Login

तुझी साथ हवी मला... भाग 47

तिच्यासोबत बॉडीगार्ड असतात तरीसुद्धा त्या लोकांनी किती त्रास दिला तिला आपण पण तुझ्यासाठी कोणीतरी बॉडीगार्ड घेऊन घेऊ


तुझी साथ हवी मला... भाग 47

©️®️शिल्पा सुतार
.........

श्रद्धा रघु स्कूटरने जात होते केंद्रात,.. "करायच ना मग लगेच लग्न श्रद्धा, तुझी काही मनात इच्छा आहे की अस लग्न व्हाव तस व्हाव, ते मूव्ही सारख , डेस्टीनेशन वेडिंग वगैरे " ,

" नाही अशी काही खर्चिक गोष्ट नाही माझ्या मनात ",.. श्रद्धा हसत होती.

"नाही तस काही असेल तर आत्ताच सांग आयुष्यभर कोण ऐकेल नंतर की माझ्या मना प्रमाणे झालच नाही, माझ्या कडे आहेत पैसे, गावाकडे थोडी जमीन पण आहे ",.. रघु.

श्रद्धा त्याला मागून मारत होती.

" घ्या असा त्रास आहे मला, कोणाला सांगणार आता, मारू नको श्रद्धा, शांततेत घे जरा ",.. रघु.

"राहू दे तुझे पैसे आणि जमीन, आपल्याला नंतर लागेल, माझ पण थोड फार सेविंग आहे ",.. श्रद्धा.

" अरे वाह छान ",.. रघु.

" घराच काय, रहाणार कुठे आपण लग्नानंतर ",.. श्रद्धा.

"आहे एक रूम सध्या, त्यात राहू, बघतो आहे मी जागा, चालेल ना",... रघु.

" हो काही प्रॉब्लेम नाही, हे ही खूप आहे माझ्या साठी रघु, थँक्स तू माझ्या आयुष्यात आलास, मला माहिती नव्हत आधी काय होईल माझ पुढे ते , हे अस होस्टेल वर रहायचा कंटाळा आला होता मला, तुला माहिती नाही लहानपण कस गेल माझ, कोणाचा आधार नाही काही नाही, कोणी दत्तक घेतल नाही मला, बिनभरोसाच आयुष्य , एकट रहायच कायम, सगळे सणवार सारखे, कधी कपडे मिळायचे तर कधी नाही, शिक्षणाच तस सगळ स्वतः च्या हिमतीवर केल, दसरा दिवाळीत कोणी उदार लोक गोड घेवून यायचे तेच आमच सेलिब्रेशन असायच, वाढदिवस कधी ते माहिती नाही, सांगणार तरी कोणाला, मार्गदर्शन करणार कोणी नाही, चांगल वाईट काय ते आपण आपल ठरवायचं, रडल तरी समजवणार कोणी नाही, आपल आपण शांत बसायच, कोण असतील माझे आई बाबा, एवढी जड झाले होते की मी त्यांना, का टाकून दिल असेल त्यांनी मला, सांभाळायच नव्हत तर का जन्म दिला मग त्यांनी मला, देवाने मला का अस केल रघु सांग ना ",.. श्रद्धा रडत होती.

रघुने एकदम स्कूटर थांबवली, तो तिच्या कडे बघत होता, त्याने तिला रस्त्यात जवळ घेतल, काही म्हटली नाही ती, त्याने तिचे डोळे पुसले, दोघ छान जवळ होते,

" असा विचार करायचा नाही मी आहे आता सोबत, आपण छान राहू, तू म्हणशील ते करेन मी, अगदी तुझे सगळे स्वप्न पूर्ण करू आपण, ठीक आहे का तू आता, रडू नकोस ",.. रघु.

" हो काळजी करू नकोस, आता मी खुश आहे रघु तुझ्या सोबत, प्लीज मला कधीच सोडून जावू नकोस",.. श्रद्धा.

"नाही जाणार मलाही कोण आहे तुझ्या शिवाय ",.. त्याने तिला परत जवळ घेतल,

" रघु काय करतोस प्लीज सोड, आपण रस्त्यावर आहोत ",.. श्रद्धा.

" मला काही फरक पडत नाही",.. रघु.

" सोड ना रघु",.. श्रद्धा.

तू एकदा हस छान, श्रद्धा खुश होती, ती गाडीवर रघुला चिटकून बसली, तो पण खूप खुश होता, दोघ आश्रमा कडे निघाले.

"काव्या अभिजीत सर खूप सपोर्ट करतात आपल्याला, एक छान मैत्रीण मिळाली मला",.. श्रद्धा.

" हो ते खूप छान झाल",... रघु.

दोघ केंद्रात आले, लगेच अभिजीत काव्या आले, काव्या हसुन बघत होती दोघांकडे,.. "पुढच्या सहा महिन्या नंतरची लग्नाची तारीख फिक्स करायची का मग अभिजीत या दोघांची " ,

"हो तीच वेळ योग्य राहील, एवढी घाई नको करायला आपण, काय अस लगेच पंधरा दिवसात लग्न म्हणजे धावपळ होईल आपली ",.. अभिजीत मुद्दाम चिडवत होता,

"बरोबर आहे, काकूंना सांगून देवू तस, चला आत, श्रद्धा रघु, ठरवल आता आम्ही ",.. काव्या.

श्रध्दा रघु दोघ हसत होते,

" अरे आम्ही सिरीयस आहोत, आताच मी मुहूर्त बघितल गाडीत येतांना, सहा महिन्या नंतर चांगले योग आहेत, हो ना काव्या",.. अभिजीत.

"हो, मलाही तेच मुहूर्त छान वाटताय ",... काव्या.

काकू बाहेर आल्या, काव्या त्यांना जावून भेटली, चला आत,

चौघ आत गेले, काकू छान चौकशी करत होत्या,.." कशी आहेस तु बेटा, घरचे कसे आहेत",

" मी मजेत आहे काकू",... काव्या.

" तुमच्या मुलीला सांभाळता सांभाळता माझ वजन किती कमी झाल काकू ते बघा जरा, फक्त स्वतः च्या मुलीची चौकशी करता आहात तुम्ही",.. अभिजीत.

"कसे आहात तुम्ही अभिजीत साहेब?, लक्ष देत जा ग काव्या त्यांच्या कडे ",.. काकू.

हो काकू.

सगळे हसत होते,

" काकू आज आम्ही श्रद्धा आणि रघु साठी इथे आलेलो आहोत",.. काव्या.

काकू बघत होत्या रघु कडे, त्या चौकशी करत होत्या रघुची, तो पण विचारेल ते सांगत होता,.." छान आहे मुलगा आवडला ना तुला श्रद्धा" ,

ती काही म्हटली नाही, लाजली होती,

"करायच ना लग्न याच्याशी",.. तिने मान हलवली,

" जोरात बोल श्रद्धा एवढी लाजू नकोस, माझ्याशी भांडताना आवाज कसा मोठा असतो तुझा तसा ठेव ",.. काव्या.

श्रद्धा तिच्या कडे रागाने बघत होती.

"कधीचा आहे मुहूर्त काही तारीख वगैरे ठरवली का" ,.काकू.

" हो",.. काव्या अभिजीत म्हणाले, आम्ही करू सगळं फक्त तुम्ही परमिशन द्या काकू,

"कस करणार पुढे" ,.. काकू.

"फार्म हाऊस वर लग्न करू ",.. अभिजीत.

" राहणार कुठे ते दोघ",.. काकू.

"आहे आमचा बंगला" ,... अभिजीत.

"इतर साड्या दागिने संसार उपयोगी वस्तु कधी घेणार ",.. काकू.

"खरेदी होवुन जाईल, सामान आहे घरात, साड्या इतर खरेदी काव्या बघेल",.. अभिजीत.

"कधीचा आहे मुहूर्त",.. काकू.

"पुढच्या आठवड्यात",.. अभिजित काव्य माहिती देत होते,

रघु श्रद्धा गप्प होते सगळ ठरवल होत दोघांनी, श्रद्धाच्या डोळ्यात पाणी होत, काव्याने तिला जवळ घेतल,.." थँक्स किती करणार माझ्या साठी काव्या" ,

"काहीही गप्प बस, वसुल करणार मी, नेहमी येईल तुझ्या कडे, तुम्हाला डिस्टर्ब करायला, माझा छान पाहुणचार करायचा समजल का",.. काव्या.

ते बोलत होते आतून दोन तीन मुली आल्या, त्यांच्या सोबत काव्या श्रद्धा आत मधे गेल्या, काव्या सगळ्यांना भेटत होती, किचन मधे स्वयंपाक सुरू होता, छान वास येत होता, ती वरती आजींना जावून भेटली,.." आज कशी आलीस तू इकडे बेटा",

" आजी ते श्रद्धा रघुच लग्न जमवायला आली मी",.. काव्या.

" इकडे ये वेगळी दिसते आहेस तू, किती दिवस झाले लग्नाला तुझ्या" ,... आजी.

"आता महिना होईलच" ,.. काव्या.

त्यांनी तिच्या कपाळावरून बोट फिरवले,.. "धावपळ करू नकोस, सावकाश फिर जरा" ,

"हो आजी मी आरामात असते",.. काव्या.

" घरी सासुबाई वगैरे आहेत ना",.. आजी.

" हो आजी ",.. काव्या तिथल्या आरश्यात बघत होती कशी दिसते ते.

अभिजित रघु पुढे बोलत बसले होते, काकूंनी चहा पाठवला,

"अभिजित साहेब आम्ही राहू माझ्या रूम वर ते बंगला वगैरे नको" ,.. रघु.

"श्रद्धा साठी आहे ते, ती कशी राहील अशी, आहे ना घर आपल, रहा आरामात, काळजी करू नकोस, मॅनेजर कॉन्टॅक्ट करेल तुम्हाला दोघांना, खरेदी वगैरे करून घ्या सगळी, अजिबात काळजी करायची नाही, आनंदात छान रहा",... अभिजीत.

" धन्यवाद साहेब",.. रघु.

" काहीही रघु",.. अभिजीत.

" काव्या झाल का निघायला हव",..

" हो आले, श्रद्धा शॉपिंग करायला जायच असेल तर सांग",.. काव्या.

हो,

" मी पण निघतो श्रद्धा",.. रघु.

ठीक आहे,.. रघु श्रद्धा पाच मिनिट बोलत होते,.." उद्या भेटू मग आपण आपल्याला काय काय घ्यायचं ते ठरवून ठेवू",

"हो चालेल",.. श्रद्धा.

"मस्त रहा, मला फोन कर, रात्री रडत बसू नकोस, मला काळजी वाटते तुझी ",.. रघु.

" हो रघु, थँक्स तू माझ्या सोबत आहेस",.. श्रद्धा.

लव यु..

श्रद्धा लाजली,

"अरे उत्तर तर दे माझ्या लव यु च",.. रघु.

लव यु टु ती हळूच म्हटली.

काव्या अभिजीत काकूंशी बोलत होते ते निघाले, घरी आले, रघु घरी गेला,

जेवताना काव्य सांगत होती,.. "श्रद्धाच लग्न जमलं, लगेच आहे पुढच्या आठवड्यात, आई आजी आपण जावु बरका, श्रद्धा येणार आहे तस तुम्हाला आमंत्रण द्यायला ",

" त्याची काही गरज नाही, नको आमंत्रण वगैरे, आम्ही येवू",..आशाताई सगळं विचारात होत्या कुठे आहे लग्न काय आहे.

आता आजी आई दोघीजणी आदेश कडे बघत होत्या, श्रद्धाच लग्न जमलं ऐकून तो सगळ्यांकडे बघत होता, आता सगळेच हसत होते ,परत कोणी काही म्हटलं नाही, जेवण झाल्यावर आदेश पुढे फोनवर बोलत होता ,

"आई आजी बाबा मी काल प्रियाकडे गेले होते तेव्हा तिच्या घरचे विचारत होते की कधी ठरवता आहे लग्नाची तारीख",.. काव्या.

"ठरवायची आहे पण मुद्दाम आम्ही आदेश समोर बोलत नाही",.. आशा ताई.

"हो आदेश म्हणतो आहे इलेक्शन नंतर लग्न करायचं, पण त्याआधी ठरवून ठेवायला पाहिजे म्हणजे प्रियाच्या घरच्यांना बरं वाटेल थोडा साखरपुड्यासारखा कार्यक्रम करून घ्यायला पाहिजे, कारण आपल्याला काही वाटत नाही ते दोघं सोबत आहे हे माहिती आहे, पण तिच्या घरच्यांसाठी ही गोष्ट एकदम नवीन आहे",.. काव्या.

" बरोबर आहे करू काही तरी, या रविवारी बोलवुन घेऊ त्या लोकांना",..आशा ताई.

ठीक आहे. प्रतापराव बघत होते छान सांभाळते काव्या सगळ्या गोष्टी, छान आहे अभिजीतची बायको.

रात्री काव्या परत आरश्यात बघत होती,

" काय सुरू आहे हे काव्या",.. अभिजीत.

" आजी म्हणत होत्या मी वेगळी दिसते खरच का",.. काव्या.

" बघू ये इकडे.. हो छान दिसायला लागली तू खूप आधी पेक्षा ",.. अभिजीत.

" कस काय",.. काव्या.

"अस असत लग्ना नंतर, चल आराम कर आता, किती प्रश्न पडतात तुला",.. अभिजीत.
........

दोन-तीन दिवस मध्येच गेले, ऑफिसमध्ये ऑर्डरची तयारी जोरात सुरू होती, संध्याकाळच्या वेळेस श्रद्धा आणि काव्या शॉपिंगला जात होत्या, छान खरेदी झाली होती, दागिने पण घेतले होते श्रद्धा नाही म्हणत होती पण काव्याने काही ऐकल नाही, रघुतीला घरी सोडून देत होता रोज ,

आदेशचं पार्टीचं काम जोरात सुरू होत, आज काव्या पार्टी ऑफिस मधे आली होती, ती आणि बाकीचे मुल काहीतरी ठरवत होते, छान काम सुरू होत, एका ठिकाणी लग्न होत तिथे जायच होत आदेश आणि चार पाच मुल जावून येणार होते, हजेरी लावण महत्वाच होत ,

"वहिनी तू घरी जाते की बसते इथे, रघुला बोलवून घेवू का ",.. आदेश.

"तू केव्हा येशील",.. काव्या.

"आता येतो पंधरा मिनिटात" ,.. आदेश.

"ठीक आहे मी थांबते इथे सोबत जावू",.. काव्या.

"कुठे जावू नकोस बाहेर",.. आदेश.

नाही,

आदेशने मुलांना काव्या वर लक्ष द्यायला सांगितल

"वहिनी आपण छान नाश्ता करू, भेळ खायची का",..संतोष.

चालेल,

मी आणतो,

काव्या आत बसुन पेपर वाचत होती
......

"हॅलो विकास आज काव्या वहिनी आली समोर ऑफिस मधे ",.. सुरेश.

" आलो मी पाच मिनिटात आणि वहिनी काय म्हणतो तिला, काव्या म्हण फक्त, तो अभिजीत भाऊ आहे का तुझा",.. विकास.

सॉरी

" ठीक आहे लक्ष ठेव तिच्यावर",.. विकास आला, आदेशच पार्टी ऑफिस रिकाम होत, दोन तीन मूल इकडे तिकडे करत होते, काव्या काही दिसली नाही त्याला.
....

"वहिनी तो संतोष भेळ घ्यायला गेला आहे ना तो विचारतो आहे तिखट किती हव आहे ",.. मनीष

" कुठे आहे तो ",.. काव्या.

"तो काय समोर आहे",.. मनीष.

" मी बघू का दोन मिनिट ",.. समोरच तर दिसत होता संतोष उभा,

"ठीक आहे जा दोन मिनिटात ये, कुठे जाऊ नको वहिनी",.. मनीष.

काव्या समोरच्या दुकानाकडे गेली, तिला तिकडे जाताना विकासने बघितलं, ही का जाते आहे तिकडे, ती जाऊन संतोष जवळ उभी राहिली, भेळ मध्ये काय काय हवं काय काय नको ते सगळं त्या लोकांना सांगत होती, विकास तिच्या मागे येत होता, तिच्या एकदम जवळ जाऊन उभा राहिला, ती काय बोलते काय नाही याकडेच बघत होता,

मध्येच काव्या तिचे केस मागे घेत होती, एका हाताने ओढणी सावरत होती, तिच्या बांगड्या छान वाजत होत्या, अतिशय सुंदर, अशी बायको हवी, हीच नुकसान करावस वाटत नाही, हिला नीट जपाव अस वाटत, मी नाही त्रास देणार काव्याला, प्रेमाने वागेल तिच्याशी. ही दुसर्‍याची बायको आहे, नको अस करायला तो थोडा बाजूला झाला.

भेळ घेऊन झाली, संतोष पैसे देत होता, काव्या वळाली मागे उभे असलेल्या विकासला तिचा धक्का लागला

" सॉरी माझं लक्ष नव्हतं, तुम्ही मागे उभे होते ते पाहिल नाही मी ",.. काव्या.

"ठीक आहे काही हरकत नाही, तुम्हाला लागलं नाही ना काही",.. विकास.

नाही... काव्यापुढे निघून गेली, तिचा रुमाल खाली पडलेला होता, तो विकासने उचलला, तो तिच्या मागे मागे येत होता, काव्या संतोष आत मध्ये गेले, टेबल खुर्चीवर काव्या बसलेली होती, संतोष खूप बोलत होता, काव्या भेळ चा पुडा उघडत होती, सगळे मुलं उठून उभे राहिले, चक्क आज आपल्या पार्टी ऑफिस मध्ये विकास आला, कसं काय आश्चर्य झालं, तो काव्याकडे बघत होता,

"हा तुमचा रुमाल तिथे पडला होता",.. विकास.

काव्या पुढे गेली,.. "थँक्यू", तिने त्याच्याकडून रुमाल घेतला, या ना आत मध्ये हे आदेशच पार्टी ऑफिस आहे, विकास आत मध्ये आला येऊन खुर्चीवर बसला, सगळ्यांना काय बोलावं होते समजत नव्हतं,

"तुम्ही भेळ घेणार का",.. काव्या.

"नाही मी जातो हे समोरच्या पार्टी ऑफिस आमचं आहे, वेळ मिळाला तर या कधी आमच्याकडे",.. विकास.

"हो नक्की येईल",... काव्या.

तो निघून गेला सगळे मुलं शॉक लागल्यासारखे झाले होते,

"काय झालं तुम्हाला सगळ्यांना",.. काव्या.

"तो विकास होता",.. संतोष.

"अच्छा म्हणजे आपल्या अपोजिट पार्टीचा का? चांगला होता मुलगा",.. काव्या.

" नाही वहिनी चांगला नाही तो",.. संतोष.

" पण माझ्याशी चांगल बोलला" ,.. काव्या.

" नेहमी बोलतो का तो",.. संतोष.

" नाही आजच बघितलं मी पहिल्यांदा",.. काव्या.

" या पुढे बोलू नकोस याच्याशी",.. संतोष.

ठीक आहे
.......

आदेश लग्नातुन निघत होता, प्रियाचा फोन आला,.. " आदेश आनंदाची बातमी, आम्हाला रविवारी तिकडे बोलावलं आहे घरी, बहुतेक लग्न जमवायला",

"काय कधी ठरलं हे, मला काहीच माहिती नाही",.. आदेश

"आजच तुमच्या घरून फोन आला होता",.. प्रिया.

आता आदेश खूप खुश होता.

" किती वाजता येणार आहात मग तुम्ही सगळे ",.. आदेश

" दहा अकरा वाजेपर्यंत येऊ",.. प्रिया.

" बरं झालं तू फोन केला प्रिया, आपण दोघं ठरवून घेऊ ना कधी करायच लग्न वगैरे, उद्या त्या सगळ्यांनी विचारलं तर काय सांगणार आहोत आपण ",.. आदेश.

"हो चालेल आदेश",.. प्रिया.

"माझ्या इलेक्शन नंतर करायचं का लग्न",..आदेश.

"कधी आहे इलेक्शन ",.. प्रिया.

"अजून दोन महिने आहेत कारण शेवटचा एक महिना प्रचार खूप जोरात असतो, अजिबात वेळ मिळणार नाही मला कुठल्या गोष्टी साठी, तू परत म्हणशील की तू मला वेळ देत नाही ",.. आदेश.

" मी नसणार आहे का तुझ्यासोबत प्रचारात? जर आपल लग्न झालं तर आपण दोघं प्रचारात उतरू",.. प्रिया.

" हो बरोबर आहे बघू आता घरचे काय म्हणतात ते, पण मी खूप खुश आहे ",.. आदेश

" ते होते म्हणतील तसं करू, लवकर तर लवकर उशिरा तर उशिरा पण हे एकदाच तारीख वगैरे फिक्स केली ना तर आमच्या घरचे शांत होतील",.. प्रिया.

हो ना.

" तुला माहिती आहे का आदेश आजकाल मला असं वाटत आहे की कोणीतरी माझा पिच्छा करत आहे ",.. प्रिया.

"कोण आहे ते काय आहे नक्की",.. आदेश.

" मी ऑफिसमधून घरी येतांना होती दोन-चार दिवसापासून बघते आहे कोणीतरी मुलं लक्ष देऊन आहेत माझ्या वर ",.. प्रिया.

" कोण असतील ते? बघितलं आहे का तू त्यांना कधी? ",..आदेश.

" नाही बघितलं पण पैलवान सारखी मुलं आहेत",.. प्रिया.

"नक्कीच ते विकासचे लोक असतील",.. आदेश.

"ते का माझ्या मागे येत आहेत पण",.. प्रिया.

" खूप एकटं कुठे फिरू नको, खूप रात्रीची घरी येऊ नको, मला असं वाटतं आपणही लवकर लग्न करून घ्याव, हे ऐकून मला भीतीच वाटते आहे",.. आदेश.

"मला पण भीती वाटते आहे आदेश नक्की काय म्हणण असेल त्या मुलांचं, वहिनीच्या मागे जे गुंड आहे त्यांचे लोक नसतील ना ते",.. प्रिया.

" नाही ते लोक माहिती आहे मला, हे नक्की त्या विकासचे लोक असतील, आता इलेक्शन जवळ आलं ना, असेच उद्योग करतात ते लोक, घाबरवतील धमक होतील, मला माघार घ्यायला लावतील ",.. आदेश.

" कठीणच आहे सगळं तू ही गोष्ट वहिनींना सांगून दे वहिनीला पण केअरफुल राहायला हवं",.. प्रिया.

" तिच्यासोबत बॉडीगार्ड असतात तरीसुद्धा त्या लोकांनी किती त्रास दिला तिला आपण पण तुझ्यासाठी कोणीतरी बॉडीगार्ड घेऊन घेऊ",.. आदेश.

" काहीही काय आदेश आणि इथे कुठे राहील तो बॉडीगार्ड",.. प्रिया.

" तू फक्त बाहेर जाताना त्याला फोन करायचा बाकी तो त्याला जिथे राहायचं तिथे राहील, वहिनी सोबत किती बॉडीगार्ड असतात ते त्यांचे राहतात, जेव्हा प्रोटेक्शनची गरज असते तेव्हा ते सोबत असतात",.. आदेश.

" कसं वाटतं पण अस ",.. प्रिया.

" तो रघु सोबत असतो तर काही वाटत नाही उलट आधार वाटतो त्याचा, मी बघतो कोणी आहे का बॉडी गार्ड, तोपर्यंत तू काळजी घे ",... आदेश.