आणि नाटूकले सुरू झाले..." अनिता काय हे आज पुन्हा पीहू च्या डब्ब्यात ब्रेड ? कितीदा सांगितलं तुला जरा चागलं काहीतरी बनव म्हणून...विनू बेटा काय करू तुझ्यासाठी..." कीर्ती अगदी वसुधा बाईंच्या स्टाईलने म्हणाली आणि एकच हशा पिकला...पुढे पुढे तर खूपच धमाल आली आणि शेवटी विनय अनिताच्याच्या लंडनला जाण्याच्या भावूक प्रसंगावर नाटक थांबलं !
सगळ्यांच्या नात्यावर अगदी प्रेमळ प्रकाश टाकणारं हे नाटक बघून आई बाबांचे डोळे पाणावले...अनिता तर अश्रू अनावर होऊन कीर्तीच्या गळ्यातच पडली.विनयची अवस्था सुद्धा काही वेगळी नव्हती...भावनेचा वेग आवरला आणि कीर्तीने अनिताच्या हातात एक सुंदर ब्रासलेट घातले आणि विनयच्या गळ्यात एक गणपतीची रेखीव मूर्ती असलेले लॉकेट ...
दोघेही अगदी भारावून गेले ...आईसाठी खरेदी करताना या ब्रासलेटवर आणि लॉकेटवर अनिताची खिळलेली नजर किर्तीने अचूक टिपलेली होती ...नणंद भावजया अगदी एकमेकींना पक्क ओळखत होत्या आणि एकमेकांवर तितकच प्रेम करत होत्या...कीर्ती विनय तर सख्खे बहीण भाऊ , त्यांचं नातं अगदी असावं तसं घट्ट आणि निर्मळ होतं...सुरेशसुद्धा सगळ्यांमध्ये अगदी सामावून गेलेला होता... पीहू , स्वरा आणि सहील सुद्धा एकमेकांवर अगदी जीव टाकत होते...
मामा , मामी आणि पीहू आता दूर जाणार म्हणून मुलं अगदी भावूक झाली होती...त्यांचे केविलवाणे चेहरे बघून सगळ्यांनी आपल्या भावना आवरल्या आणि सगळ्यांनी पीहूला गिफ्ट दिले...आत्या , मामा कडून पीहूने अगदी हक्काने हव्या त्या वस्तू उजळल्या होत्या...
कार्यक्रम आता खऱ्या अर्थाने संपला होता ...अनिता विनयला खूप काही बोलायचं होतं , ताई भावजीचे आभार मानायचे होते पण आज शब्द साथ देत नव्हते...मनातल्या भावना अनावर होऊन शब्द थोपवून धरत होत्या... सुरेशने आणि कीर्तीने हे ओळखून त्या दोघांना प्रेमळ मिठी मारली...त्या मिठीत प्रेम , आभार , होणाऱ्या दुरव्या बद्दल दुःख , विनयच्या प्रगती बद्दल अभिमान असं सगळं काही सामावल होतं !
आई बाबा सुद्धा स्टेज वर आले आणि मुलांना आपल्या प्रेमाच्या छत्राखाली घेतलं...अनिताचे आई बाबा , भाऊ वहिनी सुद्धा आपल्या भावनांना आवर घालू शकले नाहीत ... एकमेकांच्या प्रेमामध्ये पूर्ण परिवार अगदी बुडून गेला होता !
सगळेच पाहुणे हा सोहळा बघून हवालदिल झाले होते... शुभाशीर्वाद आणि शुभेच्छा देऊन आता पाहुणे जाण्याच्या तयारीला लागले...!
काही वेळातच सगळे पाहुणे निरोप घेऊन निघून गेले . आता अनिताचे माहेरचे लोकही निघणार होते... किर्तिने रहा म्हणून खुप आग्रह केला पण इथे राहणं योग्य नाही म्हणून जड अंत: करणाने अनिताने सगळ्यांना निरोप दिला...जाताना अनिताने ते लंडनला जाण्यापूर्वी काही दिवस राहायला येण्याचे वचन मात्र त्यांच्याकडून घेतले...त्यावेळी वसुधाबाईंच्या चेहेर्यावर दिसलेल्या अढीकडे तिने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले...
सगळं आवरून निघायला वेळ लागणार होता म्हणून आई बाबा आणि मुलं घरी गेली .कीर्ती , विनय , अनिता , सुरेश भावना आवरून कामाला लागले ...सगळेजण खूप थकले होते...घरी पोचताच सगळ्यांनाच आरामाची गरज होती...मुलं आणि आई बाबा कधीच झोपले होते...
सगळं सामान सध्या स्टोर रूम मध्ये ठेवून चौघही हॉल मध्ये येऊन बसले...परवा अनिता आणि विनयला निघायचं होतं ...खूप काही बोलायचं होतं एकमेकांशी पण आज सगळेच गहिवरून गेले होते...शब्द साथ देत नव्हते...अनिताने सगळ्यांसाठी छानशी कॉफी करुन आणली...थोड्या वेळाने सगळेच मनमुराद गप्पा मारून शेवटी झोपी गेले...
कीर्तीने अनिता , विनय आणि पिहूला आवडणारे अनेक पदार्थ बनवले . त्या सगळ्यांसाठी काय करू आणि किती करू असे किर्तीला झाले होते...मुलांचीही आवस्था काही वेगळी नव्हती...लहानग्या सहील आणि स्वराने सुद्धा मामा मामी आणि भवडांसाठी अनेक वस्तू मोठ्या प्रेमाने दिल्या होत्या...
जाण्याची वेळ झाली...साश्रू नयनांनी कीर्ती आणि सुरेशने सगळ्यांना निरोप दिला...! जाण्यापूर्वी भेटायला येण्याचे वचन घेऊन मंडळी निघाली...
घरी पोचताच सगळ्यांची तयारी सुरू झाली .पंधरा दिवसांनी निघायचं असल्यामुळे खूपच गडबड सुरू होती...सुदैवाने विनयचा एक मित्र तिथे ट्रान्स्फर होऊन येणार होता आणि विनयच्या घरी भाड्याने राहायला तो आनंदाने तयार होता त्यामुळे घराची चिंता मिटली होती...समान आई बाबांच्या नवीन घरात शिफ्ट करायचे ठरले होते त्यामुळे काही प्रोब्लेम नव्हता...अनिता आणि विनय कामात अगदी व्यस्त होते...
" माई अग कधी निघताय तुम्ही ? या ना लवकर मग जाण्याच्या वेळी खूपच गडबड होईल , स्वस्थपणें बोलायला सुद्धा जमणार नाही...ते काही नाही तुम्ही सगळे येणार असं कबूल केलंय ना तुम्ही...मग याच...मला आता नाही ग शक्य...खूप सारे डॉक्युमेंट् लागतात ना त्यामुळे सारखं मला इथे राहणं गरजेचं आहे ...या बरं सगळे लवकर..." अनिता आपल्या आईशी फोनवर बोलत तिला येण्याविषयी विनवत होती हे वसुधा बाईंनी नेहेमी सारखं चोरून ऐकलं होतं ...आता अनिताच्या माहेरचे येणार म्हणून त्यांच्या मनात द्वेष उत्पन्न झालाच ....
" अहो ऐकलत का ? अनिताच्या माहेरचे येणार आहेत म्हणे..." वसुधा बाई त्रासिक स्वरात म्हणल्या
" हो का ? वा वा बरं होईल ना , अप्पा म्हणजे राजा माणूस...सगळेच फार चांगले लोक आहेत ते .कधी येणार आहेत ? मला तर वाटतयं त्यांना थोडे दिवस आपल्या नवीन घरी घेऊन जाऊया मस्त मज्जा करू ? काय म्हणतेस ? " दिलीपराव म्हणाले तशी वसुधा बाईंचा पारा चढला आणि त्या तणफणत तिथून निघून गेल्या ...दिलीपरावांना त्यांच्या या तुसाड्या स्वभावाची कल्पना होती त्यामुळे त्यांनी वसुधाबाईंकडे आजिबात लक्ष न देता स्वतःला पुस्तकात झोकून दिले.पण त्या काही गप्प बसणार नाहीत तर काहीतरी कुरापती नक्कीच करतील याची त्यांना खात्री होती...
घरी परतल्या पासून वसुधाबाईंची चाललेली घुसफुस अनिताला जाणवली होती पण तिला आता त्याकडे लक्ष द्यायची आजिबात इच्छा आणि वेळही नव्हता...
" अनु अग उद्या आपल्याला व्हिसा ऑफिस मध्ये जावं लागेल ... पिहुला पण सोबत न्यावं लागेल , तिला उद्या आपण शाळेतून पीक अप करू ...नाहीतर सुट्टी घेऊ दे तिला शाळेला...तसही आता एखादा आठवडा तिला जाता येइल शाळेत...आणि माई अप्पाशी बोललीस का तू ? कधी येतायेत ते...आज मी फोन करतो अमोलला .ताईला सुद्धा फोन करतो म्हणजे सगळ्यांसोबत निवांत राहता येईल .नंतर खूप घाई होईल आपली...आणि मी काय म्हणतो ताई भाऊजी आले की आई बाबांना सुद्धा त्यांच्या सोबत पाठवून देऊ म्हणजे आपल्याला आवरता येईल इथलं.तसही तिथल्या फर्निचसाठी त्यांनी तिथं थांबणं जरुरी आहे म्हणजे त्यांना हवं तसं काम करून घेता येईल." विनय म्हणाला
" हो चालेल , मी बोलले माईशी पण तिची काही इच्छा नाहीये.जुन्या घडलेल्या गोष्टी अजून मन पोखरतात त्यांचं.आई कश्या वागतात माहीत आहे ना म्हणून ती आपल्यालाच या म्हणते आहे.मी सांगितलं की या नक्की बघू काय करतात ते.तू बोल अमोलशी यावेळी असं नाही होणार असं वाटतं..." जुन्या गोष्टी आठवून अनिताचे डोळे पाणावले ... विनयने ते समजून तिला जवळ घेतलं.आपल्या आईचा स्वभाव , टोचून बोलणं त्यालाही आवडत नव्हतं पण काही इलाज नव्हता.
अनिता समजूतदार होती पण तिचाही बांध कधीकधी फुटायचा...
\" आता लंडनला गेल्यावर फक्त अनु आणि पीहू बास्स आता दोघिंवर प्रेमाचा वर्षाव करत राहायचं त्यांना कधीही दुःख द्यायचं नाही \" असं विनयने मनोमन ठरवलं होतं.
विनय ठरल्या प्रमाणे कीर्तीताईशी बोलला .ते सगळे दोन दिवसांनी येणार होते...चार पाच दिवस राहून मग आई बाबांना सोबत घेऊन जाणार असं ठरलं...आई बाबांची गैरसोय होऊ नये हाच सगळ्यांचा उद्देश होता...
" आई बाबा , ताई आणि मंडळी परवा येणार आहेत.चार पाच दिवस राहू म्हणाले इकडे. बरं होईल सध्या त्यांच्यासोबत आनंदाने वेळ घालवता येईल.नंतर मात्र खूपच धावपळ होईल.तुम्हा दोघांना काय काय सामान न्यायचं ते बघून घ्या म्हणजे बाकीचं समान मी पॅक करून ठेवतो किंवा विकून टाकतो.एक दोन दिवसात फायनल करा म्हणजे व्यवस्था करता येईल.शेवटचे तीन चार दिवस हॉटेल मध्ये राहावं लागेल कारण सगळं सामान पॅक करून ठेवण्यात वेळ जाईल , आमचीही तयारी आहेच आणि तुमची गैरसोय होईल म्हणून आम्ही म्हणत होतो की तुम्ही ताई बरोबर जा .उगीच तुम्हाला त्रास नको..." विनय आई बाबांना म्हणाला
" हो बेटा ...आम्ही आज उद्यात सगळं ठरवतो...किती रे काळजी करता आमची ? तुमच्यासारखी मुलं म्हणजे भाग्यच...आता आजिबात आमची काळजी करायची नाही .अगदी ठणठणीत आहोत आम्ही तुम्ही तुमच्या काळजी घ्या .इकडे आमच्यासाठी सगळी माणसं आहेत तुम्ही मात्र एकटेच परक्या देशात..." बाबा अगदी भावना विवश होऊन बोलत होते.वसुधा बाईंच्या मनात मात्र वेगळंच काहीतरी शिजत होतं...
" अनिताच्या माहेरचे येणार आहेत ना म्हणून आमची रवानगी होतेय हे न कळण्याईतके अडाणी नाही आम्ही . सरळ सांगा ना आमची अडचण होते ते . उगीच घुमवून फिरून कशाला बोलताय ? थोडेच दिवस आता आमची कटकट . मग तुमचा राजा राणीचा संसार सुरू होणार ना...मग आमची अडचण होणारच ..."
आईचा हा स्वर अनिताच्या काळजाला अगदी घरे पडून गेला...अश्रू अनावर होऊन ती रडतच आत निघून गेली...बाबा आणि विनयचा संताप संताप झाला...आता मोठे रामायण होणार याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली होती....
पुढे काय होईल ? कुठलं रामायण घडेल ? जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा...
कथा आवडल्यास लाईक जरूर करा . तुमच्या अमूल्य प्रतिक्रिया नक्की द्या.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा