Login

तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं...!(भाग 20 )

एक सुंदर खुर्ची स्टेज वर ठेवलेली होती.अगदी राजमहालात राणीसाठी असावी तशीच होती ती.समोर एक सजवलेलं टेबल होतं.सगळ्यांनी अगदी मनाचा मुजरा देत वसुधाला खुर्ची वर बसवलं.वसुधाचा सुंदर फोटो असलेला भला मोठा केक आणला गेला...सुवासनिनी पंचारती घेऊन वसुधाच औक्षण केलं ...आता केक कापायची वेळ झाली...वरून चांदण्यांचा वर्षाव झाला मग फुलांचा वर्षाव झाला...तितक्यात अनिता घरी बनवलेला गव्हाच्या पिठाचा केक घेऊन आली...' हे काय आणलय ' असं सगळ्यांच्या मनात आलं..." आई तुम्ही बाहेरचा केक खात नाही मला माहितीये...म्हणून मी मुद्दाम तुम्हाला आवडतो तसा केक बनवून आणलाय.आधी हा केक कापा आणि खा आणि नंतर सगळ्यांसाठी तो मोठा केक कापा " अनिता म्हणाली...सगळ्यांनाच तिचं खूप कौतुक वाटलं.वसुधाने आधी अनिताने बनवलेला केक कापला...सगळ्यांनी तो वसुधाला भरवला.मग मोठा केक कापला...अनिता आणि कीर्ती ने सगळ्यांना केक दिला...कीर्ती आणि अनिताने त्यांच्यासाठी खास ऑर्डर देऊन त्यांना आवडेल असा सुंदर नेकलेस आणला होता तो आईंच्या गळ्यात घातला...सगळी मंडळी स्टेज समोरच्या खुर्च्यांवर स्थानापन्न झाली...अनिता , कीर्ती , विनय , सुरेश आणि मुलं गायब झाली ...वसुधाबाई त्यांना शोधत होत्या तितक्यात काही माणसे भलामोठा तराजू स्टेज वर घेऊन आले..मागे काही माणसे अनेक वस्तू घेऊन येत होती...मोठ्या मोठ्या बॉक्सेस मध्ये पॅक केलेल्या अनेक गोष्टी स्टेज जवळ ठेवल्या गेल्या...विनय आणि कीर्तीने आई बाबांना स्टेज वर आणलं आणि बाबांना तराजूत बसवलं.आई बाबांची तुला होणार होती.
सगळी मंडळी पुढच्या कार्यक्रमासाठी उत्सुक होती.आता अजून काय सरप्राइज असेल यासाठी सगळे वाट बघत होते.
वसुधाला हॉलच्या दारापाशी नेण्यात आले . सगळ्या मावश्या , मामा , मामी , वसुधाच्या मैत्रिणी सगळ्या नटून थटून स्वागताला हजर होत्या.सगळ्या अगदी ठरवून एकत्र सारख्या साड्या नेसून फारच सुंदर दिसत होत्या...वसुधाबाईंचा वाढदिवस अगदी खास अश्या अनोख्या थाटात साजरा होणार होता...
एक सुंदर सजवलेला मेणा तयार होता...त्यात बसून वसुधाला वेलकम करणार होते.अगदी एखाद्या राणीच्या थाटात बर्थडे गर्ल च स्वागत होणार होतं.हॉल पुन्हा एकदा नव्याने सजला होता...वसुधा बाईंची आवड लक्षात घेऊन खास निशिगंध , मोगरा आणि गुलाबांच्या फुलांची सजावट केलेली होती...पालखी सुध्दा खास फुलांनी सजवली होती...
वसुधा हॉलच्या दारात आली आणि हे सगळं बघून अगदी हरखून गेली...आनंदाने तिचं मन भरून आलं...विनय आणि कीर्तीने आईला पालखीत बसवल...मुलंही सोबत होतीच...
राणीसाहेब पालखीत ऐटीत बसल्या...पालखी धरायला सगळे आतुर होते...विनय , सुरेश , वसुधाचे दोन्ही भाऊ , इतकचं नाही तर कीर्ती आणि अनिता सुद्धा हट्टाने पालखी सोहळ्यात सहभागी झाल्या...समोर सगळ्याजणी फुलं उधळत उत्सव असल्यासारख्या तल्लीन होऊन नाचत होत्या ..थाटात पालखी स्टेज जवळ आली.दिलीपरावांनी पुढे होऊन बायकोला हात देऊन खाली उतरवल.वसुधा बाईंच्या गालावरची लाली बघून दिलीपराव घायाळ झाले.
एक सुंदर खुर्ची स्टेज वर ठेवलेली होती.अगदी राजमहालात राणीसाठी असावी तशीच होती ती.समोर एक सजवलेलं टेबल होतं.सगळ्यांनी अगदी मनाचा मुजरा देत वसुधाला खुर्ची वर बसवलं.वसुधाचा सुंदर फोटो असलेला भला मोठा केक आणला गेला...सुवासनिनी पंचारती घेऊन वसुधाच औक्षण केलं ...आता केक कापायची वेळ झाली...वरून चांदण्यांचा वर्षाव झाला मग फुलांचा वर्षाव झाला...
तितक्यात अनिता घरी बनवलेला गव्हाच्या पिठाचा केक घेऊन आली...\" हे काय आणलय \" असं सगळ्यांच्या मनात आलं...
" आई तुम्ही बाहेरचा केक खात नाही मला माहितीये...म्हणून मी मुद्दाम तुम्हाला आवडतो तसा केक बनवून आणलाय.आधी हा केक कापा आणि खा आणि नंतर सगळ्यांसाठी तो मोठा केक कापा " अनिता म्हणाली...सगळ्यांनाच तिचं खूप कौतुक वाटलं.
वसुधाने आधी अनिताने बनवलेला केक कापला...सगळ्यांनी तो वसुधाला भरवला.मग मोठा केक कापला...अनिता आणि कीर्ती ने सगळ्यांना केक दिला...
कीर्ती आणि अनिताने त्यांच्यासाठी खास ऑर्डर देऊन त्यांना आवडेल असा सुंदर नेकलेस आणला होता तो आईंच्या गळ्यात घातला...
सगळी मंडळी स्टेज समोरच्या खुर्च्यांवर स्थानापन्न झाली...अनिता , कीर्ती , विनय , सुरेश आणि मुलं गायब झाली ...वसुधाबाई त्यांना शोधत होत्या तितक्यात काही माणसे भलामोठा तराजू स्टेज वर घेऊन आले..मागे काही माणसे अनेक वस्तू घेऊन येत होती...मोठ्या मोठ्या बॉक्सेस मध्ये पॅक केलेल्या अनेक गोष्टी स्टेज जवळ ठेवल्या गेल्या...
विनय आणि कीर्तीने आई बाबांना स्टेज वर आणलं आणि बाबांना तराजूत बसवलं.आई बाबांची तुला होणार होती.
भल्यामोठ्या सजवलेल्या तराजूत एकीकडे दिलीपराव बसले होते आणि दुसरीकडे गहू आणि तांदूळ ठेवून त्यांची तुला केली गेली.. नंतर वह्या , पुस्तकं , पेन , पेन्सिल अश्या वस्तूंनी त्यांची तुला केली गेली ह्या सगळ्या वस्तू अनाथ आश्रम आणि वृध्दाश्रम यासारख्या गरजू विद्यार्थ्यांना आणि वृद्धाना दान करण्यात येणार होत्या.सगळेजण एक एक वस्तू तराजूत टाकत होते.
मुलांना तर खूप मज्जा वाटत होती...
दिलीप रावांनंतर वसुधाबाईना तराजूत बसवलं.दुसऱ्या बाजूला पुन्हा धान्य ठेवून त्यांची तुला केली.मग कपडे , सौभाग्याच्या वस्तू ठेवून तुला केली .जमलेल्या सगळ्या स्त्रियांनी तराजूत वस्तू ठेवल्या...या सगळ्या वस्तू सुद्धा गरजूंना दान करण्यात येणार होत्या...
तुलाभार नंतर पुन्हा सगळे स्थानापन्न झाले...आता पुढे काय याची उत्सुकता आई बाबांबरोबर बाकी सगळ्यांनाच होती ...
लाईट अगदी डिम झाले आणि काही वेळात स्टेज वर अगदी झगमगाट झाला.
पिहू , स्वरा आणि साहिल मस्त पोझ घेऊन उभे होते...त्यांच्या मागे मस्त शरारा घालून नटून थटून कीर्ती आणि अनिता होत्या...आणि सोबत विनय आणि सुरेश मस्त सिल्कचा शेरवानी घालून रुबाबदार पणे उभे होते...गाणं सुरू झालं...
" ये तो सच है के भगवान है..." सगळ्यांचा मस्त परफॉर्मन्स सुरू झाला ...आई बाबा बघतच राहिले ...आणि तितक्यात
" धरती पे रूप मा बाप का... इस विधाता की पेहेचान है..."
या ओळींना सगळ्यांनी आई बाबांना स्टेज वर हात धरून आणलं...वरून फुलांचा वर्षाव झाला...एक अप्रतिम परफॉर्मन्स झाला.
आई बाबा अगदी भावनाविवश झाले .सगळ्या मुलांना त्यांनी मिठीत घेतलं ! ते दृश्य बघून सगळ्यांचेच डोळे पाणावले.आणि मग सगळ्यांनी " हम साथ साथ है..." यावर ताल धरला...काका , काकू , मावशी , मामा , आत्या वगैरे मंडळी पण सामील झाली...सगळ्यांनी मिळून स्टेज वर धमाल केली !
मग " वाह वाह रामजी , जोडी क्या बनाई..." यावर प्रत्येकाने आपले आपले नाते जपत ठेका धरला... सगळ्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता...
पुन्हा म्युझिक वाजू लागल सगळी बच्चे कंपनी स्टेज वर धावत आली आणि " बंम बंम बोले...मस्ती मे डोले..." वर अगदी भारी डान्स करू लागली...मुलांच्या उत्साहाला तर तोडच नव्हती...एका पाठोपाठ एक डान्स सुरू होते...वसुधाच्या सगळ्या बहिणींनी मिळून मस्तपैकी " फुलो का तरोंका सबका केहेना है , एक हजारों मे मेरी बहेना है..." या गाण्यावर सुर धरले...वसुधा भोवती फेर धरून नाचत गाताना सगळ्यांना आपल्या वयाचा अगदी विसर पडला होता...
दिलीपराव सुद्धा मागे नव्हते...अगदी मस्तीत येऊन \" ए मेरी जोहरा जबिन , तुजपे कुर्बान मेरी जान मेरी जान \" असं म्हणत आपलं प्रेम व्यक्त केलं...वसुधा बाईंनी " बडे अच्छे लगते है...ये धरती ये नादिया , ऑर तुम ..." म्हणत गोड लाजून प्रेमाची पावती दिली...
शेवटी साहिल कृष्ण बनून आला आणि स्वरा , पिहू राधा बनून. " मैय्या यशोदा ..." म्हणत तिघांनी सुंदर डान्स केला आणि सगळ्यांचे परफॉर्मन्स संपले...
टाळ्यांचा कडकडाट झाला आणि सोबत आई बाबांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावल्या...
0

🎭 Series Post

View all