तुझ्यातलं माझं आभाळ...भाग 4
त्या दोघांनी पहिल्यांदा दरवाज्यावर हात ठेवला. दरवाजा हलक्याने ढकलला आणि त्या गॅलरीमध्ये पहिलं पाऊल टाकलं.
त्या जागेत अजून फार काही नव्हतं – फक्त एक चहा उकळणारा गॅस, पांढऱ्या भिंती आणि एकत्र स्वप्न बाळगणाऱ्या दोन माणसांचं धाडस.
त्या जागेत अजून फार काही नव्हतं – फक्त एक चहा उकळणारा गॅस, पांढऱ्या भिंती आणि एकत्र स्वप्न बाळगणाऱ्या दोन माणसांचं धाडस.
पहिल्याच दिवशी चार लोक आले.
एक तरुणी, जी लिहायला शिकायची इच्छा बाळगून आली होती.
एक मध्यमवयीन गृहिणी, जिला तिच्या आयुष्यातल्या "न बोललेल्या" कथा शेअर करायच्या होत्या.
एक कॉलेजचा विद्यार्थी, ज्याला जगणं साजरं करायचं होतं — फोटोंमधून.

आणि सगळ्यांत शेवटी आले – सायलीचे मामा.
त्यांनी एकटक तिच्याकडे पाहिलं. भिंतीवर तिचा फोटो, तिच्या नावाचं मासिक आणि तिच्या शब्दांनी भरलेले फलक.
"सगळं सोडलं… आणि हे सगळं उभं केलंस?" ते थोडं उपहासाने म्हणाले.
सायली त्यांच्या नजरेत शांतपणे पाहत म्हणाली,
"हो. मी जगासाठी हरवलेय… पण मी स्वतःला सापडलेय."
"हो. मी जगासाठी हरवलेय… पण मी स्वतःला सापडलेय."
"आणि घर?"
"घरासारखं काही शोधलंय… ज्याचं छप्पर शब्दांनी बांधलंय, आणि भिंती विश्वासाच्या आहेत."
"घरासारखं काही शोधलंय… ज्याचं छप्पर शब्दांनी बांधलंय, आणि भिंती विश्वासाच्या आहेत."
त्या रात्री सायली खूप शांत होती.
आरवने विचारलं, "बरी आहेस ना?"
आरवने विचारलं, "बरी आहेस ना?"
ती हलकं हसली. "मला काही ठरवायला वेळ लागतो… पण एकदा पावलं पडली, की मी मागे पाहत नाही. तू माझ्या सोबत चालत आहेस, हेच पुरेसं आहे."
पुढच्या काही आठवड्यांत ‘आरव & सायली’ स्टुडिओ एक छोटंसं आश्रयस्थान बनलं होतं.
ते लोकांना लिहायला शिकवत, बोलायला मदत करत, फोटोंमध्ये आठवणी जपून ठेवत.
त्यांनी अनेक अपरिचितांमध्ये एक गोष्ट शोधली – सर्वांच्या आत एक 'गप्प बसलेली गोष्ट' असते.
ते लोकांना लिहायला शिकवत, बोलायला मदत करत, फोटोंमध्ये आठवणी जपून ठेवत.
त्यांनी अनेक अपरिचितांमध्ये एक गोष्ट शोधली – सर्वांच्या आत एक 'गप्प बसलेली गोष्ट' असते.
ते त्या गोष्टींना आवाज द्यायचे.
पण एक दिवस… अचानक स्टुडिओच्या बाहेर एक व्यक्ती उभी होती –
सायलीचे वडील.
सायलीचे वडील.
सायलीने त्यांना पाहिलं आणि क्षणभर तिचं मन थांबलं.
ते आत आले. एकटक सगळं पाहिलं. भिंतीवरील फोटो, तिनं लिहिलेल्या ओळी.
आणि मग तिला पाहत म्हणाले –
आणि मग तिला पाहत म्हणाले –
"मी काहीही म्हणालो होतो… पण तू इतकी खोल आणि सुंदर गोष्ट उभी करशील, याचा मला अंदाज नव्हता."
सायली चटकन उठली, त्यांच्या पुढे उभी राहिली. पण तिला शब्द सापडले नाहीत.
ते पुढे म्हणाले,
"माझ्या चौकटींमध्ये तुला अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला… पण तू घरापेक्षा स्वप्न उभं केलंयस आणि आता मला कळतंय – मुलींच्या पंखांना जबाबदारीचा नाही, समजुतदार प्रेमाचा आधार हवा असतो."
"माझ्या चौकटींमध्ये तुला अडकवून ठेवण्याचा प्रयत्न केला… पण तू घरापेक्षा स्वप्न उभं केलंयस आणि आता मला कळतंय – मुलींच्या पंखांना जबाबदारीचा नाही, समजुतदार प्रेमाचा आधार हवा असतो."
त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला.
ती तुटून रडली. तो रडला नाही… पण डोळे पाणावले.
ती तुटून रडली. तो रडला नाही… पण डोळे पाणावले.
त्या रात्री सायलीने आरवच्या खांद्यावर डोकं टेकवलं.
"आज बाबांचा हात डोक्यावर होता… आणि तूही. मला जसं वाटतं होतं… तसंच सगळं घडलं."
"आज बाबांचा हात डोक्यावर होता… आणि तूही. मला जसं वाटतं होतं… तसंच सगळं घडलं."
आरव तिच्या केसांतून बोटं फिरवत म्हणाला,
"हे सगळं खऱं आहे सायली… कारण आपण हे नातं ‘सिद्ध’ केलंय… फक्त ‘स्वीकारलं’ नाही."
"हे सगळं खऱं आहे सायली… कारण आपण हे नातं ‘सिद्ध’ केलंय… फक्त ‘स्वीकारलं’ नाही."
सायली आणि आरवचं नातं आता लोकांच्या नजरेतही 'स्थिर' वाटायला लागलं होतं.
गल्लीतल्या काकूंना "तुमच्या गॅलरीत तो चहा मिळतो का गं?" हे विचारायचं थांबलं नव्हतं,
आणि फेसबुकवर लोक 'आरव & सायली' या पेजवर रोज नव्या पोस्टची वाट बघत होते.
गल्लीतल्या काकूंना "तुमच्या गॅलरीत तो चहा मिळतो का गं?" हे विचारायचं थांबलं नव्हतं,
आणि फेसबुकवर लोक 'आरव & सायली' या पेजवर रोज नव्या पोस्टची वाट बघत होते.
पण त्या यशाच्या चमकदार पडद्याआड, काही गोष्टी डोकं वर काढू लागल्या होत्या.
एक दिवस आरव खूप शांत होता.
सायलीने त्याच्या टेबलावर एक बुकिंग कॅन्सल झालेलं पाहिलं.
"आरव… पुन्हा क्लायंट मागे का हटला?"
सायलीने त्याच्या टेबलावर एक बुकिंग कॅन्सल झालेलं पाहिलं.
"आरव… पुन्हा क्लायंट मागे का हटला?"
तो नजर टाळून म्हणाला,
"त्यांना मोठं पोर्टफोलिओ हवं होतं आणि मी ‘फीलिंग्स’ दाखवतो… ग्लॅमर नाही."
"त्यांना मोठं पोर्टफोलिओ हवं होतं आणि मी ‘फीलिंग्स’ दाखवतो… ग्लॅमर नाही."
सायली त्याच्यासमोर बसली.
"आपण का झगडतोयस, आरव?"
"आपण का झगडतोयस, आरव?"
"कारण आता तू माझ्या मागे उभी राहिलीयेस… आणि मला वाटतं, मला काही सिद्ध करावंच लागेल तुझ्यासमोर.
तू स्वप्नं जगतीयेस… आणि मी अजूनही जगण्यासाठी झगडतोय."
तू स्वप्नं जगतीयेस… आणि मी अजूनही जगण्यासाठी झगडतोय."
सायली शांतपणे त्याचा हात हातात घेऊन म्हणाली,
"आपल्यातला फरक तू नाहीस… हे आयुष्य आहे आणि हे नातं म्हणजे स्पर्धा नाही.
माझं भविष्य तुझ्या यशाशी बांधलेलं नाही…
माझं भविष्य तुझ्या अस्तित्वाशी बांधलेलं आहे."
"आपल्यातला फरक तू नाहीस… हे आयुष्य आहे आणि हे नातं म्हणजे स्पर्धा नाही.
माझं भविष्य तुझ्या यशाशी बांधलेलं नाही…
माझं भविष्य तुझ्या अस्तित्वाशी बांधलेलं आहे."
त्या रात्री पहिल्यांदा त्यांच्यात काही वेळेची शांतता होती… ती गोड नव्हती, ती चिंताजनक होती.
सायलीने विचार केला —
“आपलं प्रेम आता स्थिर झालं आहे… पण जेव्हा नातं स्थिर होतं, तेव्हा जबाबदाऱ्यांची धूळ त्यावर बसते."
सायलीने विचार केला —
“आपलं प्रेम आता स्थिर झालं आहे… पण जेव्हा नातं स्थिर होतं, तेव्हा जबाबदाऱ्यांची धूळ त्यावर बसते."
काही दिवसांनी एक मित्र त्यांच्याकडे भेटायला आला रोहित.
सायलीचा कॉलेज मित्र आणि आता एक प्रसिद्ध पब्लिशिंग एजन्सीचा टीम लीडर.
सायलीचा कॉलेज मित्र आणि आता एक प्रसिद्ध पब्लिशिंग एजन्सीचा टीम लीडर.
"सायली, मला तुला एक मोठा प्रोजेक्ट द्यायचा आहे.
दिल्लीला यावं लागेल… तीन महिने.
स्वतःचा स्वतंत्र कॉलम, स्वतःचं टीम."
दिल्लीला यावं लागेल… तीन महिने.
स्वतःचा स्वतंत्र कॉलम, स्वतःचं टीम."
सायली क्षणभर शांत झाली.
आरव तिच्या शेजारीच बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर काही नव्हतं, पण नजरेत हलकं काहीतरी बदललं.
आरव तिच्या शेजारीच बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर काही नव्हतं, पण नजरेत हलकं काहीतरी बदललं.
"तीन महिने?"
"हो राहणे, पगार सगळं भरपूर. तू तयार असशील, तर मी तुझं नाव पाठवतो."
"हो राहणे, पगार सगळं भरपूर. तू तयार असशील, तर मी तुझं नाव पाठवतो."
सायलीकडे दोन वाटा होत्या –
स्वतःच्या स्वप्नांची उंची आणि आरवच्या हातातली उब.
स्वतःच्या स्वप्नांची उंची आणि आरवच्या हातातली उब.
त्या रात्री ती खिडकीजवळ उभी होती. पावसाचा हलका आवाज आणि तिच्या मनात वादळ.
आरव तिच्यामागे आला पण गप्पच.
आरव तिच्यामागे आला पण गप्पच.
"मी जाऊ?" – सायलीने विचारलं, अगदी हळुवार आवाजात.
"तू स्वतःला दाबून ठेवू नको. मला माहीत आहे, तुझ्या स्वप्नांना पंख लागायची ही संधी आहे."
आरवचा स्वर नरम होता, पण थोडासा थरथरला होता.
आरवचा स्वर नरम होता, पण थोडासा थरथरला होता.
सायली त्याच्याकडे वळून म्हणाली,
"पण मला तुझ्याशी गाठ बांधून उडायचे आहे. मला तू माझ्या सोबत हवा आहेस. जर मी जाईन, तर तुझं काय? तू एकटा होशील. तू इथे मी तिथे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार."
"पण मला तुझ्याशी गाठ बांधून उडायचे आहे. मला तू माझ्या सोबत हवा आहेस. जर मी जाईन, तर तुझं काय? तू एकटा होशील. तू इथे मी तिथे, मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार."
"मी इथेच असेन… तुझी वाट पाहत."
त्या रात्री दोघं खूप बोलले. भविष्याबद्दल, वेळेच्या अंतराबद्दल, विश्वासाबद्दल.
ती रडली, तो हसला. तो गप्प झाला, ती त्याचा हात घट्ट धरून बसली.
ती रडली, तो हसला. तो गप्प झाला, ती त्याचा हात घट्ट धरून बसली.
"आरव… आपण नातं बांधलं नाहीये अजून. लग्नाचं काय?"
ती विचारताच त्याचं भुवई हलकं उंचावलं.
ती विचारताच त्याचं भुवई हलकं उंचावलं.
"आपलं नातं हेच माझं वचन आहे, सायली.
पण तू दिल्लीहून परत ये… मग आपल्या नावाच्या पुढे एकसंध ओळख लावू."
पण तू दिल्लीहून परत ये… मग आपल्या नावाच्या पुढे एकसंध ओळख लावू."
सायलीने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं.
"माझं आभाळ तुझं आहे… मी कुठेही जाईन, ते तुझं घेऊनच."
"माझं आभाळ तुझं आहे… मी कुठेही जाईन, ते तुझं घेऊनच."
दिल्लीचं हवामान थोडं थंड, पण आत कुठेतरी जळजळीत होतं.
सायलीनं पहिल्यांदाच आरवपासून इतकं लांब पाऊल टाकलं होतं.
तिने विमानतळावरून बाहेर पडताना मागे वळून पाहिलं… पण तिथं आरव नव्हता.
त्याचं गोडसं 'जाहिरातबाज' हसू तिच्या डोळ्यांत विसावलेलं होतं.
सायलीनं पहिल्यांदाच आरवपासून इतकं लांब पाऊल टाकलं होतं.
तिने विमानतळावरून बाहेर पडताना मागे वळून पाहिलं… पण तिथं आरव नव्हता.
त्याचं गोडसं 'जाहिरातबाज' हसू तिच्या डोळ्यांत विसावलेलं होतं.
त्याने पाठवलेला एकमेव मेसेज होता –
"उंच भरारी घे… मी तुझ्या पंखांना फाटू देणार नाही."
दिल्लीतला पहिला दिवस...
सायली ऑफिसमध्ये पोहोचली. उच्चभ्रू लोक, इंग्रजीतून उडणाऱ्या कल्पना आणि एका वेगळ्याच गतीचा जीवन प्रवाह.
सायली ऑफिसमध्ये पोहोचली. उच्चभ्रू लोक, इंग्रजीतून उडणाऱ्या कल्पना आणि एका वेगळ्याच गतीचा जीवन प्रवाह.
ती शांत होती, पण तिचे शब्द धडधडत होते.
पहिल्याच मीटिंगमध्ये तिच्या स्क्रिप्टला मान्यता मिळाली.
"Sayli’s Shade – A Woman’s Voice" या शीर्षकाखाली मासिकाला नवा चेहरा मिळणार होता.
"Sayli’s Shade – A Woman’s Voice" या शीर्षकाखाली मासिकाला नवा चेहरा मिळणार होता.
सायली रात्री हॉटेलमध्ये परत आली.
रूमच्या खिडकीतून ती दिल्लीच्या रात्रीच्या उजेडाकडे पाहत होती.
टाकून आलेल्या मुंबईची ओढ,
आणि त्याहून जास्त — आरवच्या आवाजाची, त्याच्या मिठीची गरज.
रूमच्या खिडकीतून ती दिल्लीच्या रात्रीच्या उजेडाकडे पाहत होती.
टाकून आलेल्या मुंबईची ओढ,
आणि त्याहून जास्त — आरवच्या आवाजाची, त्याच्या मिठीची गरज.
तिने मोबाईल उघडला. मेसेजेस होते :
आरवने तुळशीच्या कुंडीतलं नवीन फुल टिपलं होतं.
“आज तुझ्या नावाचं फुल आलं.”
सायली हसली… डोळे पाणावले.
ती उत्तर देणार, तोच आरवचा फोन आला.
“आज तुझ्या नावाचं फुल आलं.”
सायली हसली… डोळे पाणावले.
ती उत्तर देणार, तोच आरवचा फोन आला.
"कशी आहेस?"
"सांगू का खरं?"
"हो."
"तुझ्याशिवाय मोठ्या गोष्टी छोट्या वाटतात.
पण तुझ्या विश्वासाने त्यांना पुन्हा मोठं करणं जमतोय."
"सांगू का खरं?"
"हो."
"तुझ्याशिवाय मोठ्या गोष्टी छोट्या वाटतात.
पण तुझ्या विश्वासाने त्यांना पुन्हा मोठं करणं जमतोय."
आरव हसला.
"आयुष्य तुझ्या आवाजात ऐकणं मला जास्त आवडतंय सध्या."
"आयुष्य तुझ्या आवाजात ऐकणं मला जास्त आवडतंय सध्या."
"आणि मला तू नजरेत दिसावा असं वाटतंय सध्या."
दूर अंतर असूनही, त्यांच्या शब्दांनी त्यांच्यातली उब वाढली होती.
पण काही विरह, शब्दांपेक्षा खोल असतो.
पण काही विरह, शब्दांपेक्षा खोल असतो.
दिल्लीतीलं बारावा दिवस
सायली ऑफिसमध्ये रेंगाळलेली असताना, रोहित — तिचा जुना मित्र — तिच्या केबिनमध्ये आला.
सायली ऑफिसमध्ये रेंगाळलेली असताना, रोहित — तिचा जुना मित्र — तिच्या केबिनमध्ये आला.
क्रमशः
ऋतुजा वैरागडकर
ऋतुजा वैरागडकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा