Login

तुझ्या सोबतीची गोडवा

कविता
लेक तिचा गोडवा हा घर भर फसरवते, ती तिच्या गोड गोड बोलण्याने सगळं घर जिवंत ठेवते.
बाप लेकीचे हे सुंदर गोड नाते...
त्यांचे प्रेम बघून मी रोजच सुखावते..
मुलगी ही कायम घर आनंदी ठेवते
म्हणूनच सासरी जाताना मन भरून येते..
एकदा का सासरी गेली की तिच्या सोबतचा गोडवा आठवत राहतो पण ती संसारात रमली हे बघून आपण समाधानी पावतो...
कश्या असतात ना ह्या मुली दोन्ही घरांना जोडतात आणि दोघी घरात सतत सुख,आनंद ठेवतात.
तुझा सोबतचा गोडवा हा कायम सोबत राहतो,
तू सासरी सुखी आहेस ह्यातच आम्ही सुख मानतो