तुझ्या विना मरजावा भाग २

प्रेमात स्वत:चेही भान उरत नाही. ती परीस्थिती समोर येईल त्यात आनंदाने सहभागी होता येते.
मागील भागात सुहानी आणि सुजयच्या काॅलेजच्या फेअरवेल पार्टीत दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले होते. तेच सुहानीची बहिण स्वरदाची मैत्रिण काव्या हिच्या घरी आठ‌ दिवसांकरता राहायला गेलेली स्वरदा मात्र विहानच्या प्रेमात पडली होती.

सुहानी आली हे कळताच सुजयने ताबडतोब एका कॅन्टीन मध्ये सुहानीला भेटायला बोलावले होते.

" तुला माझी आठवण येत होती का नव्हती ग. "

" फोनवर तर बोलत होतो ना सारखे आपण."

" तस नाही ग. समोरासमोर बसून कुठे बोलता आले आपल्याला."

" आता बसलोय की बोल की आता तू."

" मी एका कंपनीत मुलाखत दिली. तिथे मी सिलेक्ट झालो. महिनाभरासाठी मला ट्रेनिंगला तिकडे जावे लागणार आहे. हेच तुला सांगायचे होते."

" हि तर आनंदाची बातमी आहे. एवढ्या दु:खी असल्यासारखे का सांगतो आहेस. जायला अजून वेळ असणार ना तुला. कधी निघायचे आहे तिकडे जायला. आणि आजच मी आले. डायरेक्ट तू बोलावलं म्हणून. अजून घरी देखील गेली नाही. निवांत भेटलो असतो ना आपण. "

" आजच रात्री ८ वाजता निघणार आहे मी. म्हणूनच लगबगीने तुझी भेट घेतली."

" तू तुझ्या ट्रेनिंगवर फोकस कर. तुला जसा वेळ मिळेल तसा फोन करत रहा." सुहानी हळव्या स्वरात बोलत होती.

दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली होती. सुहानी घरी पोहचली होती. स्वरदा तिच्या कामात बिझी झाली होती. सुहानी देखील इतरांपेक्षा वेगळे करीअर करण्याच्या प्रयत्न करत होती. तिने ब्युटिशियनचा कोर्स पूर्ण करायचे ठरवले होते. त्यात अॅडव्हान्स कोर्स पूर्ण करुन स्वत:चे सलोन तिला उभे करायचे होते.

एक आठवडा सुजयशी बोलणे सुरु होते. नंतर मात्र दोन आठवडे होवून गेले तरी सुजयचा फोन लागत आला नव्हता. सुहानीचे कोर्स मध्ये लक्ष लागत नव्हते. स्वरदाला बरोबर घेवून तिने सुजय जिकडे नोकरी करत होता तिकडे ती निघाली होती. प्रवास करत असताना तिने सुजय विषयी सर्व सांगितले होते. सुरवातीला शाॅक होणारी स्वरदा स्वत: मात्र विहानच्या प्रेमात असल्याने सुहानीच्या प्रेमाला विरोध दर्शवू शकत नव्हती.

दोघी कंपनीच्या पत्यावर जातात. तिथे सुजय विषयी चौकशी केली होती. ते ऐकून दोघी स्तब्ध झाल्या होत्या. सुजयचे नाव तर दिसत होते. परंतु तो ट्रेनिंग करता अजून जाॅईन झालेला नव्हता. म्हणजे तो घरीच असल्याचे सुहानीला कळले होते.

सुहानी आणि स्वरदा सुजयच्या घरी गेल्या होत्या. तिथे सुजयला अश्या अवस्थेत पाहून त्या पुन्हा एकदा शाॅक झाल्या होत्या. सुजय ज्या दिवशी ट्रेनिंग करता निघणार होता. त्याच दिवशी त्याचा अपघात झाला होता. त्यात कमरेखालचा भाग निकामी झाला होता. तो स्वत:ला अश्या अवस्थेत स्विकारायला तयार नव्हता.

" तू मला विसरुन जा. आपल्यात जे काही नातं होते त्यापासून मी तुला मुक्त करतो."

" अस बोलू नकोस. मी तुझी काळजी घेईल. आयुष्यभर तुझी साथ देईल."

" मी मलाच सांभाळू शकत नाही. तुला कसा आधार देणार आहे."

" मला काहीच ऐकायचे नाही. मी आजच माझ्या आई-बाबांशी या विषयावर बोलणार आहे."

" ते तुझे बोलणे नाही ऐकणार."

" मी त्यांना सोडून तुझ्याकडे येईल नाही ऐकले त्यांनी तर.. "

सुहानी घरी जावून सुजय आणि तिच्या नात्याविषयी सांगते. सुजय शिवाय आपण जगू शकत नसल्याचे देखील सांगते. आई-वडिल विरोध दर्शवतात. सुहानी स्वत:ला संपवून टाकण्याची धमकी देत होती. अखेरीस सुहानीच्या मनासारखे घडून तिचे लग्न सुजय बरोबर लावण्यात येते. सुजय सुहानीच्या येण्याने खुश होतो. त्याची स्वत:ची अवस्था बघून मनातल्या मनात तो स्वत:ला कोसत होता.

एकीकडे स्वरदा वर मात्र लग्न आम्ही ठरवलेल्या मुलाबरोबरच करायचे असे सांगण्यात आले होते. स्वरदाला कोणावरही प्रेम करण्याची अजिबात मुभा नव्हती. स्वरदा आधी पासूनच विहानच्या प्रेमात होती. आई-वडिलांची काळजी पाहता ती विहानला विसरुन जायचे ठरवत होती.

तसेही चार - पाच दिवसांत कोणी आयुष्यभराचा निर्णय घेवू शकते का असे तिला वाटत होते. वर्ष उलटून गेले होते. स्वरदाच्या लग्ना करता स्थळ बघायला सुरवात झाली होती. अचानक काव्याचा स्वरदाला फोन येतो. काही दिवसांकरता ती कंपनीच्या कामा निमित्त तिच्या घरी राहायला येणार होती.

काव्या खरतर विहानचा निरोप घेवून स्वरदाकडे आली होती. "विहानला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तो त्याच्या आई-वडिलांना घेवून तुमच्याकडे लग्नाची बोलणी करायला येणार आहे."

" एक वर्ष कुठे गायब होता तो. आणि मी आता आई-वडिल सांगतिल त्याच मुलाशी लग्न करणार आहे. तू माझा निरोप दे त्याला, कोणताच सबंध यापुढे ठेवायचा नाही असेही त्याला सांग."

काव्या स्वरदाला समजावत होती. परंतु ती ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती. अखेरीस काव्या विहानला स्वरदाचा निरोप पोहचवला होता.

विहान स्वत:शीच हसू लागला. मध्येच रडत होता. या वर्षभरामध्ये त्याने नोकरी जाॅईन करुन स्वत:च्या पायावर उभ राहून यश आणि पैसा कमावला होता. तो फक्त आणि फक्त स्वरदाकरता. आता जिच्यासाठी एवढा बदल घडवून आणला तिच आपल्याला नाही म्हणते. या विचाराने विहान मात्र स्वत:ला दारुच्या नशेत बुडवून घेत होता.

विहानला आता स्वत:चा विसर पडला होता. अनेकदा समजावून घरचे देखील आता त्याला कंटाळले होते. त्याला वेड लागते का? काय इथपर्यंत तो स्वरदाच्या प्रेमात आकंठ बुडाला होता.

स्वरदाचे लग्न लावण्यात आले होते. आई-वडिलांच्या इच्छेने लग्न केल्यामुळे स्वरदा खुश होती. सुहानी सुजयला घेवून लग्नात उपस्थित राहिली होती. स्वरदाचा नवरा इतका देखणा आणि सुहानी चा बघा कसा आहे? अशी चर्चा त्या लग्न मंडपात सुरु होती. सुजयच्या कानावर त्या गोष्टी आल्या होत्या.

सुजयला अतिशय वाईट वाटत होते. त्याने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला होता. स्वरदा तिथे उपस्थित असल्याने सुजयचा जीव वाचला होता. परंतु तो त्याच्या हेतूत काही दिवसांनी यशस्वी ठरला होता. त्याने स्वत:ला संपवले होते. सुहानीच्या नावाने चिठ्ठी देखील लिहली होती.

" तू पुन्हा एकदा नव्याने संसार कर. माझ्या सारख्या अधू असणाऱ्या माणसाबरोबर तू सुखी नाही राहू शकणार. लोकांचे टोमणे, समाजाच्या नजरा मला टोचून टोचून मारत आहे. यापेक्षा मी स्वत:लाच संपवून टाकत आहे."

हि चिठ्ठी वाचून सुहानी रडत होती.

क्रमशः

सुहानीच्या आयुष्यात पुढे काय असणार आहे? विहान बरा असेल ना त्याच्या आयुष्यात?

🎭 Series Post

View all