तुझ्या विना मरजावा भाग १

त्याग आणि आठवणीत देखील प्रेमाचा अंश पाहायला मिळतो नाही का?
काॅलेजचा निरोप समारंभ सुरु झाला होता. सगळेजण आपल्या मित्र-मैत्रिणींना कडकडून भेटण्यात मग्न होते. सुहानी आणि सुजय मात्र एकमेकांकडे टक लावून पाहत बसले होते. इतक्यात मनोजची हाक सुजयला ऐकू येत होती.

" कुठे हरवलास मित्रा, आम्ही पण आहोत म्हटलं. आम्ही पण तुला आजच दिसणार आहोत. जरा आम्हांला पण वेळ देशील की नाही तू."

" आपण काय रे, मनात आणले तर कुठेही भेटू शकतो. पण मुलींच्या बाबतीत थोडं वेगळे असते ना."

" बरोबर आहे तुझे. चल मग आम्ही आता येतो. भेटूया नंतर."

" पंधरा मिनिटे तरी थांबा, आलोच मी."

" तुझी पंधरा मिनिटे म्हणजे एक तास. आम्हांला परत लांबचा प्रवास आहे. आमची ट्रेन सुटली तर.. रिझरव्हेशन केले आहे."

" कधी येशील पुन्हा?"

" पुढच्या महिन्यात होईल चक्कर माझी. तेव्हा भेटूया नक्की आपण. "

" मी देखील माझ्या बहिणी बरोबर मैत्रिणीच्या गावाला जाणार आहोत काही दिवसांकरता."

" काय? हे तू मला आज सांगते. परत कधी येशील."

" आठ दिवसांचा प्रश्न आहे. इतकं काय त्यात, अशी गेले आणि अशी आले मी."

सुहानी निघून गेल्यावर सुजय मात्र तिच्या आठवणीत नदिच्या काठी जावून खळखळत्या पाण्याच्या प्रवाहाकडे एकटक पाहत बसलेला होता.


सुहानी तिच्या बहिणीच्या मैत्रिणीं बरोबर तिचे घर, आजूबाजूचा परीसर पाहण्यात दंग झाली होती. सुहानीला फोटोग्राफीची आवड असल्याने नैसर्गिक वातावरण बरोबर स्वत:चे देखील फोटो काढून घेत होती.

सुहानी च्या बहिणी चे नाव स्वरदा आणि मैत्रिणीचे नाव काव्या होते.

" हे आज त्या ठिकाणी सर्कस आली आहे. आपण जावूया पाहायला. मजा येईल खूप." काव्या बोलत होती.

" ताई मी आज नाही येत तिकडे. तुम्ही जावून या. माझ थोडं डोक दुखत आहे. मी घरीच आराम करते."

" काव्या चल आपण जावू. मला सर्कस पाहायला खूप आवडते. लहानपणी बाबा आम्हांला घेवून यायचे सर्कस पाहायला. पण हि सुहानी असेच कारण काढून घरी बसून राहायची. तिच्या सोबत आईला देखील शिक्षा असायची."

" बरं, चल नाहीतर सर्कस तिकडे सुरु व्हायची नाहीतर."

सर्कस बघायला काव्याचे काही मित्र-मैत्रिणी देखील आल्या होत्या. त्यापैकी विहान ला स्वरदा पाहताच क्षणी आवडायला लागली होती. काव्याने सर्वांशी ओळख करुन दिली होती. विहानची ओळख करुन देताना विहानने हात पुढे करत काव्याला गप्प करुन स्वत:विषयी माहिती सांगत होता. स्वरदाने देखील मैत्रीच्या नात्याने
हात पुढे करत विहान काय बोलतोय ते ऐकत होती. आता मात्र स्वरदा थोडी घाबरली होती. विहानने तिचा हात सोडलाच नव्हता.

" पुरे झाली तुझी ओळख. सर्कस पाहायला आलोय आपण तुझी ओळख ऐकायला नाही. तिचा हात सोड आधी." जोरात खेकसून विहानच्या तावडीतून स्वरदाचा हात तिने हुशारीने सोडवला.

सर्कस पाहायची सोडून विहान स्वरदालाच पाहत होता. सगळेजण आपल्या घरी जायला निघाले होते.

" आपण उद्या निलायम गार्डनला भेटायचं का." विहान काव्याला विचारत होता.

" प्लॅन फिक्स आहे आमचा, आम्ही दुसरीकडे चाललो आहे."

" कुठे? मी पण येतो मग. "

" जरा चिटकू दिसतो का हा. मागेच लागलाय आपल्या." स्वरदा काव्याला सांगत होती.

" तू त्याला आवडली आहे वाटते. तुझ्यावर फिदा आहे वाटतो तो."

" नको सांगू आपण कुठे जाणार आहोत ते."

काव्या विहान ला भेटण्याचे चुकीचे ठिकाण सांगून तिथून निघून गेली होती.

सुहानी दिवसभर सुजय बरोबर व्हिडीओ काॅलवर गप्पा मारण्यात बिझी होती. घरी आल्यावर स्वरदाच्या बाबतीत घडलेला किस्सा काव्याने सांगितला होता.

" शीट.., मी असायला हवे होते तेव्हा. तो उद्या येणार आहे का? आपण जिथे जाणार आहोत तिकडे."

" तो तर स्वत:हून तयार आहे तिकडे यायला. पण स्वरदाच्या सांगण्यावरुन त्याला दुसरे ठिकाण सांगितले." काव्या सुहानीला सांगत होती.

ओके म्हणत सगळे दमले असल्याने झोपी गेले होते.

सुहानी हळूच इशारा करत काव्याला बोलावून घेते. "आपण उद्या विहानला सांगितलेल्या ठिकाणी‌ जायचे."

" स्वरदाने विचारले तर काय सांगायचं?"

" विहान तिकडे पण येवून पोहचला. असे काहीतरी सांगूया. तू नको टेन्शन घेवू. मी पाहून घेते सगळे." सुहानी मनातल्या मनात हसत बोलत होती.

ठरल्याप्रमाणे सर्वजण डोंगरावरच्या देवीच्या मंदिरात गेले होते. जवळपासच निलायम गार्डन असल्याने बाकीच्या मैत्रिणी देखील त्या दिशेने जायला निघाल्या होत्या. विहान ने गार्डन मध्ये गुलाबाच्या पाकळ्यांनी सुंदर मोराचे चित्र साकारले होते. विहानला चित्रकलेची आवड होती. त्याने प्रत्येकीला पिंपळाच्या जाळीदार पानावर मोर, घर, निसर्गाच्या विविध छटा असणारे चित्र रंगवून मैत्रीची भेट म्हणून स्विकारण्याचा आग्रह केला होता.

स्वरदा साठी विहान ने स्पेशल पेण्टिंग काढले होते. त्यात नदिच्या मधोमध नावे मध्ये एक मुलगा आणि एक मुलगी थांबले असताना आजूबाजूला बदक आपल्या परीवारासोबत मनसोक्त विहार करत होती. स्वरदा त्या चित्राच्या पाहताच क्षणी प्रेमात पडली होती. तिने स्वत:हून विहानकडे या चित्रा विषयी उत्सुकतेने विचारायला सुरवात केली होती. विहान आपली कल्पकता स्वरदाला सांगत होता. स्वरदा त्याच्याकडे एकटक पाहण्यात दंग होती.

" अग चल आपल्याला घरी जावून बॅग भरायची आहे." सुहानी स्वरदाच्या हाताला हात मारत बोलत होती.

" उद्या तुम्ही जाणार आहात का? अजून थांबा ना एक-दोन दिवस." विहान केविलवाण्या नजरेतून विचारत होता.

" जायला तर हवं ना. आता प्रत्येक जण आपल्या करीअर प्रमाणे वेगवेगळ्या दिशांना वेगळे होणार. कोण कोणाला कधी भेटेल, म्हणून काव्याला भेटायला आलो होतो. ती देखील आमच्या घरी येणार आहे. तेव्हा....... " आपल्या भावनांना आवर घालत स्वरदा विहानचा निरोप घेते."

क्रमशः

विहान आणि स्वरदा एकमेकांच्या प्रेमात आकंठ तर बुडाले हे दिसले पण, त्यांचे प्रेम घरातल्यांना मान्य असेल ना?

🎭 Series Post

View all