दुसऱ्या दिवशी सगळी मंडळी जवळच्या एका सुंदर निसर्गरम्य रिसॉर्टमध्ये पोहोचली . तिथला परिसर खरोखर खूप सुंदर होता . प्रसन्न वातावणात सगळेच फ्रेश झाले . रिसॉर्टमध्ये अनेक प्रकारचे इंडोर गेम्स होते . लहान मोठे सगळेच एन्जॉय करत होते . एक छोटीशी टेकडी ट्रेकिंग साठी होती. सकाळी सकाळी सगळेजण तिकडे निघाले .
फारसा अवघड चढ नसल्यामुळे मज्जा येत होती . माई, अप्पा आणि बाबा रिसॉर्टवर खास ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या योगा आणि हास्यक्लब मध्ये रमले होते . मुलं तर एकदम खुश होती . टेकडी चढून वर तर अगदी सुंदर असं तळ होतं. गार वारा आणि इतकं छान निसर्ग सौंदर्य सगळ्यांचं मन अगदी प्रफुल्लित करून गेलं . थोडावेळ तिकडे फिरून मंडळी परत आली .
ब्रेकफास्टला विविध प्रकारची रेलचेल होती . सगळेच अगदी मनसोक्त खाऊ लागले . खाऊन झाल्यावर थोडा आराम करेपर्यंत कीर्ती , सुरेश आणि मुलं आलीच .
सगळ्यांना एकमेकांना भेटून खूपच आनंद झाला . मुलं लगेच खेळायला पळाली. कीर्तीची नजर आईला शोधत होती.
" तुम्ही सगळे फ्रेश व्हा.मग मस्तपैकी जेवण करूया . गप्पा होतीलच निवांत . आटपा लवकर आम्ही सगळे थांबलोय जेवायचे. भूक लागलीय जोरदार . मी मुलांना घेऊन येतो . " वीनयने कीर्तीला काहीच बोलू न देता फ्रेश व्हायला पाठवलं.
जेवण अगदी छान होतं. सगळे अगदी मनसोक्त जेवले .
आता मात्र कीर्तीला राहवत नव्हतं . तिची मनस्थिती समजून कीर्ती आणि विनय तिला रूम मध्ये घेऊन गेले . माई अप्पा मुलांना घेऊन गेम खेळायला गेले .
सुरेश, कीर्ती , दिलीपराव , अनिता , विनय सगळेच रूम मध्ये होते . विनयने माई अप्पा, अमोल आणि सुधालाही बोलावलं .
सुधा मुलांजवळ थांबली आणि बाकी सगळे रूम मध्ये जावून बसले .
विनयने घडलेलं सगळं अगदी सविस्तरपणे सांगितलं . दिलीपराव सुद्धा लेकीला आपला निर्णय सांगायला आजिबात संकोचले नाहीत . हे सगळं काय होऊन बसलं ? कीर्ती तर रडायलाच लागली . सूरेशने मात्र घडलेली हकीगत शांतपणे ऐकून घेतली . धक्का तर दोघांनाही बसला होता पण आता यातून काहीतरी मार्ग काढणे जरुरी होते .
आईचं चुकलं हे जरी कीर्तीला पटत असलं तरीही आपले आई वडील या वयात वेगळे होणार ही कल्पनाच तिला सहन होणारी नव्हती .
बाबांचं म्हणणं जरी बरोबर असलं तरी या वयात त्यांनी असं वागणं योग्य नाही असंच कीर्तीला वाटत होतं. बाबांवर रागावून कीर्ती निघून गेली . तिच्या पाठोपाठ अनिता आणि सुरेश तिला समजावण्यासाठी गेले . कीर्ती खूप रागावली होती , दुखावली होती .
" ताई शांत व्हा बघू आधी . पाणी घ्या आणि स्वस्थ बसा . आम्हालाही ही गोष्ट पटत नाहीये . पण त्या दिवशी हे सगळं घडलं आणि बाबांची तब्येत बिघडली . बीपी खूप हाय झालं . ताबडतोब डॉक्टरांकडे घेऊन गेलो म्हणून धोका टळला . डॉक्टरांनी बाबांना आजिबात त्रास होऊ देऊ नका म्हणून निक्षून सांगितले आहे . त्यामुळे आम्हाला इकडे यावं लागलं . तुम्हाला ऐकून वाईट वाटेल पण इतकं सगळं होऊनही आईंवर त्याचा काहीच परिणाम झाला नाहीये . आताही त्या घरी अगदी मजेत आहेत . रोज वेगळे वेगळे पदार्थ बनवायला सांगतात मावशींना आणि काल तर घरी पार्टी सुद्धा झाली . आमचाही जीव तुटतो त्यांच्यासाठी पण आता सध्या बाबांची तब्येत सगळ्यात महत्त्वाची आहे . आईंचा विषय जरी काढला तरी त्यांची चीड चीड होते . काय करायचं काहीच कळत नाहीये . आम्ही तूर्तास लंडनला जाण्याचं कॅन्सल करायचं ठरवलं होतं पण आता सगळी प्रोसेस झालिये त्यामुळे ते सुद्धा शक्य नाही . विनय एकटाच जाईल सध्या मी थांबते इकडेच . पण खूप काळजी वाटतेय मला ." अनिता म्हणाली . तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते .
अनिताचं बोलणं ऐकून कीर्तीला खूप वाईट वाटलं. लग्न झाल्यापासून आई नेहेमीच अनिताला घालून पाडून बोलत असायची .पण अनिता नेहेमीच संयमाने वागली होती . आता खरंच काय करावे ते कळत नव्हते .
" अनु खरंच आईच्या वतीने मी माफी मागते तुझी . मला कळतंय तू खूप सहन केलंस पण कधीही कोणाला दुखावलं नाहीस . पण आपण काहीतरी विचार करूया . बाबांची तब्येत महत्त्वाची आहेच पण आईचं वागणं योग्य नाही. इतकं होऊनही आई अशी कशी वागू शकते हेच मला कळत नाही . बाबांचं म्हणणं खरं आहे . आता या वयात तरी निदान त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्यावं हे खरं आहे . पण आईला एकटं कसं ठेवणार ? नाहीतर माझ्याकडे घेऊन जाते आईला आणि बाबांना अमोलकडे राहू देऊया काही दिवस . मग बघू काय करायचं ते . पण तुम्ही दोघं लंडनला जाताय हे नक्की . बाबांनी तसं वचन घेतलय ना तुमच्याकडून . मी आहे ना काहीच काळजी करू नका तुम्ही . तुला काय वाटतं सुरेश ? " कीर्ती म्हणाली .
" हे बघा परिस्थीती खूप नाजूक आहे . तुम्ही दोघीही आततायी पणा करू नका . बाबा खूपच दुखावले गेले आहेत. सध्यातरी थोडा संयम ठेवा . आईंचं वागणं चुकीचं आहे हे त्यांना पटवून देणं महत्त्वाचं आहे असं नाही का वाटत तुम्हाला ? आपण सांभाळू दोघांना , माई, अप्पा अमोलही आहेच पण हे असं किती दिवस चालणार ? दोघांचीही अवस्था नाजूक आहे , वय झालंय आता त्यांचं . आपण काहीतरी सुवर्णमध्य काढुया . कीर्ती , अनिता रडणं थांबवा बघू तुम्ही आधी . आपण शांतपणे विचार करूया . कीर्ती तू आईंना फोन कर आणि त्यांच्या मनात काय आहे ते जाणून घे . आपण इकडे आलोय आणि आपल्याला सगळं माहिती आहे हे त्यांना आजिबात सांगू नकोस . गरज पडल्यास आपण मावशी , मामा यांच्याशीही बोलूया . होईल काहीतरी . चला थोडं फिरून येऊया म्हणजे फ्रेश वाटेल ." सुरेशच्या बोलण्याने सगळ्यांना थोडा धीर आला होता .
ठरल्याप्रमाणे किर्तीने आईला फोन केला . आईने नेहेमीप्रमाणे कांगावा करत आपलंच कसं बरोबर आहे आणि बाकी सगळे आपल्याला कसा त्रास देतात हे कीर्तीला ऐकवलं. यावेळी अनिताने बाबांना आणि विनयला आपल्याविरुद्ध भडकवल आणि सगळे आपल्याला एकटं टाकून कसे निघून गेले हे अगदी रडून पडुन सांगितलं. आपण एकटे कसे राहतोय ह्याचा कोणीच विचार करत नाहीये असही सांगितलं . तब्येत सुद्धा खराब झालीय त्यामुळे किर्तींने ताबडतोब निघून यावं अशी गळ वसुधाबाईंनी कीर्तीला घातली .
कीर्ती आली की सगळं ठीक होईल याची वासुधाबाईंना खात्री होतीच .
कीर्तीने सगळ्यांना आईशी झालेलं संभाषण सांगितलं . ती खूप व्यथित झाली होती . आईला चांगली समज द्यावी असं तिला खूप वाटत होतं . पण तूर्तास ती संयम ठेवून होती . आईला कसं समजावयाचे हा खूप मोठा प्रश्न तिच्यापुढे होता. सगळेच विचार करत होते .
काही वेळाने अमोलच्या डोक्यात एक भारी कल्पना आली . त्याने ती सांगताच सगळ्यांना एक आशेचा किरण दिसू लागला . सविस्तर बोलून , सगळ्यांच्या संमतीने एक प्लॅन आखला गेला . प्लॅन सक्सेस झाला तर खरंच प्रोब्लेम नेहमीसाठी सुटणार होता.
काय असेल तो प्लॅन ? खरंच तो सक्सेस होईल का ? जाणून घेऊया पुढील भागात .

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा