घरची सगळी मंडळी आता आराम करायला गेली होती...वसुधा बाई आणि दिलीपराव गोंधळात पडले.सगळं आटोपलं तरी पाहुणे जायचं नाव घेत नाहीत याचं त्यांना आश्चर्य वाटत होतं.पण विचारणार तरी कसं आणि का ? सगळेच आपले...
कीर्तीला विचारायचा प्रयत्न केला तर तिने काहीच न बोलता आई बाबांना जबरदस्ती आराम करायला रूम मध्ये पाठवलं...
आता जरावेळ बहीनिंशी मनमोकळ्या गप्पा माराव्यात म्हणून त्यांनी मीना आणि आशा ताईला बोलावलं पण दोघीही " खूप थकलोय , झोपतो थोडावेळ " म्हणून निघून गेल्या.दिलीप रावांशी बोलायला सुद्धा कोणीच नव्हतं.
आता काही पर्याय नव्हता.दोघेही आराम करायला गेले.तशीही कालपासून दगदग झाली होती त्यामुळे पटकन झोप लागली.
आई बाबा झोपलेत याची खात्री करून आता सगळे पुन्हा अगदी जोशात कामाला लागले...
हॉल नव्याने सजवला गेला...मावशी , काकू सगळ्या मिळून वसुधा बाईना उठवायला गेल्या , तर आत्या , काका वगैरे मंडळी दिलीपरावाजवळ गेली .दोघांना तयार करावं लागणार होतं .हे काय चाललंय दोघानाही कळत नव्हतं...
" अरे काय चालू आहे ? पुन्हा कशाला तयार व्हायचं आता झालं ना सगळं.आणि हे कपडे काय ? मी काय नवरदेव आहे का ? " दिलीपराव गोंधळून म्हणाले.पण त्यांना काहीही बोलू न देता काकांनी जबरदस्ती तयार करायला सुरुवात केली...
वसुधा बाईंची अवस्था काही वेगळी नव्हती.अनुने नेसायला दिलेली जांभळी पैठणी बघून खरतर त्या हरखून गेल्या होत्या...किती दिवसांपासून त्यांची इच्छा होती ह्या रंगाची पैठणी घ्यायची म्हणून पण उगीच कशाला इतकी महाग साडी घ्यायची असं म्हणून त्या गप्प बसल्या होत्या.अगदी त्यांच्या लग्नातल्या शालुसारखा कलर होता , आज अचानक लग्नातल्या गोष्टी का आठवतायत याच त्यांना नवल वाटत होतं...
सगळ्या मिळून त्यांना तयार करायला उत्सुक होत्या पण वसुधा बाई काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हत्या.शेवटी मीना मावशीने शपथ घातली तेव्हा त्यांचा नाईलाज झाला...
सगळ्यांनी मिळून वसुधा बाईना अगदी नव्या नवरीसारख सजवलं.सुंदर जांभळी पैठणी , राणीहार , चिंचपेटी , आंबाड्यात सोन्याचं फुल वर मोगर्याचे गजरे , हातात हिरवा चुडा , पाटल्या , बांगड्या आणि मेहेंदीने रंगलेले हात खूप सुंदर दिसत होते.नाकात मोत्याची पाणीदार नथ आणि कपाळावर चंद्रकोर लावल्यामुळे वसुधाचे रूप अजुनच खुलले होते.
वसुधाने स्वतःला आरशात पाहिले आणि ती स्वतःशीचं हसली...हे आपलं इतकं सुंदर रूप बघून मनोमन हरखली...नकळत तिला लग्नाचा दिवस आठवला आणि लाजेने अजुनच मोहक दिसणारे आपले रूप बघून आपण आज्जी झालोय हेच ती विसरली...
स्वतः मध्ये हरवलेल्या वसुधाला एकटीला सोडून सगळ्या पळाल्या .वसुधा भानावर आली तेव्हा रूम मध्ये कोणीच नव्हतं...पुन्हा एकदा मनात अनेक प्रश्न निर्माण झाले कोणाला विचारावं म्हणून इकडे तिकडे बघतांना सगळ्याजणी मस्त तयार होऊन हसत खिदळत तिथे आल्या.कोणाचंतरी लग्न असल्यासारख्या त्या नटल्या होत्या.आता तरी कोणीतरी काहीतरी सांगेल म्हणून वसुधा आतुर होती पण ती काही बोलायच्या आतच कोणीतरी \" चला चला वरात जवळ येतेय , वरात जवळ येतेय \" असं सांगितल्यामुळे सगळ्याजणी बाहेर पळाल्या...
\" कोणाची वरात आली आता ? \" उत्सुकतेने वसुधा सुद्धा बाहेर जाऊ लागली पण अरे देवा ! दाराची कडी कोणीतरी बाहेरून लावून गेलं होतं...आता गप्प बसण्या व्यतिरिक्त काहीच गत्यंतर नव्हतं...
दिलीपराव चक्क घोड्यावर बसून येत होते... नवरदेवाचा थाट काही औरच होता. बँडवाले सुद्धा अगदी आश्चर्याने ही वरात बघत सांगितलेली गाणी वाजवत होते...आगळी वेगळी वरात रस्त्यावर अगदी प्रेक्षणीय भासत होती... आजोबांच्या लग्नात बेधुंद होऊन नाचणारी नातवंडे , सासऱ्याच्या लग्नात मिरवणारी सून आणि जावई...सोबत बाबांच्या वरातीत नाचणारी मुलं अशी ही अनोखी वरात होती.दिलीपरावांसोबत घोड्यावर चक्क त्यांच्या सगळ्यात मोठ्या बहिणीचा पणतू बसलेला होता...चार पिढ्या एकत्र वरातीचा आनंद अगदी मनसोक्त लुटत होत्या !
आधी या सगळ्याला नाही नाही म्हणणारे दिलीपराव आता मात्र अगदी आनंदात होते.त्यांनाही ही सगळी मज्जा अनुभवायची संधी मिळाली होती.स्वतःच्या लग्नात त्यांना असं काही करायला मिळालं नव्हतं...
सुरेश , विनय आणि मुलांनी आता दिलीपरावांना घोड्यावरून खाली उतरवले आणि नाचायला लावले.आणि काय ते नवल ...कधीही दुसऱ्यांना सुद्धा नाचताना बघून चिडणारे दिलीपराव अगदी तल्लीन होऊन नाचू लागले...इतकचं काय बँडवाल्यांना सुद्धा नवीन गाणी सोडून आपल्या जमान्यातील जुनी गाणी वाजवायला लावयाच फर्मान सुद्धा सोडलं...त्यांचे काही जवळचे मित्र सुद्धा हजर होते... \" आज मेरे यार की शादी हैं \" हे गाणं वाजवायला सांगून ते सुद्धा अगदी मनसोक्त नाचले....
पणजोबा , आजोबा आणि नातवंडं अगदी बेफाम होऊन नाचू लागले...त्यांना बघून सगळ्यांचं डोळ्याचं पारणं अगदी फिटून गेलं...बाकी सगळे नाचायचे थांबले आणि दिलीपरावांचा नाच बघत उभे राहिले...विनय आणि सूरेशने त्यांच्यावरून नोटा ओवाळून टाकल्या ...फोटोग्राफर सुद्धा अगदी तल्लीनतेने हे अनमोल क्षण कॅमेऱ्यात साठवत होता...
थोड्या वेळातच सगळेजण परत दिलीपरावांना सामील झाले.
सगळी जेष्ठ मंडळी सुद्धा अगदी तरुण होऊन वेगळ्याच धुंदीत नाचत होती...
मनाने जरी सगळे तरुण झाले होते तरी शरीराचे काय ? त्याचे तर वय झाले होते ना..दिलीपरावांना थकवा जाणवू लागला.बाकीची ज्येष्ठ मंडळी सुद्धा आता थकली होती.
तरुण मंडळींचा आणि लहान मुलांचा उत्साह अजूनही टिकून होता.पण थकलेली मंडळी आता बसायला जागा शोधू लागली होती.पाणी मागू लागली होती.परिस्थीतीच भान राखून आता सगळ्यांसाठी सरबत मागवण्यात आल... थोडं थांबून नवरदेव पुन्हा घोड्यावर बसले...वरात पुन्हा निघाली...
देवदर्शन घेऊन वरात हॉल जवळ आली...मराठमोळ्या थाटात सुवासणी हातात पंचारती घेऊन स्वागताला हजर होत्या.
नवरदेव अतिशय रुबाबदार दिसत होते.आता सगळी मंडळी आपापल्या पक्षाकडे गेली...
दिलीपरावांच्या बहिणी , भाऊ आणि काही लोक वरपक्षात गेले...वसुधाबाईंच्या बहिणी , भाऊ वगैरे मंडळी वधू पक्षात सामील झाली.अनिता- विनय वरपक्षात होते तर कीर्ती - सुरेश वधू पक्षात... पिहू वसुधाबाईंची करवली म्हणून मिरवत होती तर स्वरा दिलीपरावांची .दोघीही नऊवारी साडी नेसून अगदी गौराई सारख्या सुंदर दिसत होत्या...
हॉलमध्ये अगदी गलका चालू होता.वरात आली होती.अक्षदा वाटल्या जात होत्या.अन्नाची नासाडी नको म्हणून फुलांच्या अक्षदा वाटल्या गेल्या होत्या...
वधू वराचे काही जवळचे मित्र मैत्रिणी आवर्जून हजर होते...वसुधाबाईना चैन पडत नव्हती.बाहेर काय चाललंय काहीच कळत नव्हतं. कोणाचीतरी वरात आलीय हे समजलं होतं पण लग्न कोणाचं हे काही कळत नव्हतं...
तितक्यात दार उघडलं गेलं...वसुधाची अगदी जवळची मैत्रीण गीता तिच्यासमोर हजर होती.तिला बघून वसुधा हरखली दोघी अगदी एकमेकींच्या मिठीत समावल्या...तितक्यात \" आम्हाला नका ग विसरू \" असं म्हणत त्यांच्या अजून दोन जवळच्या मैत्रिणी आशा आणि शांता सुद्धा त्यांना सामील झाल्या...
आपल्या मैत्रिणी इतक्या वर्षांनी अचानक कश्या काय आल्या ? याचं कोडं वसुधा बाईना पडलं होतं.आता त्यांच्या कडून आपल्या प्रश्नाची उत्तरे नक्की मिळतील असं त्यांना वाटलं...
त्या काही विचारणार इतक्यात वरात हॉलवर आल्याचं कळलं आणि त्या सगळ्या पुन्हा एकदा वसुधाबाईना एकटीला सोडून निघून गेल्या...!
दिलीपरावांना खूप थकल्यासारख वाटत होतं.त्यामुळे सगळे थोडे काळजीत पडले...थोडावेळ त्यांना आराम करू देऊया म्हणून त्यांना रूम मध्ये नेऊन थोडं खाऊ घालून झोपवण्यात आलं...बाहेर सगळी मंडळी खोळंबली होती पण पर्याय नव्हता...सुरेशने उगीच रिस्क नको म्हणून फॅमिली डॉक्टरना फोन करून बोलावून घेतलं...

पुढे काय होईल ? कसा होईल सोहळा ? जाणून घेऊया पुढील भागात...!
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा