तुझी साथ हवी मला... भाग 51
©️®️शिल्पा सुतार
.........
.........
आदेश संध्याकाळी त्याच्या पार्टी ऑफिस मध्ये बसलेला होता त्याने दोन-तीनदा प्रियाला फोन लावला, ती फोन उचलतच नव्हती,.. "प्रिया प्लीज अस करु नकोस, बोल ओरड मला हव तर, मी नाही राहू शकत तुझ्या शिवाय, हक्काने तुझ्या जवळ आलो होतो मी, सोड ना आता हा अबोला",
प्रियाचा रीप्लाय आला नाही.
मी आता जातो ऑफिस झाल्यावर तिच्याकडे, भेटून बोलतो प्रियाशी, तो निघाला,
प्रिया किचन मधे काम करत होती, तिच्या बाबांनी दरवाजा उघडला,.. "या आत आदेश राव, प्रिया बाहेर ये" ,
प्रिया आली, ती छान हसली त्याच्याशी,.. थॅक गॉड ही हसली,
" बस ना आदेश" ,.. तो बसला.
पाच मिनिट तो तिच्या बाबांशी बोलत होता,.. "मला प्रियाशी बोलायच आहे थोड बाहेर जावू का आम्ही, तुम्ही रविवारी येणार आहात ना घरी तर लग्ना बाबतीत आम्हाला दोघांना आधी ठरवायचं आहे" ,
"ठीक आहे प्रिया, जा तयार हो",.. बाबा.
प्रिया आदेश निघाले, ते त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी आले,
" प्रिया बोलणार का काही आता, सॉरी प्लीज अस करु नकोस , ठीक आहे या पुढे न विचारता मी तुला काही करणार नाही, हात लावणार नाही, एवढ काय? तुझा विश्वास नाही का माझ्या वर? इतके वर्ष आपण एकत्र आहोत कधी काही केल का मी तुला, आता आपल लग्न आहे ना, प्लीज बोल",.. आदेश.
"मला थोडा वेळ हवा आहे आदेश, मला अस तुझ्या सोबत लगेच रहायला जमणार नाही, तू हो म्हणत असशील तर लग्न करेन मी, मला त्रास द्यायचा नाही",... प्रिया.
" काय प्रॉब्लेम आहे ", .. आदेश.
" माहिती नाही मला तुझ्या सोबत कंफर्टेबल व्हायच आहे आधी ",.. प्रिया.
"ठीक आहे किती वेळ लागेल तुला साधारण " ,.. आदेश हसत होता.
" माहिती नाही",.. प्रिया.
" काय अस, फिक्स सांग, तरी आपल लव मॅरेज आहे, अरेंज मॅरेज असत तर काय केल असत तू",.. आदेश.
"ते मला माहिती नाही, महिना दोन महिने तरी वेळ दे",.. प्रिया.
"अस केल तर कस चालेल, माझा विचार कर थोडा, ठीक आहे तू म्हणते तस, लग्न करशील ना, नसेल करायच तर रविवारी तस स्पष्ट सांगून दे ",.. आदेश चिडला होता, त्याने तिला घरी सोडून दिल.
आदेश.... तो निघून गेला, प्रिया बघत राहिली .
आज अभिजीत खाली बसुन प्रतापरावां सोबत बोलत होता, घरी आल्या वर आदेश त्याच्या रूम मध्ये निघून गेला, दोघ बघत होते,
" काय झाल आदेशला",.. प्रतापराव.
" काय माहिती बाबा सकाळी पण गप्प होता ",.. अभिजीत.
अभिजीत रूम मध्ये आला, त्याने काव्याने पाठवलेले फोटो बघितले, जीन्स छान दिसते हिला, त्याने फोन केला, काव्या तीन चार मैत्रिणी गप्पा मारत होत्या , सगळ्या मुली त्रास देत होत्या, काव्या उचलू नको फोन नाही तर आम्ही पण बोलू,
श्रद्धा मागे होती यात, अभिजीत तिचा बॉस होता, नको नाव घ्यायला, बाकीच्या मुलीनी फोन उचलला, सगळ्या हॅलो बोलत होत्या,
"काव्या आहे का, तिला द्या फोन",.. अभिजीत.
बाकीच्या हसत होत्या, कोणी फोन देत नव्हत, आमच्याशी बोला ना.
"फोन द्या इकडे".. काव्या बोलत होती, "अभिजीत तू स्पीकर वर आहेस या मुली फोन देत नाही",.. काव्या.
तो पण खूप हसत होता,.. "चालू द्या तुमची पार्टी, एन्जॉय आराम पण करा उद्या ऑफिस आहे",
गुड नाइट जिजाजी, त्याने फोन ठेवला, मुली परत गप्पांमधे रमल्या.
"काय यार बोलू पण दिल नाही अभिजीत सोबत",.. काव्या.
" उद्या बोल आरामात, आज आमच्याशी बोलायच फक्त",..
सकाळी काव्या रेडी होती, तिने केंद्रातच नाष्टा केला, जाऊन ती आजींना भेटून आली,
श्रद्धा सोबत होती त्यामुळे आजी काही म्हटल्या नाही, त्यांनी काव्याला जवळ घेतलं, श्रद्धा स्कूटरने ऑफिसला गेली, पाच मिनिटातच अभिजीत तिला घ्यायला आला, ती कार मध्ये बसली. खूप छान हसत होती ती त्याच्याशी.
"अरे वाह आज मूड छान दिसतो राणी सरकारांचा आज आमच्यावर मेहेरबानी होण्याची शक्यता आहे" ,.अभिजीत.
"काहीही अभिजीत",..काव्या.
"छान हसतेस तू आज काय विशेष",.. अभिजीत.
"काही नाही तू भेटला ना आता म्हणून खुश आहे मी ",..काव्या.
"जीन्स का नाही घातली",.. अभिजीत.
"आता ऑफिसला चालते का",.. काव्या.
"हो घालायची एखाद्या वेळी ",.. अभिजीत.
" अभिजीत कुठे जायचं ",..काव्या.
"कुठे म्हणजे काय ऑफिसला जायचं ना",.. अभिजीत.
"मला पाच मिनिट तुला भेटायचं आहे",.. काव्या.
"काय झालं काव्या",.. अभिजीत.
"पाच मिनिट फार्म हाऊस वर जायचं का",.. काव्या.
"विचार काय आहे",.. अभिजीत.
"तसं काही नाही एकदा मिठी मारायची आहे",.. काव्या.
"इथेच ये ना मग जवळ, तिकडे कशाला जायचं, तिकडे गेलं तर मग हाफ डे सुट्टी होईल, मला महत्त्वाच्या मिटींग आहे",.. अभिजीत.
" ठीक आहे",.. अभिजीतने तीला जवळ घेतलं दोघ ऑफिसला निघाले.
" काय झालं काही सांगणार का ",.. अभिजीत.
काव्याला काय सांगू असं झालं होतं, खूपच लाज वाटत होती, अभिजीत तिच्याकडे बघत होता,.." काय झालं आहे खरंच जायचं का फार्म हाऊसवर",
नको.
" मग सांगणार का पटकन",.. अभिजीत.
"अभिजीत आजी म्हणत होती होत्या की त्यांना वाटत आहे मी प्रेग्नेंट आहे ",.. अभिजीतने गाडी थांबवली, तो एकदम काव्याकडे बघत होता, काय म्हणते आहेस?
" मला काही वाटत नाही तसं अजून काही, आजी म्हणताहेत चेहरा वाटतो तसा, अस असत का ",.. काव्या.
तो एकदम खुश होता,.." डॉक्टर कडे जायचं का",..
" नाही अजून कशात काही नाही, मला काहीच वाटत नाही",.. काव्या.
"आजींचा अनुभव आहे पाठीशी, पण खात्री तर करावी लागेल ना" ,.. अभिजीत.
" आता नको श्रद्धाच्या लग्नानंतर जाऊ तोपर्यंत थोडे दिवसही पुढे जातील",.. काव्या.
" चालेल पण तू काळजी घे खूप, म्हणजे आपण काळजी घेऊ, तू खुश आहेस ना काव्या ",.. अभिजीत.
" हो तू अभिजीत",.. काव्या.
हो.
"असं तर नाही वाटत ना खूप लवकर होत आहे ",..काव्या.
" काही प्रॉब्लेम नाही ",.. अभिजीत.
"माझ पुढच शिक्षण, कस करणार मी ",.. काव्या.
" करायच तसच, आता पासुन काळजी करू नकोस, काही खाल्लं का नाश्ता केला का",.. अभिजीत.
" हो. संध्याकाळी आई आजी त्यांना सांगते त्या काय म्हणता आहेत ते बघु ",.. काव्या.
ठीक आहे.
दोघ ऑफिस मधे आले, अभिजित सोडत नव्हता काव्याला,.." थांब नको जावू, मी तुझ ऐकायला पाहिजे होत, फार्म हाऊसवर जायला पाहिजे होत, आता जावू या का, मला तुला जवळ घ्यायच आहे ",
"अभिजीत मी काय म्हणते खूप स्वप्न नको बघु अजून नक्की नाही",.. काव्या.
"होईल छान सगळ",. अभिजीत.
आत मधे येवून अभिजीत नुसता बसला होता, काही काम सुचत नव्हत त्याला, काव्याने कामाला सुरुवात केली,
.......
.......
विकास शशीला भेटायला आला,
" आज कसा काय तू सकाळी इकडे, ऑफिस नाही का",.. शशी.
" तशी आनंदाची बातमी घेवून आलो आहे मी, तुला जायच ना घरी, तुझ काम झाल, तु जावू शकतोस" ,.. विकास.
"काय बोलतो आहेस",..शशीला विश्वास बसत नव्हता,
"हो, मी बोललो इन्स्पेक्टर साहेबांशी, तुझ्या विरुद्ध या गावात तक्रार दाखल केली आहे ना, तुला जरी पकडल तरी इथे याव लागेल, पुरवा काय आहे, लगेच सोडतील तुला ",.. विकास.
" तिकडचे सीसीटीव्ही" ,.. शशी.
" ते केल मॅनेज",.. विकास.
"कस काय, ते तर अभिजीतच प्रायव्हेट फार्म हाऊस होत ना",... शशी.
" करता येतात सगळी काम, डिलीट केल रेकॉर्डिंग",.. विकास.
" ठीक आहे निघू का मी मग ",.. शशी.
" आज रात्री निघ, आता नाही, तयारी करून ठेव मी येतो संध्याकाळी जेवण करू सोबत मग जा ",.. विकास.
"खूप धन्यवाद मित्रा, कधी काही लागल तर सांग, मी तुझी मदत कधीच विसरणार नाही ",.. शशी.
"काहीही शशी कधीही आवाज दे मी आहे ",.. विकास.
विकास निघाला,
" अरे विकास तू याला का जावू देतो आहेस पण, आपल्याला तर काव्याला याला द्यायच होत ना",.. मोहन.
" नाही आता प्लॅन बदलला ",.. विकास.
" काय आहे ",.. मोहन.
" आता काव्या किडनॅप होईल पण माझ्या सोबत राहील, शशी मुळे दिसली ती मला म्हणून शशीला सोडल मी खुश होवुन, शशीचे उपकार आहेत माझ्या वर",.. विकास.
"काय हे, तीच लग्न झाल आहे ना, तू का अस करतोस, प्रेमात पडला का तिच्या तू ",.. मोहन.
" मग काय, झालं लग्न झाल तर, मला काही फरक पडत नाही, छान आहे ती, काय दिसते आणि ती घाबरते मला ते आवडत , थोडे दिवस राहील माझ्या कडे नंतर मी स्वतः तिला अभिजीत कडे सोडून देईल",.. विकास,
" चांगला प्लॅन आहे, त्या अभिजीतला चांगला धडा मिळेल, त्याच लग्न तो स्वतः मोडेल, त्याच्या बायकोला स्वतः सोडून देईल, आपण काही करायची गरज नाही",.. मोहन.
" हो ना आणि मला ही काव्या मिळेल, अभिजीतचा संसार उध्वस्त होईल, पण छान आहे काव्या अस करू वाटत नाही मला तिच्या सोबत, बघु राहील माझ्या कडे ती नाहीतर",.. विकास.
" आदेशच काय करू या",.. मोहन.
" आधी हे काम पूर्ण करू, काव्याला समजल आहे मी तिच्या मागे आहे ते, तिचा दिनक्रम माहिती आहे मला, आदेशच्या डिपार्टमेंट मधे आहे ती अकाऊंटच काम करते साध्या एम्प्लॉईज प्रमाणे, अभिजितला काही वाटत ही नाही एवढी छान बायको कश्याला काम द्यायच तिला, मी असतो तर फुला सारख जपल असत तिला ",.. विकास.
.....
काव्या काम करत होती, आदेश आला,.. "वहिनी कशी होती पार्टी तुझी? मला वाटल आज काही येत नाही तू",
"त्यात काय न येण्या सारख आदेश, खूप मजा आली आमची, खूप गप्पा मारल्या आम्ही, तू फेमस आहेस, सगळ्या मुली तुझ्या बद्दल विचारत होत्या",.. काव्या.
"माझ्या बद्दल का",.. आदेश.
"विचारात होत्या तुझ दीर लग्नाचा आहे ना, हॅन्डसम आहे",.. काव्या.
" बापरे काही खर नाही, कोण कोण काय काय म्हणाल माझ्या विषयी, अजून माझी तारीफ सांग वहिनी ",.. आदेशने आरामात बाजूच्या खुर्ची बसुन घेतल.
" एवढा काय इंटरेस्ट आहे तुला ",.. काव्या.
" तुम्ही मुली अस ही बोलतात ",.. आदेश.
" नाही.. गम्मत सुरू होती.. तरी मी ओरडली त्या मुलींना, आमच्या आदेश बद्दल काही बोलायच नाही अस सांगितल, बरोबर ना ",.. काव्या.
" काय यार वहिनी, कशाला रागवल त्या मुलींना",.. आदेश.
"आता काय उपयोग आदेश लग्न जमल ना तुझ, प्रियाला सांगू का ",.. काव्या.
" नको ग बाई ते करू नकोस, मला सोडणार नाही ती आधीच डेंजर आहे प्रिया, साधी होती का पार्टी ",... आदेश.
म्हणजे?
" वहिनी तू अति साधी आहेस, कर तू काम",.. आदेश गेला.
आता काय पार्टी करणार मी, माझ्या कडे बहुतेक गुड न्यूज आहे, परत काव्याला छान वाटत होत.
.......
.......
आदेश केबिन मधे येवून बसला, वहिनी खूप शांत छान आहे, दादा लकी आहे, ही प्रिया काय अस करते काय माहिती? छान प्रेमाने मोकळ राहायच तर उगीच चिडचिड करते, आज फोन केला नाही तिला आपण, जावू दे, थोडा आपल्याला राग आला अस दाखवू, तिच्या मागे मागे करतो मी तर जास्त करते ती, तिला वेळ हवा आहे, आता छान वेळ देवु तिला.
.....
.....
लंच ब्रेक मध्ये श्रद्धा आणि काव्याने घरी फोन केला दादाला, काव्या खूप बोलत होती त्याच्याशी, नंतर श्रद्धाने फोन घेतला,.. "दादा तुम्ही सगळे या पुढच्या आठवड्यात इकडे".
"हो श्रद्धा आमच्या रघुच्या लग्नाला येणारच आम्ही, काव्याने सांगितलं मला लग्नाबद्दल, तुझं खूप अभिनंदन, एक दिवस आधी येतो आम्ही सगळे" ,.. सोहम.
नंतर तिने मावशीला फोन केला,.. "कशी आहेस मावशी, तुझी खूप आठवण येते करमत नाही मला, इकडे ये पुढच्या आठवड्यात सोहम दादा सोबत श्रद्धाच लग्न आहे रघु सोबत",
" हो सोहम सांगत होता",.. मावशी.
" मावशी तू नक्की ये मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे",..काव्या.
" हो तिकडुन मी नंतर मामाकडे जाणार आहे थोडे दिवस",.. मावशी.
" भेटू मग लग्नात",.. काव्याने फोन ठेवला.
" श्रद्धा मी लग्नात तुझ्या बाजूने असेल की रघुच्या बाजूने",... काव्या.
"दोघी बाजूने ",.. श्रद्धा.
" हो ठीक आहे तुम्ही दोघांनी खूप मदत केली आहे मला",..काव्या.
ऑफिस सुटलं काव्या अभिजीतच्या केबिनमध्ये आली, अभिजीत बिझी होता,.. "आज थोडा वेळ होईल सहा वाजता जाऊ, तू बस का जाते तू पुढे ड्रायव्हरला सांगू का ",
तिला एकदम विकास आठवला, रोज तो साडेपाच वाजता माझ्या मागे येतो, त्याला माझ्या येण्या जाण्याच्या वेळा माहिती आहेत, काय हव नक्की त्याला? एका लग्न झालेल्या मुलीच्या मागे येतांना लाज नाही वाटत का, नको एकट जायला, सांगावच लागेल अभिजीतला लवकर,
" मी थांबते तुझ्यासाठी अभिजीत, काही घाई नाही" ,.. ती तिथेच बसली होती खुर्चीवर, साडेपाच नंतरही खूप जोरात काम सुरू होत, तिथले बरेच मॅनेजर वगैरे येऊन भेटत होते, सगळेजण रिपोर्ट करत होते काय काय झालं कोणत्या कोणत्या डिपार्टमेंट मध्ये, अभिजीत सिरियस रिव्ह्यू घेत होता,
ती अभिजीत कडे बघत होती, भारी वाटतो हा असा सिरीयस बॉस, एकदम डॅशिंग लुक, अभिजितला हा व्हाइट शर्ट फार छान दिसतो ना, तिला हसू आलं, नको बघायला याच्याकडे अस,
काव्या जरा वेळ बाहेर येऊन बसली, पूर्ण शॉप रिकामा होता, सगळे असले की छान वाटतं इथे, सहानंतर अभिजीतच काम झालं नव्हतं , तो बाहेर आला,
"काव्या उद्यापासून तू तुझं घरी जात जा, मला इतक्या लवकर घरी येता येणार नाही, सगळ काम राहून जात माझ, मी साडेसात आठला येईल, घरी जा तू आता, काकांना सांगतो, माझी एक मिटींग आहे, ती झाली की मी येईल घरी",.. अभिजीत.
" अभिजीत मी थांबते ना तुझ्यासाठी, प्लीज",..काव्या.
" काय अस मी बिझी आहे, किती वेळ बसणार तू जा घरी" ,... अभिजीतला तेवढा ही वेळ नव्हता, फोनवर बोलत तो आत निघून गेला,
आदेश कुठे आहे काय माहिती, बाहेर विकास असेल, ओह माय गॉड, तिने रघुला फोन केला,.. "कुठे आहेस रघु" ,
"इथेच आहे मेन गेट जवळ",.. रघु.
बरं झालं ड्रायव्हर आणि रघुने तिला घरी सोडून दिल, विकास होता की नाही बाहेर हे तिने बघितलं नाही, मला आता काहीही करून हा प्रॉब्लेम सॉल्व करावा लागेल, घरी सांगावं लागेल त्याबद्दल.
काव्या घरी आली, आता असंच करत जाऊ आपण, आपली सेफ्टी आपणच बघायला पाहिजे, रघुला बोलवूनच घ्यायचं, पुढच्या आठवड्यात काय करणार, तो सुट्टीवर आहे, लग्न आहे तर मी तशी दोन दिवस मी तिकडे असेल, आदेश किंवा अभिजीत सोबतच घरी जाईल, थांबेल जितक्या वेळ ते थांबतील ते.
"अभिजीत कुठे आहे",.. आशा ताई.
"आज त्यांना अजून ऑफिसचं काम आहे, उशिरा येतील ते",.. काव्या.
"चल चहा पाणी करून घे",.. आशा ताई.
"मी आलीच पाच मिनिटात फ्रेश होऊन",.. काव्या खाली आली, ती आई आणि आजींना पार्टीत काय काय झालं ती गंमत जंमत सांगत होती, आजींनी सुद्धा ड्रेस घातला होता,आणि बाकीच्या मुली आदेशची चौकशी करत होत्या
का?
" लग्ना साठी असच गम्मत म्हणून ",.. काव्या.
" आपण तिघींनी अशी पार्टी करायला हवी",.. आशा ताई.
"हो आता चौथा मेंबर येणार आपल्यात प्रिया ",..काव्या.
"हो ना आपली टीम स्ट्रॉंग होईल",.. आशा ताई.
आई आजी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे, आश्रमातल्या आजी म्हणत आहेत म्हणजे त्यांना तसं वाटतं आहे माझ्या कडे गुड न्यूज आहे
दोघी एकमेकींकडे बघत होत्या,.. "आम्हालाही तसेच वाटत आहे, मी म्हटलं होतं ना तुला दोन दिवसापूर्वी, आधीचा काव्याचा चेहरा आणि आता वेगळा वाटतोय" ,
"तुला काय वाटतं आहे" ,.. आशा ताई.
"मला काहीच वाटत नाही अजून" ,.. काव्या.
"खूपच सुरुवात आहे काळजी घे" ,.. आशा ताई काव्या सोबत बोलत होत्या, ती माहिती देत होती, अजून पंधरा एक दिवसांनी डॉक्टर कडे जाऊ, खूप खुश होत्या तिघी,
"मी अजून कोणालाच बोलली नाही",.. काव्या.
"नको सांगू कोणाला",.. आजींनी तिची नजर काढली,
अभिजीत थोडं उशिरा घरी आला, त्याने आल्या आल्या काव्याला जवळ घेतल, बराच वेळ तो तसाच होता,
"काय झालं आहे अभिजीत सोड ना",.. काव्या.
" नाही असंच थांब माझ्याजवळ",.. डोळ्यात खूप प्रेम होतं त्याच्या, थॅंक्यु सो मच. या पुढे तुला काय हव ते मला सांगायच,
जेवतानाही आज आई आजी काव्याची खूपच काळजी घेत होत्या.
काव्या रूम मध्ये तिचे कपडे नीट ठेवत होती कपाटात,
" पुरे आता घरचे काम, इकडे ये काव्या",.. अभिजीत.
" काय अभिजीत,.. काव्या.
" आराम कर जरा ",.. तो तिच्या जवळ येवून बसला, कसा दिसत होता मी आज,
म्हणजे?
" एवढ काय बघत होती माझ्या कडे केबिन मध्ये संध्याकाळी ",.. अभिजीत.
" मी कुठे बघितल तुझ्याकडे अभिजीत ",.. काव्या.
" तुला काय वाटल मला काही समजत नाही का, बोल पटकन",.. अभिजीत.
काव्या हसत होती,.." तुझ लक्ष होत का",
हो.. त्याने तिला जवळ घेतल. सांग ना कसा दिसत होतो मी,
" एकदम हॅन्डसम डॅशिंग",.. काव्या.
अजून
अस नको बोलू या.
मग कस तू सांग
अभिजीत..
....
....
रात्री विकास शशी कडे फार्म हाऊस वर येत होता, त्याचा मूड नव्हता, आज काव्या दिसली नाही, किती तरी वेळ तो तिची वाट बघत होता, कुठे गेली आज ती, नंतर तो थोडा वेळ बंगल्या जवळ गेला होता, कोणीच दिसल नाही काय कराव, रोज माझा बराच वेळ जातो असा, काही तरी कराव लागेल.
तो त्याच्या फार्म हाऊस वर आला, शशी रेडी होती, त्याचं सगळं सामान घेऊन, दोघांच जेवण झाल, शशी घरी निघाला, गावाच्या बाहेर पर्यंत विकास आला होता त्याला सोडवायला, बराच वेळ ते दोघे बोलत होते, त्यानंतर शशी घरी चालला गेला.
घरी गेल्यावर त्याचे बाबा थोडी चिडले होते त्याच्यावर,
"खूप दिवे लावून घरी आला आहे शशी , समजवून सांगा त्याला, इतक नुकसान झाल तरी तेच सुरू आहे , आता तरी घरच्या बिझनेस कडे लक्ष दे म्हणा" ,..
"खूप दिवे लावून घरी आला आहे शशी , समजवून सांगा त्याला, इतक नुकसान झाल तरी तेच सुरू आहे , आता तरी घरच्या बिझनेस कडे लक्ष दे म्हणा" ,..
"जाऊ द्या हो कधीतरी मुलगा घरी आला",.. आई समजावत होती,
"आई-बाबा मी आता फक्त माझ्या कामावर लक्ष ठेवणार आहे, विकास कडे बघून काम कस करायच ते छान शिकलो आहे मी, एवढा एक चान्स द्या ",.. शशी.
त्याला माहिती नव्हत विकासचे काव्या बाबतीत विचार, त्याला का सोडल विकासने, तो त्याला खूप चांगल समजत होता,
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा