तुझी साथ हवी मला... भाग 50
©️®️शिल्पा सुतार
........
........
तिघे ऑफिस मधे आले, आदेश आत निघून गेला,
"अभिजित संध्याकाळी काही मीटिंग ठेवू नको आपल्याला शॉपिंगला जायच आहे " ,.. काव्या.
"ठीक आहे तू म्हणशील तस" ,... अभिजीत.
काव्या हसत होती,.. "जस खूप ऐकतो तू माझ" ,
"हो ऐकतो, तू काहीही सांग आता मी लगेच करेन",.. अभिजीत.
"मला दादाला मावशीला भेटायच आहे",.. काव्या.
"ठीक आहे होईल भेट पुढच्या आठवड्यात ",.. अभिजीत.
" कशी काय? ",.. काव्या.
" श्रद्धाच्या लग्नाला येतील ना ते ",.. अभिजीत.
" अरे हो मस्त",.. काव्या.
"आपण बोलवून घेवू त्यांना",.. अभिजीत.
"मग मी त्यांच्या सोबत राहील चालेल का ",.. काव्या.
" हो मी पण येईल तुझ्या सोबत",.. अभिजीत.
काव्या खुश होती आता, ती तिच्या डिपार्टमेंट मध्ये आली. लंच ब्रेक मध्ये श्रद्धा भेटली,
" मी येते आहे संध्याकाळी केंद्रात, बॅग सुद्धा घेतली आहे सोबत ",.. काव्या.
दोघी खूप खुश होत्या, तिथेच उड्या मारत होत्या,
"मला तर असं झालं आहे कधी जाऊ संध्याकाळी तिकडे",.. काव्या.
"हो ना तुझ्याशी खूप बोलायचं आहे, काल तर नाही म्हणत होते ना अभिजीत सर, मग अचानक तू नकार होकारात कसा बदलला ",.. श्रद्धा हसत होती.
" तू मला सारख चिडवणार असशील तर मी येणार नाही",.. काव्या.
"बर सॉरी पण कस झाल हे आश्चर्य ",.. श्रद्धा.
" तुला ही समजेल आता, तुझ लग्न आहे ",.. काव्या.
श्रद्धा लाजली होती, रघु खूपच छान आहे, कस असेल त्याच्या सोबतच आयुष्य, मला खूप जपतो तो, खूप प्रेम करतो, टच वूड, तिने डोक्यावर हात ठेवला.
"काव्या सोबत जायच का केंद्रात संध्याकाळी ",.. श्रद्धा.
"नाही मी अभिजीत सोबत येईल ",.. काव्या.
चालेल.
दिवस भर आदेश बिझी होता, एकदा दोनदा काव्याला तो दिसला, विशेष बोलला नाही तो, काय झाल याला, ती विचारायला जात होती पण आत मीटिंग सुरू होती,
ऑफिसचं काम झालं, ती साडेपाचला तयार झाली, आदेश काय करतो आहे काय माहिती,.." काय झाल आदेश? काही टेंशन आहे का? ",
"नाही वहिनी",.. आदेश.
"मग काय झाल एकदम गप्प आहेस तू आज, परत मीटिंग आहे का अभिजीत सोबत",.. काव्या.
"नाही वहिनी",.. आदेश.
"तब्येत ठीक आहे ना",.. काव्या.
"हो थोड कामात आहे",.. आदेश.
"ठीक आहे मी निघते, मी आज घरी नाही केंद्रात जाते आहे, आदेश आमची आज पार्टी आहे तिकडे ",.. काव्या खूपच बोलत होती, खुश होती ती, चल मी निघते, उशीर होतो आहे.
"ठीक आहे काळजी घे, दादा आहे ना सोबत ",.. आदेश.
हो.
काव्याशी बोलून थोडा तरी आदेशचा मूड ठीक झाला होता.
ती अभिजीतच्या केबिनमध्ये आली,.. "चल ना अभिजीत, उशीर होतो",
"हो थांब दहा मिनिट",.. अभिजीत त्याच्या कामात होता.
"नाही अभिजीत उद्या कर काम",.. काव्या.
" अरे एवढी काय घाई आहे, इथेच तर जायच केंद्रात ",.. अभिजीत.
" शॉपिंगला जायचं आहे आधी, नंतर केंद्रात ",.. काव्या.
अभिजीत हसत होता, एकदम लहान मुलीसारखी आहे ही गोड,
काव्याने त्याला जबरदस्ती लॅपटॉप बंद करायला सांगितला, ओढतच त्याला बाहेर आणलं,.." कोणाशी बोलायचं नाही रस्त्यात, मग तुला काम आठवतं, चल पटकन ",
" माझ्यावर फारच जबरदस्ती होते आहे ",.. अभिजीत.
" असू दे इतर वेळी कुठे जात नाही मी, काही मागत नाही ",.. काव्या.
"हो का, असे किती दिवस झाले आपल्या लग्नाला",.. अभिजीत.
"आता दोन महिने होतील",.. काव्या.
"फक्त दोन महिने, तरी तू मला सोडून आज रात्री तिकडे जातेस, काय अस, रात्री वापस ये ना प्लीज, तरच मी येईल तुला सोडायला ",.. अभिजीत.
" नाही येणार, तिकडे रहायच मला",.. काव्या.
प्लीज.
नाही.
" काय अस, काय करायचं आता, सांग ",.. अभिजीत.
"आधी मला जीन्स घ्यायची ती मी घालणार आहे कार्यक्रमाला, सगळ्या मुली जीन्स घालणार आहेत",.. काव्या.
" अच्छा यासाठी चालली आहे का ही शॉपिंगची गडबड ",..अभिजीत.
दोघं निघाले ते मॉलमध्ये जात होते, त्यांच्या मागे विकासची गाडी होती, आज कुठे चालले आहे हे वेगळ्या दिशेला, काव्या दिसली नाही आज, तिला बघायच आहे एकदा,
मॉलमध्ये गेल्यानंतर खाली पार्किंग मध्ये अभिजीतने गाडी लावली, त्यांच्या थोडं दुर विकासने गाडी लावली,
दोघं हात धरून मॉलमध्ये आले, अभिजीतने काव्या साठी तीन-चार जीन्स चार-पाच टॉप निवडले ते काव्याने घालून बघितले छान दिसत होते,.. "दोन घे अभिजीत इतके नको" ,
"का? आवडले नाही का",.. अभिजीत.
"छान आहेत पण नंतर घेईल, अभिजित केंद्रातल्या आजीं साठी ड्रेस घेवू का त्यांना हौस आहे " ,... काव्या.
"घे ना, तुझ्यासाठी ही घे",.. अभिजीत.
काव्याने आजीं साठी एक ड्रेस घेतला, तिच्या साठी तीन चार ड्रेस घेतले , अभिजितने तिच्या साठी एक डार्क ब्लू प्लेन साडी घेतली,
"ही साडी बघ काव्या, अशी साडी आवडते मला",... अभिजीत.
" नको साडी",.. काव्या.
" घ्यावी लागेल",.. अभिजीत.
" मला नेसता येत नाही" ,.. काव्या.
"शिकून घे",.. अभिजीत.
"ऑफिसला जाते फक्त मी कधी नेसू",. काव्या.
"कधी तरी माझ्या साठी नेस",..अभिजीत.
"ठीक आहे",.. काव्या.
लगेच बिल केल,
"घालते का जीन्स",.. अभिजीत.
" नको तिकडे जावून घालेल",.. काव्या.
"मला फोटो पाठवायचा मला फर्स्ट दाखवायची",.. अभिजीत.
चालेल.
"झालं शॉपिंग, आता काय करायचं ",.. अभिजीत.
"आता मला केंद्रात सोडून दे",.. काव्या.
"असं चालणार नाही, माझ्याकडुन किती काय काय सामान घेतलं तू, आता आपण जरा वेळ फार्म हाऊस वर जाऊ, माझ्याबरोबर थोडा वेळ घालव",.. अभिजीत मुद्दाम तिला त्रास देत होता.
"नाही अभिजीत अजिबात जमणार नाही मला जायचं आहे केंद्रात",.. काव्या.
"शक्य नाही, मी जावू देणार नाही, तुझे केवढे लाड केले, आता माझा टर्न",.. अभिजीत.
अभिजीत प्लीज,
दोघेजण छान बोलत येत होते, अभिजीत काहीतरी बोलत होता, काव्या लाजत होती, विकास पटकन लपला, केवढी चांगली दिसते आहे आज काव्या, पण ती त्या अभिजीत सोबत असते तर फार राग येतो मला,
केक शॉप मध्ये ते गेले.
" इथे का आलो आपण ",.. काव्या.
" तुमच्या पार्टीसाठी सामान नाही घ्यायचं का?",.. अभिजीत.
चालेल.
मोठा केक, पेस्ट्री, समोसे, चिप्स अश्या बर्याच पदार्थांची अभिजीतने ऑर्डर दिली, बरोबर साडेसात वाजता दिलेल्या पत्त्यावर पाठवून द्या, तिथे त्याने डायरीत पत्ता लिहून दिला.
" केक वर काय लिहायचं आहे सर ",.
काँग्रॅच्युलेशन श्रद्धा.
दोघ बाहेर निघाले,.. "चलते ना मग फार्म हाऊस वर",
"नाही श्रद्धा वाट बघत असेल प्लीज",.. काव्या.
"ठीक आहे ही एक गोष्ट पेंडिंग आहे तुझ्यावर",.. अभिजीत.
चालेल ते दोघं केंद्राकडे निघाले, अभिजीतने तिला गेटवर सोडलं, काव्या तिची बॅग आणि पर्स घेऊन खाली उतरली,.. "जाते मी अभिजीत, थँक्यू लव यू ",
" लव यू टू काव्या, मी काय करू आज घरी एकट, प्लीज रात्री ये ना घरी",... अभिजीत.
नाही,
" ठीक आहे तरी माझी आठवण आली तर कर फोन मी येईल घ्यायला",.. अभिजीत.
हो.
काव्या आत मध्ये चालली गेली, अभिजीत समोरून घरी चालला गेला, विकास होता त्यांच्या मागे, तो केंद्राच्या गेटवर येऊन थांबला, काव्या आत मध्ये आहे वाटतं, कसं काय विचारणार पण, हे तर अभिजीतच महिला आधार केंद्र आहे, काय करू.
त्याने गाडीला टर्न मारता मारता एकदम गेटला धडक मारली, मोठा आवाज झाला, तेव्हा काव्या नुकतीच आत मध्ये गेली होती आणि ती काकूंशी बोलत होती, गेटचा आवाजा वरुन काहीतरी पडलं अस काव्याला वाटलं, गेट जवळ अभिजीत होता, त्याला काही झालं की काय? ती घाबरली.
"काय झालं",.. काकू विचारत होत्या.
गाडी गेटला धडकली वाटत, काव्या काकू पळत बाहेर आल्या, मागून दोन-तीन मुली पण आल्या, विकास गाडीतून उतरून आला, वॉचमन त्याच्याशी भांडत होता, गेटला काय झालं ते बघत होता, काकू विकास जवळ गेल्या,.. "काय झालं काय प्रॉब्लेम आहे",
तोपर्यंत काव्या बाहेर पोहचली, काव्याकडे विकास बघत होता, तीच लक्ष नव्हत,
"अभिजीत कुठे आहे?" ,... तिने वॉचमनला विचारलं,
"साहेब गेले लगेच, हे साहेब पाठीमागून आले, गाडी वळवतांना गेटला धडक मारली",.. सिक्युरिटी गार्ड काकू गेट खराब झाल का ते बघत होते.
आता काव्याने बघितलं कोण आहे, ती बघतच राहिली, हा काय करतो आहे इथे, विकास तिच्याजवळ उभा होता, रोज माझ्या मागे येतो का हा , तो तिच्याकडेच बघत होता, ती पटकन मागे झाली, विकास तिच्या जवळ येत होता, काय करू मी कुठे जावू, ती मागे सरकत होती, त्याच्या गाडीला टेकली ती , विकास तिच्या अजून जवळ येवून उभा राहील, ती बाजूला होत होती, विकास तिला जावू देत नव्हता , त्याची नजर... बापरे काव्या घाबरली होती.
काकू तिने हाक मारली, विकास बाजूला झाला, काव्या काकू जवळ जावून उभी राहिली.
एक तर मोठ्या मुश्किलीने अभिजीतने इकडे येऊ दिल, त्यातही हा विकास मागे आला, काय कटकट आहे, वाटतं मुद्दामून धडक मारली त्यांने गेटवर, बोलू का त्याला माझ्या मागे यायच नाही अस, नको कोणी ऐकल तर, गोंधळ होईल,
विकास अजूनही काव्या कडे बघत होता,.. "काकू पाणी मिळेल का मला थोडं, घाबरल्यासारखे झाला आहे, अचानक गाडी गेटवर आली",
"या आत मध्ये" ,.. काकू.
त्यांने गाडी व्यवस्थित बाजूला लावली.
"जा काव्या थोडं पाणी आण",.. काकू
काव्याला राग आला होता, ती आतुन पाणी घेऊन आली तिने विकासला पाणी दिलं, थँक्स तिच्याशी हसला तो, ती दुसरीकडे बघत होती,
" थँक्यू काव्या बर वाटतय आता थोडं तुझ्या हातून पाणी पिलं तर, तो हळूच म्हटला, सॉरी काकू तुमच्या गेटचा काही नुकसान झालं असेल तर सांगा मी पैसे देतो नाही तर नवीन गेट लावून देतो ",.. विकास
" काही गरज नाही त्याची पुढच्या वेळी सावकाश गाडी चालवा",.. काकू.
"ठीक आहे, या महिला आधार केंद्र साठी काही मदत लागली तर सांगा, मी तुमच्या सेवेसाठी हाजीर होईल, येतो मी",.. मुद्दामून तो काव्या कडे बघून बोलत होता, काव्या पटकन आत मध्ये निघून गेली.
श्रद्धा आली तोपर्यंत खाली,.." काय गडबड आहे ग ",
" माहिती नाही कोणाची तरी गाडीने गेटला धडक दिली",.. काव्या.
तिने विकास बद्दल कोणाला सांगितलं नाही.
श्रद्धाच्या रूममध्ये ती आली, काही समजत नाही काय कराव, हा मुलगा रोज मागे येतो आहे, आता तर माझं लग्न पण झालं आहे, काही करता काही झालं तर, अभिजीत चिडले तर, मला दादाकडे जायला सांगितलं तर, परवा नुसत तो विकास रुमाल द्यायला आला तर किती चिडले होते घरचे, आज जर समजलं की तो डायरेक्ट माझ्या मागे केंद्रात आला तर काय होईल, ऑफिसला जाण सुद्धा बंद होईल, नको सांगायला कोणाला, आपण जायच नाही या पुढे कुठे,
थोड्या वेळाने केकच पार्सल आल, मुलींनी केक नीट फ्रीज मध्ये ठेवला, जेवायला मस्त पुलाव केला होता त्यात ही ऑर्डर आली, खूप पदार्थ होते,
खूप छान दिसत होत्या सगळ्यां, काव्याने जीन्स घातली,.. "श्रद्धा फोटो काढ माझा, अभिजीतला पाठवायचा आहे",
दोन तीन फोटो तिने अभिजीतला पाठवले,
गप्पांना नुसता ऊत आला होता, काव्या आजींना भेटायला गेली,.. "आजी चला ना तुम्ही खाली",
"तू हे काय घातला आहे पँट का",.. आजी.
" हो आजी, तुम्ही पण आज ड्रेस घाला ना, छान कॉटनचा ड्रेस आणला तुमच्या साठी, चला मी तयार करते तुम्हाला" ,.. काव्या.
"पँट घट्ट नाही ना तुझी",.. आजी.
" नाही आजी काय झाल" ,.. काव्या.
"मला वाटतय तुला दिवस गेले आहेत, असे कपडे नको घालू तू",.. आजी.
काव्या आश्चर्य चकित झाली, आजी काय बोलता आहेत, आता तर झाल लग्न, आता दोन महिने पण झाले नाही लग्नाला , अस होवू शकत का, ती विचार करत होती, आजींना अनुभव होता, काही सांगता येत नाही, काय करू मी आता,
तिने आजींची तयारी करून दिली, दोघी खाली आल्या,.. "धावपळ करू नको बेटा जास्त, घरच्या मोठ्यांना सांग" ,
" ठीक आहे आजी, इथे कोणाला बोलू नका पण",.. काव्या.
"ठीक आहे लाजते का तू",.. आजी.
"अजुन कन्फर्म नाही काही" ,.. काव्या.
"असेल बघ नक्की, छान दिसतेस तू, मुलगी जेव्हा आई होणार असते ना तेव्हा ती सगळ्यात छान दिसते, हव ना तुला मुल",... आजी.
" आजी आम्ही दोघ या बाबतीत काही बोललो नाही",.. काव्या.
आजी सगळ्यांमधे जावून बसल्या. सगळ्या मुली आजींच कौतुक करत होत्या, आजी किती छान दिसता ड्रेस मधे, आजी तुमचा आहे का ड्रेस?
" हो काव्याने आणला माझ्यासाठी",.. आजी.
" सुंदर दिसतोय ड्रेस तुम्हाला, अस रहात जा आता",..
" हो पुढच्या वेळी तुमच्या सारखी पँट घालणार आहे मी",.. आजी.
सगळ्या हसत होत्या,
हॉल मध्ये देवाचा फोटो होता,. "चल श्रद्धा दिवा लाव देवाला नमस्कार कर, मग करा कार्यक्रम सुरू",.. काकू बोलवत होत्या.
काव्याने पण हात जोडले, ती परत आजीं जवळ येवून बसली,
काव्याला एकदम छान वाटत होत, खर असेल का हे, आता लग्न झाल माझ आणि बाळ आहे का माझ्या कडे, तिने हळूच पोटाला हात लावला, काय माहिती पिरीएड्स यायचे आहेत माझे, लग्ना नंतर एकदा येवून गेले, काळजी घ्यायला हवी, अभिजितला सांगू का, नको पण मला खात्री नाही, घरी गेल्यावर बोलू,
श्रद्धाने बाकीच्या मुली सोबत केक कापला, खूप चिडवत होत्या मुली तिला, नाव घे श्रद्धा,
"काहीही पार्टीत कोण नाव घेत, लग्नाला याल तुम्ही तेव्हा घेईल",.. श्रद्धा.
" तेव्हा रघु समोर तु काही बोलत नाहीस",..
"रघुचा कोणी भाऊ वगैरे लग्नाचा आहे का?",.. एक दोघी विचारात होत्या, बाकीच्या खूप हसत होत्या,
"काव्याचा दीर आहे लग्नाचा, तो तर एकदम हॅन्डसम आहे",..
" आदेश बद्दल कोणी काही बोलायच नाही बरका, आणि त्याच लग्न ठरलं आहे ",.. काव्या.
" काय यार सगळे चांगले मुल लग्न करता आहेत, आपल काय होईल ",..
नुसती धमाल सुरु होती, काव्याने आजींना प्लेट मधे केक आणून दिला.
" तू घे ना ",.. आजी.
" हो घेते मला समोसा हवा आहे ",.. काव्या.
काकू सगळ्यांना आग्रह करत होत्या.
" एवढा खाऊ कोणी आणला",..
काव्याने.
" मी नाही अभिजीतने घेवून दिला केक, मला लक्ष्यात नव्हत",... काव्या.
सर चांगले आहेत,
मस्त गाणे लावले होते, बाकीच्या मुली नाचत होत्या, त्या काव्याला ओढत होत्या, आजी नाही म्हटल्या, थांब इथे माझ्या जवळ,
"काय काव्या किती बोर करते चल ना",..
"येते ग मी थांब आजींना सांभाळते आहे ",.. काव्या.
" आजी लहान आहेत का",..
"हो मी लहान आहे, थांब काव्या इथे",.. आजी.
आता बर्याच मुली एका जागी बसून बोलत होत्या, जेवण करू या, मस्त झाला होता पुलाव, मजा आली आज, चल काव्या रूम मध्ये,
" आजी येते मी थोड्या वेळाने",.. काव्या.
" कपडे बदल आधी ",.. आजी.
हो.
श्रद्धा काव्या रूम मध्ये आल्या,
" श्रद्धा मला तुला एक गोष्ट सांगायची आहे ",.. काव्या.
काय?
"एक मुलगा माझ्या मागे येतो रोज",.. काव्या.
"काय कोण",.. श्रद्धा.
विकास.
"कोण आहे तो कुठे भेटला",... श्रद्धा.
"इलेक्शनला उभा आहे तो आदेशच्या अपोझिट, मला तो आदेशच्या पार्टी ऑफिस मधे दिसला होता, मला आता हे समजत नाही तो मुद्दामून आम्हाला त्रास देतो आहे का, की त्याला माझ्यात इंटरेस्ट आहे" ,.. काव्या.
"काय म्हटलं तो",.. श्रद्धा.
"काही म्हटला नाही पण मुद्दामून मागे येतो, हसतो, आज म्हणे तुझ्या हातून पाणी पिऊन छान वाटल",.. काव्या.
"म्हणजे तो गेट वर येवुन धडकला तोच का",.. श्रद्धा.
हो
"अभिजीत सरांना सांगितलं का तू",... श्रद्धा.
"नाही सांगितलं हिम्मत होत नाही माझी, ऑफिसला जाणं बंद होऊन जाईल, काय करणार आहे मी दिवसभर घरी, काय करू मी सांग मला श्रद्धा",.. काव्या.
"पण तुझी सिक्युरिटी महत्वाची आहे, मला असं वाटतं की तू अभिजीत सरांना सांगून दे, जर काही प्रॉब्लेम झाला पुढे तर निदान सर काहीतरी उपाय करतील याच्यावर",.. श्रद्धा.
" ठीक आहे. मला भीती वाटते श्रद्धा अभिजीत माझ्यावर चिडला तर, काल अस झाल माझी काही चुकी नव्हती तरी त्या विकास मुळे मला ओरडा बसला ",.. काव्या.
" तू गेली होती ना भेळच्या दुकानात तीच तुझी चूक होती",.. श्रद्धा.
" तू पण अभिजीतच्या बाजूने बोल ",.. काव्या.
"अस नाही पण काळजी वाटते तुझी, नको जात जावू कुठे जो पर्यंत प्रॉब्लेम ठीक होत नाही ",.. श्रद्धा.
" मला कंटाळा येत नाही का ",.. काव्या.
"ते आहेच, पण तू सुरक्षित रहाण महत्वाच आहे, तू इतकी सुंदर श्रीमंत म्हणून अस होत ",.. श्रद्धा.
"नाही अस नाही तो विकास इनामदार खूप श्रीमंत आहे, मुद्दामून त्रास देतात लोक,अभिजित साठी मला भीती वाटते, लग्न झालेल्या मुली मागे का येत असेल तो ",.. काव्या.
"माहिती नाही विचित्र आहे हे ",.. श्रद्धा
" हो ना मी बोलेन अभिजीत सोबत बघु काय होत ते",.. काव्या.
" रघु ठीक आहे ना स्वभावाने, चिडका वगैरे नाही ना काव्या",.. श्रद्धा.
" नाही ग तुला का अस वाटल ",.. काव्या.
"अग तो कराटे चॅम्पियन आहे शार्प शूटर आहे म्हणून वाटल ",.. श्रद्धा.
" नीट आहे तो वागायला, उगीच कोणाला मारत नाही तो, डोन्ट वरी तुला तर फार घाबरतो तो",. काव्या.
" काहीही.. कोणी सांगितल ",.. श्रद्धा.
" नुसत म्हटल श्रद्धा आली तरी नीट उभा रहातो तो ",.. काव्या.
श्रद्धा हसत होती.
" मी खूप खुश आहे तुझ्या साठी, छान सुरुवात कर नवीन आयुष्याची",.. काव्या.
" तुम्ही दोघ जास्त करता पण आमच्या साठी, किती शॉपिंग दागिने खूप घेतले, रहायला बंगला ",.. श्रद्धा.
" तू माझी बहिण आहेस तुझ्या साठी काहीही ",.. काव्या.
" तू खुश आहे ना काव्या तुझ्या सासरी?",.. श्रद्धा.
" हो काही प्रोब्लेम नाही",.. काव्या.
" सगळे बॉस घरात कस वाटत",.. श्रद्धा.
"घरात वेगळ वागतात ते, ऑफिस मधे वेगळे, बाबा काही जास्त बोलत नाही घरात, आदेश जास्त बोलतो, तो ऑफिस मधे गप्प असतो, सासुबाई आजी चांगल्या आहेत",.. काव्या.
"आमच्या कडे परत कोणी नाही रघु एकटा मी एकटी",..श्रद्धा.
"येतील की नंतर तुमचे मुल ",.. काव्या.
"आता श्रद्धा लाजली होती मी या गोष्टीचा विचार केला नाही",.. श्रद्धा.
" कर मग लवकर",.. काव्या.
" तू केला का विचार काही",. श्रद्धा.
" नाही अजून ",.. काव्या.
सांगू का हिला, नको पण नीट माहिती नाही आणि अभिजीतला आधी जाणून घ्यायचा हक्क आहे, त्या शिवाय कोणाला नाही सांगायच.
रात्री बर्याच वेळ श्रद्धा काव्या बाकीच्या मुली गप्पा मारत होत्या.
.....
.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा