©️®️शिल्पा सुतार
.........
.........
शशी त्याच्या ऑफिस मध्ये येऊन बसला, त्याने मोहन शरदला बोलवून घेतलं,
"आज काय झालं खुश आहेस तू शशी" ,.. शरद.
"काव्याकडे गेलो होतो तिला भेटायला, ती माहेरी आली आहे",.. शशी.
दोघ आश्चर्य चकित झाले.. "कशी आहे ती? " ,..
"मजेत आहे आणि एक आनंदाची बातमी आहे काव्या फॅक्टरी साठी इन्व्हेस्टमेंट करायला तयार आहे",.. शशी.
काव्या काय म्हणत होती फॅक्टरी बद्दल त्याने ते शरद मोहनला सांगितलं, खूप खुश होता तो, डोळ्यात अपराधीपणाची भावना दिसत होती,
"मी कसा वागलो काव्याशी, किती त्रास दिला तिला, माझ्या स्वार्था साठी मी तिचा विचार केला नाही, पण ती नेहमी चांगलीच वागली माझ्याशी, तिने मला काय आवडतं याचाच विचार केला, खरंतर काव्याला ही इन्व्हेस्टमेंट करायची काही गरज नव्हती, पण तरी ति मला फॅक्टरी टाकायला मदत करते आहे, खरच खूपच चांगली आहे काव्या, मी चुकलोच तिच्याशी वागायला",.. शशी.
" जाऊ दे आता झालं गेलं विसरून जा, चांगला चान्स मिळाला आहे तुला आयुष्यात, ही फॅक्टरी खूप मोठी होऊ शकते, कारण तू मुळातच खूप हुशार आहेस शशी , आता तुला पैशाची पण मदत मिळत आहे",.. शरद.
" शरद तू आणि मोहन माझ्यासोबत काम करणार का",.. शशी.
" करू ना आपण सगळे मिळून हे काम, आम्ही कायम तुझ्या सोबत आहोत ",.. मोहन
"माझी काहीही पैशाची इन्व्हेस्टमेंट नसतांना मला पन्नास टक्के भागीदारी देणार आहे काव्या ",.. शशी.
" तू स्वतःला सिद्ध करून दाखव, तुझ्या मनात नाही ना आता काही राग वगैरे तिच्या बद्दल ",. शरद.
" अजिबात नाही, आता खूप सिरीयस होवुन काम करणार आहे मी ",.. शशी.
...
...
घरी काव्याचे खूप लाड सुरू होते, रोज आवडीचे पदार्थ होत होते, उद्या अभिजीत येणार होते घ्यायला, जावई येणार काय काय करायच सगळ सुरभी ठरवत होती,
सकाळी सकाळी अभिजीत आला, खाली चहा पाणी झाल, काव्या अजून आराम करत होती, अभिजित तिच्या रूम मधे आला,.." छान आराम सुरू आहे माहेरी" ,
ती पटकन उठून आली, अभिजितने तिला जवळ घेतल,.. "जायच ना घरी आज, की रहाते अजून" ,
"येते घरी, झाला आराम",.काव्या.
"चेंज वाटल ना",..अभिजीत.
हो.
"माझी आठवण आली का",..अभिजीत.
" रोज येत होती आठवण, घरी कसे आहेत सगळे", ...काव्या.
"तुझी आठवण काढता आहेत, तू नाही आदेश प्रिया नाही करमत नाही त्यांना",.. अभिजीत.
नाश्ता झाल्यावर सोहम अभिजीत त्यांच्या फॅक्टरीत गेले, सोहमला त्याला बर्याच गोष्टी दाखवायच्या होत्या,
"कशी झाली काल मीटिंग शशी सोबत? ठीक आहे ना शशी आता",.. अभिजीत.
" नॉर्मल वाटला आणि काव्या त्याला मदत करणार आहे आता एकदम शांत झाला, माफी मागत होता, कामाला लागला",.. सोहम.
"छान चला बर झाल" ,..अभिजीत.
"तुला काही प्रोब्लेम नाही ना काव्याने सांगितल ना तुला या बाबतीत",. सोहम.
"हो माहिती आहे मला, काव्याला ही दुष्मनी मिटवायची होती, काही हरकत नाही तस ही काव्याला काही काम कराव लागणार नाही यात, शशी करेल काम काही वाटल तर बघू आपण ",.. अभिजीत.
दुपारी ते जेवायला घरी येणार होते, छान स्वयंपाक केला होता सुरभीने, जेवण झाल, काव्याने निघायची तयारी केली, सगळे बाहेर पर्यंत आले होते सोडायला,
" ये परत मावशी आल्या की, तब्येत सांभाळ",.. सोहम.
हो. काव्या इमोशनल झाली होती, अभिजित तिला सांभाळत होता, आज काल खुप मूड स्विंग होते तिचे, बर्याच वेळ ती शांत होती.
ते वापस घरी आले, आशा ताई आजी वाट बघत होत्या, प्रतापराव ऑफिसला गेले होते,
"काय हे तुम्ही कोणी घरी नाही, अजिबात करमत नव्हत आम्हाला, आता या पुढे सगळ्यांनी एका वेळी जायचं नाही गावाला, नाहीतरी आम्ही पण येवू",.. आशा ताई.
काव्या तिकडून काय काय आणल ते दाखवत होती, खूप खुश होती ती.
"आई आजी.. आदेश आला की आपण पिकनिकला जावू सगळे" ,.. अभिजीत.
"हो आम्हाला ही घरी राहून राहून कंटाळा आला आहे",..आजी.
थोड्या वेळाने अभिजीत ऑफिसला निघून गेला.
आदेश प्रिया आज रात्री येणार होते, काव्या आई आजींना तिकडे काय काय झाल ते सांगत होती,
"आता तू कॉलेजला जाणार की ऑफिसला",... आजी.
" सुरुवातीला जाव लागेल कॉलेजला, नंतर दुपारी ऑफिसला जाईल ",.. काव्या.
तिने आदेश प्रियाला फोन केला, दोघ खूप खुश होते सोबत, निघाले होते ते घरी यायला .. "वहिनी तुम्ही दोघांनी पण यायला हव होत इकडे छान वाटतय",
"तुम्ही दोघांनी आम्हाला विचारल नाही, तुमचे तुमचे निघून गेले, कसे येणार आम्ही ",.. काव्या मुद्दाम चिडवत होती,
"सॉरी वहिनी पुढच्या वेळी आपण सोबत जावू" ,.. प्रिया.
दुसर्या दिवशी काव्या कॉलेजला आली, कोणी ओळखीच नव्हत, ती क्लास मध्ये येवून बसली, कमी होते मुल मुली, बरेच आधी पासून एकमेकांना ओळखत होते , काव्याशी सगळे ओळख करून घेत होते, रश्मी सोबत ती बसली होती, तीच पण लग्न झाल होत, या गावत तीच ही सासर होत, सगळे ओळख करून घेत होते, बरेच मुल मुली जॉब करत होते, आठवड्यातुन दोन तीन दा याव लागेल कॉलेज मध्ये सर सांगत होते, ठीक आहे बर झाल त्या दिवशी दुपारी हून ऑफिस मधे जाणार होती काव्या.
सिलॅबस काय आहे, कधी परीक्षा असेल सगळी माहिती आज मिळाली होती, दुपारी ती ऑफिस मध्ये आली, तिचा डबा अभिजीतने आणला होता, दोघ जेवायला बसले,
"आवडल का कॉलेज ",. अभिजीत.
"ठीक आहे, कोणी ओळखीच नाही, मी बोलत होती ना मला माझ्या गावाला घ्यायची अॅडमिशन",.. काव्या.
"माझ्या पासून लांब राहिली असती का मग",.. अभिजीत.
"नाही शक्य नाही ते, पण आधी जस वाटायच कॉलेज मध्ये तस आता वाटत नाही, बर्याच मुलींचे लग्न झाले आहेत त्या ही या गावत नवीन आहेत" ,.. काव्या.
"होतील ओळखी हळू हळू",.. अभिजीत.
"सुरुवातीला थोड जाव लागेल कॉलेजला नंतर परमिशन घेईल",.. काव्या.
श्रद्धा भेटली बाहेर.
" झाल का सेट घर",. काव्या.
" हो सगळ ठीक आहे घरात, खूप सुंदर बंगला आहे तुमचा, कामाला बाई ही आहे, सिक्युरिटी इतर काम करणारे लोक ही आहेत",.. श्रद्धा.
" छान तू खुश आहे ना",.. काव्या.
हो.
आदेश डिपार्टमेंट मधे नव्हता तर खूप बोर वाटत होत, पवार साहेब सगळ सांभाळून होते, काव्या आत आली ती आल्या मुळे सीमा अक्षय खुश होते, ती त्यांच्या सोबत खूप बोलत होती, कॉलेज बद्दल सांगत होती त्यांना, ते तिघ आरामात बसुन होते ,
"काम झाल का तुमच काव्या मॅडम? बोलत बसायच नाही, अक्षय सीमा आटपा लवकर, गप्पा मारायच्या नाही",.. पवार रागावले,
सॉरी सर.. ती दिलेल काम करत होती,
आज दुपारी गव्हर्न्मेंट ऑफिस मधे मीटिंग होती, आदेश नव्हता म्हणून अभिजीत जाणार होता मीटिंगला,
विकास सचिन हि जॉईन होणार होते, ते नेहमी प्रमाणे आदेशला बोलवायला आले, गेट वरून सांगितल की तो नाही ऑफिस मधे,
विकास सचिन हि जॉईन होणार होते, ते नेहमी प्रमाणे आदेशला बोलवायला आले, गेट वरून सांगितल की तो नाही ऑफिस मधे,
त्यांनी अभिजितला फोन लावला, तो पटकन बाहेर आला, दोघां सोबत मीटिंगला गेला, रस्त्यात विकास सचिन खूप बोलत होते, काम जोरात सुरू होत, तिकडे प्रेझेंटेशन ही छान झाल, आता तिघे नवीन प्लांट मधे आले, काम बघून अभिजीत खुश होता, हुशार आहेत हे दोघ मूल, आपण जरा शांततेत घेवून विकासला समजुन सांगाव लागेल, तो खरच त्रास देतो का काव्याला ते बघाव लागेल,
रात्री आदेश प्रिया घरी वापस आले, जेवायला आज सगळे हजर होते, काव्या ताट करत होती, प्रिया आता बर्या पैकी मदत करत होती,
"वहिनी बरोबर आहे का वाढलेल",.. प्रिया.
"हो आपल्या घरी जस करत होतो तस कर काही फरक नाही" ,.. काव्या.
आदेश खूप बोलत होता सगळ्यांशी, अभिजित बाबांना आदेशला मीटिंग मधे काय काय झाल ते सांगत होता, आशा ताई आजी पुढे बसुन होत्या,
"तुला ऑफिस आहे का उद्या वहिनी",.प्रिया.
"हो त्या आधी कॉलेज ही आहे",.. काव्या.
" होत का तुझ्या कडून एवढ",.. प्रिया.
" हो होईल तो पर्यंत करेन",.. काव्या.
" कस वाटतय तुला, बाळ कस आहे ",..प्रिया.
" काहीच फरक नाही, फक्त मधे मधे वीक वाटत",.. काव्या.
" तुला काही लागल तर मला सांगत जा आणि उद्या पासून मी करत जाईल काम तू बस",.. प्रिया.
"नाही अस मी काय करणार नुसत बसुन, दोघी मिळून करू, नाही झाल तर मी सांगेन ",.. काव्या.
"जेवणाच्या आधीच काव्या प्रिया तुम्ही आवरायच आणि जेवण नंतर अभिजीत आदेश आवरतील",.. आजींनी सांगितल,
"सगळ्यांनी काम करायच, त्या पण दोघी ऑफिसला जातात",.. आशा ताई.
हो ना.
" ठीक आहे, आता आजी बिग बॉसने सांगितल तर काय नाही म्हणणार आम्ही, चला आपण आइस्क्रीम खायला जावू एका ठिकाणी, मजा येईल",... आदेश.
" तुम्ही जा आमच्या साठी घेवून या ",.आजी.
" अस चालणार नाही याव लागेल कोणीही पार्सल आणणार नाही ",.. आदेश.
" अरे आण ना",.. आजी.
" ठीक आहे, पुढच्या वेळी याव लागेल सोबत ",.. चौघे निघाले, आदेश प्रिया पुढे बसले होते, अभिजीत काव्या मागे होते, खूप गम्मत येत होती, खूप गप्पा सुरू होत्या, दुकान आल.
" कोणाला काय हव आहे ",.. अभिजीत.
" अभिजित मला फालुदा हवा आहे",... काव्या.
बाकीच्यांनी आइस्क्रीम घेतल. खूप छान दुकान होत, ते सगळे छान बोलत होते.
"आदेश प्रिया तुमची ओळख कशी झाली ते सांगा" ,.. काव्या.
"आम्ही शाळे पासून सोबत होतो, मध्ये आदेश नव्हता इथे 5-6 वर्ष, शिकायला बाहेर गेला होता तेव्हा फोन वरून संपर्कात होतो आम्ही",.. प्रिया.
"कितवीत भेटले तुम्ही",... काव्या.
" तरी पाचवी पासून",.. प्रिया.
"बापरे तेव्हा समजत तरी होत का तुम्हाला ",.. काव्या.
" आम्ही बेस्ट फ्रेंड होतो",.. प्रिया.
"कोणी कोणाला प्रपोज केलं ",.. काव्या.
" अस काही नाही झाल, माहिती होत सोबत रहायच आम्हाला ते ठरलं होत ",..आदेश.
किती छान.
" तुम्ही दोघ कसे भेटले दादा वहिनी ",.. प्रिया.
" आम्ही ते अचानक भेटलो स्टेशन वर, मी एकटी होते, मला जॉब नव्हता अभिजीत बोलला आमच्या कंपनीत आहे जॉब, मी जॉईन झाली अशी झाली ओळख ",.. काव्या छान लाजली होती.
" मला नाही वाटत ही पूर्ण स्टोरी , काही तरी लपवते आहेस तू वहिनी",.. प्रिया.
"अग हीच स्टोरी आहे",.. काव्या.
" तुम्ही दोघांनी कस ठरवल मग लग्न करायच, कोणी कोणाला विचारल",.. प्रिया.
अभिजीत काव्या दोघ काही बोलत नव्हते.
" दादाने विचारल असेल, तोच वहिनीच्या मागे मागे होता",.. आदेश.
काव्या अभिजीत हसत होते,
" आदेशला माहिती आहे आमची स्टोरी",.. काव्या.
.......
.......
विकास घरी पोहोचला, जेवण झाल, तो रूम मध्ये आला, घरचे लग्नाच्या मागे लागले होते, आजही दोन तीन स्थळ सांगून आले होते, बाहेर आईने दोन तिन फोटो दिले होते बघायला, त्याच्या हातात ते फोटो होते , त्याने ते फोटो समोर टेबल वर फेकले, तो सोफ्यावर जावून बसला, अजिबात इच्छा होत नाही कोणत्याही मुली कडे बघायची, काव्या मला हवी आहे , अतिशय निरागस सुंदर आहे ती, माझ प्रेम आहे तिच्यावर. साडीत किती सुंदर दिसते, काय करू मी.
काव्या तिच्या घरात छान रमली आहे, तिचा नवरा तिच्या सासरचे तीच जग आहे, काय कराव, उगीच दिसली ती, उद्या बघाव लागेल काय करते ती,
त्याने त्याच्या कपाटातून गुलाबच फुल काढल जे आदेशच्या लग्नात काव्याने दिल होत, त्याने फुल जवळ घेतल, वास घेतला, परत नीट ठेवल, तिचा नंबर मोबाईल मधे सेव केला होता, त्याने बघितल ती ऑनलाईन दिसत होती. फोटो खूप छान होता तिचा,
त्याने एक फोन लावला,.. "समजल का काही काय आहे सध्या काव्याचा दिनक्रम ",
"कॉलेजला गेली होती आज ती मॅडम, नंतर दुपारी ऑफिस मध्ये गेली होती",..
"कोणता कोर्सला घेतल अॅडमिशन",.. विकास.
"एम कॉमला",..
"शिक्षण झाल नाही म्हणजे तीच , काय आहे कॉलेजची वेळ" ,.. तिची इतर माहिती तो घेत होता, आता जायच बोलायच तिच्याशी, काहीही झाल तरी चालेल.
......
......
काव्या कॉलेज मधे आली, लगेच पहील लेक्चर सुरू झाल, रश्मी आलेली होती, ब्रेक मधे त्या कॅन्टीन मध्ये गेल्या, वर्गातले अजून दोन तीन मूल मुली होते, सगळ्यांनी एकमेकांना मदत करायच नोट्स द्यायच ठरवल, आपण विचारून बघु सरांना किती दिवस कंपल्सरी अॅटंडंस आहे,
कॉलेज आज अर्धा तास आधी संपल, काव्या आणि रश्मी बाहेर उभे होते, ड्रायवर येत होता,
" ठीक आहे मी निघते काव्या थोड काम आहे",.. रश्मी.
काव्या तिथे उभी होती, एक गाडी समोर येवुन थांबली, काव्याच लक्ष नव्हत, ती अभिजीतला मेसेज करत होती, विकास उतरून आला,.. "हाय काव्या",
हाय,.. ती दचकली, हा काय करतोय इथे.
"छान वाटल तुला आज बघून, संपल का लेक्चर",.. विकास.
"हो तुम्ही काय करताय इथे ",.. तिने रागात विचारल.
" मी तुला भेटायला आलो, तुला माहिती आहे ते ",.. विकास डायरेक्ट बोलला.
" काय माहिती आहे मला, का आलात मला भेटायला? काय संबंध आपला ",.. काव्याला राग आला होता, ती बाजूला जावून उभी राहिली, एक झाल की एक आहेच मागे, आता शशीचा प्रॉब्लेम नीट केला, जरा छान शांततेत राहू तर हा विकास आहे मागे.
विकास परत तिच्या जवळ आला.. "मी त्या दिवशी बोललो होतो त्यावर विचार केला का? माझ्याशी मैत्री करणार का",..
"नाही जमणार मला मैत्री करायला, माझ लग्न झाल आहे आणि मी माझ्या संसारात सुखी आहे, मी कशाला घाबरत नाही, काय करायच ते करा आणि माझ्या मागे यायच नाही",.. काव्या.
" चल तुला सोडून देतो मी ऑफिसला जायच ना, कॉफी घेवू रस्त्यात, मला बोलायच आहे तुझ्याशी ",.. विकास.
" नाही ड्रायवर येईल, मला कॉफी आवडत नाही ",.. काव्या.
"ड्रायवरला उशीर होईल, ज्यूस आवडतो ना तुला ",.. विकास.
काव्या आश्चर्याने बघत होती,
" मला माहिती आहे तुझी आवड निवड, चल थोड बोलायच आहे",.. विकास.
" नाही तुम्ही जा",.. काव्या फोन शोधत होती,
" आपण शांततेने बोलू या ना काव्या प्लीज चल ",.. विकास.
नाही.
तिने ड्रायवरला फोन केला,.." येतो आहे मी रस्त्यात इथे ट्रॅफिक जाम आहे पंधरा मिनिट",
"तू माझ्याशी नीट बोलली तर येईल तुझी गाडी, आय एम सिरियस ",.. विकास.
" मला जायच आहे",.. ती अभिजीतला फोन करत होती, विकासने तिचा फोन काढून घेतला, स्वतः च्या खिश्यात टाकला,
काव्या घाबरली,.. "तुम्ही का त्रास देत आहात मला , तुम्हाला माहिती आहे ना मी मॅरीड आहे, माझा फोन द्या आणि जा इथून, हे अस आपल्या दोघांसाठी चांगल नाही, मला जायच आहे",..
" तुला मी आवडतो का ते सांग फक्त, बाकीच मी बघून घेईल",.. विकास.
"नाही मला फक्त अभिजीत सोबत रहायच आहे",.. काव्या.
"काय हव तुला ते सांग. तू जे म्हणशील ते करेन मी, सगळ आहे माझ्या कडे फक्त तू नाहीस, खूप सुखी राहू आपण ",.. विकास.
"शट अप ",.. काव्या.
काव्याला खूप कसतरी होत होतं, टेंशन आल होत तिला. ती पाणी शोधत होती, एकदम चक्कर आल्या सारख झाल, ती तिथे कट्ट्यावर बसली, प्लीज मला पाणी हव.
" काय झाल काव्या",.. विकास घाबरला.
" गोड आहे का काही खायला ",.. तिने कट्ट्यावर बसुन घेतल,
त्याने समोरच्या दुकानातून पाणी आणि चॉकलेट आणल तिला दिल, थोड पाणी पिल तिने एकदम खाली पडल्या सारखी झाली, त्याने तिला आधार देवून कार मध्ये बसवल, ती मागच्या सीट वर झोपली जरा,
काव्या... काव्या... विकास आवाज देत होता, काय करू अभिजीतला फोन करू का, काही गरज नाही मी लक्ष् देईल हिच्या कडे, त्याने कार काढली तिला फार्म हाऊसवर आणल, ती अजूनही झोपून होती,.. "उठ काव्या काय झाल" , त्याने तिच्या कपाळावर हात लावला,
अभिजीत... काव्याने त्याच्या हात धरला, तिला काही समजत नव्हत कोण आहे ,
विकासने त्याचा हात तिच्या हातातून काढून घेतला , एकदम मागे झाला तो,
शेतातला एक दोन बायका जमा झाल्या,.. "काय झालं साहेब, काय झाल मॅडम चक्कर आली का",
काव्या उठून बसली सगळ्यांकडे बघत होती ती,.. "मी कुठे आहे, मला घरी जायच आहे",
"काही खाल्लं नाही का सकाळ पासून, काय ग पोरी चक्कर कशी आली",..
काव्या काही म्हटली नाही,
"कामाला जा तुम्ही मावशी",.. विकास.
त्या गेल्या.
"माझा फोन द्या, मला जायच आहे इथून , अभिजित कुठे आहे",..काव्या.
"ठीक आहे का तु, चल आत येवून बस, मला बोलायच आहे तुझ्याशी ",.. विकासने तिचा हात धरला.
नाही, हेल्प हेल्प..
" चूप एकदम, मी काही करतो का तुला, आत चल पटकन",.. विकास.
" मला घरी जायच आहे",.. काव्या.
तो तिला हाताने ओढत आत घेवून गेला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा