जलद कथामालिका
विषय- अपेक्षाच ओझं
त्या सुनेकडूनच अपेक्षा आणि त्याच ओझं भाग 1
मालिका काल्पनिक आहे. व्यक्ती घटनेशी साम्य आढळ्यास निव्वळ योगायोग समजावा. तीनही भाग वाचून कृपया आपली बहुमूल्य कॉमेंट द्या.आवडल्यास लाईक करा.
आरती - गणपतीच्या दर्शनाला अनवाणीच निघाली. पहाटेच उठून अंघोळ करून गणपतीच्या आवडीचे मोदक, दुर्वा, जास्वंदीची फुलं घेऊन लगबगीने दर्शन घ्यायला निघाली. बाप्पा चा धावा करता करता. बाप्पा समोर आली. त्याच सुंदर रूप पाहून डोळे लागले, हात जोडले आणि काकड आरती सूरू झाली. मनातून नवस करू लागली. डोळ्यातून धारा वाहू लागल्या..कोणी पाहत तर नाही लपवत. डोळे पदराने टिपले.टाळ्या वाजवत होती. पिशवीतून जास्वंद, दुर्वा, मोदक काढून गणपती जवळच्या पुजारीच्या हातात दिल्या. चरणावर डोक ठेवून निघाली. प्रदक्षिणा पूर्ण करत करत जरा दोन मिनटं बसाव तर बसली.
अचानक हसत एक मुलगी जवळ आली हातात हात दिला. आरती बघत असताना. कोण हि म्हणून आरती तिला न्याहाळू लागली. आरतीला ओळख पटेना. पंजाबी ड्रेस मधली साधारण तिच्याच वयांची, केस छोटे मोकळे, चॉप लावलेली मुलगी कोण? प्रश्नाचे उत्तर शोधताना मनात आठवत असताना.
समोरची मुलगी - " ए तू आरती ना.. "आनंदाने हसू लागली. आरतीला मिठी मारू लागली.
आरती अचानक - " आई ग म्हणाली.. "
समोरची मुलगी - "का ग? काय झाले? मला अजून ओळखले नाही? आरतीच्या नजरेतला अनोळखी भाव पाहून अग मी भक्ती.. तुझी मैत्रीण असे काय करते?"
आरती - "अग हो की.. कशी आहेस भक्ती? किती वर्षांनी. कुठे असते? काय करतेस?"
भक्ती- " माझे सोड. तू का अशी झाली आहे? चेहऱ्यावर ती स्माईल नाही. तुझ्या चेहऱ्यावरची रयाच गेली.चप चप तेल लावून वेणी, साडी, काचेच्या बांगड्या. तुझ्या चेहऱ्यावरच तेजच हरपलं काय झाले काय तुला? जवळची मैत्रीण मला नाही ओळखले? तू पार बदलून गेली आहे. का? काय झाले "
आरती- " कुंकू, बांगड्या सौभाग्याचे लक्षण आहे. साडी भारतीय संस्कृती आहे.उगाच पश्चिमात्याचे आंधनुकरण करायच आणि आपल्या संस्कृती ला कमी का लेखायचं?"
भक्ती - "सासरी अनिवार्य केले का तुला साडी घाला. बांगड्या पाहिजेच. राहण्यावर पण बंधन. हे पळावं लोक नावं ठेवतात. अशी काय राहते. मागून कुजबुज करतात. खेड्यातली गावंढळ दिसते म्हणतात."
आरती- " हो.. सासूबाईना काचेच्या बांगड्या हातात पाहिजेच.त्यांची अपेक्षा. जाऊदे म्हणू दे लोकांना. आपल्याला पटेल तसे राहावे. लोक काय दोन्हीकडून बोलतील.मॉडर्नच्या नावाखाली उघड फिरलं. शॉर्ट घातले तर वाईट नजरा असतील. त्याला ही नावं ठेवतीलच."
भक्ती- "हे मात्र खरं. जाऊदे आपण इतक्या वर्षांनी भेटून काय बोलतोय. तू मगाशी काकड आरती मध्ये रडली का? निवांत वेळ आहे का? तू इकडे माहेरी आली का? मी पण माहेरी आले. बोलू, बसू जरा निवांत."
आरती -" खूप बोलायचं आहेच ग.. बरी मन मोकळे करायला जिवलग मैत्रीण भेटली. बऱ्याच वर्षाने. बाप्पा मुळेच. बोलू, बसू जरा निवांत."
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी -सांबरे
©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा