#जलद लेखन स्पर्धा -२०२५
विषय:- नात्यातील अंतर
शीर्षक:- त्या वळणावर
भाग:- ३
मागील भागात:-
रमण आणि ईशा यांची क्लास दरम्यान रोज भेट होऊ लागली. तो दररोज न चुकता काॅलेजला जाऊ लागला.
हळूहळू रमणच्या मनात ईशाबद्दल एक वेगळीच फिलिंग निर्माण झाली. तिचं हसणं, बोलणं, शिकवण त्याला आवडू लागलं.
आता पुढे:-
एकदा ईशा रिक्षाची वाट पाहत उभारली होती. नेमका रमण तिथे आला. त्याला जेव्हा कळलं ती घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहतेय, पण एकही रिक्षा फुल्ल असल्याने थांबली नाही. तेव्हा तो तिला घरी सोडण्याबद्दल विचारतो. तेव्हा ती आभार मानत नम्रपणे नकार देत बाईकची भीती वाटते. त्या दिवशीही ती घाईत असल्याने जीव मुठीत घेऊन बाईकवर बसल्याचे सांगते. तेव्हा तो आश्चर्य व्यक्त करतो. रिक्षा येईपर्यंत तो कंपनी देईल म्हणत थांबतो. बऱ्याच वेळ थांबूनही रिक्षा मिळत नाही तेव्हा ती पायी जाण्याचे ठरवत त्याला जायला सांगते. पण तो तिला एकटीला सोडून जाण्यास तयार नसतो. तो तिच्यासोबत पायी येण्याचा हट्ट करतो. तेव्हा ती नाईलाजाने तयार होते. दोघेही बोलत सोबत तिच्या घराच्या दिशेने चालू लागतात.
"इतके दिवस झाले आपण एकमेकांना ओळखतो पण एकमेकांबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही फक्त नावाशिवाय. तर जरा तुमच्याबद्दल सांगा ना, प्लीज. म्हणजे तुमची इच्छा असेल तर काही जबरदस्ती नाही. मी असंच विचारलं, म्हणजे बोलत बोलत रस्ता लवकर संपेल. बस इतकंच." तो पॅंटीच्या दोन्ही खिशात हात घालत हळूच एक नजर तिच्यावर टाकत म्हणाला.
"मग तर तूच सुरूवात करं. तुझ्याबद्दल सांग." ती त्याला म्हणाली.
"अम्म..माझ्याबद्दल सांगायला तसतर काहीच नाही. मी एकदम बोरींग पर्सन आहे. ते सोडा, तुम्ही सांगा." तो सुस्कारा टाकत खांदे उडवत म्हणाला.
"मी टिचर असलेली तर तुला माहितीच आहे. मला कुकिंग करायला खूप आवडतं. शिकवायला आवडतं म्हणून तुम्हांला सर्वांना शिकवते. घरी आईबाबा आहेत. ज्यांच्यावर मी खूप प्रेम करते. थोडक्यात काय तर ते माझे जीवन आहेत. बस्स इतकंच." ती हसत म्हणाली.
"तुम्ही ना सेम माझ्या दीसारख्या आहात. तिचं लग्न झालंय पण तरीही तिला माझी आणि पप्पांची खूप काळजी असते. अधूनमधून ती घरी येते. आई नाही ना म्हणून. सगळे लकी नसतात." तो उदास हसत म्हणाला.
तिला वाईट वाटले, ती एकदम शांत झालेली त्याने विषय बदलत कुकिंगबद्दल बोलू लागला. तिची आवड निवड विचारले. तेव्हा तिला पेस्ट्री आणि कोल्ड कॉफी आवडते असे सांगितले. बोलता बोलता कधी तिचं घरं आले हेही कळलं नाही.
तिला घरी सोडून तो निघून गेला.
असेच दिवस निघून गेले. त्याला तिचा सहवास आवडू लागला. त्याने तिच्याकडे मैत्रीसाठी म्हटलं तर तिनेही हसत हसत होकार दिला.
टिचर आणि स्टुडंट्स मध्ये फ्रेंडशिपची बाॅंड निर्माण झाली होती. तो सर्वकाही तिच्याशी शेअर करू लागला.
एकदा त्याने तिला सोबत फिरायला येण्यास विचारले. तेव्हा तिने आधी नकार दिला पण नंतर त्याने खूप गळ घातल्यावर ती तयार झाली.
दोघेही सागर किनारी गेले. तेही बाईकवर. तिला बाईकची भीती घालवायची होती म्हणून.
सागर किनाऱ्यावर दोघेही मनसोक्त गप्पा मारत फिरत होते. बोलता बोलता त्याने त्याच्या वडिलांबद्दल सांगितले.
"माझे आणि पप्पांचे पटत नाही. जेव्हा पासून माॅम आम्हाला सोडून गेली तेव्हापासून ते खूप चिडचिडे झालेत. मी काही बोललो, काही करायचो म्हंटले की ते खूप ओरडतात. मग मलाही राग येतो आणि रागात मीही बोलून जातो. नंतर वाईट वाटतं. मी बोलायचा प्रयत्न करतो पण ते बोलायला तयार नसतात. कदाचित आमच्यातील जनरेशन गॅप असेल." तो त्याचं मन तिच्यासमोर रितं करत म्हणाला.
"रमण, तुला सांगू का?" ती त्याच्याकडे पाहत म्हणाली.
त्याने होकारार्थी मान डोलावली.
"तुझे पप्पाही तुझ्या माॅमच्या जाण्याने एकटे पडलेत. जशी तुला तिची कमी जाणवते तशीच कमी त्यांनाही जाणवत असेल. तुला सुख दुःख शेअर करायला तुझी दी आहे पण त्यांचं काय याचा विचार केलास का कधी? " तिच्या या प्रश्नावर तो निरूत्तर झाला.
खरंच की या गोष्टीचा विचार त्याने कधी केलाच नव्हता. त्याला स्वतःलाच कसंतरीच वाटलं.
"अजून एक रमण. आपले आईवडील नेहमी आपल्या चांगल्यासाठी आपल्याला ओरडतात. आपल्याकडून त्यांच्या काही अपेक्षा असतात. ते सांगताना कदाचित त्यांना जमत नसेल, किंवा ते बोलणं रूड असेल. पण भावना साफ असतात. वयानुसार त्यांच्यात बालपण डोकावतं. आपण मोठे होते जातो आणि ते छोटे होत जातात. एकदा त्यांच्या बाजूने विचार करून बघं." ती त्याला समजावून सांगू लागली.
तो लक्षपूर्वक तिचे बोलणे ऐकत होता.
"हम्म.. आय कॅन अंडरस्टँड. आय विल ट्राय." तो होकारार्थी मान डोलावत म्हणाला.
"गुड, चल घरी जाऊ या. खूप उशीर झालाय." ती मनगटातील घड्याळाकडे पाहत म्हणाली.
तिला सोडून तो घरी आला. घरी आल्यावरही त्याला तिचे बोलणे आठवत होते. तो आता रघुनाथ यांना समजून घेण्याचा प्रयत्न करू लागला.
दुसऱ्या दिवशी तो त्यांच्यासाठी नाश्ता बनवून सोबत एक चिठ्ठी ठेवून काॅलेजला गेला.
त्यावर लिहिलं होतं ,"पप्पा, आय एम साॅरी. तुमच्याशी जे वागलो त्यासाठी."
रघुनाथ यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले. "आय एम अल्सो साॅरी, माय सन." असे म्हणत त्यांनी त्या चिठ्ठीवर ओठ टेकवत ती चिठ्ठी हृदयाशी लावून घेतली.
त्यातील बदल त्यांना जाणवत होते. ते कोणामुळे होतंय हे त्यांना शोधून काढायचे होते. तुर्तास तर त्यांनी शांत राहणे पसंत केले. योग्य वेळं आल्यावर त्याला विचारू असा त्यांनी विचार केला.
रमणच्या मनात तर ईशाबद्दल प्रेम भावना निर्माण होऊ लागली. पण त्याला अजून तरी ते प्रेम आहे हे लक्षात येत नव्हते.
क्रमशः
रमणने जर त्याचे प्रेम व्यक्त केले तर ईशा मान्य करेल का? रघुनाथला त्या व्यक्तीबद्दल माहिती होईल का?
जयश्री शिंदे
प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. कथेतील घटना, पात्र, स्थान यांचा वास्तवाशी, जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा