त्या चेहऱ्यामागची कथा भाग - २ (अंतिम भाग)
कॉलेजमध्ये तिची नजर सतत लोकांवर फिरत होती.
कुणी मला फॉलो तर करत नाही ना? तिच्या मनात शंका वाढत होती. स्वरा तिच्यासमोर आली.
“चेहरा पुन्हा दिसला का?” सान्वीने नकारार्थी मान हलवली. “पण काल दाराबाहेर एक नोट ठेवली होती,” सान्वीने कुजबुजत सांगितलं. स्वराने नोट वाचली.
I SEE YOU
“सान्वी हे सरळ धमकीचं प्रकरण आहे,” स्वरा म्हणाली.
“तू पोलिसात तक्रार केली पाहिजे!”
“तू पोलिसात तक्रार केली पाहिजे!”
सान्वीने ओठ चावले. “पोलिस येईपर्यंत तो माणूस गायब असेल. मला स्वतःच तपास करायचा आहे.”
स्वरा चिंतेत होती, पण तिला सान्वीचा हट्ट ठाऊक होता.
“ठीक आहे. पण मी तुझ्याबरोबर आहे.”
स्वरा चिंतेत होती, पण तिला सान्वीचा हट्ट ठाऊक होता.
“ठीक आहे. पण मी तुझ्याबरोबर आहे.”
त्या दोघी दुपारी थेट बिल्डिंगच्या पार्किंगमध्ये गेल्या.
जिथे सान्वीने पहिल्यांदा चेहरा पाहिला होता.
सान्वी जमिनीवर वाकून तपास करत होती.
तेवढ्यात तिच्या नजरेला एक छोटी चमक दिसली.
“हे काय आहे?” तिने हातात घेतलं, एक लहानसं मेटलचं बटन. काळसर, त्यावर काही क्रमांक कोरलेले.
स्वरा बटन हातात घेत म्हणाली, “हे पोलीस लाइनचं बटन असतं ना?”
सान्वी थरथरली, “म्हणजे…तो चेहरा एखाद्या पोलिसाचा??” नवीन गूढ समोर आले.

सान्वीने पुन्हा सीसीटीव्ही रूमकडे धाव घेतली.
सुपरवायझर कंटाळला होता पण तिने आग्रह केला.
“कृपया काल 12:47 ते 12:50 पुन्हा स्लो मोशनमध्ये दाखवा.” फूटेज सुरू झालं.
सुपरवायझर कंटाळला होता पण तिने आग्रह केला.
“कृपया काल 12:47 ते 12:50 पुन्हा स्लो मोशनमध्ये दाखवा.” फूटेज सुरू झालं.
12:48:11, स्क्रीन ग्लिच.
पुढची फ्रेम, तो चेहरा.
पुढची फ्रेम, तो चेहरा.
सान्वीने नीट पाहिलं. चेहरा अंधुक. संपूर्ण सावलीत. पण… त्याच्या डाव्या कॉलरजवळ काहीतरी चमकत होतं.
तिने झूम करण्यास सांगितलं.
झूम झालं. कॉलरजवळची चमक म्हणजे, तोच मेटलचा बटन. सान्वी आणि स्वरा दोघी थिजल्या.
“तर हा तोच माणूस आहे,” सान्वी म्हणाली.
“आणि तो पोलिसांचा युनिफॉर्म घालतो किंवा आधी कधीतरी घालत होता.”
सुपरवायझर घाबरला. “मला हे प्रकरण हाताळायचं नाही. मी बिल्डिंग मॅनेजमेंटकडे कळवतो.”
“नको!” सान्वी म्हणाली. “तुम्ही काहीही करू नका. हे मी स्वतः शोधेन.”

त्या रात्री स्वरा सान्वीबरोबर राहायला आली. दोघींनी फ्लॅटचे सर्व दिवे बंद ठेवले. खिडकीजवळ बसून पाहत राहिल्या.
12:40 12:45 12:50… काहीच नाही.
12:40 12:45 12:50… काहीच नाही.
स्वराने मंद हसत म्हटलं, “कदाचित आज तो ये—”
तेवढ्यात खिडकीबाहेर हलकी सावली दिसली आणि दोघींच्या श्वासात अडथळा आला. हळूहळू सावली जवळ आली. पण यावेळी असा चेहरा नव्हता… तर एक उंच माणूस खिडकीशेजारी उभा होता.
स्वरा थरथरली. “सान्वी, आपण,” सान्वीने तिचा हात दाबला. “शांत रहा, मला बघायचंय तो कोण आहे.”
माणूस खिडकीजवळ पुढे आला आणि खिडकीच्या काचेवर हलक्या बोटांनी टकटक केली.
टक…टक… सान्वी आणि स्वरा दोघी दचकल्या.
सान्वीच्या भीतीचा कमाल बिंदू झाला होता, पण तिने स्वतःला स्थिर केलं. अगदी हळूच तिने पडदा एक सेंटीमीटरने बाजूला केला आणि तिने त्याचा चेहरा पाहिला. तोच चेहरा, तेच डोळे, तेच स्थिर भाव.

पण एक नवंच रहस्य उघडलं, त्याच्या गळ्यात पोलीस आयडी कार्ड लटकत होतं. तेवढ्यात अचानक तो माणूस मागे फिरला. खालच्या पार्किंगकडे पाहिलं.
सान्वीचं लक्ष गेलं, खाली एक काळी मोटारसायकल उभी होती. त्यावर एक माणूस त्याच्याकडे बघत होता.
तो माणूस जोरात ओरडला, “सर! खाली या ताबडतोब! त्या दोघी वरून बघतायत!” खिडकीबाहेरचा चेहरा असलेला माणूस झट्कन निघून गेला.
सान्वी थिजली. “याचा अर्थ… तो इथे एका गँगसोबत आहे? ते काय करतायत?” स्वराने पटकन दरवाजा लावला. “हे एकट्याचं काम नाही. हे प्लॅन्ड आहे!”
सान्वीला अचानक एक गोष्ट आठवली. दोन आठवडे आधी तिच्या कॉलेजजवळ एक चोरी झाली होती.
चोरी करणारा पकडला होता, पण तपासात राहिली होती,
एक पोलीस अधिकारी गुन्हेगारांना मदत करत असल्याची चर्चा. “स्वरा… मला वाटतं हा माणूस त्याच प्रकरणाशी जोडलेला आहे.” “काय?!”
“मी त्या चोरीच्या दिवशी कॉलेजमध्ये होते आणि मी तिथे कुणीतरी संशयास्पद पाहिलं होतं. कदाचित त्याला वाटलं असेल की मी त्याला ओळखते… म्हणजे मी त्याच्यासाठी धोका आहे.”

स्वरा थरथरली. “म्हणून तो तुला घाबरवत होता? नजरेसमोर राहण्यासाठी?” “हो. आणि त्याच्या साथीदारांनी त्याला सांभाळून ठेवायला सांगितलं असेल.”
दोघींनी पोलिसांना फोन केला नाही, कारण कोणावर विश्वास ठेवायचा याची खात्री नव्हती. परंतु त्या रात्री 3:15 ला, दरवाज्यावर मोठ्या आवाजात धाडकन कुणीतरी मारलं. “सान्वी! दरवाजा उघड. मला माहित आहे तू जागी आहेस.”
तोच आवाज, तोच चेहरा असलेला माणूस.
सान्वीने ओरडत स्वराला मागे घेतलं. स्वरा 100 डायल करण्याचा प्रयत्न करत होती पण नेटवर्क गायब होत होतं.
सान्वीने ओरडत स्वराला मागे घेतलं. स्वरा 100 डायल करण्याचा प्रयत्न करत होती पण नेटवर्क गायब होत होतं.
माणसाने पुन्हा दरवाजाला लाथ मारली. “उघड! तू आमच्या आड येत आहेस!” सान्वीचं हृदय धडधडत होतं.
तिने स्वयंपाकघरातून तिखटाचा डबा उचलला आणि दरवाजाजवळ उभी राहिली. तिसऱ्या लाथेत दरवाजा तुटला. माणूस आत आला, चेहरा अंधुक, डोळ्यात वेडी चमक.
“तू मला पाहिलं आहेस. तू शांत राहणार नाहीस. आता”
तो वाक्य पूर्ण करणार इतक्यात, सान्वीने भरपूर तिखट त्याच्या डोळ्यांत फेकलं. तो जोरात ओरडला.
स्वराने फोन खिडकीतून बाहेर फेकून “मदत! मदत!” असं ओरडलं. खाली काही लोक जागे झाले.

तोंड झाकलेला साथीदार पळून गेला. चेहरा असलेला माणूस अंधळेपणाने भटकत होता.
त्याचवेळी, बिल्डिंगचा दुसरा गार्ड आणि काही पुरुष वर आले आणि त्याला पकडलं.
त्याचवेळी, बिल्डिंगचा दुसरा गार्ड आणि काही पुरुष वर आले आणि त्याला पकडलं.
पोलिसांनी तपास केला आणि धक्कादायक सत्य समोर आलं, तो माणूस सस्पेंडेड कॉन्स्टेबल ऋषिकांत जाधव होता. गुन्हेगारांकडून पैसे घेऊन चोरी, अपहरण, डिलिव्हरी यांसारख्या कामात तो मदत करत होता.
सान्वीने ६ महिन्यांपूर्वी कॉलेजजवळ त्याला संशयास्पद अवस्थेत पाहिलं होतं. त्याला वाटलं, सान्वी त्याला ओळखते आणि त्याच्या चुकीचं उघड करेल.
सान्वीने ६ महिन्यांपूर्वी कॉलेजजवळ त्याला संशयास्पद अवस्थेत पाहिलं होतं. त्याला वाटलं, सान्वी त्याला ओळखते आणि त्याच्या चुकीचं उघड करेल.
म्हणून तो तिला घाबरवून तिला शांत ठेवण्याचा प्रयत्न करत होता. CCTV मधला चेहरा तोच. बटन त्याच्याच युनिफॉर्मचं. त्याच्या साथीदाराचा पोलिसांनी शोध घेतला, पण तो पळून गेला.
घटनेनंतर काही दिवसांनी सान्वीचे दिवस शांत झाले.
स्वरा तिच्याबरोबरच होती आणि दोघी कॉलेजला परतल्या. एके दिवशी सान्वी एकटी खिडकीजवळ उभी होती. रात्रीचा वारा वाहत होता. खाली काळोख.
स्वरा तिच्याबरोबरच होती आणि दोघी कॉलेजला परतल्या. एके दिवशी सान्वी एकटी खिडकीजवळ उभी होती. रात्रीचा वारा वाहत होता. खाली काळोख.
ती हळूच हसली. “आता कोणाचाही चेहरा दिसणार नाही…” तिने पडदा हलकेच बाजूला केला. पार्किंग रिकामी होती.
ती मागे फिरणार तेवढ्यात, तिच्या मोबाईलवर एक मेसेज आला.
Unknown:
“This is not over.”
सान्वीने थरकापला हात मागे घेत फोनकडे पाहिलं.
खालच्या पार्किंगमध्ये, काळ्या मोटारसायकलचा सायलेन्सर अजूनही थोडा उबदार धूर सोडत होता.

समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा