तुझसे नाराजी नहीं जिंदगी..
(दिव्या खाली अंधार)
भाग (४)
नशीबाने पुन्हा एकदा हुलकावणी दिली. सुख आले म्हणता म्हणता दुःख हळूच पदरात आले. आधिराज गेल्यावर सगळ्या कुटुंबाची जबाबदारी तिच्यावर आली. आधिराज गेल्यावर सासूबाईंनी हाय खाल्ली व त्या हे जग सोडून गेल्या. जाता जाता तिच्या सासूबाई तिच्यावर “तू पांढऱ्या पायाची आहेस, तुझ्यामुळेच माझे लेकरू गमावले.” हा ठपका ठेवून गेल्या. तिच्या दोन नणंदा ही तिच्याशी नीट वागेनाशा झाल्या. सासरे चांगले वागत होते. अजून वेणू आणि रेणूचे लग्न व्हायचे होते. तिच्यावर जबाबदारी होती. तिचे काका काकू तिला नोकरी सोडून गावी परत येत होते. तिने नकार दिला. तिच्या वरची जबाबदारी तिने नाकारावी हे तिला पटत नव्हते. ती हट्टाने नोकरी करत होती. वेणू आणि रेणूचे लग्न त्यांच्या मताप्रमाणे, त्यांना हवे तसे करुन दिले. चांगल्या ठिकाणी करून दिले. सासरे ही खुश झाले. त्यांनी गावातली जमीन आणि घर विकले आणि आलेले पैसे तिन्ही मुलींना व करुणाला सारखे वाटून दिले. व स्वतः करुणा जवळ येऊन राहिले. करूणाला त्यांचा आधार आणि सोबत होती. करुणाला त्यांची खूप मदत होईल. भाजी आणणे, दूध आणणे अशी कामे ते करत होते.
दोन तीन वर्षे छान गेली. या काळात करुणाने स्वतःचे घर घेतले. रेणू वेणूची सारे सणवार, माहेरपण, बाळंतपण केले. त्या तिच्याशी नीट वागत नव्हत्या तरीही. आहिल्याचे आणि करुणाचे मात्र चांगले संबंध होते. एक दिवस तिचे सासरे लवकर घरी आले नाहीत. वाट बघून बघून ती शोधायला बाहेर पडणार इतक्यात त्यांचे शेजारचे काका त्यांना घरी घेऊन आले. ते घराचा रस्ता विसरले होते व इकडून तिकडे फिरत होते. काकांनी त्यांना पाहिले व घरी घेऊन आले. करुणाला आता काळजी वाटायला लागली. तिने लगेचच आहिल्या व वेणू रेणूला कळवले. आहिल्या दुसऱ्या दिवशी हजर झाली. तिने व करुणाने मिळून त्यांना डाॅक्टरांना दाखवले. त्यांना डिमेन्शीयाचा त्रास होत होता. आहिल्याने वेणू रेणूला फोन केला. “त्यांचे पैसे घेतले ना, मग बघ म्हणाव आता तूच. तिचा काय अधिकार त्यांचे पैसे घ्यायचा?” वेणू रेणूने लावलेला सूर पाहून आहिल्याने त्यांना चांगलेच सुनावले. “तुमचे सगळे तिनेच केलयं हे लक्षात असू द्या. अग गेली पाच सहा वर्षे तीच बघते आहे त्यांच्याकडे. आत्ताही तिने पैशांसाठी कळवलेच नाही. आजार मोठा आहे, काही घडले तर तुम्ही परत तिलाच बोल लावाल म्हणून कळवले. आणि वडील आहेत तुमचे, तुम्हांला ही त्यांच्याबद्दल काही वाटत असेल म्हणून कळवले.” असे बोलल्यावर दोघी वरमल्या. पण आहिल्याने त्यांची वाट न पाहता वडीलांना आपल्या घरी नेण्याचे ठरवले. करुणाला मात्र फार वाईट वाटत होते. तिने वडिलांसारखे त्यांना जीव लावला होता. त्यांनाही आहिल्याकडे जायचे नव्हते.
ते आहिल्याकडे गेल्यावर इकडे करुणाला अजिबात करमत नव्हते. त्यांनाही करुणाची सवय झाली होती. ते आहिल्याला “करुणा” म्हणून हाक मारत होते. . महिना दीड महिना झाल्यावर एक दिवस ते फिरायला म्हणून बाहेर पडले आणि घरी परत आलेच नाहीत. पोलीस कंप्लेंट झाली, सगळीकडे शोधाशोध झाली पण काही उपयोग झाला नाही. करुणाला परत नशिबाने मोठा दणका दिला. एकावर एक आघात तिच्यावर होतच होते. जरा एका दुःखातून सावरून बाहेर पडावे तोपर्यंत दुसरे त्याला धक्का देत मागोमाग येत असे. नशीब तिची सतत परीक्षा बघत होते.
ते आहिल्याकडे गेल्यावर इकडे करुणाला अजिबात करमत नव्हते. त्यांनाही करुणाची सवय झाली होती. ते आहिल्याला “करुणा” म्हणून हाक मारत होते. . महिना दीड महिना झाल्यावर एक दिवस ते फिरायला म्हणून बाहेर पडले आणि घरी परत आलेच नाहीत. पोलीस कंप्लेंट झाली, सगळीकडे शोधाशोध झाली पण काही उपयोग झाला नाही. करुणाला परत नशिबाने मोठा दणका दिला. एकावर एक आघात तिच्यावर होतच होते. जरा एका दुःखातून सावरून बाहेर पडावे तोपर्यंत दुसरे त्याला धक्का देत मागोमाग येत असे. नशीब तिची सतत परीक्षा बघत होते.
क्रमशः
©️®️ सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा