जलद कथा मालिका
त्या सुनेकडूनच अपेक्षा आणि त्याच ओझं भाग 2
त्या सुनेकडूनच अपेक्षा आणि त्याच ओझं भाग 2
भक्ती -"बोल काय म्हणतेस. ही बसले तुझ्या सोबत निवांत. काय योग जुळून आला आहे. कधी नव्हे ते नाही तर संसाराच्या राहाट गाडग्यात कुठे वेळ मिळतो. आपले कॉलेज चे दिवस काय छान होते. कसलं टेन्शन नाही. जवाबदारी नाही. आई -बाबांनी किती फुलात वाढवले आपल्याला. तू कुठे असतेस?."
आरती - "मी मुंबईला असते आणि तू?"
भक्ती - "मी पुण्यात. बोल बिनधास्त. तुला बरं वाटेल मन मोकळे केले तर. नंतर मी पण करेल."
आरती - "दोघीं घरी आईला कळवू म्हणजे त्यांना उगाच चिंता नको. दोघी माहेरी कळवतात ही मैत्रीण भेटली मंदिरात येतो तासाभरात."
आरती - "अग भक्ती काय काय सांगू तुला कसे सांगू.. यांच्या अपेक्षा सासरच्याच्या वाढतच चालल्या आहे. लग्न इथेच करा. हे मेनू पाहिजेच. यांचा मानपान पाहिजेच. इथलेच भारीचे कपडे पाहिजे. लग्नात फोर व्हिलर गाडी दिली. पहिले सगळे सण वार, धोंड्याचा महिना सोन देत देत पन्नास एक तोळे सोन दिले असेल. आई, वडिलांनी कर्ज काढून ठेवल माझ्यासाठी. सगळी भांडी कुंडी पूर्ण संसार थाटून दिला आहे माझा. त्यांच्या म्हातारपणी दुखणी, खुपणी त्यांची सेविंग नको का?"
भक्ती - "बापरे.. काय भिकारचोट आहे. काय मागतात. स्वतःच्या बळावर घ्या म्हणा. यांच्या मनगटात जोर नाही का? काय हे.. शी.. हुंडा देणं - घेणं कायद्याने गुन्हा आहे."
आरती - " अगं सासू, सासरे, नणंद, नवरा, दिर सारखे सगळ्यांना सणावारी भारी कपडे केले. त्यांच्या आवडीने घेतले दुकानात. वर काय कपड्यातच पैसा घातला काय कामाचा शेवटी चिंध्याच होतात त्या."
भक्ती -"काय हे.."
आरती - " अगं आता मारू लागले मला परवा नणंदेनी, नवऱ्याने मागून पाठीला चटका दिला आहे. अजून आई - बाबांना, दादा ला सांगतिले नाही. त्यांना टेन्शन नको म्हणून.त्यांनी मला माहेरी पाठवले आहे. नवऱ्याला आयफोन पाहिजे तो माहेराहून घेऊन ये."
भक्ती - " बापरे.. हद्द झाली आता.. काय हे.. म्हूणन मगाशी मी मिठी मारली आई गं कळवळून म्हणाली. तू अन्याय सहन करू नको. अन्याय सहन का करतेस? मार खायचा नाही. तू शिकलेली आहेस नोकरी कर आपल्या पायावर उभी रहा. सोडून दे घटस्फोट घे."
आरती - " आई वडील म्हणतात सासरच तुझं घरं आहे. तुझं लग्न मोडू नाही म्हणून इतकं दिले. लग्न मोडले लोक काय म्हणतील? "
भक्ती - "अवघडच आहे. स्त्री जन्मच. जग बदललं म्हणतो आपण तरी अजून असे कानावर पडावं. जग बदललं पण स्त्रीच्या बाबतीत नाही. माझ्या लग्नाला तीन वर्ष झाले. सासूबाई चे सतत टोमणे. तू तुझ्या आई वरच पडली का? माझ्या आईच नावं कशाला घेतात हे. तुझ्या आईला पहिले पाच वर्ष मुलबाळ नव्हतं. त्यांना तू तेवढीच एकच मुलगी. आम्हाला मुलगा पाहिजे कळले का? वैताग आहे नुसता. आणि आता शुक्राणू चे प्रमाण यांच्यातच कमी आहे कळले आता यांना गोळया आता कुठे सासूबाई बोलते"
आरती -" अगंबाई मी आता प्रेग्नन्ट आहे. सगळ्यांना माहीत आहे. काही कौतुक नाही. बाळाचं, संसाराच सगळं चांगल होऊ दे म्हणून बाप्पा कडे आले. आईला बरं नाही. दवाखाने चालू आहे. कोणत्या तोंडाने आयफोन मागू सांग."
क्रमशः
सौ. भाग्यश्री चाटी सांबरे
©®
©®
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा