Login

तुझी साथ हवी मला... भाग 55

माहिती आहे मला विकास बद्दल, तो डेंजर आहे, पण इथे बघते ना किती काम करतो तो, हे गव्हर्न्मेंट प्रोजेक्ट आहे, कराव लागेल काम आपल्याला, सुरुवातीला काम असत, पुढे जावून तो मॅनेजर करेल काम


तुझी साथ हवी मला... भाग 55

©️®️शिल्पा सुतार
.........

घरी आल्यावर काव्या मावशीच्या आजूबाजूला होती, सोहम सुरभीला दुसरी रूम दिली होती, सगळे जेवायला आले, काव्या वाढत होती, सुरभी तिला मदत करत होती,

"बस तू वहिनी मी करते",.. काव्या.

" ठीक आहे ना तू? होत ना काम तुझ्या कडून ",.. सुरभी.

"हो विशेष काम नसत मला काही" ,.. काव्या.

मावशीने आणलेला खाऊ टेबलवर होता.

"वहिनी काय आहे हे एवढे पदार्थ, मजा आहे, तुझे फेवरेट आहेत का हे",.. आदेश.

"हो लहानपणा पासून, मावशी राहणार आहे आता पंधरा दिवस ",.. काव्या.

" आता रोज वेगवेगळे पदार्थ करू आपण ",.. आशा ताई.

काव्या खूप खुश होती, आशा ताई आजी होत्याच काळजी घ्यायला, तरी माहेरचे लोक आले की छान वाटत होत. रात्री बराच वेळ काव्या मावशी सोबत बोलत होती, आशा ताई आजी सोबत होत्या, सुरभी होती, अभिजित सोहम बाहेर बोलत होते,

आदेश प्रिया सोबत बोलत होता, उद्या ते लग्नाच्या खरेदीला जाणार होते, लग्नाला थोडे दिवस बाकी होते, आदेश जे बोलले त्याला प्रिया हो बोलत होती, बर्‍या पैकी शांत होती ती.

"काय झाल प्रिया, तू तुझ मत का मांडत नाही , तू नाराज आहेस का, लग्न करायच ना तुला ",.. आदेश.

"हो आदेश लग्न करायच आहे, मला खरच समजत नाही कस वागावं, माझा गोंधळ झाला आहे, सारख वाटत काही चुकलं तर",.. प्रिया.

"मी आधीचा आदेश आहे, तू काळजी करू नकोस, मला काही सारखा राग येत नाही, मोकळ रहा आधी सारख, मला तस आवडत ",.. आदेश.

"ठीक आहे, आदेश मला सांगत जा काही चुकलं तर",.. प्रिया.

" प्रिया तू कंफर्टेबल रहा, काही प्रॉब्लेम नाही, उद्या भेटू आपण ",.. आदेश.

काव्या आणि सुरभी बोलत होत्या, आशाताई मावशीं सोबत बोलत होत्या,

" वहिनी शशी सोबत बोलणं झालं का तुझं, तो वापस आला ना ",.. काव्या.

" हो झालं बोलण सांगू नको कोणाला",.. सुरभी.

" कसा आहे तो? त्याने इकडे आल्याचे सगळे पुरावे नष्ट केले, काय आहे त्याच्या मनात ",. काव्या.

"त्याला पस्तावा होतो आहे त्याच्या वागण्याचा, खूप व्यवस्थित काम करतो आहे तो आता हल्ली, आई बाबां कडे लक्ष देतो ",.. सुरभी.

" चांगल आहे, मला काही धोका नाही ना आता त्याच्यापासून वहिनी",.. काव्या.

" नाही त्याला काही प्रॉब्लेम नाही, सॉरी काव्या तुला खूप त्रास झाला ",.. सुरभी.

"मला वाटलच होत वहिनी शशी बदलला ते, मी हे सांगते आहे इकडे सगळ्यांना, त्यांना विश्वास वाटत नाही, मला तिकडे आपल्या घरी यायचं आहे, बाकी सगळे परवानगी देत नाही, तू सांगशील का दादाला मला बोलवायला तिकडे",.. काव्या.

" हो सांगेन आम्ही दोघे येऊ तुला घ्यायला तुझ्या दिराचं लग्न होऊन जाऊ दे, मग जावू ",.. सुरभी.

ठीक आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी चहा नाश्ता करून सोहम आणि सुरभी घरी चालले गेले, मावशी होत्या थांबलेल्या, मावशी आणि काव्या तयार होऊन अभिजीत सोबत श्रद्धा कडे जायला निघाल्या ,.." थोड्यावेळाने नवीन शॉप मध्ये पूजा आहे तिकडे जायचं आहे, आई आजी तयार रहा".

आश्रमातल्या काकूंनी श्रद्धा कडे सगळी सत्यनारायणाच्या पूजेची तयारी करून ठेवली होती, श्रद्धा रेडी होती, मावशी काव्या तिला मदत करत होत्या, घरात स्वयंपाक सुरू होता, जरा वेळाने पुजारी आले, लगेच पूजेला सुरुवात झाली, छान पूजा झाली, दुपारी जेवण झाल्यानंतर सगळे जाणार होते आणि नंतर रघु आणि श्रद्धा फिरायला जाणार होते, मावशी आता काकू सोबत बोलत बसल्या होत्या.

"झाली का बॅग भरून श्रद्धा" ,.. काव्या.

"हो तयारी सुरू आहे, काव्या मला काही सुचत नाही" ,.. श्रद्धा.

" अस होत सुरुवातीला, काळजी करू नकोस, रीपोर्ट दे तिकडचा, काय काय झाल ते",.. काव्या.

"काहीही काय बोलतेस तू" ,.. श्रद्धा लाजली होती खूप.

" अरे बापरे किती ते लाजणं, खूप छान दिसते तू श्रद्धा, माझ्या सोबत नंबर लाव",.. काव्या.

कसला? ,

" माझ्या बाळा सोबत कोणी नको का खेळायला",.. काव्या.

" नाही ग बाई इतक्यात नाही, सांभाळायला कोणी नाही माझ्या कडे ",.. श्रद्धा.

" आश्रमातल्या आजींना बोलवून घेवू आपण, काळजी करू नकोस",.. काव्या.

" नाही तरी नको, मला त्रास देवु नकोस काव्या",.. श्रद्धा.

" ठीक आहे, मग रघुला सांगते त्रास द्यायला",.. काव्या.

"जा बाई तू",.. श्रद्धा.

"हो ना, मी निघते, आता आम्ही नको आहोत तुला इथे आजूबाजूला ",.. काव्या.

"असं काही नाही आहे काव्या तुला माहिती आहे",.. श्रद्धा.

" श्रद्धा मला पूजेला जायचं आहे अभिजीत सोबत, मी इकडे येणार नाही आता, तिकडून घरी जाईल,श्रद्धा तिकडे पूजेला विकास असेल मी काय करू समजत नाही, एक तर या लोकांच काम सोबत आहे, भीती वाटते आहे ",.. काव्या.

" काय वाटतय तुला तो तुझ्या कडे बघतो का की नॉर्मल वागतो",.. श्रद्धा.

"एक दोन दा बघितल होत त्याने",... काव्या.

" जावू दे तू ऐकत नाही, सांगत नाही अभिजीत सरांना रिस्क घेते आहेस , नसेल सांगायचं तर दुर्लक्ष कर त्या विकास कडे, अभिजीत सरां सोबत रहा, टेन्शन घेऊ नको कुठल्या गोष्टीच आणि जरा तब्येतीकडे लक्ष दे खूपच धावपळ होते आहे तुझी",.. श्रद्धा.

" हो ना अजून आदेशच लग्न बाकी आहे, थोडी धावपळ आहे, आणि तो अग तो विकास काही बोलत नाही पण बघतो विचित्र पद्धतीने, काय बोलणार सांग ना अश्या वेळी ",.. काव्या.

" एकटीच जाते आहे का पूजेला",.. श्रद्धा.

" नाही मावशी आहे सोबत तिकडून आई आजी येतील",.. काव्या.

"मग ठीक आहे त्यांच्या सोबत रहा",.. श्रद्धा.

रघु अभिजीत सोबत उभा होता, एक मुलगी आली जीन्स घातलेली,.." काव्या इकडे ये, रघु पंधरा दिवस नाही तो पर्यंत ही साक्षी तुझी बॉडी गार्ड असेल ",

"ठीक आहे" ,.. काव्या.

साक्षी रघु सोबत बोलत होती, तो तिला सगळे इन्स्ट्रक्शन देत होता.

काव्या अभिजीत मावशी गाडीत बसले, साक्षी येवून बसली, सगळे घरी गेले, आशा ताई आजी हॉलमध्ये बसलेल्या होत्या, मावशी खाली उतरल्या, त्या तिघी बोलत होत्या,.." अभिजीत इकडे ये आम्ही येण गरजेच आहे का? बाकीच्या बायका येतं आहेत का? नाहीतर तुम्ही जावून या आम्ही घरी आहोत" ,

" ठीक आहे तिकडून कोणी पाहुणे नाहीत" ,.. अभिजीत.

"आई आजी मावशी चला ना प्लीज, जाऊन येवु पटकन",... काव्याला काही सुचवत नव्हतं,

"येवु आपण लगेच काही काम नाही एवढ्या लोकांच काव्या ",.. अभिजीत.

ठीक आहे.. तिने जबरदस्ती केली नाही. मनात खूप धाकधूक होती, बोलू का याच्याशी? काय सांगू पण, त्या दिवशी तो विकास तिकडे केंद्रा कडे आला होता अस, नको जावू दे, त्याच काम असेल तिकडे तर, कशा वरून माझ्या मागे येतो तो, लग्न झालेल्या मुलीच्या मागे का येईल कोणी, आता तर मी आई होणार आहे, शांत राहू पूजा करून घरी येवू.

अभिजीत काव्या आणि साक्षी निघाले, अभिजित बघत होता काव्या काहीतरी विचारत होती,.. "काव्या लवकर येऊ पूजा करून, नंतर मला ऑफिसलाही जायचं आहे, मला माहिती आहे तुला मावशी सोबत रहायचं आहे" ,

हो.. काव्या फक्त हसली, साक्षी सोबत होती, काव्याला जरा बरं वाटत होतं.

थोड्यावेळाने ते एका फॅक्टरीत पोहचले, गाडी पार्किंगला लावल्यानंतर काव्या खाली उतरली, अभिजीत साक्षीला इन्स्ट्रक्शन देत होता, काव्या इकडे तिकडे बघत होती, जुनीच कंपनी होती पण साफसफाई करून स्वच्छ वाटत होती, बरेच लोक कामाला होते तिथे, आजूबाजूला बऱ्याच गाड्या होत्या, त्यात विकासची गाडी पण होती,

आदेश समोरून येतांना दिसला,.. "इकडे चला दादा वहिनी, आधी शॉप बघून घ्या ",

दोघं आदेश सोबत आत गेली, आत मध्ये अजून काहीही मशीन नव्हते, थोडी बसायला जागा केली होती, त्या बाजूला टेबल खुर्च्या नवीनच आसल्या सारख्या वाटत होत्या, काव्या केबिनमध्ये जाऊन बसली, अभिजीत आदेश आत मध्ये ऑफिसमध्ये गेले, तिथे सचिन बसलेला होता,

"विकास कुठे आहे ",.. सचिन.

" तो कामात आहे, काहीतरी बघतो आहे",.. आदेश

नवीन मॅनेजर येऊन अभिजीतला भेटला, तो पुढे कामाच काय प्लॅन आहे आहे ते सांगत होता,

विकास बाजूच्या शॉप मध्ये होता, तो अभिजीत काव्या आले तेव्हा बाहेरच बघत होता, अभिजीतची गाडी आली, दुसऱ्या बाजूने काव्या उतरली, वाह आजचा दिवस खूप सुंदर आहे, खूपच छान दिसत होती काव्या केशरी पांढऱ्या रंगाची साडी मधे, लांब केस पाठीमागून मोकळे होते, थोडी ज्वेलरी मोठ मंगळसूत्र घातलेलं होतं, टिकली लिपस्टिक लावलेली होती तिने, हातभर बांगड्या, नजर हटत नाही हिच्या वरून , अगदी रेखीव बांधा, उजळलेला रंग.

तिच्या सोबत दुसरी मुलगी कोण आहे जीन्स घातलेली, बहुतेक बॉडी गार्ड आहे का, तिच्या कडे काव्याच सामान होत, काव्या सगळीकडे फिरून बघत होती,

काही सुचत नाही मला काव्या दिसली की, चला आत जावू केबिन मधे,

विकास शॉप मधे आला, काव्या ऑफिस मध्ये बसलेली होती, अभिजित आदेश सचिन बाहेर उभ राहून काहीतरी बोलत होते, त्यांच्यात विकास जावून उभा राहिला.

" झाल का काम",.. सचिन.

"हो",.. विकास.

" फर्स्ट टार्गेट काय आहे" ,.. अभिजीत विचारात होता.

विकास... अभिजीत सचिन आदेशला माहिती देत होता, चौघे बाजूच्या केबिन मधे गेले, विकास समजून सांगत होता काम, खूप छान प्लॅन होत त्याच.

हुशार आहे विकास, बराच वेळ देतो तो या कामासाठी,.. अभिजीत विचार करत होता

एक प्रेझेंटेशन दाखवतो, पुढच्या आठवड्यात ते तिकडे ऑफिस मधे सबमिट करायच आहे,.. "लॅपटॉप आणा", त्याने शिपाई काकांना सांगितल,

ते गेले, दोन मिनिटात आले, साहेब तुमची बॅग कपाटात आहे, लॉक आहे कपाट,

"मी आलोच एका मिनिटात" ,.. विकास.

तो केबिन मधे आला, समोर काव्या बसलेली होती, ती मोबाईल मधे मेसेज बघत होती, कोणी नव्हत केबिन मधे,

किती छान दिसते आहे ही अशी जवळून, तो दारात उभा होता, काव्याने समोर बघितल, तिला काय कराव अस झाल होत, हा विकास का आला इथे, अभिजित आदेश कुठे आहेत, बोलू का याच्याशी, जावू दे,

हॅलो काव्या.

ती हसली, हा काय मला नावाने हाक मारतो आहे, आमची ओळख ही नाही.

"खूप छान दिसते आहेस तू आज, साडीत पहिल्यांदा बघितल तुला आज मी , केस मस्त आहेत तुझे, तू आज इकडे आलीस खूप छान वाटतय, प्रसन्न वातावरण झाल या फॅक्टरीच" ,... विकास.

काव्या घाबरली, ती इकडे तिकडे बघत होती. बापरे हा काहीही बोलतो.

" काळजी करू नकोस, कोणी नाही इथे आपल्या दोघां शिवाय, ते लोक तिकडे आहे, मला माझी बॅग हवी आहे",.. त्याने कपाटा कडे हात दाखवला.

काव्या बाजूला सरकली, विकास तिच्या बाजूने येत होता,.." काव्या मला तुझ्याशी बोलायचं आहे, मला तुझ्याशी ओळख वाढवायची आहे, मला भेटायला येणार का",

"सॉरी काय म्हणताय तुम्ही, माझं लग्न झालेल आहे, अभिजीत माझ्या नवरा आहे" ,.. काव्या.

" माहिती आहे मला, माझी काही हरकत नाही, तू खूप छान आहे, मला खूप आवडते",.. विकास.

" मी काही बोलत नाही याचा अर्थ तुम्ही काहीही बोलायच अस नाही, माझ्या पासून लांब थांबायच, नाही तर मी अभिजीतला सांगेल ",.. काव्या.

" चिडू नकोस तू, मी काही कोणी गुंड मवाली नाही, मी खूप चांगल्या घरचा मुलगा आहे, खूप प्रॉपर्टी आहे माझ्या नावावर, आधी का नाही भेटली तू मला, तुझ्याशी लग्न केल असत मी, असू दे पण अजूनही उशीर झाला नाही, मला जे आवडत ते मी मिळवतो",... विकास.

" शट अप" ,.. ती बाहेर येत होती, विकासने तिला बाहेर येऊ दिल नाही, तिच्या दोन्ही बाजूला भिंतींवर हात ठेवून तो तिच्या कडे बघत उभा होता,.." समजल ना मी काय म्हणतो ते, हो बोलायच मला, मी नंतर फोन करेन",

अभिजीत.... अभिजीत.... दोन-तीनदा हाक मारली.

" घाबरू नकोस काव्या, इथे मी काही करणार नाही तुला, राग छान दिसतो तुझ्या चेहर्‍यावर, आणि अजून एक तू तुझ्या नवर्‍याला काहीही सांग मी घाबरत नाही" ,.. विकास.

साक्षी.. काव्या हाक मारत होती,

"बॉडी गार्डला बोलवून काय होणार आहे काव्या, माझ्या कडे गाडी भर बॉडी गार्ड आहेत, ते मी म्हणेल ते करतात, स्वतः च डोक वापरत नाहीत, त्या समोर तुझा एक बॉडी गार्ड किती टीकेन, विचार करून ठेव, माझ्याशी मैत्री करायची, माझ्याकडे खूप पॉवर आहे, माझं तू ऐकलं नाही तर मी खूप प्रॉब्लेम क्रिएट करेल, आदेशही इलेक्शनला उभा आहे, कधीही कुठलाही एक्सीडेंट होवू शकतो इथे, अभिजीत आदेशला त्रास देईल मी ",.. विकास लॅपटॉप घेवून निघून गेला,

काव्याला अचानक खूप धड धड होत होतं, अगदी घाम फुटला तिला, काय करू, पाणी हव मला, अभिजीत कुठे आहे... एकदम तिला चक्कर आली, ती खाली पडली,

डोळे उघडले तर ती सोफ्यावर झोपली होती, सगळे आजुबाजूला उभे होते, अभिजीत तिचा हात धरून काळजीने तिच्या कडे बघत होता, साक्षी बाजूला होती, आदेश सचिन विकास थोडे दूर उभे होते,

"डॉक्टरांना बोलवू का, काय झाल वाहिनीला",.. सचिन.

"नको पूजा करून घेवू, वहिनी जाईल घरी नंतर " ,... आदेशला माहिती होत ती प्रेग्नंट आहे, आली असेल चक्कर,

" अभिजित मला घरी जायच आता",.. काव्या.

"हो गुरुजी आले आहेत पूजा करून घेवू मग डॉक्टर कडे जावू मग तू घरी जावून आराम कर, मी अपॉइंटमेंट घेतली आहे, कुठे लागल का तुला, कशी काय चक्कर आली ",.. अभिजीत.

" नाही लागल, मी कशी पडली",.. काव्या.

" तू पडता पडता साक्षीने पटकन तुला धरल म्हणून बर झाल, हा घे ज्यूस पिऊन घे",.. अभिजीत.

" अभिजीत मला तुला अजून एक गोष्ट सांगायची आहे, मला विकासची भीती वाटते, इथे आपण काम नको करायला, जावू इथून आपण, तो चांगला नाही तो त्रास देईन तुम्हाला",.. काव्या.

" हो रिलॅक्स हो काव्या, आता काही बोलू नको, मी मागे ओरडलो होतो तुला विकास तुझ्याशी बोलला तेव्हा, पण काही काळजी करू नकोस, चांगला आहे तो, काही धोका नाही आपल्याला ",.. अभिजीत.

" नाही तो चांगला नाही, मला घरी जायच आहे, इथे नाही राहायचं ",.. काव्या.

" ठीक आहे, जावु जरा वेळाने, शांत हो, ज्यूस पी आधी हा, तुला आवडतो ना ",.. अभिजीत.

"नको मला काही",.. काव्या.

"अस करता का दुसरीकडे, चल आटोप, आपण पूजा करून निघू इथून",.. अभिजीत काव्या बाहेर आले, काव्या समोर खुर्चीवर बसली, विकास समोर होता तो अजून ही काव्या कडे बघत होता, तिने पटकन दुसरीकडे बघितल, अभिजीत तयारी झाली का ते बघायला गेला,

आदेश जवळ आला,.." कस वाटतय वहिनी",

"मला घरी जायच आदेश, बर वाटत नाही ",.. काव्या.

" हो चल पूजेची तयारी झाली वहिनी अर्धा तास" ,.. आदेश.

"तू पण नंतर इथे थांबू नकोस जास्त आपल्या ऑफिस मध्ये जा",.. काव्या.

हो.

पूजा सुरू झाली, काव्या पूर्ण वेळ अभिजीत सोबत होती, एक मिनिट ही तिने त्याला इकडे तिकडे जावू दिल नाही, त्या दोघा मागे आदेश सचिन विकास पूजेला बसले होते, विकास आजुबाजूला आहे या विचाराने काव्याला काही सुचत नव्हत, काय कराव या विकासच, खूप धोका आहे, आधी तो शशी त्रास देत होता आता विकास, काय हे अस, माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का सगळे लोक माझ्या मागे का येतात,

इथे सगळ्यां समोर तो विकास चांगला वागतो, मला एकटीला धमकी देतो अभिजितला वाटत मी जून आठवून विकासला बघून घाबरली, आता विकास अस दाखवतो आहे जस काही मला ओळखत नाही, विशेष इंट्रेस्ट नाही माझ्यात अस करतो आहे, खूप कामात आहे जसा तो, खर तर पटकन येवून तो मला बोलून गेला, हा शशी सोबत मिळालेला असेल तर, पण शशी गावाला गेला, सुरभी वहिनी म्हणते तस तो त्याच्या कामात बिझी आहे. मग हा का मागे येत असेल.

पूजा झाली, शॉपला लाल रीबीन बांधली होती, ती कट करायची होती, सगळे तिकडे गेले,

"चल वहिनी इकडे ये",.. आदेश.

"मी काय म्हणते हे उद्घाटन तुम्ही तिघे करा, आता आम्ही केली पूजा",.. काव्या.

अभिजीत ही हो बोलला.

तिघ ऐकत नव्हते,.. "वहिनी तू लकी आहे आमच्या साठी, कर उद्घाटन",

हो... हो .

चल आटोप .

आजुबाजुला सगळा ऑफिसचा नवीन स्टाफ उभा होता, काव्याला कात्री दिली, सगळ्यांनी हात लावा, छान फोटो काढले, उद्घाटन झाल, सगळे टाळ्या वाजवत होते,

विकास केव्हाचा बघत होता काव्या कडे, काय झाल हिला, एकदम चक्कर येऊन पडली, माझ्या बोलण्याच एवढ टेंशन घेतल, अभिजित किती काळजी घेतो आहे तिची, मला अजिबात आवडलं नाही अस त्याच तिच्या मागे मागे करण, काय होईल पुढे, ही राहील की नाही माझ्या कडे, काय करू, पण मला ही हवी आहे ही, त्या अभिजीतला सांगेल का माझ्या बद्दल, सांगू दे काय फरक पडतो, तेव्हा पासून माझ्या कडे बघितल नाही हिने, घाबरली वाटत,

"पूजा झाली असेल तर आम्ही निघू का आदेश",.. अभिजीत.

"ठीक आहे काळजी घे दादा वहिनीची",.. आदेश.

"हो आता डॉक्टर कडे जातो आम्ही",.. अभिजीत.

सचिन विकास बाजुला उभे होते, ते पुढच्या कामाच बोलत होते,

"चला आम्ही येतो" ,.. अभिजित.

"ठीक आहे काळजी घ्या वहिनी",.. सचिन.

विकास फक्त दोघांकडे बघत होता.

ते दोघ निघाले, कार मधे काव्या गप्प होती, विकास खर तर शत्रू आहे, तो मित्रा प्रमाणे वागताना दिसतो, काय करू थांब बोलते,

"अभिजीत हे काम किती दिवस आहे" ,.. काव्या.

"वर्ष दोन वर्ष असेल",.. अभिजीत.

"विकास चांगला मुलगा नाही, नको करायला हे काम, तो धमकी देतो ",.. काव्या.

"कसली धमकी, कोणाला दिली, तू काळजी करू नकोस काव्या, माहिती आहे मला विकास बद्दल, तो डेंजर आहे, पण इथे बघते ना किती काम करतो तो, हे गव्हर्न्मेंट प्रोजेक्ट आहे, कराव लागेल काम आपल्याला, सुरुवातीला काम असत, पुढे जावून तो मॅनेजर करेल काम, जास्त याव लागणार नाही, काही संबंध नाही आपला त्या लोकांशी, आपण नाही येणार इकडे परत",.. अभिजीत.

"पण आदेश करतो ना काम त्यांच्यात, धोका आहे अभिजीत ",.. काव्या.

" काही प्रॉब्लेम नाही काव्या, मी लक्ष देवून आहे, तू शांत हो ",..अभिजीत.

लक्ष देवून आहे म्हणे, तो विकास सगळ्यां समोर माझ्या मागे लागला आहे , भेटायला बोलवतो तो, मैत्री कर म्हणतो, काहीही बोलतो, काय करु, अभिजितला स्पष्ट सांगू का, नको, लांब राहू या ऑफिस पासून, समजत नाही काय कराव , म्हणून मी आधी बोलत नव्हते काही , माझा त्रास मला नीट करावा लागेल हे, मी परत येणार नाही इकडे.