तुझ्या विना मरजावा भाग ३ अंतिम

प्रेम फक्त मिळवणं नसते. कधी‌ कधी ते दुस-याचे सुख लांबून पाहणे देखील असते.
मागच्या भागात आपण सुजयच्या आयुष्यात आलेलं वादळ आणि त्यावर तोडगा काढत सुहानी ने साताजन्माची दिलेली सोबत. परंतु दुर्देव सुजय हे जग सोडून जातो. स्वरदा आई-वडिलांच्या इच्छेने लग्न करते. विहान मात्र स्वरदाच्या प्रेमात वेडापिसा होतो.

सुहानीने स्वत:च्या पायावर उभे राहायचे ठरवले होते. तिने अर्धवट राहिलेला ब्युटिशियनचा कोर्स पूर्ण करायचे ठरवले होते. पाहता पाहता तिने अॅडव्हान्स कोर्स देखील कमी वेळात पूर्ण केला होता. दिवस रात्र प्रॅक्टिस करत सुहानीने आपल्या करीअर मध्ये अव्वल ठरली होती. तिने सरावा करता मोठ्या मोठ्या सलोन मध्ये नोकरी करायचे ठरवले होते.

स्वरदा आणि राहूल आपल्या संसारात खूश होते. राहूल बिजनेसमॅन होता. एक दिवस काव्याचा पुन्हा स्वरदाला फोन आला होता. काव्याचा फोन घ्यावा की नाही हा एकच विचार स्वरदाच्या मनात येत होता. काव्याशी बोलले की, विहानचा विषय आल्याशिवाय राहणार नव्हता. आजूबाजूला कोणी नाही ना? पाहत तिने रुमचा दरवाजा लावून घेतला होता.

"हॅलो काव्या बोल ना? कशी आहेस. काही काम होत का तुझे."

" तू कशी आहेस."

" मी छान आहे."कोड्यात का बोलते. काय झाले ठिक आहे ना सगळे."

" विहान बरा नाहीये अग. तूझे लग्ना झाल्याचे कळताच. तो अक्षरश: वेडापिसा झाला आहे. त्याने केवळ तुझाच ध्यास घेतला आहे."

" माझे आता लग्न झाले आहे. काय करु शकते मी."

" तू एकदा त्याला भेटायला येशील का? तेवढेच त्याला बरे वाटेल."

" कशी येणार. नविनच लग्न झाले आहे . घरी काय कारण सांगायचे."

" मैत्रिणीच्या घरी काही दिवस जावून येते अस काहीस सांग."

" राहूल मी काही दिवसांकरता माझ्या मैत्रिणीच्या घरी राहायला जावू का."

" हो. कुठे राहते ती. मी तुला तिच्या घरी सोडून येतो हव तर. "

" ती सोलापूरला राहते. मी एस टी ने जाईल."

" आमची एक मिटिंग आहे चार दिवसांनी तिकडेच मी सोडतो तुला. माझे काम झाले की मी निघून येईल. तू रहा तिकडे. यायच्या वेळी पुन्हा फोन कर मी घ्यायला येईल तुला."

काव्याला फोन करुन राहूल बरोबर येत असल्याचे कळवले होते. राहूल बरोबर एवढ्या लांबच्या प्रवासाला स्वरदा पहिल्यांदाच बाहेर पडली होती. राहूल स्वरदाला मैत्रिणीच्या घरी सोडून कामा करता निघून गेला होता.

घरी आल्यावर काव्या विहान बाबत सांगायला सुरवात केली होती.

" विहान इतका वेडापिसा झाला होता की, त्याच्या डोक्यावर प्रेशर येवून तो मानसिक संतुलना बरोबर स्वत: कोण आहे हे देखील विसरला आहे. त्याला विस्मरणाचा आजार झाला आहे."

स्वरदा मोठ्याने रडायला लागली होती. "माझ्यावर एवढे वेड्यासारखे प्रेम करत होता. आणि मी मात्र स्वार्थीपणाने राहूल बरोबर संसारात खूश होते. मला आत्ताच्या आत्ता विहानला भेटायचे . आपण ताबडतोब जावूया."

विहानने स्वत:ला एका रुम मध्ये बंद केले होते. त्याने चित्रकलेची आवड मात्र विसरु दिली नव्हती. त्याच्या रुम मध्ये त्याने स्वरदा सोबत घालवलेला प्रत्येक क्षण चित्राच्या रुपात भिंतीवर साकारला होता. स्वरदाच्या चेह-यावरचे वेगवेगळ्या हालचाली, भावना हुबेहुब साकरात पोस्टर देखील बनवले होते.


स्वरदा आणि काव्या विहानच्या घरी येवून पोहचल्या होत्या. विहानला आवाज देत त्या दोघी त्याच्या रुमच्या दिशेने गेल्या होत्या. स्वरदाला पाहून विहानला काहीतरी आठवेन असे काव्याला वाटत होते. पण त्या दोघींकडे तो अनोळखी नजरेने तसेच गोंधळलेल्या चेह-याने पाहत होता.

विहानचे आई-वडिल एका कार अपघातात लहानपणीच वारले असल्याने तो आपला भाऊ साहिल सोबत राहत होता.

अनोळखी व्यक्ती समोर दिसताच विहान जोरजोरात ओरडायला सुरवात करत होता. यावेळी स्वरदाला पाहून तो गोंधळलेल्या अवस्थेत एकटक तिच्याकडे आणि आपण काढलेल्या चित्रांकडे पाहत होता. अद्याप त्याला स्वरदा कोण? हे आठवतच नव्हते. एक मात्र घडले, विहानने स्वरादाशी बोलायला सुरवात केली होती. त्याला तिच्यात आपलेपणा जाणवत होता.

साहिल सांगत होता,
"पहिल्यांदा तो मनमोकळेपणाने आज बोलत आहे. एरव्ही रुम बंद करुन तासनतास या खोलीत चित्र काढण्यात मग्न असतो."

स्वरदाशी तो बोलला तरी काय?

" मॅडम तुम्ही माझ्या फोटोतल्या परी प्रमाणे हुबेहुब दिसताय. पण या परीला अस श्रृंगार रुपात मी कधीच साकारले नाही. मला तुमची परवानगी असेल तर., तुमचे पोस्टर बनवू का मी."

तू मला का सोडून गेलीस? आपण लग्न करायचं का? असे प्रश्न विहान स्वरदाला करणार हे अपेक्षित होते. विहानला स्वरदा नक्की आठवते की नाही हे कळतचं नव्हते.

हो चालेल ना, म्हणत स्वरदा समोर येवून बसली होती. साडी, भांगेत कुंकू, गळ्यात मंगळसूत्र विहानने हुबेहुब रेखाटले होते.

चित्र काढून झाल्यावर काव्याला घेवून ताबडतोब स्वरदा तिथून निघून आली होती.

"त्याची अशी अवस्था केवळ माझ्यामुळे झाली. मी स्वत:ला कधीच माफ करु शकणार नाही. मी उद्याच माझ्या घरी जात आहे. राहूल तिकडे एकटे आहेत."

काव्या देखील कुठल्या तोंडाने स्वरदाला थांबवणार होती. ‌ती तिला लवकरच भेटूया म्हणत निरोप देण्यासाठी तिला बस स्टाॅपवर बसून द्यायला गेली होती.

दोन वर्षांचा काल उलटून गेला होता. स्वरदा आणि राहूलला एक मुलगा झाला होता. स्वरदाचा वाढदिवस जवळ आला होता. काव्याने तिला भेटून सरप्राइज द्यायचे ठरवले होते.

इकडे साहिलने विहानने बनवलेल पोस्टर काव्याकडे पॅक करुन कधीच दिले होते. काव्याला ते पोस्टर देखील स्वरदाला द्यायचे होते.

काव्याला अचानक पाहून स्वरदाला आनंद झाला होता. जेवणाकरता बाहेर जावूया म्हणत काव्याने स्वरदा करता वाढदिवसाची पार्टि अरेंज केली होती. तिथे सर्व मैत्रिणींना बोलावले होते. सगळ्यांनी स्वरदाला गिफ्ट दिले होते.

घरी आल्यावर तिने एक- एक गिफ्ट खोलून पाहिले होते. एक गिफ्ट पाहताच स्वरदा पुन्हा त्या क्षणांमध्ये स्वत:ला हरवून बसली होती.
ते पोस्टर होते विहानने साकारलेलं. त्यात एक मुलगा आणि एक मुलगी नावेतून प्रवास करत असताना त्या मुलीने मात्र साडी आणि साज श्रृंगार केलेला होता. आजूबाजूला तशीच बदके गोलाकार फिरताना दिसत होती.

स्वरदाला कळून चुकले होते. विहान पूर्णपणे बरा आहे खरतर. त्याला एकदा फक्त डोळे भरुन स्वरदाला पाहायचे होते. कोणतीच तक्रार त्याची नव्हती. त्याला ज्या अर्थी हे पोस्टर बनवले होते. त्यातून सगळचं स्पष्ट जाणवत होते.

विहानच्या सांगण्यावरुन त्याचा भाऊ साहिल, काव्या या प्लॅन मधे सामील झाले होते. विहानला फक्त एकदा स्वरदाला पाहायचे होते.

सुहानीने आता स्वत:चे मोठे सलोन टाकले होते. तिचे स्वप्न पूर्ण झाले होते. सुजयच्या आठवणीत तिने आपले स्वप्न पूर्ण केले होते.

स्वरदा आपल्या संसारात पुन्हा रममाण झाली होती. मनाच्या हळव्या कोप-यात विहानचे पेन्टिंग मात्र साद घालत होते.

समाप्त:

🎭 Series Post

View all