Login

त्या वळणावर.. (भाग:- ४)

बाप लेकाच्या नात्यातील अंतर दूर करण्यास कारणीभूत असणारी ईशा त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या तिच्या प्रेमात पडणाऱ्या रमणची कथा
#जलद लेखन स्पर्धा - २०२५

विषय:- नात्यातील अंतर

शीर्षक:- त्या वळणावर

भाग:- ४

मागील भागात:-

रमणच्या मनात तर ईशाबद्दल प्रेम भावना निर्माण होऊ लागली.‌ पण त्याला अजून तरी ते प्रेम आहे हे लक्षात येत‌ नव्हते.‌

आता पुढे:-

तीन महिन्यानंतर-

ईशाने क्लासमध्ये अनाउन्समेंट केलं, "हॅलो, एव्हरीवन, लिसन केअरफुली, टुडे इज अ सरप्राइज फाॅर यू.‌ आज जी काॅम्पिटिशन आहे त्यात तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही एक डिश बनवा. ज्याची टेस्ट सगळ्यांत बेस्ट असेल तो विनर असेल. त्याला इंटर्नशीप भेटेल. सो, गेट रेडी फाॅर दॅट, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू. लेट्स स्टार्ट."

सर्वांचे हात सराईतपणे चालू लागले. प्रत्येकजण आपापले बेस्ट देण्याचा प्रयत्न करू लागले. वेळ संपल्याचे तिने जाहिर करताच सगळ्यांनी बनवलेली डीश आपल्या पुढ्यात ठेवले. ती आणि बाकी जज प्रत्येकाची डीश चाखून बघू लागले. रमणने बनवलेली डीश विनर ठरली. ज्याला त्याला खूप आनंद झाला.

"क्राॅंग्रॅच्युलेशन‌ मिस्टर रमण, यूवर डीश इज सो डेलिशियस, यू गाॅट इंटर्नशीप. किप इट अप." तिने टाळ्या वाजवून त्याचे अभिनंदन केले.

त्याला खूप आनंद झाला.

एका महिन्याच्या इंटर्नशीप नंतर जेव्हा त्याला पहिला चेक मिळाला तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला.‌ त्याच्या आयुष्यातील पहिली मेहनतीची कमाई जी त्याला ईशाने प्रोत्साहन दिल्यामुळे तो हे करू शकला असे त्याला वाटलं. सर्वात आधी ही बातमी तिला द्यावी म्हणून तो आर्धी सुट्टी घेऊन तिच्याकडे गेला.

तिच्या हातात त्याने पहिल्या कमाईचे चेक ठेवले आणि त्या आनंदात त्याने तिला मिठी मारत म्हणाला,"थॅंक्यू मॅम, हे तुमच्यामुळे होऊ शकले."

त्याच्या मिठी मारण्याने आधी तर ती गडबडून गेली, नंतर त्याला बाजूला करत ती म्हणाली," मी काही नाही केले, तुझ्या मेहनतीचे फळ आहे हे. हे तुझ्या पप्पांच्या हाती ठेव बघ कसे ते प्राऊड फिल करतील."

"हो, साॅरी ते भावनेच्या भरात मी.." तो मान खाली घालून तिला म्हणाला.

"इट्स ओके. मी समजू शकते. बाय द वे काॅंग्रॅच्युलेशन. आय एम व्हेरी हॅपी फाॅर यू." ती त्याच्या हातात हात मिळवत हसत म्हणाली.

तिचे आभार मानत तो घरी गेला. वाटेतच त्याने काॅल करून सिम्मीला ही बातमी कळवली तिलाही या गोष्टीचा खूप आनंद झाला.

रघुनाथ एकटेच रूममध्ये पुस्तक वाचत बसले होती. तो दबकत त्यांच्याजवळ आला. तो चेक त्यांच्या समोरील टीपाॅयवर ठेवत म्हणाला," पप्पा, ही माझी पहिली कमाई.‌"

त्यांनी एकदा त्या चेककडे आणि एकदा त्याच्याकडे पाहले. नंतर काही न बोलता पुन्हा पुस्तक वाचत बसले. तोही काहीच न बोलता तेथून निघून गेला.

तो निघून गेल्यावर मात्र रघुनाथ यांनी तो चेक हातात घेऊन त्यावरून हळूवारपणे हात फिरवत पुटपुटले," माझ्या रमूची पहिली कमाई. माझा मुलगा जबाबदार झाला, आय एम व्हेरी ग्लॅड ॲण्ड प्राऊड ऑफ हिम."

तो चेक ठेवतानाच त्यांना भरून आलं होतं. पण चेहऱ्यावर तसे त्यांनी दाखवले नव्हते. आता मात्र त्यांना फार छान वाटले होते.

असेच काही दिवस निघून गेले. रमणला कळून चुकले की तो ईशाच्या प्रेमात पडलाय. त्याच्या भावना तिच्याजवळ व्यक्त करायचे त्याने मनात ठरवले. ते सांगण्यासाठी तो तिच्या काॅलेज सुटण्याच्या वेळी तो तिची वाट पाहत गेटजवळ येऊन थांबला.

ती बाहेर पडताच खूप महत्त्वाचे बोलायचे आहे असे म्हणत एका शांत ठिकाणी घेऊन आला. आधी तिच्या आवडीची त्याने बनवलेली पेस्ट्री खायला दिली.

"छान झाली आहे. हे देण्यासाठी तू मला इथे आणले आहेस का तू? काय बोलायचे आहे ते बोल पटकन." ती कपाळावर आट्या पाडत त्याच्या डोळ्यांकडे पाहत म्हणाली.

"ॲकच्युली, कसे सांगू ते कळतं नाही? पण ही गोष्ट मी आता जास्त वेळ मनात ठेवू शकत नाही. आजकाल सगळ्या गोष्टी मी परफेक्ट करतो. प्रत्येक वेळी तुम्ही दिसता. काही अडले की तुम्ही काय केले असते ते इमॅजिन करून करतो. खरंच मॅम नाही माहिती कधी, कसं मी तुमच्यावर प्रेम करू लागले. आय रियली लव्ह यू, मॅम. आय कान्ट लिव्ह विथाऊट यू." तो तिचा हात हातात घेऊन तिच्या‌ डोळ्यांत डोळे घालून मनापासून म्हणाला.‌

हे ऐकून तिने मात्र पटकन तिचा हात काढून घेत त्यांच्यापासून लांब होतं रागात म्हणाली," व्हाॅट नाॅनसेन्स ? वेड लागलंय का तुला? तुला कळतंय का तू काय बोलतोस ते ? शुद्धीत तर आहेस तू?"

"मी पूर्ण शुद्धीत आहे. खरं तेच बोलतोय. हो, वेड लागलंय मला तुमच्या प्रेमाचं. यात काहीच चुकीचे नाही." तो तिच्या जवळ जात अगतिक होऊन म्हणाला.

हाताचा पंजा दाखवत त्याला थांबवत ती म्हणाली," मी तुझ्या पेक्षा मोठी आहे वयाने याचा तरी विचार करायचा. तू जे म्हणतोस ना त्याला प्रेम म्हणत नाहीत आकर्षक म्हणतात. प्लीज इथून पुढे मला भेटायचा प्रयत्न करू नकोस. बाय."

"काय झालं तुम्ही मोठे असलात तर. माझं खरंच प्रेम आहे तुमच्यावर ते आकर्षण नाही. कसं समजावून सांगू तुम्हाला? " तो अस्वस्थ होत केसांवर हात फिरवत म्हणाला.

"मला काहीही सांगू नकोस, मला काहीही ऐकायचे नाही, सांगितले ना तुला. बाय."

त्याचे काहीही ऐकून न घेता तिने तिथे ठेवलेली तिची पर्स खांद्यावर अडकवत तिथून तडक निघून गेली.

तो पाठीमागे तिला आवाज देत तिला थांबवाचा प्रयत्न करत होता पण सगळे व्यर्थ गेले.

तो निराश होत घरी गेला. सिम्मी घरी आली होती. त्याचा उतरलेला चेहरा पाहून काय झाले म्हणून तिने विचारले तर तो तिच्या कमरेला विळखा घालून ढसाढसा रडू लागला.

रडत रडतच त्याने सगळे सांगितले. तिला ईशाचा रागच आला. तिने सगळं ठीक होईल असा दिलासा देत त्याला शांत केले.

क्रमशः

काय करेल सिम्मी?

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. कथेतील घटना, पात्र, स्थान यांचा वास्तवाशी, जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all