©️®️शिल्पा सुतार
.........
.........
मिरवणुकीची तयारी झाली होती, अभिजित काव्या हात धरून सगळीकडे फिरत होते, विकास बघत होता, त्याला खूप राग येत होता, वाटत होत आताच्या आता इथून निघून जाव, किती कौतुक सुरू आहे, मुद्दामून करतो आहे अभिजीत.
आशा ताई, प्रतापराव, आजी, सुरेश राव, प्रमिला ताई, पुढे बसले होते, थोड्या वेळाने श्रद्धा रघु आले, ते आज सकाळी वापस आले होते फिरून, साडीत श्रध्दा खूप सुंदर दिसत होती, ती काव्या सोबत होती, काव्या तिच्या कडे हसुन बघत होती,.. "आठवण होती वाटत आमची, मला वाटल विसरली असशील तू, आठ दिवसात खूपच छान दिसायला लागली तु, काय म्हणतोय रीपोर्ट" ,
श्रद्धा लाजली होती,.. "काहीही काय ग, तू कशी आहेस, ठीक आहे ना तब्येत, बाळ काय म्हणत आहे " ,
"बाळ मजेत आहे, तू आलीस ना आता माझी काळजी घ्यायला",..काव्या.
आदेश खूप खुश होता, सकाळ पासून पाच सहा वेळा त्याने प्रियाला फोन केला होता, प्रियाला आवरायची घाई होती, ती विशेष बोलत नव्हती त्याच्याशी,.. "काय आहे आदेश का फोन करतो आहेस सारखा? " ,
"अरे थोड प्रेमाने बोल ना, आपल लग्न आहे ना आज, मला तुला बघायच आहे, फोटो पाठव, नाहीतर भेटायला ये " ,..आदेश हट्ट करत होता.
"मी घाईत आहे" ,.. प्रिया.
"अरे याला काय अर्थ आहे, विचार करून वाग माझ्याशी नाहीतर नंतर त्रास देईल मी तुला",.. आदेश.
प्रिया हसत होती,.. "मी ठेवते फोन पुरे आता आदेश मांडवात भेटू".. , नंतर तिने फोन बंद करून ठेवला.
मिरवणुकीत खूप मजा आली, आदेशचे पार्टी ऑफिसचे मुल खूप नाचत होते, वरात पुढे जात नव्हती, अभिजित घाई करत होता, मुल येवून काव्याला भेटत होते, तिला आत ओढत होते,
"नका घेवू तिला नाचायला, त्रास होईल तिला",.. अभिजीत काळजीत होता.
मोठ्या आवाजात गाणे वाजत होते, काव्याला धड धड होत होती, ती सुरभी श्रद्धा सोबत आत निघून आली, मावशी बसल्या होत्या तिथे येवून बसली, श्रद्धा तिच्या साठी सरबत घेवून आली,.. "आता शांत बस इथे गडबड नको काव्या",
सगळे स्टेज वर आले, आदेश काव्याला वरती बोलवत होता, त्या तिघी स्टेज वर गेल्या,.. "काय झालं वहिनी ठीक आहेस ना तू",
"हो आदेश काही प्रॉब्लेम नाही",.. काव्या.
प्रिया मैत्रिणीं सोबत मांडवात आली, आज खूपच छान दिसत होती ती, लाल शालू सुंदर ज्वेलरी माफक मेक अप, आदेश सोबत सगळेच तिच्या कडे बघत होते, मुद्दामून समोर बघत नव्हती ती, दोघांच लग्न लागल, स्टेज वर बराच गोंधळ झाला वरमाला घालतांना, आदेशच्या मित्रांनी त्याला वर उचलून घेतल होत, प्रियाच्या बाजूने विशेष लोक नव्हते, ती सगळीकडे बघत होती, सगळे आदेशला खाली बोलवत होते, शेवटी प्रियाने खुर्चीवर बसून घेतल, आदेश बघत होता, मला उतरवा खाली तो बोलत होता, बाकीच्या मुलांनी आदेशला खाली उतरवलं,.. "हे बघ आदेश अशी हार मानू नकोस",
"सोड यार माझी प्रिया निघून गेली तर, माझ्याशी लग्न नाही केल तर मला भीती वाटते",.. आदेश.
सगळे हसत होते, एवढा काय घाबरतो तू वहिनीला,
"काय करतो मग आता",..आदेश प्रिया समोर गुडघ्यावर बसला, प्रिया त्याच्या कडे बघत नव्हती,.. "प्लीज प्रिया वरमाला घाल ना, प्लीज लग्न कर, अग हे पार्टी ऑफिसचे मुल असेच त्रास देतात, माझा विचार नव्हता हा, मी ओरडणार आहे त्यांना नंतर, आटोप आता" ,
प्रिया उठली, छान हसत होती ती, दोघांनी एकमेकांना वरमाला घातली, आदेशने पुढे येवून तिला मिठी मारली, ती आदेशला मारत होती, सगळे टाळ्या वाजवत होते,
"काही खर नाही माझ्या भावाच आता पासून किती माघार घ्यावी लागते आहे त्याला",.. अभिजीत.
"आदेशाने का अस कराव, प्रिया च्या मदतीला कोणी नाही ती काय करेल",.. काव्या.
"अरे पार्टी बदलू, तुझा प्रिय दीर आहे ना आदेश",.. अभिजीत.
"आहेच मुळी आदेश प्रिय, पण प्रिया ही किती छान आहे, माझ आणि तीच पटत" ,.. काव्या.
"काही खर नाही आता आमच्या दोघांच",.. अभिजीत.
" हो अतीच गरीब बिचारे तुम्ही खूप ऐकता आमच ",..काव्या.
बाकीच्या पूजा सुरू होत्या, प्रियाच्या घरचे अभिजीत काव्या श्रद्धा आजुबाजूला होते, सचिन विकास भेटायला आले,.. "आम्ही निघतो, खूप काम आहे ",
" नाही जेवण केल्या शिवाय जायच नाही",.. आदेश आग्रह करत होता, अभिजीत त्या दोघांना जेवायला घेवून गेला, जेवण झाल, आम्ही निघतो, ते प्रतापरावांना येवून भेटले,
काव्या तिच्या कामात बिझी होती, अभिजित तिच्या सोबत होता, विकास दुरून बघत होता, चांगली रमली आहे ही हिच्या संसारात, ठीक आहे बघु काय करता येईल ते, ते दोघ गेले,
घरच्या लोकांची पंगत चांगली रंगली होती,..
"आजी आता खाऊ घालू शकतो का घास माझ्या बायकोला" ,.. आदेश,
मागच्या वेळी अभिजीतच्या लग्नात आजी रागावल्या होत्या आदेश प्रियाला.
"आता कोण काय म्हणणार आहे तुला आदेश, रोज जरी तिला खाऊ घातलं तरी चालेल" ,... आजी.
बाकिचे हसत होते,
अभिजित काव्याला घास खावु घालत होता,.." अभिजित काय आहे? नको अरे",
" आपलही आताच तर लग्न झाल लाजू नकोस, एवढ आहे की आपली पुढची तयारी ही झाली, पिल्लू ठीक आहे ना आपल, त्रास नाही ना होत ",.. अभिजीत.
" नाही ठीक आहे मी",.. काव्या हसत होती,
आदेश अति उत्साही होता, प्रिया लाजून अर्धी झाली होती,.. "आदेश प्लीज थोड आरामात घे ना",
" नाही मी ऐकणार नाही, तू माझी आहेस",.. , तो तिच्या जवळून एक मिनिट ही सरकला नाही.
संध्याकाळी रीसेप्शन होत, त्या साठी सगळे तयार होत होते, आता प्रियाने घागरा घातला होता, आदेश कोट घालून तयार होता ,जोडी खूप छान दिसत होती, हातात हात घालून फिरत होते ते, बरेच पाहुणे येत होते,
अभिजीत काव्या थोड आरामात त्यांच्या रूम मधून निघाले, आता काव्या आरामात बसलेली होती, तिच्या कडून धावपळ होत नव्हती, तिला काय हव खायला वगैरे मावशी अभिजीत बघत होते,
थोड्या वेळाने सोहम सुरभी सुरेश राव प्रमिला ताई मावशी निघाले,
"मी आता थोडे दिवस मामा कडे जाणार आहे, काळजी घे काव्या काही वाटल तर फोन कर मी येईल लगेच",.. मावशी.
"ठीक आहे मावशी फोन कर रोज, काळजी घे तू" ,.. काव्या.
सोहम सुरभी येवून भेटले,.. "तब्येत सांभाळ, मी पाठवतो तुझा रिजल्ट आणि पेपर अॅडमिशन घेवून घे",
"दादा मला घरी यायच आहे ",.. काव्या.
" मी येईल घ्यायला, काळजी करू नकोस, पुढच्या आठवड्यात येतो, अभिजीत सोबत बोलून घेतो मी, तू त्या आधी अॅडमिशन घेवून घे",... सोहम.
हो,
ते निघाले काव्या अभिजीत बाहेर पर्यन्त आले होते, ते गेले तेव्हा काव्याच्या डोळ्यात पाणी होत, अभिजीत लक्ष देवून होता,.. "पुरे त्रास करून घेवू नको",
" अभिजित मला घरी जायच प्लीज, आता शशीचा प्रोब्लेम नाही ना, मला तू सोडायला ये ना",.. काव्या.
"ठीक आहे अॅडमिशन झाल की जावू" ,.. अभिजीत.
पाठवणीची वेळ आली, आता काव्या उठली ती प्रिया सोबत होती, तीच आवरून देत होती, तिने प्रियाच्या बॅग घेतल्या, प्रिया नुसती शांत बसुन होती, तिची आई तिच्या आजूबाजूला होती, आशा ताई दोघींशी बोलत होत्या, तिच्या घरच्यांना समजावत होती, घरच्यांना तशी काळजी नव्हती, पण ती वेळ अशी असते की रडताच घरचे,
सगळे घरी निघाले, आदेश प्रिया सजवलेल्या गाडीत होते, प्रिया अजूनही रडत होती, आदेशने तिला जवळ घेतल, पुरे आता प्रिया रडू नकोस,
अभिजित काव्या आजी पुढे आले होते, घरात स्वागताची तयारी सुरू होती,
आशा ताईंनी प्रिया आदेशला ओवाळून आत घेतल, आजींनी दोघांची नजर काढली, अभिजित काव्याची पण नजर काढली,.. "काव्या प्रियाला आत ने,"
दोघी आत आल्या,.. "फ्रेश हो प्रिया",
"वहिनी करमत नाही इथे, मला जमेल का इथे रहाण, मला काहीही येत नाही" ,.. ती परत रडत होती
"अरे काय अस, शांत हो बर, आता एक तास तर झाला तुला इथे येवून, आता कायम इथे राहायच आहे, काळजी करू नकोस, खूप चांगले आहेत घरचे, काही काम नसत, ओरडत नाही कोणी आणि मी आहे ना सोबत, आपण छान राहू, आणि आदेश तर अति मागे पुढे करतो तुझ्या, तुला अजिबात एकट सोडणार नाही तो, चल आटोप" ,.. काव्या.
" जेवून घ्या चला",.. आजी बोलवत होत्या , त्या प्रियाला समजावत होत्या.
काव्या कामात होती, प्रिया बसलेली होती, जेवण झाल,
" आता उद्या सकाळी होतील बाकीचे कार्यक्रम झोपा आता",.. आशा ताई.
काव्या अभिजीत आदेश प्रिया आजी बोलत बसले होते, आजी उठून गेल्या, आदेश प्रिया कडे बघत होता, ती खाली बघत होती,
"चल काव्या आता थकली आहेस तू" ,.. अभिजित.
"तुम्ही दोघ बोलत बसा, आम्ही जातो आराम करतो, आदेश नंतर हिला आजींच्या रूम मधे सोडून दे " ,..काव्या.
आदेशला तेच हव होत. तो अजून प्रिया जवळ सरकून बसला,
काव्या अभिजीत रूम मध्ये आले, आता आराम कर काव्या,
आदेश प्रिया बागेत फिरत होते..." काय झालं प्रिया टेंशन आहे का कसल ",
" आदेश मला माहिती नाही कस राहू वागु इथे, मला टेंशन येत आहे काही चुकल तर",..प्रिया.
"बस एवढच ना मला वाटल काय झाल ,काहीच काळजी करू नकोस तू जशी आहेस तशी रहा",.. आदेश.
दुसर्या दिवशी हळद उतरवायचा प्रोग्राम झाला, खूप मजा आली, आदेश उगीच त्रास देत होता प्रियाला, ती अगदी गोंधळुन गेली होती,.. "वहिनी सांग ना आदेशला, कसा करतोय सगळ्यांसमोर" ,
" वहिनी माझ्या बाजूने आहे प्रिया समजल ना" ,.. आदेश.
"हो भांडू नका, आटपा आता, आदेश अरे नको त्रास देवु तिला " ,.. काव्या.
वहिनी..
थोड्या वेळाने लगेच पूजा होती, छान दिसत होती प्रिया, काव्या तिला मदत करत होती,.." खूप सुंदर दिसते आहेस तू प्रिया, आदेशच काही खर नाही",
प्रियाच्या पोटात गोळा आला,.. "वहिनी काय ग तू नको ना चिडवू ",
प्रिया बाहेर येवून बसली, आदेश तिची वाट बघत होता, चला मॅडम पूजे साठी, ती छान हसली, पूजा झाली, प्रिया च्या घरचे आले होते ते सगळे समोर बसले होते.
जरा वेळाने अभिजीत ऑफिसला निघून गेला, काव्या रूम मधे आली, मावशी गेल्या मुळे तिला बोर होत होतं, प्रिया तिच्या माहेरी गेली होती, दुसर्या दिवशी सकाळी येणार होती ती,
दुसर्या दिवशी प्रिया आली, लगेच निघणार होते ते, आधी ते देवाला जाणार होते त्या नंतर घरी येवून फिरायला जाणार होते, काव्या नव्हती गेली त्यांच्या सोबत,
अभिजित रेडी होता,.. "चल काव्या आज कॉलेजला अॅडमिशन घ्यायची आहे",
"आले का डॉक्युमेंट्स",.. काव्या.
"हो काल पाठवले सोहमने",.. अभिजीत.
"मला सांगितल का नाही" ,.. काव्या.
"तू बिझी होतीस ना घरात" ,.. अभिजीत.
काव्या चांगल्या मार्काने पास झाली होती. दोघ कॉलेजला गेले, लगेच अॅडमिशन झाल, कॉलेजचे ट्रस्टी ओळखीचे होते, येतांना ते जवळच्या देवळात गेले, खूप छान शांत वाटत होत,
"अभिजीत आपण जावू मामाच्या गावाला तिथे देवळात जायच आहे",.. काव्या.
" हो जावु नक्की थोड एक महिना जावू दे अजुन, तुझी थोडी तब्येत नीट झाली की जावु" ,.. अभिजीत.
"उद्या दादा येणार आहे घ्यायला जावू का थोडे दिवस आई कडे",.. काव्या.
"हो जा काळजी घे साक्षी असेल ना सोबत",.. अभिजीत.
हो,
"मी येईल सोडायला आणि घ्यायला, सोहमला नको सांगू, तिकडे फिरायच नाही उगीच",.. अभिजीत.
आता शशी नाही बाकीच्या लोकांचा धोका होता,
" ठीक आहे",.. खूप खुश होती काव्या, बर्याच दिवसांनी घरी जाणार होती, घरी आल्यावर तिने तयारी केली, दुसर्या दिवशी सकाळी ते निघाले, गाव आल, लवकर पोहोचले घरी, सगळे वाट बघत होते, काव्या अभिजीतला सगळ घर फिरून दाखवत होती ,
"इकडे ये अभिजीत ही माझी रूम" ,.. तशीच्या तशी होती रूम, सगळ्या वस्तु सामान आता मी तिकडे नेणार आहे, एका कपाटात खूप टेडी बेअर होते, खेळणी होतो, ते कधी कधी घेतले सगळ काव्या सांगत होती, तिला अस खुश बघुन अभिजीत आनंदी होता, शेवटी हे तीच घर होत,
दुपारी जेवल्यावर अभिजीत वापस गेला, काव्या दुपार भर प्रमिला ताई सुरभी सोबत बोलत बसली होती, मावशी गावाला गेल्या होत्या, सुरेश राव सोहम ऑफिसला गेले,
" तू तिकडे ऑफिस मधे काम करते का काव्या",.. सुरभी.
"हो वहिनी, पुढच अॅडमिशन ही घेतल" ,.. काव्या.
"कस करणार एवढ्या गोष्टी एकत्र, बाळ ही असेल त्यात थोड्या दिवसानी",. सुरभी.
"हो आहेत घरी सांभाळणारे, वहिनी मला तुझ्याशी थोड बोलायच आहे",.. काव्या.
"बोल ना" ,.. सुरभी.
" शशीला भेटायच आहे",.. काव्या.
"नको काव्या तुझ्या घरचे ही आणि इकडचेही ओरडतील" ,.. सुरभी.
"नाही ओरडणार तुम्ही लोक आहात ना सोबत",.. काव्या.
"नाही काव्या, अस करू नकोस, काय काम आहे",.. सुरभी.
"ते त्याला फॅक्टरी टाकायची होती ना, त्या बाबतीत बोलायच आहे, मी करते त्याला मदत",.. काव्या.
"नको काव्या तू नको करू काही, तुला माहिती नाही सोहम किती चिडलेला माझ्या वर, कशी तरी घरी आली मी परत, त्याला वाटेल मीच सुचवल हे ",.. सुरभी.
" वहिनी मी बोलेन दादा सोबत तू अजिबात काळजी करू नको",.. काव्या.
" नाही म्हंटल ना मी, मला टेंशन येत आहे काव्या तुझ्या वागण्याच, मी अभिजीत रावांना फोन करून सांगून देईल, तुला येवून हो घेवून जा म्हणून, त्रास देवु नको काव्या तब्येत सांभाळ",... सुरभी.
ठीक आहे, ती तिच्या रूम मधे आली काय कराव, तिने शशीला फोन लावला, काव्याचा फोन बघून शशी आश्चर्यचकित झाला होता, हॅलो काव्या.
" शशी मला तुला भेटायला यायचं आहे, थोडं कामा बाबतीत बोलायचं आहे, तुला फॅक्टरी टाकायची ना",.. काव्या.
" तू तुझ्या घरच्यांना विचारून घे आधी, काय काम आहे? तू नक्की मला फोन केला आहे ना काव्या",.. शशी.
"शशी काही प्रॉब्लेम नाही, मी अभिजीतला विचारल आहे, सोहम दादाला पण सांगते मी",.. काव्याने अभिजीतला सांगितलं होतं तिला इन्वेस्टमेंट करायची आहे, तो काही म्हटला नाही,
तिने जरा वेळाने अभिजीतला फोन केला,.." अभिजीत हे लोक मला नाही भेटू देत शशीला, तो ही नाही म्हटला भेटायला",
" ठीक आहे, त्याला काय काम आहे ते स्पष्ट सांग, करायच असेल काम सोबत तर तो हो म्हंणेल नाही तर राहू देवु",.. अभिजीत.
"हो बरोबर आहे, तुला काही प्रॉब्लेम नाही ना",..काव्या.
"काही प्रॉब्लेम नाही जोपर्यंत तू सेफ आहे तोपर्यंत काही प्रॉब्लेम नाही उद्या मी वकीलांना पाठवून देतो, एक मॅनेजर असेल सोबत, तुम्हा लोकांना काय काम करायचे असतील त्याचं मीटिंग घेऊन घ्या, साक्षी असेल ना सोबत घरी बोलवून घे शशी ला",.. अभिजीत.
हो.
" तुला का करायचं आहे पण हे काम मला अजून समजल नाही ",.. अभिजीत.
" शशीला माझ्याशी लग्न या कारणासाठीच करायचं होतं, त्याला स्वतःची फॅक्टरी टाकायची आहे, खूप हुशार आहे तो, खूप छान काम करतो, म्हणून मला वाटत होतं की मी इन्व्हेस्टमेंट करते, त्याला फॅक्टरी टाकायला मदत करते, त्याला सांगते मी की तूच एकट काम कर मी अर्धी भागीदारी होते, तो प्रॉफिट झाल्यावर माझे पैसे वापस करेल, आणि मला ही दुश्मनी संपवायची आहे, नेहमी धोका नको आहे मला, आहेत ना पैसे मग वापरु दे त्याला, वाढतील अजून मला खात्री आहे यातुन फायदाही होईल आपली इकडे ही एक फॅक्टरी तयार होईल",.. काव्या सांगत होती,
" ही ठीक आहे काव्या, काही हरकत नाही ",.. अभिजीत.
" विशेष कामही नाही मला, शशी करेल",.. काव्या.
" तू स्वतः कुठे जाऊ नको कुठे, शशीला इकडे यायचं असेल तर येऊ दे भेटायला ",.. अभिजीत.
ठीक आहे.
रात्री जेवताना काव्याने सोहम आणि सुरेश रावांना तिला काय वाटत ते सांगीतल, मला करायच शशी सोबत काम, आणि हे मला सुरभी वहिनीने सांगितलं नाही, तिला काही माहिती नाही दादा, मी हे अभिजीत सोबत बोलली आहे आणि त्यांना काही प्रॉब्लेम नाही.
सुरुवातील सोहमला हे आवडलं नव्हत पण अभिजीत काव्या याना काही प्रॉब्लेम नाही म्हणून तो हो बोलाल,.. "मी तुझ्या सोबत राहील यात पण" ,
" ठीक आहे उद्या सकाळी शशीला इकडे भेटायला बोलवून घे",.. सोहम.
काव्याने शशीला फोन करून भेटायला बोलवून घेतलं, सुरभी खुश होती,
सकाळी नाश्त्याचे वेळी शशी आला, तो काव्याला भेटला, दोघ छान बोलत होते, काव्याचे वकील मॅनेजर आलेले होते, ते सगळे ऑफिसमध्ये बसले, काव्यासोबत सोहम होता, तो काही बोलत नव्हता, काव्याचं काय म्हणणं आहे हे वकील शशीला सांगत होता, आता शशीला खूपच आश्चर्य वाटलं,.. "खरंच काव्या तयार आहेस तू ही इन्व्हेस्टमेंट करायला",
"हो शशी मला माहिती होत ही फॅक्टरी टाकण तुझ स्वप्नं आहे, मी जरी तुझ्या सोबत असली तरी याच्यातलं काही माहिती नाही, तुलाच काम करायचं आहे सगळं, पण मी अर्धी पार्टनर राहील कायम",.. काव्या.
"चालेल मला काही हरकत नाही, मी पूर्ण प्लॅन तयार करतो आणि मग तुला सांगतो",. शशी.
" एक प्लॅन्ट मॅनेजर सेपरेट टीम अपॉइंट करून ठेव तेच बघतील सगळं, फायनान्स वगैरे या वकिलांवर मॅनेजर वर ठेवल आहे फक्त मी पेमेंट करून टाकेल",.. काव्या.
" चालेल काही हरकत नाही ",.. शशी त्या लोकांशी बोलत होता, चल मी निघतो काव्या कामाला लागाव लागेल, काव्या सोहम जवळ बसली होती, वकील मॅनेजर बाहेर उभे होते,
थोड बोलायच होत काव्या,.. "मी तुझ्याशी किती वाईट वागलो, तरी सुद्धा तु मला मदत करायला तयार आहेस, का अस",
" यात माझा ही स्वार्थ आहे शशी, मला इन्व्हेस्टमेंट करायची होती, आणि तुझ्या हुशारीचा उपयोग करून घ्यायचा आहे, आणि मला तुझा राग नाही आला, इट्स ओके, जास्त विचार करू नकोस",.. काव्या.
" खूपच व्यवस्थित स्वभाव आहे तुझा, मी तुला ओळखू शकलो नाही, तू मला माफ करणार का, तुझ्या सारख चांगल मला कधी वागता येणार नाही ",.. शशी.
" शशी मनात आता कुठलीच गोष्ट आणू नको, आपल्या फॅक्टरीच काम लवकर करायला घे ",.. काव्या.
"तुझ्या घरच्यांना काही प्रॉब्लेम नाही ना, नाही तर राहू दे हे काम",.. अभिजीत.
" नाही काही प्रॉब्लेम नाही, ते माझ्या कुठल्याच गोष्टींत मध्ये मध्ये करत नाही, विश्वास ठेवला आहे त्यांनी माझ्यावर, तुझ्या कंपनीचं काम पूर्ण झालं की सांग आपण छान उद्घाटन करू, मस्त काम करू ",.. काव्या.
बऱ्याच वेळे शशी बसला होता, तो गप्पा मारत होता, आता सोहम ही त्याच्याबरोबर थोडसं बोलत होता,.." आपल्याला जागा घेण्यापासून तयारी करावी लागेल, सगळं बघून घे शशी किती खर्च होतो, तुझ्याकडे आहे ना तयार प्लॅन",
" हो जिजाजी आहे सगळं ठरलेलं, बरेच लोक आहेत माझ्याकडे कामाला, त्यांना मदतीला घेता येईल",.. शशी.
"काही हरकत नाही या सगळ्या गोष्टीचा निर्णय तू घेऊ शकतो शशी ",.. सोहम.
नंतर काव्याने अभिजीतला फोन करून सगळी माहिती दिली, त्याला ते सगळं आधीच माहिती होतं, सोहमने सांगितलं होतं सगळ,
अभिजीतने सोहमला काव्यावर लक्ष द्यायला सांगितल होत आणि तिकडे काय होतं ते सांगायला सांगितलं होतं.
शशीने आता काव्याच्या टीमशी संपर्क साधला, पुढे काय काय काम करायच याची त्या सगळ्यांची दुपारून मीटिंग होती, लवकरच काम सुरू होणार होत, तो खुश होता.