Login

तुझी साथ हवी मला... भाग 48

प्लीज माफी मागू नको आदेश, मला तुझा राग नाही आला, मला एकंदरीत परिस्थितीचा कंटाळा आला आहे, कुठे जाता येत नाही, येता येत नाही,


तुझी साथ हवी मला... भाग 48

©️®️शिल्पा सुतार
.........

आदेश पार्टी ऑफिसमध्ये वापस आला, सगळे विकास बद्दलच बोलत होते, काव्या एका बाजूला बसून भेळ खात होती.

" काय झालं? टेंशन आहे का कसल?",.. आदेश.

सगळे मुल काव्या कडे बघत होते .

"आदेश कोण आल होत माहिती आहे का आज इथे.. विकास",.. संतोष.

"तो का आला होता? ",.. आदेश.

" वहिनीचा रुमाल वापस करायला आला होता ",.. संतोष.

" म्हणजे? काय झालं वहिनी, तुला कुठे भेटला हा विकास, कुठे गेली होतीस तू ",.. आदेश.

" मी ते समोरच्या दुकानात भेळ घेत होती तेव्हा तो मागे उभा होता, मला माहिती नाही माझं रुमाल तिकडे पडला ते, तो विकास रुमाल घेवून आला होता ",.. काव्या.

" अजून काय म्हटला का? ",.. आदेश.

"नाही रुमाल दिला आणि गेला, एवढं काय टेन्शन घेता आहात तुम्ही सगळे ",.. काव्या.

"काही नाही आता पार्टी ऑफिस मधे तू यायचं नाही, चल घरी जावूया",.. रस्त्यात ही आदेश शांत होता.

" काय झाल आहे आदेश, माझ चुकल का काही? ",.. काव्या.

" मी तुला सांगितल होत वहिनी कुठे जावू नकोस, का गेली होती तू समोर, तुला माहिती नाही तो विकास कसा आहे, तुला काही झाल तर काय करणार मी, माझी चुकी झाली, मी अस लग्नाला जायला नको होत, दादा किती विश्वास ठेवतो माझ्यावर, प्लीज आता यायच नाही तू तिकडे पार्टी ऑफिस मधे",.. आदेश.

सॉरी.

" सॉरी काय त्यात, धोका आहे माहिती का ",.. आदेश.

" मी नाही अस करणार प्लीज रागवू नको आदेश ",.. काव्या.

" वहिनी मला असं वाटतं आहे की तू मला सपोर्ट नको करू, मला भीती वाटते त्या विकास सारख्या लोकांची, काय म्हटला तो आज",.. आदेश.

" तो बोलला समोर माझ ऑफिस आहे या कधी तरी आमच्या कडे ",.. काव्या.

" तो तुझ्या मागे आला भेळच्या दुकानापर्यंत दादाला जर ही गोष्ट समजली तर काही खर नाही ",.. आदेश.

" आदेश तो विकास माझ्या मागे नाही आला, तू प्लीज काही सांगू नको अभिजीतला , मी नाही येणार परत इकडे, कोणाशी बोलणार नाही, अभिजित ओरडेल मला",.. काव्या.

आदेश गप्प होता,

आदेश प्लीज.

"वहिनी अस करता येणार नाही मला, दादाला समजत सगळं आपोआप, आपल्याला सांगाव लागेल त्याला ",.. आदेश.

आता काव्या शांत होती, काय केल यार मी, सगळे माझ्या मागे का येतात, शशी पण आता विकास ही, या मुलांमुळे मला नीट जगता येत नाही, कुठे जाता येत नाही, काय हव आहे यांना, मी किती दिवस अस आत कोंडला सारख जगायच,मला आवडत पार्टी ऑफिस मधे आता तिकडे ही जाता येणार नाही.
.....

विकास एकदम खुश होता तो काही न बोलता खुर्चीत बसुन होता,

"काय झाल विकास भाऊ बोलत का नाही" ,.. संतोष.

"कुठे गेला होता विकास",.. दोन तीन मूल विचार होते एकमेकांना,

"विकास भेळच्या दुकानात गेला होता",.. संतोष.

"त्यात एवढ खुश होण्या सारख काय आहे मग" ,..मोहन.

"काय माहिती तो नंतर आदेशच्या ऑफिस मधे गेला होता, काहीतरी झाल असेल" ,... संतोष.

" विकास भाऊ मीटिंग कधी घ्यायची आपल्या कार्यकर्त्यांची",.. मोहन.

"केव्हाही घ्या काही प्रॉब्लेम नाही" ,... विकास.

सगळे विकास कडे बघत होते, जरा वेळाने तो उठून घरी निघून गेला, अरे आता म्हणे केव्हाही घ्या मीटिंग आणि आता विकास निघून ही गेला, काय चाललय काय?
.......

आदेश काव्या घरी आले, काव्या त्यांच्या रूममध्ये निघून गेली, अभिजीत आलेला होता, तो नेहमीप्रमाणे छान तिच्याशी बोलत होता, आज काव्या थोडी गप्प होती, तिला भीती वाटत होती काय होईल, याला समजल तर, सांगू का मी, तिची हिम्मत झाली नाही, दोघे जेवायला खाली आले.

खाली आदेश टेन्शनमध्ये फोनवर कोणाशी तरी बोलत होता.

"काय झाल आदेश",.. अभिजीत.

"दादा आजकाल कोणीतरी प्रियाच्या मागे फिरत आहे, ती घरी येतांना लक्ष देत आहे, आता ही या वेळी प्रियाला कोणी तरी बागेत उभ आहे अस वाटल, मला खूप भीती वाटते आहे प्रियाला काही झाल तर",.. आदेश.

अभिजीतने लगेच फोन करून बॉडीगार्ड मागवून घेतला, प्रियाचा पत्ता दिला, प्रियाची माहिती फोटो पाठवून दिली,.." या मुलीकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं, ही आमच्या घरची होणारी सून आहे, अजिबात काही त्रास होता कामा नये, एका तासात हे काम व्हायला पाहिजे ",

" ठीक आहे सिक्युरिटी मिळून जाईल",..

आदेश काळजीत बसलेला होता, काव्या त्याच्या शेजारी बसलेली होती, अभिजीत फोनवर बोलत फिरत होता,

आशाताई घरातुन आल्या,." काय चाललं आहे कसलं टेन्शन आहे? ",

काव्या त्यांना सगळं सांगत होती.

" कोण असेल",.. आशा ताई.

" हे नक्की ते त्या विकासच काम असेल ",.. अभिजीत.

आता काव्या परत आदेश कडे बघत होती, विकास चांगला वाटला होता तिला, शांततेत बोलत होता तिच्याशी, एवढा वाईट आहे तो तर माझ्याशी कसा काय चांगला बोलला.

आजी पण आत मधून आल्या,.. "मी तर कधीची म्हणते आहे तुला आदेश कशाला हव्या त्या इलेक्शनच्या भानगडी, त्यात या काव्याला पण घेवून जातो तू तिकडे",

" नुसतं इलेक्शन मुळे त्याची आपली दुश्मनी आहे का आजी, तो नेहमी आपल्या कंपनीची ऑर्डर खराब करायच्या मागे असतो, आपलं जास्तीत जास्त नुकसान व्हाव असं त्याला वाटतं, खूपच दादागिरी करतो तो, बिझनेस म्हटलं की थोड्याफार प्रमाणात दुश्मन असणारच",.. आदेश.

बापरे अस आहे का, काव्या विचार करत होती.

" पण असं आपल्या घरच्या बायकांना त्रास द्यायचा हे काम अजिबात योग्य नाही, आपल्याला तर त्यांच्या घरी कोण आहे हे सुद्धा माहिती नाही आणि ते लोक सरळ प्रियाच्या मागे फिरतात, म्हणजे ते लोक काव्याच्या मागे पण येत असतील, पण रघु असल्यामुळे आपल्याला काही समजत नाही",.. आशा ताई.

" शशी कुठे आहे? नक्कीच याबाबतीत जर काही विकासला माहिती असेल तर त्यांने त्याला आधार दिला असेल तर, दोघ मिळून त्रास देतील आपल्याला आपण सावध रहायला हव ",.. अभिजीत.

" बरोबर आहे उद्या इन्स्पेक्टर साहेबांना फोन करावाच लागेल",.. आदेश.

" जरा चौकशी कर तिथली, त्यांच्या घरी कोण कोण आहे ते समजल तर बरं होईल, अटक करता आली त्या लोकांना तर चांगल होईल पुढच संकट टळेल",..अभिजीत.

आदेश काव्या कडे बघत होता, ती परत घाबरली,

"काय झाल आदेश काव्या",.. अभिजीत.

काव्या मानेने सांगू नको बोलत होती, आदेश गप्प होता, आई आजी काव्या कडे बघत होत्या.

"मी विचारतो आहे काय झालं? सांगेल का कोणी? आदेश बोल पटकन",.. अभिजीत.

"दादा ते आज विकास आपल्या पार्टी ऑफिस मधे आला होता वहिनीच्या मागे",.. आदेश.

" नाही अभिजीत म्हणजे माझ्या मागे नाही, माझा रुमाल द्यायला आला होता तो",.. काव्या.

"म्हणजे काय झाल नेमक, कुठे गेली होती तू काव्या? तू कुठे होता आदेश? , रघु कुठे होता? , समजेल का मला",.. अभिजीतचा आवाज मोठा होता. मूर्ख पणा सुरू आहे नुसता, गम्मत वाटते का तुम्हाला दोघांनी सगळ्या गोष्टीची.

सगळे दचकले.

"दादा ते मी लग्नाला गेलो होतो, वहिनी ऑफिसमध्ये होती, तिच्यासोबत चार-पाच मुलं होते, अर्ध्या तासात वापस आलो मी",.. आदेश.

"मग कुठे भेटला तो विकास तुला काव्या",.. अभिजीत.

" मी ते संतोष सोबत समोर भेळच्या दुकानात गेली होती तिथे विकास होता, तिथे माझा रुमाला पडला तो द्यायला तो विकास आला होता, बाकी काही झालं नाही, तुम्ही लोक का घाबरले एवढे",.. काव्या.

"का घाबरले म्हणजे काय? तुला काही झाल्यावर घाबरायचं आहे का आम्ही, तुला समजत आहे का काव्या? सांगितलं होतं ना कुठे जायचं नाही, का गेली तू समोरच्या दुकानात, या पुढे मी सोबत असेल तर बाहेर पडायचं घराच्या, समजल का ",.. अभिजीत.

हो.

"तू पण कसा काय आदेश हिला सोडून लग्नाला चालला गेला",.. अभिजीत.

" सॉरी दादा ",.. आदेश.

"यापुढे प्रचार ऑफिस मध्ये जायचं नाही समजतय का काव्या, कधीच सांगतो आहोत मी आई आजी, अजिबात सिरियस नाहीत तुम्ही दोघ , इलेक्शन इलेक्शन करू नको तू, एक तर तुला काही समजत नाही किती धोका आहे ते, तुला काही झालं तर काय करणार आहे मी " ,.. अभिजीत.

अभिजीत फारच ओरडत होता , आई आजी गप्प रहायला सांगत होत्या, त्याने ऐकल नाही, आदेशनेही सांगितलं की आता असं होणार नाही, काव्या शांत होती, तिच्या डोळ्यात पाणी होतं,

प्रतापराव आले बाहेर सगळे गप्प बसले, चला जेवून घ्या.

" मी फ्रेश होऊन येते",.. काव्या रूम मध्ये निघून गेली.

सगळ्यांना माहिती होतं कि ती रडत असेल, अभिजीत तिच्या मागे जात होता पण प्रतापरावांनी त्याला आवाज दिला, तो त्यांच्याजवळ जाऊन बसला,

" ऑर्डरच काम कुठे पर्यंत आल",.. प्रतापराव.

"पंच्याहत्तर टक्के काम झाल आहे बाबा ",.. अभिजीत.

" काय काय बाकी आहे पुढच्या दोन दिवसात झाल पाहिजे",.. प्रतापराव.

हो ते दोघ बोलत बसले.

आई आजी डायनिंग टेबलवर ताट करत होत्या, काव्या अजून खाली आली नव्हती, ती आत बसुन रडत होती, खूप धडधड होत होती, मला काहीही माहिती नाही या लोकांची हिस्टरी तरी मला बोलतात सगळे, आज पहिल्यांदा बघितल त्या विकासला, मला काय माहिती तो वाईट आहे ते, अभिजित किती चिडला आहे, थोड प्रेमाने सांगता आल असत ना, तिने तोंड धुतल, जावू दे शांत रहायला हव, माफी मागून घेवू, कुठे जायच नाही या पुढे,

आदेशला कसंतरी वाटत होतं, उगाच सांगितलं दादाला, किती ओरडला तो वहिनीला, पण तेच ठीक आहे जर दादाला नंतर समजलं असतं तर काही खरं नव्हतं आणि वहिनीला माहिती नाही अजून विकास किती डेंजरस आहे उगाच ती त्याच्याशी बोलली असती, काही झालं तर तिला,

आई आजी एकमेकीकडे बघत होत्या,.. "कोणीतरी बोलवून आणा काव्याला",

तेवढ्यात काव्या खाली येताना दिसली, चेहरा नॉर्मल होतं तिचा, तिने आई आजीला ताट करायला मदत केली, शांततेत जेवण झालं, जेवण झाल्यावर तिने मागच आवरलं, ती लगेच तिच्या रूममध्ये निघून गेली,

जरा वेळाने अभिजीत वरती आला काव्या तोपर्यंत काहीतरी वाचत होती, तो येऊन तिच्याजवळ बसला, तिला जवळ घेतल,.. "काव्या सॉरी, खूप बोललो मी तुला, मला तुझी काळजी वाटते इतकंच आहे, तुला नाही माहिती या गावाचं पॉलिटिक्स, विकास एकदम डेंजर मुलगा आहे, शशी पेक्षा डेंजर, एवढं समजून घे तू, सावध रहा",

"अभिजीत मी नाही जाणार आता प्रचार ऑफिस मध्ये, तू म्हणशील तेच करेल, ऑफिसला जाईल आणि घरी येईल तुझ्यासोबत, श्रद्धाच्या लग्नाला जाईल फक्त, तुला राग नाही आला ना, ओरडू नको ना मला",.. काव्या.

" नाही आला राग, ",.. अभिजीत.

" मला नव्हतं माहिती विकास बद्दल काही, या पुढे काळजी घेईन मी ",... काव्या.

" ठीक आहे, आपण सोबत राहू, मी पण तुला एकट सोडणार नाही",..अभिजीत.

मी झोपते.. काव्यांनी झोपून घेतलं, अभिजीत काहीतरी काम करत होता, वेगळी शांतता होती,

सकाळी काव्या किचन मधे काम करत होती, चहा नाश्ता रेडी होता, अभिजित रेडी होता, आदेश फिरून आला, आदेश आटोप नाश्ता साठी ये पटकन, तिघांचा नाश्ता झाला, अभिजित आदेश ऑफिस बद्दल बोलत होते, काव्या किचन मधे डबे भरत होती, सगळे काव्या शांत आहे म्हणून उदास होते, नाहीतर किती बोलते ती रोज,

" अभिजित तू आमच्या समोर नव्हत बोलायच काव्याला , गप्प झाली आहे ती खूप" ,.. आशा ताई.

"अरे पण काय बोललो मी तिला, फक्त कुठे जायच नाही एवढ तर बोललो, तिला धोका आहे, मला भीती वाटते काही झाल तर",.. अभिजीत.

"तुझी काळजी समजते आम्हाला, तरी पण हळू बोलत जा तिच्याशी",.. आशा ताई.

" अरे आई आजी काय अस? कठिण आहेत , पहिल्या दिवशी बघितल नव्हत तुम्ही काव्याला, किती लागल होत, त्या शशीने मारल होत तिला, तिथून कसतरी पळाली ती, आत्महत्या करत होती माहिती का, नदीवर भेटली मला ही रात्री अकरा वाजता, कसतरी गोड बोलून महिला केंद्रात सोडल होत तिला, मला खूप काळजी वाटते तिची, एक तर तिच्या प्रॉपर्टी मागे बरेच लोक आहेत, ठीक आहे ती, काही रडत नव्हती, आदेशला ही बोललो की मी, त्याला रोज बोलतो",.. अभिजीत.

" आदेशच वेगळ आहे, काव्या तुझी बायको आहे, घरच्या सगळ्या लोकांसमोर तू तिला बोलला, मुली हळव्या असतात मनाला लागत लगेच, अस करू नको या पुढे, जरा प्रेमाने शांततेत वागत जा तिच्याशी, आणि एवढी काळजी आहे तर तू रहात जा तिच्या सोबत, एकट नको सोडू तिला",.. आशा ताई.

"ठीक आहे, आता मी काळजी घेईल, आता काय करू माफी मागू का तिची, कसा राग जाईल तिचा",.. अभिजीत.

" काही करू नको आता, शांत रहा, काही बोलू नको, विचारु नको, एक दोन दिवसात होईल ठीक ती",.. आशा ताई.

" एवढा वेळ? आदेश तर पाच मिनिटात बोलतो माझ्याशी",... अभिजीत.

"मला पण राग येतो दादा ",.. आदेश.

" पुरे झाल तुझ्या रागाच, चला आता वहिनीला बोलव तुझ्या",.. अभिजीत

तिघ निघाले, आई आजी नेहमी प्रमाणे बाहेर पर्यंत आल्या होत्या, त्या आपणहून बोलत होत्या काव्या सोबत, ती थोड बोलली, ऑफिस आल्यावर ही तीच सामान घेऊन निघून गेली, अभिजित आदेश बघत होते, कोणाशी बोलली नाही ती,

काम सुरू झाल, पवार सरांना विचारुन काम सुरू होत तीच, बाकीच्या ऑर्डरच्या कामाशी काहीही संबध नव्हता, लंच टाइम मधे श्रद्धा भेटली खूप बर वाटल काव्याला, श्रद्धा खूप बोलत होती, खरेदी पूर्ण झाली होती, आता कार्यक्रम तेवढे बाकी होते,.. "काव्या आम्ही पार्टी ठेवली आहे माझ्या लग्ना आधी, बॅचलर पार्टी, तू येशील का उद्या रात्री, तिथे थांब माझ्या सोबत केंद्रात " ,

"नाही श्रद्धा जमणार नाही",.. काव्या.

"का काय अस करतेस ग भाव खाते",.. श्रद्धा.

"घरचे सोडणार नाही आणि आता मला त्या लोकांना विचारायची हिम्मत नाही, लग्नाला येईल मी तुझ्या बस, आता माझ्या कडून काही अपेक्षा ठेवू नको फक्त ऑफिस आणि घर एवढ फिरू शकते मी ",..काव्या.

काय झाल?

काव्या सांगत होती विकास बद्दल, अभिजीत चिडला आहे, मला खूप ओरडला काल तो.

" बापरे कठीण आहे, मी विचारु का अभिजीत सरांना, आपण कुठे बाहेर थोडी जाणार आहेत केंद्रात असू आपण, ये ना ",.. श्रद्धा.

"नको ग बाई, तुला ही आणि मला ही ओरडा बसेल, कधी आहे पार्टी ",.. काव्या.

उद्या

"मी करेन व्हिडीओ कॉल",.. काव्या.

"याला काय अर्थ आहे मी कॅन्सल करते तू नाही तर मजा नाही ",.. श्रद्धा.

" अस करु नकोस मला खरच जमणार नाही, अभिजित चिडतील अस काही करायच नाही मला ",.. काव्या.

काव्या आत येऊन बसली, तिचं काम सुरू झालं, आदेश जरा वेळाने तिच्याजवळ येऊन उभा राहिला, ती उठून उभी राहिली,.." बोलायचं नाही का माझ्याशी वहिनी? ",

" तसं काही नाही आदेश",.. काव्या.

" सॉरी ते मी दादाला सांगायला नव्हतं पाहिजे, पण त्याला समजलं असतं नंतर मग तो अजून चिडला असता",... आदेश.

"प्लीज माफी मागू नको आदेश, मला तुझा राग नाही आला, मला एकंदरीत परिस्थितीचा कंटाळा आला आहे, कुठे जाता येत नाही, येता येत नाही, नुसत आपला धोका धोका, सगळे सोबत असूनही का सेफ नाही मी ",.. काव्या.

" वहिनी मी बघतो काय आहे ते प्रकरण, नक्की विकास का मागे आहे तुझ्या आणि प्रियाच्या, शशी सापडला पाहिजे, काळजी करू नकोस, तू लवकर मोकळ राहशील फिरशील",..आदेश.

" आदेश मी नाही येणार तुझ्या सोबत पार्टी ऑफिस मधे, सॉरी, अभिजित असेल तर येईल",.. काव्या.

" काही हरकत नाही वहिनी, अशी गप्प नको राहू",.. आदेश.

" ठीक आहे, प्रियाची काळजी घे, आला का तो बॉडी गार्ड? नाहीतर रघुला सांग तिकडे जायला",.. काव्या.

" आला नवीन बॉडी गार्ड",.. आदेश.

पवार सर आले, काम होत, आदेश आत निघून गेला,
......

0

🎭 Series Post

View all