Login

तुझी साथ हवी मला... भाग 46

आमच्या कडे ही बघा जरा वहिनी, इथे स्वतः चा बॉस बिना लग्नाचा आहे, किती सांगतो घरी कोणी ऐकत नाही, आज जरा तू जाता जाता दादाला सांग काही


तुझी साथ हवी मला... भाग 46

©️®️शिल्पा सुतार
.........

शशीला विकासच्या फार्म हाऊस वर खूपच कंटाळा आला होता, किती फिरणार शेतात, बरचसे सजेशन त्याने दिले होते, शशी ऐकुन विकासने बराच बदल केला होता शेतात , पण शेतातून बाहेर निघता येत नव्हत, पुढे काय होईल ते ही समजत नव्हत, पोलिस मागे, काय करू अस झाल होत त्याला, विकास मदत करेल हीच आशा होती, तो संध्याकाळी जेवायला बसला होता, त्याच्या बरोबरीचे त्याचे मित्र त्याला आसपासच्या गोष्टींचे रिपोर्ट देत होते,

" काव्याबद्दल काही समजलं का?",.. शशी.

" तिने ऑफिस जॉईन केला आहे तिच्या नवऱ्याचं",.. मनोज म्हटला तसा तो हळूच शशीकडे बघत होता, शशी चिडला आहे का, अस म्हणायला नव्हत पाहिजे. सॉरी त्याने म्हटलं.

शशीने त्याच्याकडे रागाने बघितलं, तो चिडला होता, चांगल चालल आहे सगळ्यांचं, मी तिथे खितपत पडलो आहे, इथून कुठे बाहेर गेलो की पोलीस आहेच मागे, कधी संपणार हे, मी बोलणार आहे विकास सोबत. मला जायच आता घरी.

तेवढ्यात बाहेर गाड्या थांबल्या तीन-चार,

"कोण आल बघ रे",.. शशी.

" विकास साहेब आले आहेत" ,.. मनोज.

विकास पटकन आत मध्ये आला, शशी जवळ बसला,

"जेवतो का विकास, मला माहिती आहे तुझ्याच घरात मी तुला विचारतो आहे",.. शशी.

"नाही तू जेवून घे, मी घरी जाईल आई-बाबा वाट बघत असतिल",.. विकास.

आई-बाबांचं नाव काढल्यावर शशीला पण त्याचे आई बाबा आठवले, खूपच कसंतरी होत होतं, आता शशीला असं वाटत होतं की एकदाच संपाव हे मॅटर.

" मी तुला एक गोष्ट सांगायला आलो आहे शशी",.. विकास.

काय?

" मी आज कोणाला बघितलं असेल? ",.. विकास.

शशी त्याच्याकडे प्रश्नचिन्ह घेऊन बघत होता... कोण?

काव्याला,

"कुठे होती ती?",.. शशी.

"आदेशच्या पार्टी ऑफिसमध्ये आली होती",.. विकास,

"कोण आदेश",.. शशी.

"अभिजीतचा भाऊ, काय छान आहे काव्या, एकदम सुंदर",.. विकास.

शशी आश्चर्याने विकास कडे बघत होता, विकासला काव्या सुंदर वाटली होती, नक्की काय विचार आहे त्याचा, काव्या कडे सगळच होत पैसा, छान दिसते ती, मी वाईट वागलो, मूर्खपणा झाला,

इकडे विकास तिची खूपच तारीफ करत होता,.." चेहऱ्यावरूनच दिसते ती श्रीमंत, किती छान केस आहेत तिचे, तो ड्रेस तर किती छान दिसत होता तिला",

त्याला असं तिच्याबद्दल बोलताना बघून शशी आठवत होता, खरच सुंदर आहे काव्या, माझी होती ती, गमावून बसलो तिला, कधी कधी खूप चुका होतात हातून,

"बरोबर आहे शशी या मुलीसाठी इतके भांडण होतीलच, सगळ्याच गोष्टी आहे तिच्यात रूप सौंदर्य शांत हुशार श्रीमंत कोणीही तिच्याशी लग्न करायला एका पायावर तयार होईल ",.. जरा वेळ विकास तिथेच बसलेला होता, शशीला त्याचे काव्या बद्दलचे विचार ऐकुन भीती वाटत होती,

मुद्दाम शशीने विषय बदलला,.. "आता पुढे काय करायचं ठरवलं आहे विकास ",

"काही नाही आता काव्या प्रचारात उतरली आहे, मजा येईल आता निवडणुकीत, ती समोरच्या प्रचार ऑफिसात येईलच, छान वातावरण होईल आजुबाजूला, मला खूप काम आहे आता",..विकास.

"यार हा काय तेच तेच बोलतो, घेवून तर जाणार नाही ना हा काव्याला",.. शशी.

"तुला राग येत नाही ना मी अस म्हणतो तर ",.. विकास.

" नाही,.. विकास तुझी वर पर्यंत ओळख आहे ना मदत कर केस क्लोज कर ही,मला कंटाळा आला आता घरी जाईल मी ",.शशी.

" हो बघतो काय करता येईल ते ",.. विकास शशी कडे बघत होता,

" तुला राहायचं आहे ना काव्या सोबत शशी, मग इथून जायची घाई का करतो आहेस तू",.. विकास,

" हो... रहायच आहे, जवळ आहे गाव माझ, येता येईल की लगेच ",.. शशी.

" ठीक आहे मग, मी निघतो, बघतो काय करता येईल ते ",.. ह्या काव्याच लग्न झालं नसतं तर मी माझ्यासाठी पण विचार केला असता, पण आता अभिजीतच नुकसान व्हायला पाहिजे, काव्याला तिथून घेऊन शशीकडे द्यायला पाहिजे.
.......

आदेश काव्या पार्टी ऑफिस मधून घरी आले, रघु त्याच्या रूमवर निघून गेला, अभिजीत आलेला होता, त्यांच्या रूममध्ये काम करत होता तो , काव्या रूम मध्ये आली,..

"झाला का प्रचार सुरू ",.. अभिजीत

"नाही आज फक्त ठरवल काय करायच ते",.. काय काय झालं कुठे कुठे गेले हे पूर्ण जोरा जोरात काव्या नॉन स्टॉप सांगत होती.

"किती बोलणार आहे काव्या",.. अभिजीत हसत होता, काव्याला राग आला, ती कॉटवर जाऊन बसली,

"बापरे आता काही खरं नाही बायको रुसली",.. तो येऊन तिच्याजवळ बसला,.." बोल काय सांगत होती ",

"आता कशाला मी एवढं छान सांगत होती तर ऐकलं नाही",.. काव्या.

" तू एवढा फास्ट बोलत होती की मला काहीच कळलं नाही, एवढंच कळलं की पार्टी ऑफिस मध्ये गेली होती आणि प्रियाकडे गेली होती",.. अभिजीत.

" तेवढंच झालं आहे मग ",.. काव्या कपडे बदलायला आत मध्ये निघून गेली, त्यानंतर ती खाली आशा ताईंच्या मदतीला गेली.

जेवणाचे टेबलवरही काव्या पार्टी ऑफिस मध्ये काय झालं, प्रियाच्या घरी गेलो होतो ते सगळं बोलत होती, आजी आणि आशाताई तिच्याशी बोलत होत्या, बाकीचे ऐकत होते.

" तू खरच गेली होती का पार्टी ऑफिस मध्ये",.. आजी.

"हो मी आदेशला हेल्प करते आहे, आमचा पुढच्या महिन्यापासून प्रचार सुरू होणार आहे, सध्या कोणाला काही अडचण असेल तर ते आम्ही नीट करतो आहोत",.. काव्या.

बाकीच्यांनी डोक्याला हात लावून घेतला, आधी आदेश कमी होता त्यात आता काव्या पण आदेश सारखं बोलायला लागली, काव्या घरची लहान मेंबर होती,

" आदेश तू का तिला काहीही सांगत बसतो, बघीतला का आता ही पण इलेक्शन इलेक्शन करते, अजिबात चालणार नाही आदेश.. काव्या, इकडे तिकडे फिरायच नाही उगीच ",.. आजी ओरडल्या.

" नाही आजी आदेश काही सांगत नाही, मला आवडलं पार्टी ऑफिस मधे , खूप छान वाटतं तिकडे, चांगले आहेत सगळे मुलं ",.. काव्या.

"हो पण तरी तू एवढं फिरणार नाही सगळ्यांसोबत, स्वतःची काळजी घे, रोज घेऊन नको जात जाऊ हिला आदेश ",.. आजी.

" नाही वहिनीला आठवड्यातनं एकदा दोनदा नेईल ",.. आजी.

ठीक आहे

" काव्या हुशार आहे तशी, घरी पटकन यायच काय ",.. आजी.

हो आजी.... बाकीचे हसत होते.

" हो वहिनी कामाची आहे, वहिनी काही लागलं तर आम्हाला स्पॉन्सरशिप द्यायची ",.. आदेश.

" यासाठी सोबत घेतल आहे का तू हिला सोबत? अजिबात नाही ह काव्या फालतू गोष्टीसाठी पैसे खर्च करायचे नाहीत ",.. आजी.

" फालतू गोष्ट आहे का ही आजी, महत्वाची गोष्ट आहे",.. आदेश.

" हो आमच पार्टीच काम महत्वाच आहे ",.. काव्या.

आशा ताई अभिजीत कडे बघत होत्या, मी लक्ष देईल तिच्याकडे अभिजीतने इशाऱ्याने सांगितल, प्रताप राव हसत होते,

" बघितल का वहिनी आजी कस ओरडते सारख",.. आदेश.

"हो आटपा आता जेवून घ्या",.. आजी.

काव्या काही म्हटली नाही.

" एकतर काव्या आताच नोकरीला लागली आहे, अजून पगार झाला नाही तिचा",.. आजी असं म्हणतात सगळे हसत होते, आजींना विशेष माहिती नव्हतं काव्याच्या नावावर काय काय आहे ते, हे लोक काव्याच्या माहेरी गेले नव्हते, लग्न घाईत झाल.

"आजी वहिनी एकटी आपल्यापेक्षा श्रीमंत आहे, तू तिला काही बोलू नको ह",.. आदेश.

" नाही हो आजी, आदेश गप्प बस. आजी बरोबर आहे पैशाची उधळपट्टी नाही करायची",.. काव्या .

जेवण झाल्यावर अभिजीत काव्या रूम मध्ये आले, काव्या अजूनही चिडलेली होती अभिजीत वर, ती बाजूला जावून बसली, काय यार काय बोलू हिच्याशी, हिला हसवायला पाहिजे ,.. "काव्या तुला आठवत का तू मला पैसे वापस देणार आहेस, तू बोलली होती तस, पटकन देवून टाक मला लागता आहेत ",

"कसले? काहीही आपल ",... काव्याला स्पष्ट आठवत होत की आश्रमात जातांना ती अभिजीतला बोलली होती माझे किती पैसे होतात ते लिहून ठेवा कुठे तरी, मी नंतर देवून देईल, पण आता ती मुद्दाम काही आठवत नाही अस दाखवत होती,

"बापरे कसले म्हणजे, डॉक्टर फी, इतर खर्च आश्रमाचा वगैरे ",.. अभिजीत.

" मी कुठे म्हटलं होत मला डॉक्टर कडे घेवून जा तूच नेल होत जबरदस्ती",.. काव्या.

"अरे मग तुला खूप लागल होत" ,.. त्याने अस म्हणताच काव्या सिरीयस झाली, अभिजित तिच्या जवळ येवून बसला, तिला जवळ घेतल,

"काय झाल होत तेव्हा, म्हणजे तू कंफर्टेबल असेल तर सांग " ,.अभिजीत.

"ते मी दादा आणि मावशी घरातून निघून गेलो होतो, मला शशी सोबत लग्न नव्हत करायच म्हणून, शशी त्याचे माणसे मागे होते आमच्या, आम्ही एक दोन जागा बदलल्या, तरी त्या लोकांनी शोधल आम्हाला" ,... काव्या.

" बॉडी गार्ड नव्हते का सोबत",.. अभिजीत.

"होते दादाची टीम पण होती, रघु पण होता, तरी ते गुंड लोक त्यांचा भरोसा नाही, त्यांनी शोधल आम्हाला, रघु बेशुद्ध होता, मला मारत नेल शशीने, थोड पुढे गेलो तर रघु घ्यायला आला होता, तेव्हा त्याला आणि मला मारल खूप जोरात, मला दोनदा मारल होत रघुला खूप मारल त्या शशी ने , आम्ही पळून गेलो, मग आपण भेटलो",.. आता काव्याच्या डोळ्यात पाणी होत अभिजीतने तिला जवळ घेतल,

" मी नव्हत विचारायला पाहिजे होत", ..अभिजीत.

"नाही अस काही नाही", ...काव्या.

"ठीक आहे ना तू ",..अभिजीत.

हो

"चल मग माझे पैसे दे ",..अभिजीत.

"काहीही मी नाही देणार ",..काव्या.

"चांगल आहे ज्याच चांगल करा तो मलाच ओरडतो ",..अभिजीत.

"एखाद्याला डॉक्टर कडे नेण पुण्याच काम आहे ",..काव्या.

"बर ठीक ते जावू दे ,जाॅइनिंग बोनस दिला तो, त्याच काय",.. अभिजीत.

" तो तर मला आदेशने दिला ",.. काव्या.

"मीच दिले होते ते पैसे तू आभार पण मानले होते आठवत का ",.. अभिजीत.

" तू तर तेव्हा बोलला होता मी नाही दिला बोनस ",.. काव्या.

" मला माहिती नाही माझे पैसे मला हवे आहेत, काय लोक असतात एक एक, आधी गोड बोलतात नंतर पैसे देत नाही ",.. अभिजीत.

" माझा पेमेंट झाला की देईल ",.. काव्या.

" तुला पेमेंटची गरज आहे का ",.. अभिजीत.

" हो आहे" ,.. काव्या.

"थांब जरा बघतो तुझ्या कडे",.. त्याने पुढे होवुन तिला जवळ घेतल, बोल आता,

" अभिजित सोड, ठीक आहे देवून देईन पैसे, किती झाले",.. काव्या.

" सांगेन नंतर पण आधी तू नाही म्हटली पैसे द्यायला ते तर बघु दे तुझ्या कडे" ,.. अभिजीत.

काव्या हसत होती, सोड ना,

"नाही तू त्रास देते मला आता हल्ली ",.. अभिजीत.

" मी? उलट तूच त्रास देतोस, चिडून बोलतोस माझ्याशी " ,... काव्या.

" काव्या ते इलेक्शनच काम सांभाळून करायच बरका, नाहीतर नको जात जावू तिकडे, चांगले लोक नाहीत ते, समोर अपोजीट पार्टीच ऑफिस आहे, तो विकास बदमाश आहे ",.. अभिजीत.

"हो अभिजीत काळजी करू नकोस, मी काळजी घेईन, रोज नाही जाणार तिकडे, तुला सांगून जाईल",.. काव्या.

बर सॉरी मी पण चिडणार नाही तुझ्यावर... चल आता इकडे ये इकड तिकडच बोलत बसणार का आपण... मला वेळ देत जा ... हम बरोबर... संसारात नेहमी नवर्‍याने सॉरी बोलायच का... हो मग तुच चुकतो... नेहमी तुझ नेहमी बरोबर असत का... हो असत माझ बरोबर... थांब बघतो तुझ्याकडे... अभिजीत..... दोघ एकमेकात रमले होते.

......

दुसर्‍या दिवशी अभिजीत आदेश काव्या ऑफिस मध्ये आले, प्रताप रावां सोबत मीटिंग होती, छान झाली मीटिंग, सगळ काम प्रतापरावांना आवडल होत, त्यामूळे आदेश खुश होता,

श्रद्धा आलेली होती ऑफिस मधे, ती लंच टाइम मधे भेटली

" आज येते मी केंद्रात, काकूंना भेटून घेवू ",.. काव्या.

"ठीक आहे मिळाला का वेळ मॅडमला, झाल का काम इलेक्शनच",.. श्रद्धा.

"सुरू आहे श्रद्धा, मस्त वाटत तिकडे पार्टी ऑफिस मधे",..काव्या.

ती नंतर अभिजीतच्या केबिन मधे गेली,.. "साडेपाच नंतर जावू आज आपण केंद्रात श्रद्धा रघुच लग्न जमवून टाकू",

चालेल.

" अजून एक ते रहातील कुठे",.. काव्या.

" आहे आपल एक घर , मी सांगतो संध्याकाळी रघुला",..अभिजीत.

" कुठे आहे",.. काव्या.

" मार्केट सोडल की त्या बाजूला हाऊसिंग सोसायटी आहे तिथे बंगला आहे",.. अभिजीत.

"अरे वाह",.. काव्या.

" तुझी मैत्रीण आहे ती त्या लोकांची सोय मी करणारच",.. अभिजीत.

"हो का अजून काय काय करणार माझ्या साठी" ,.. काव्या.

" एवढ करून कोणी सहजासहजी जवळ येत नाही माझ्या, रोज नवीन आयडिया शोधावी लागते मला",... अभिजीत.

काव्या लाजून हसत होती,

" हे अस हसुन चालणार नाही या बदल्यात काय मिळेल ते सांग, आय एम सिरीयस ",.. अभिजीत.

" नंतर सांगेल",.. काव्या.

"झाल.. आम्हाला फक्त आश्वासन मिळतात, त्या आदेश सोबत नको रहात जावू तू, त्याचे गुण येत चालले तुझ्यात",.. अभिजीत.

" आमचे आदेश सर छान आहेत, चल मी जाते लंच ब्रेक संपला संध्याकाळी साडे पाच नंतर पार्किंग मधे भेटू",.. काव्या.

" ठीक आहे",.. अभिजीत.

संध्याकाळी श्रद्धा काव्या रघु तिघे पार्किंग मधे उभे होते,

" कुठे आहे अभिजीत सर ",.. श्रद्धा.

" येतील श्रद्धा थांब जरा किती घाई तुला, ठरेल तुझ लग्न रघु सोबत आज ",.. काव्या त्या दोघांना हसत होती.

" मी असच विचारल काव्या, किती बोलतेस तू मला ",.. श्रद्धा.

"तुला किती घाई झाली आहे म्हणून म्हटल मी, पाच दहा मिनिटानी काही होणार नाही",.. काव्या.

आता काव्याच्या चिडवण्याला श्रद्धा वैतागली,.." मी जाते पुढे स्कूटर आहे माझ्या कडे",

"आम्ही पण येते थांब जरा, रघु बघ बाबा काय ही घाई लग्न जमवायची हिला ",.. काव्या.

रघु काव्या हसत होते, श्रद्धा अजूनही रागात होती,.." पुरे काव्या, मी मारेन, रघु", ...

सॉरी... रघु म्हटला

आता काव्या अजून हसत होती,.." रघु काही खर नाही बाबा तुझ ",

अभिजित आला, सॉरी थोडा बिझी होतो मी, रघु तू जा श्रद्धा सोबत, आम्ही येतो पाच मिनिटात निघतो, अभिजित परत आत गेला,

रघु श्रद्धा निघाले , येतो आम्ही काळजी करू नकोस श्रद्धा.

काव्या तिथे उभी होती आदेश आला,.. "अभिजीत कुठे आहे",

"येतो आहे",.. काव्या.

"कुठे दौरा",.. आदेश.

"आम्ही श्रद्धाच लग्न जमायला जातो आहोत" ,.. काव्या.

"आमच्या कडे ही बघा जरा वहिनी, इथे स्वतः चा बॉस बिना लग्नाचा आहे, किती सांगतो घरी कोणी ऐकत नाही, आज जरा तू जाता जाता दादाला सांग काही, म्हणजे काम होईल माझ ",.. आदेश.

"हो, करू काम, डोन्ट वरी, आता तूच म्हटला ना इलेक्शन नंतर करणार आहेस लग्न",.. काव्या.

" पण त्या आधी ठरवावा लागेल ना काही",.. आदेश.

" हो या शनिवार रविवार ठरवून टाकु बस का ",.. काव्या.

" अरे वाह खूप छान निर्णय वहिनी अस झाल तर तुला पार्टी देईल मी, मी जातो पार्टी ऑफिसला",.. आदेश.

ठीक आहे.
.......

अभिजीत आला,.." लवकर घरी ये आदेश ",

हो दादा.

ते दोघ निघाले,.." मला आज अस वाटतय मी तुला केंद्रात सोडायला येतो की काय ",

" हो ना आपण भेटलो ही, लग्न ही झाल फास्ट झाल सगळ",..काव्या.

" हो ना",. अभिजीत.

"आता श्रद्धा रघुच लग्न, त्या नंतर आदेश प्रियाच ठरवू",.. काव्या.

"तुझ्या बॉसने सांगितलेल दिसत आज माझ्याशी बोलायला",.. अभिजीत.

"नाही अस काही नाही",.. काव्या खूप हसत होती.

" मला चांगल माहिती तुम्ही दोघ कसे आहात ते, चालेल घरी आई बाबां जवळ काढू नंतर विषय आदेशच्या लग्नाचा, तुझ्यासाठी काहीही, ठीक आहे ",.. अभिजीत तिच्या कडे बघत होता, काव्या लाजली.

पैसे दे माझे लवकर... हो रे...

........

विकास त्याच्या ऑफिस मध्ये बसलेला होता, खूप काम सुरू होत, तिथले मॅनेजर आज काय काय काम झालं हे सगळं सांगत होते,

" ही ऑर्डर महत्वाची आहे, वेळेत काम झाल पाहिजे" ,.. विकास.

हो साहेब... ते पुढच्या कामाला गेले.

बाकीचा स्टाफ घरी गेला होता, आता इथून पार्टी ऑफिस मधे जावू मग घरी जावू असा विचार होता त्याचा, तो निघाला मार्केटच्या पुढे अभिजीतची गाडी त्याला क्रॉस झाली, आत काव्या बसलेली होती वाटत , छान बोलत होती ती अभिजीत सोबत,

तो पार्टी ऑफिस मधे आला, सुचत नाही काही हे अस बघितल की, एवढ हसून काय बोलत असतिल ते दोघ, विकास चिडला,.. "आजची काही न्यूज पाटील ब्रदर्सची, काय चाललय गेली का त्यांची ऑर्डर",

"नाही पुढच्या आठवड्यात जाईल बहुतेक , जोरात काम सुरू होत ऑफिस मध्ये अस ऐकल, काव्या आज महिला आधार केंद्रात गेली आहे अभिजीत सोबत, आदेश पार्टी ऑफिस मधे आहे ",.. सुरेश.

"हो दिसले ते दोघ, आदेश बाबतीत काही बातमी",.. विकास.

" प्रिया आदेशची होणारी बायको आहे, इलेक्शन नंतर आहे लग्न",... सुरेश.

" छान आहे, काय करता येईल आता यांच, त्या लोकांची तयार ऑर्डर कोण नेत",.. विकास.

" त्यांची स्वतःची गाडी आहे",... सुरेश.

" ऑर्डर मधे काही प्रॉब्लेम होवु शकतो का" ,...विकास.

" अस तर होत नाही नेहमी परफेक्ट काम असत अभिजीत च",.. सुरेश.

" म्हणजे आपण काही बिघडवू शकत नाही त्यांच, काय कराव, चोरी करता येईल का, त्या काव्या सोबत ही नेहमी दोघ भाऊ असतात",... विकास.

" प्रियाला ताब्यात घेता येईल तिच्या बदल्यात काव्याला घेता येईल",.. सुरेश.

" हो करता येईल अस, पोलिस पकडतील आपण त्या शशीच नाव देऊ लावून, त्या साठी त्याला सांभाळतो आहे आपण, फुकट काही मिळत नाही या जगात, त्याला अडकवता येईल",..विकास.

हो चालेल ते दोघ काय करायच ते ठरवत होते.
........

0

🎭 Series Post

View all