतरी",

"काय झालं दादा",.. आदेश.

"अभिजीत म्हणतो आहे की मी इथून गेली तर तो आपल्या डिपार्टमेंटला मदत करणार नाही",.. काव्या.

"दादा तू असं म्हटलं का",.. आदेश.

"हो काव्या इथेच थांबेल माझ्या जवळ",.. अभिजीत.

"ठीक आहे, काय एक एक",.. आदेश हसत होता, बस तू वहिनी इथे, अजिबात दादा इथून जाता कामा नये, आपल काम व्हायला पाहिजे, दादाशी छान बोलत रहा म्हणजे तो खुष राहील, मी पटकन फाइल आणतो, मधे मधे दादा काही तरी महत्वाचे बदल सांगतो ते लिहून घे फक्त.

काव्या हसत होती.

"आपल्या डिपार्टमेंट साठी एवढ तर करशील ना तू",.. आदेश.

हो.

जोरात काम सुरू झालं, काव्या पण थोडी मदत करत होती, जे काही अभिजीतला लागेल ते आणून देत होती, थोडा हिशोब बघत होती, एक दीड तासात काम, बर झालं,

लंच ब्रेक झाला, शिपाई काकांनी अभिजीतचा डब्बा इकडे आणून दिला,

" चल काव्या जेवायला",.. काव्या अभिजीत आदेश छान जेवत होते, आदेशला मध्येच फोन आला तो बाजूला जाऊन फोनवर बोलत होता,

अभिजीत काव्याचं जेवण झालं... "चल मी जातो आता माझ्या शॉप मध्ये",.

"मी नको येऊ का तिकडे आता, तुला मी समोर हवी ना",.. काव्या.

"चल मग, आता तर खरंच घेऊन जाईल मी तुला तिकडे माझ्या डिपार्टमेंट मध्ये, दिवसभर तुला माझ्यासमोर बसून राहाव लागेल",.. अभिजीत.

"नको बाबा त्यापेक्षा माझं हे एन्ट्री घ्यायचं काम बरं. मी जाते, आता नाहीतर पवार साहेब ओरडतील",.. काव्या गेली,

आदेश येऊन बसला,

" हे बघ आदेश आता नव्वद टक्के काम झालं आहे काळजी करू नको बाकीचे मी सांगितलं आहे तसच दिवसभर करून घे ",.. अभिजीत.

" मी आज थोडं लवकर पाच वाजता जाऊ का पार्टी ऑफिसमध्ये ",.. आदेश.

" हो चालेल",.. अभिजीत.

" वहिनीला घेऊन जाऊ का?, वहिनीला यायचं आहे तिकडे ",.. आदेश.

"ठीक आहे लवकर या दोघांनी घरी, हे बघ काव्या मागचा धोका गेलेला नाही अजून, तो मुलगा खूप डेंजर आहे नाहीतर मला बोलव, आपण तिघं सोबत येऊ सोबत",.. अभिजीत.

"नाही दादा काही काळजी करू नकोस, रघु असेल सोबत मी त्याला बोलवून घेतो",.. आदेश.

ठीक आहे, अभिजित त्याच्या डिपार्टमेंट मधे गेला,

आदेशच काम सुरू होत, चहाची वेळ झाली, सगळे गप्पा मारत होते.

"वहिनी तू आज येशील ना पार्टी ऑफिस मध्ये दादाला विचारलं आहे तो हो म्हटला",.. आदेश.

हो

" पाच वाजेपर्यंत काम आटोप",.. आदेश.

चालेल.

जरा वेळाने श्रद्धाचा फोन आला,.. "तू येशील का आज माझ्यासोबत केंद्रात",

"पण मी आदेश सोबत जाते आहे पार्टी ऑफिसमध्ये उद्या येते ",.. काव्या.

पाच वाजता काव्या तयार होती,.." आदेश मी पाच मिनिटात अभिजीतला भेटून येते",

" ठीक आहे वहिनी पार्किंगच्या इथे ये",.. आदेश.

अभिजीत काम करत होता. काव्या आत आली.

" मी आदेश बरोबर जाते आहे तू येतो आहेस का आमच्या सोबत ",.. काव्या.

"नाही मला आज ऑफिसमध्ये सात वाजतील खूप काम आहे दुपारचे एक दोन तास गेले",.. अभिजीत.

"मग पटकन करायचं ना काम माझ्या मागे मागे कशाला करायचं ",.. काव्या.

" असं आहे का नंतर बघतो तुला मी",.. अभिजीत.

" मी जाते मग आणि अजून एक गोष्ट म्हणजे तू चिडणार नसशील तर सांगते",.. काव्या.

काय?

"श्रद्धा म्हणते आहे की तिचं लग्न जमवायला मला काकूंना भेटायला जायला लागेल तिच्या सोबत उद्या आश्रमात , रघु असेल सोबत ",.. काव्या.

"ठीक आहे, उद्या संध्याकाळी जायचं असेल तर मी पण येईल",.. अभिजीत.

"ठीक आहे मग उद्या जाऊ तिकडे आणि त्या दोघांचे व्यवस्थित लग्न ठरवून टाकू तिथे आश्रमात बसून",.. काव्या.

हो

" आज धावपळ होईल",.. काव्या.

काव्या बाहेर आली श्रद्धा तिच्या जागेवर बसलेली होती,

" आम्ही उद्या येऊ आश्रमात काकूंना भेटायला चालेल का? दोघांना घाई झाली आहे वाटत लग्नाची, काळजी करू नकोस, उद्या होवुन जाईल तुझ काम",.ती मुद्दामूनच श्रद्धाला चिडवत होती,

श्रद्धा हसत होती, चांगला चान्स मिळाला हिला मला चीडवायचा.." तू कुठे चालली आहे काव्या ",

" मी आदेश सोबत पार्टी ऑफिसमध्ये जाते आहे, चल मी जाते तो वाट बघत असेल आणि ऑफिस सुटलं की घरी जा, रघु माझ्या सोबत आहे म्हणजे तो थोड्यावेळाने येणार आहे, तुला माहितीच असेल तस मिनिटा मिनिटाचा हिशोब",.. काव्या.

" जा बर तू इथून काव्या",.. श्रद्धा आता परत चिडली होती,

" अजून काहीच चिडवल नाही मी तुला, पुढे बघ काय होईल ",.. काव्या.

आदेश काव्या निघाले .

"कुठे आहे पार्टी ऑफिस",.. काव्या.

"थोडं मार्केटच्या त्या बाजूला आहे",.. आदेश.

"नेहमी मुलं असतात का तिथे",.. काव्या.

"हो ते माझे मित्र आहेत",.. आदेश.

"तू कसं काय इलेक्शन मध्ये भाग घ्यायचं ठरवलं",.. काव्या.

"मला आधीपासून इंटरेस्ट होता, मी कॉलेजला असताना सुद्धा इलेक्शन मध्ये भाग घेतला होता ",.. आदेश.

" मग भांडण मारामाऱ्या होत्या का?",.. काव्या.

" हो खूप होत होत्या",.. आदेश.

" आता कोण उभ आहे विरोधात",.. काव्या.

" बरेच जण आहेत पण एक आहे विकास इनामदार तो इंडस्ट्रियलीस्ट आहे आणि चांगलच टक्कर देतो",.. आदेश.

" ही पहिलीच इलेक्शन आहे ना ",.. काव्या.

" नाही याच्या आधी मी हरलो होतो",.. आदेश.

आता काव्या थोडा हसत होती,.." सॉरी म्हणजे काही हरकत नाही",.

"वहिनी हे या गावाच इलेक्शन आहे, थोड साध आहे ",.. आदेश.

" हे कोण जिंकलं होतं तेव्हा",.. काव्या.

" आम्ही दोघे पण नाही तिसराच जिंकला होता ",.. आदेश.

"यावेळी काय चान्सेस आहेत",.. काव्या.

" माहिती नाही ",.. आदेश.

" हा पक्ष कुठला आहे",.. काव्या.

"कुठल्या पार्टीचा नाही तो आम्ही मुलांनी मिळून तयार केला आहे",.. आदेश.

दोघं पार्टी ऑफिसमध्ये पोहोचले, दोन रूम बाजू बाजूला होत्या, वरती पाटी होती, पताका लावलेल्या होत्या, पार्टीचे चिन्ह आणि ध्वज होता

काव्या आल्यामुळे सगळे मुलं भेटायला येत होते, वहिनी.. वहिनी करत होते

एवढे मोठे मोठे मुले पण बोलताना एकदम साधे होते, आदेशचेच मित्र होते ते, दोघं आत मध्ये गेले, सगळे येऊन आजूबाजूला उभे होते, आदेश ओळख करून देत होता, बरेच जण पाया पडत होते,

"हे बघा असं असेल तर मी इकडे येणार नाही, मी तुमच्यातलीच एक आहे, अगदीच म्हातारी असल्यासारखं करू नका, मी पण तुमच्या पार्टीची मेंबर होणार आहे त्यामुळे तुमच्या सारखाच मला पण काम असणार, मला सगळं काम सांगायचं पुढच्या महिन्यापासून मी पण रेग्युलर येणार आहे आदेश सोबत, आपण जोरात प्रचार करू, यावेळी हार म्हणायची नाही, आणि तुम्हाला सगळ्यांनी थँक्स, तुम्ही खूप मदत केली फार्म हाऊसवर आम्हाला गरज होती तेव्हा ",... काव्या.

हो जबरदस्त मारामारी केली होती तेव्हा आम्ही , सगळ्यांना खूपच उत्साह आला होता. एकदमच काय करायचं काय नाही सगळे ठरवत होते, वहिनी येणार तर लग्न झालेले मुल त्यांच्या बायकांना आणणार होते, चहा आला सगळ्यांचा चहा झाला,

"काही खायचं आहे का वहिनी, भूक लागली का? इथे समोर वडापाव खूप छान मिळतो",.. आदेश.

सगळ्यांनी वडापाव मागवला, छान गोल बसून सगळे खात होते, त्याबरोबर गावाची हिस्ट्री पण सांगत होते, काव्याला आता बरीच माहिती मिळाली होती,

काव्या बाहेर जाऊन बघत होती काय काय आहे ते ?

" वहिनी कुठे जाऊ नको",.. आदेश.

" नाही इथेच आहे मी",.. ती बाहेर ओट्यावर उभी होती एक दोन मुलांसोबत बोलत, ते तिला माहिती देत होते सगळे आजूबाजूची,

" ते त्या बाजूला गर्दी आहे ते काय आहे",.. काव्या.

"तेच आहे त्या विकासच ऑफिस आहे",..

"हे दोघ ऑफिस एवढ्या जवळ का आहेत",.. काव्या.

" आधी आपण इथे ऑफिस घेतलं, त्यांनी मुद्दामून आपल्या जवळ घेतलं, नेहमी लक्ष द्यावे लागत इथे, नाही तर ते मुलं चोरी करतात",..

"बापरे एवढं आहे का",.. काव्या.

" हो मग खूप नाव घेतात ते मुलं, सारखी मारामारी होते",..

तेवढ्यात विकास त्याच्या पांढऱ्या गाडीने त्याच्या पार्टी ऑफिस मध्ये आला, त्याने जाताना आदेशच्या ऑफिस कडे बघितलं ,ओट्यावर काव्या उभी होती दोन-तीन मुलांसोबत

" कोण आहे ही ?",.विकास.

बाकीच्या मुलांचं लक्ष नव्हतं, गाड्या त्यांच्या ऑफिस जवळ जाऊन थांबल्या, विकास अजूनही इकडेच बघत होता,.. "ती मुलगी कोण आहे आदेशच्या पार्टी ऑफिसमध्ये",

"माहिती नाही पहिल्यांदाच बघतो आहे तिला",..

विकासात मध्ये चालला गेला, अजूनही तो काव्याचा विचार करत होता, सुंदर आहे मुलगी.

जरा वेळाने काव्या सुद्धा आत मध्ये येऊन बसली, आदेश फोनवर बोलत होता,.. "वहिनी जरा वेळ जायचं का प्रियाकडे, तुला वेळ आहे ना",

" आहे मला वेळ जाऊया, कुठे भेटणार आहात तुम्ही",.. काव्या.

"तिच्या घरी बोलवलं आहे तिने ",.. आदेश.

"मी आली तर काही अडचण नाही ना",.. काव्या.

"काहीतरी काय वहिनी चल तू पण",.. आदेश.

" रघु आला की निघू तो येतोच आहे दहा मिनिटात",..काव्या.

" ठीक आहे मी माझं थोडं काम करतो ",.. आदेश.

काव्या बाहेर येऊन सोफ्यावर बसली होती, ती पेपर वाचत होती.

विकासच्या पार्टीचे मुले चौकशी करत होते, तिकडे आदेशच्या ऑफिस मध्ये कोण आला आहे, विकास साहेब विचारत आहेत,

सगळे आता आदेशाच्या ऑफिस कडे बघत होते

" ती वहिनी आहे काव्या वहिनी, अभिजीत साहेबांची बायको, छान आहे ना वहिनी",.. एका मुलाने चौकशी केली होती.

" हो खूपच छान आहे ती",.

बाकीच्या मुलांनी विकासला सांगितलं की ती आदेशची बायको आहे

"काव्या नाव आहे का तिचं?",.. विकास.

हो

"बापरे खूपच सुंदर मुलगी आहे नाजूक ही आहे",.. त्याला अभिजीत वर अजूनच जाळायला झाल होत.

" हो आणि खूप श्रीमंत सुद्धा आहे बाजूच्या गावचा सोहम देशमुख तिचा भाऊ आहे",..

"माहिती आहे मला, शशी त्यासाठी तर इकडे आला आहे, हिच्यावरून भांडण झाले, खरच भांडण होण्या सारखी आहे ती, या लोकांवर लक्ष ठेवा, जरा लांबुन पण, फार बॉडीगार्ड आहे तिला",.. विकास.

रघु आला जरा वेळाने आदेश काव्या आणि रघु निघाले,
" इकडे काय काम आहे",.. गाडी दुसरीकडे जात होती,

"जरा वेळ प्रियाला भेटायचं आहे, तिच्या घरी जावु",.. आदेशाने सांगितलं

ठीक आहे.

प्रियाच्या घरी आले ते तिघ खाली उतरले, रघु बाहेर उभा होता, आदेश काव्या आत मध्ये गेले.

काव्याला खूप आवडलं प्रियाचं घर, तिचे आई वडील येऊन भेटले, छोटी बहीणही छान होती तिची, त्यांनी चहा घ्यायचा आग्रह केला,

" नाही तिकडे आदेशच्या पार्टी ऑफिस मध्ये झाला चहा, निघू आपण आदेश" ,.. काव्या.

"नंतर सावकाश ये काव्या",.. काकू.

हो काकू.

"एकदा एक पूर्ण दिवस मी इकडे येईल मस्तपैकी राहायला",.. काव्या.

"हो चालेल",.. काकू.

प्रिया काव्या खूपच बोलत होत्या, .. "प्रिया मी जाते आता",

"येत जा इकडे वहिनी",.. प्रिया.

" घरून सोडलं तर येईन मी ",.. काव्या.

"काय झालं अजून धोका आहे का मागे",.. प्रिया,

"हो हे काय किती बॉडीगार्ड आहेत सोबत",.. काव्या.

काव्या आत येवून बसली, आदेश प्रिया बाजूला उभ राहून बोलत होते, थोड्या वेळाने ती काव्याला भेटायला आली

"प्रिया काळजी करू नकोस तू आम्ही घरी लवकरच बोलतो आहे तुझ्या आणि आदेश बद्दल",. काव्या.

"मला काहीच प्रॉब्लेम नाही वहिनी पण घरचे ऐकत नाहीत आता",.. प्रिया.

" इलेक्शन झाल्यावर करू लग्न",.. आदेश.

"ठीक आहे असं काही फिक्स असलं म्हणजे घरचे पण जरा शांत होतील ना",.. प्रिया.

"हो बरोबर आहे",.. काव्या.

काव्या कुठे कुठे जाते आहे त्याची पूर्ण माहिती विकासला मिळत होती, प्रिया कोण आहे चौकशी करा, त्याने सांगितल.