Login

त्या सुनेकडूनच अपेक्षा आणि त्याच ओझं भाग 3 अंतिम

Tya Sunekadunch Apeksha Aani Tyach Ozh
जलद कथा मालिका
त्या सुनेकडूनच अपेक्षा आणि त्याच ओझं अंतिम भाग 3

आरती - "काही आयफोन मागणार नाही आई, बाबांना कशाला त्रास? उद्या सासरी निघायचं."

भक्ती - " खंबीर हो. अन्याय सहन करू नकोस. उगाच मार खायचा नाहीच. का सहन करायचा? बाळाला, स्वतः ला जप.. "

आरती - " तुही जप स्वतःला. भेटू परत. भक्ती तुला बोलून खूप मन हलकं झाले."

भक्ती - " काय खावं वाटत सांग तुला? "

आरती -" पाणीपुरी"

भक्ती- "चल माझ्या कडून. दोघी खातात निघतात. माहेरी. फोन नंबर एकमेकींना देतात. काही कामं पडलं सांग म्हणतात. मस्त पाणीपुरी खातात. मनसोक्त"


आरती तिसऱ्या दिवशी सासरी जाते. आयफोन आणला नाही म्हणून आरतीला सासू, नणंद, नवरा घेरतात. मारायला लागतात. आरती ओरडते. "माझे बाळ.. " काठी ओढून घेते ज्याने मारतात. ओरडते म्हणून सगळे चिडतात. सासरचे आरती, बाळ यांचा विचार करत नाही. काही दया, माया नाही. नणंद तोंडात बोळा कोंबते. सासू हात धरते. नवरा तिला जाळायला येतो. आरती एकटी किती प्रतिकार करणायचा प्रयत्न करेल तितका करत होती. दिर येऊन पाय धरतो. नवरा, पेट्रोल टाकतो. काडी ओढतो. तिने पेट धरताच सगळे लांब होतात. नवरा, सासू आरती ला शिव्या देत असतात. आरती बोळा काढायचा प्रयत्न करते. आग तिला वेढून घेते. मोठया ज्वाला तिला वेढून तिचं, बाळाचं अस्तित्व संपवण्याचा प्रयत्न करतात. तिच्या बाळावर आले मग ती तशीच यांना धडा शिकवायचा म्हूणन नवऱ्याला मिठी मारते. नवरा पेट घेतो. सासू ओरडायला लागते मग आरती खूप जळत आली असते. शेवटी सासूच्या जवळ जाते सासू लांब पळताना पडते. आरती तिच्याच अंगावर मुदाम पडते. सासू पण पेट घेते. आरती आणि तिच्या बाळाला त्रास देणाऱ्याना तिने जाळून बदला घेतला. आरतीने अन्यायाचा बदला घेतला. तिने शेवटच्या श्वासापर्यंत एकटीने झुंज दिली. तिने जमेल तशी आपली लढाई लढली. ती झाशीची राणी आहे हेच सिद्ध केले. या समाधानात आरती ने प्राण सोडला.


मग नणंद आरडा ओरडा, कांगावा करायला सुरुवात करते.. आरती ने सासू, नवऱ्याला पण जाळले. नणंद मोठयाने रडू लागली.


समाप्त