त्या शेवटच्या सेल्फीत मी हसले होते.
अनया आणि समीर हे खुप प्रेमळ जोडपं होतं, त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्यांच्या वैवाहिक जीवनात ते खुप खुश होते. त्यांना साहिल आणि आरोही ही दोन मुलं होती. त्या दोघांनी कीती दिवसापासून सुट्ट्यांमध्ये काश्मीरला जाण्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांच्या मुलाच्या साहिलच्या चौथ्या वाढदिवसानंतर आणि अनयाच्या प्रमोशननंतर अखेर ती संधी आली. आता त्यांना पहलगाम, गुलमर्ग, श्रीनगर. प्रत्येक जागा त्यांच्या आठवणीत जपून ठेवायची त्यांना संधी मिळाली. अनयाचं मन भरून आलं होतं. तिच्या नवऱ्याच्या समीरच्या डोळ्यातसुद्धा एक समाधानाची शांतता होती.
त्या दिवशी ते बैसरन व्हॅलीत फिरत होते. स्थानिक गाईडसह ते टेकडी चढून वर गेल्यावर, त्यांना एक मोकळी जागा दिसली. साहिलने हवेत उड्या मारल्या, तर आरोहीने फुलं वेचली, आणि समीरने ती फुलं अनयाच्या केसांमध्ये खोवली. त्याचवेळी त्यांनी मस्त एक सेल्फी घेतला.
"काय गं, आज असं वाटतंय की मी पुन्हा नव्याने तुझ्या प्रेमात पडलो आहे." समीर हसत म्हणाला. यावर ती गोंधळली... आणि त्या क्षणाला त्याच्या नजरेत अडकून राहिली.
तेवढ्यात दूर कुठेतरी एक जोरदार आवाज झाला,
सुरवातीला कोणीही लक्ष दिलं नाही. पण दुसऱ्या क्षणाला हवेत एक हुलकावणी, एक वेदनांनी भरलेली किंकाळी, आणि मोठा आवाज झाला . "कोणीच मागे पलटू नका, खाली जमिनीवर झोपून घ्या!" एवढ्या आवाजानंतर तिथे गोंधळ सुरू झाला. कोणी ओरडत होतं, कोणी पळत होतं...
अनया फक्त समीरकडे पाहत राहिली. त्याच्या हातात आरोही होती. साहिल तिच्या मागे पळत होता. आणि... एका क्षणात ते सगळच थांबलं. गोळ्यांचा आवाज... आणि नंतर केवळ शांतता... एक थंड शांतता त्या शांततेत हे सुखी हसरं कुटुंब खाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं.

काही वेळाने अनया शुद्धीवर आली, पण... जिचं आयुष्य होतं, ते मात्र हरवलं होतं. तिने डोळे उघडले आणि समोर पाहीलं तेव्हा आपण हाॅस्पीटलमध्ये आहोत असं तिला जाणवलं. समोर पांढऱ्या भिंती, शरीरावर नळ्या, आणि वेदना. त्या वेदनेने शरीर थरथरत होतं. मन मात्र पोकळ होतं.
"अनया... मी डॉ. शारदा. तुम्ही इथे सुरक्षित आहात." अनयाने डोळे उघडताच समोर एक डाॅक्टर असतात त्या अनयाला म्हणाल्या.
"मी सुरक्षित आहे मग समीर? आरोही? साहिल...? ते तिघे कुठे आहे?" अनयाने क्षीण आवाजात विचारलं आणि तिला तो शेवटचा क्षण आठवला आरोहीच्या हातात फुलं, साहिलची धाव, आणि... समीरचं डोळे बंद करणं. शेवटचं सगळं आठवलं आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं.
तिने त्या तिघांबद्दल विचारलं तेव्हा डॉक्टर शांत होते. त्यांनी खांदे खाली गेले. आणि त्या शांततेनंच सगळं उत्तर दिलं. ती रडली नाही. फक्त पांढऱ्या छताकडे बघत राहिली. ते छत रिकामं होतं. पण हृदयात, ती समीर सोबत बसली होती ती ठिकाणं अजूनही भरलेली होती आठवणींनी, गंधांनी, आणि त्यांच्या आवाजांनी.
काही दिवसांनी, तिला डिस्चार्ज मिळाला. पायाखालची जमीन अजूनही स्थिर नव्हती. मात्र, तिच्या हातात मोबाईल होता आणि ज्यात ती शेवटची सेल्फी होती. तिच ती पाहत राहिली.
तिचं ते हसणं, समीरची मख्ख नजरेतून प्रेमाची भाषा, साहिलचा दात दाखवणारा आनंद, आरोहीच्या गालावरचा छोटा फुगा. त्या एका फ्रेममध्ये तिचं पूर्ण जग होतं.
पुढचे काही महिने अनया फक्त नावालाच श्वास घेत होती, पण तिचं जगणं मात्र केव्हाच संपलं होतं.
पण मग एके दिवशी, तिला एक मेल आला, त्यात तिच्यासाठी आमंत्रण होतं. "काश्मीर पीडितांसाठी साक्षीदारांच्या कथनांचा कार्यक्रम" एक मंच, जिथे जे वाचले होते ते बोलू शकतात. सांगू शकतात, की त्यांनी काय गमावलं, आणि पुन्हा उभं कसं राहिलं. तिची इच्छा नसतानाही ती गेली आणि पहिल्यांदा, लोकांसमोर उभी राहिली. आणि म्हणाली. "त्या शेवटच्या सेल्फीत मी हसले होते. त्या हसण्यावर या हिंसेनं काळोख टाकला.
पण... आज मी पुन्हा हसते आहे त्यांच्यासाठी. ज्यांनी मला हसणं शिकवलं."

समाप्त.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा