Login

त्या वळणावर.. (भाग:-२)

बाप लेकातील नात्यातील अंतर दूर करण्यास कारणीभूत ठरणारी ईशा, त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या तिच्या प्रेमात पडणाऱ्या रमणची कथा
#जलद लेखन स्पर्धा -२०२५

विषय:- नात्यातील अंतर

शीर्षक:- त्या वळणावर

भाग:- २

मागील भागात:-

"मी समजावते त्याला. तुम्ही काळजी करू नका. तुम्ही जा मी बघते.‌" ती त्यांना विनंती करत म्हणाली.

"समजावून सांग याला, म्हणावं बाप आयुष्यभर पुरणार नाही." ते रागात हातवारे करत म्हणाले आणि तेथून निघून गेले.

ते तेथून निघून जाताच तोही रागात कपडे बदलून बाहेर निघून गेला.‌

आता पुढे:-

रमण जाताना सिम्मीने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला ; पण तो इतका रागात होता की तिचं काहीच न ऐकता तो बाईकची चावी घेऊन घराबाहेर पडला.

ती पाठीमागे आवाज देत राहिली ; परंतु त्याने कोणताच प्रतिसाद दिला नाही. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत ती हताश होत स्वतःलाच म्हणाली,"अवघड आहे या दोघांचे. कधी या दोघांच्या नात्यातील अंतर मिटणार काय माहित? सिम्मी तुलाच काही तरी करायला हवं यासाठी."

खूप विचार करून तिने मनात काही तरी ठरवलं आणि ती तिच्या कामाला लागली.

रमण बाईक चालवत एका वळणावर आला. अचानक‌ एक मुलगी खाली पडलेली त्याला दिसली. दोन गुंड तिच्या गळ्यातील चैन ओढून घेतलं आणि तिला धक्का देऊन खाली पाडलं आणि ते पळू लागले. ती हाताच्या कोपऱ्यावर पडल्याने वेदनेने कळवळली.

तिला पडलेलं पाहतच त्याने बाईक थांबवली. त्या गुंडांना ओरडत तेथील दोन-तीन दगड त्यांना भिरकावून मारले. त्यातील एकाच्या पाठीत तो दगड बसला तसा तो खाली पडून धडपडत उठून पुन्हा पळायला लागला. तसा तो त्याच्या मागे पळणार तोच ती मुलगी विव्हळत म्हणाली, "आह ! जाऊ द्या मिस्टर, ते गुंड आहेत. एवढ्या सहज हाती लागणार नाहीत. मी कम्प्लेंट करेन नंतर."

ती हात पकडून उठण्याचा प्रयत्न करूत होती ; तिला लवकर उठता येत नव्हते. ती तसे म्हणताच तो गुंडांच्या मागे न जाता तिच्याकडे धावत आला.

"आर यू ऑल राईट, मॅम ?" तो तिला मदतीसाठी हात पुढे करत म्हणाला.

"या एम ऑल राईट. थोडंसं खरचटले आहे." ती त्याच्या हातात हात न देता कपडे झटकत उठून उभी राहिली.

एका अनोळखी पुरुषाच्या हातात हात देणं तिला योग्य वाटलं नाही हे त्याच्या लक्षात आल्याने त्याने हात मागे घेतला.

तिची पडलेली पर्स आणि चश्मा त्याने उचलून तिला दिला.

" इफ यू डोन्ट माईंड, कॅन आय ड्राॅप यू? तसंही तुम्हाला लागलं आहे आणि आता एवढ्या सकाळी तुम्हाला रिक्षाही मिळणार नाही. म्हणून म्हणतोय." तो बिचकत तिच्या लागलेल्या हाताकडे पाहत म्हणाला.

ती हाताला पकडून विचार करू‌ लागली.

" डोन्ट वरी, मॅम. मी चांगल्या घरातला मुलगा आहे. मी फक्त तुम्हाला मदत करण्याच्या उद्देशाने म्हणतोय. बाकी तुमची मर्जी." तिला कदाचित ऑकवर्डनेस वाटत असेल एका अनोळखीकडून मदत घेणे म्हणून तो पुन्हा म्हणाला.

"अम्म, ठीक आहे, मला त्या कोपऱ्यावर सोडा. तेथून जवळच माझं घर आहे." तो एवढं विश्वासाने बोलतोय त्यात तिचा हातही ठणकत होता. म्हणून तिने त्याची मदत घ्यायचे ठरवले. बिचकतच ती अंतर राखून बाईकवर बसली. त्याने तिला सांगितलेल्या जागेवर सोडले.

" थॅंक्यू सो मच, मिस्टर. एक अनोळखी असूनही इतकी मदत करण्यासाठी." तिने मनापासून त्याचे आभार मानले. त्यानेही हसत तिला निरोप घेतला.

पण त्याला कुठे माहित होतं की त्या वळणावर झालेली तिची भेट पुढे त्याचे आयुष्य वेगळ्या‌ वळणावर जाणार होतं.

दोन दिवसांनी सिम्मीने त्याला एक फाॅर्म दिला. तो हाॅटेल मॅनेजमेंटच्या कोर्स पाहून त्याच्या डोळ्यांत चमक आली आणि चेहरा आनंदाने खुलला. पण रघुनाथ यांचा चेहरा समोर येताच त्याचा चेहरा उतरला. तिला ते लक्षात येताच ती त्याच्या गालावर हात ठेवत म्हणाली, " छोटे, तू पप्पांची काळजी करू नकोस. मी संभाळून घेईन, समजावेन त्यांना."

तो आनंदाने तिला बिलगून म्हणाला,"लव्ह यू सो मच, दी. फक्त तूच आहेस जे मला समजावून घेऊ शकतेस."

"लव्ह यू टू, छोटे. तुझ्या आवडीच्या क्षेत्र तुला भेटते आहे तुला त्यात जोखून दे. प्रुव्ह यूवरसेल्फ. " तीही त्याला गळ्याशी लावून घेत पाठीवरून हात फिरवत म्हणाली.

" हो दी. आय प्रॉमिस यू, आय कॅन प्रूव्ह मायसेल्फ. डोन्ट वरी. मी तुला निराश करणार नाही." तो तिचा हात हातात घेत म्हणाला.

"आय नो दॅट, ऑल द बेस्ट." ती हसत त्याला म्हणाली.

पहिल्या दिशवी तो काॅलेजमध्ये गेला. क्लास ऑलरेडी भरला होता. तो त्याच्या जागेवर पटकन येऊन उभा राहिला.

"मला वाटतं सगळे स्टुडंट्स आले आहेत. तर आजचा पहिला टास्क घेऊ चाॅपिंगचा.‌ तुम्ही हा कोर्स निवडला आहे तर तुम्हाला हे बेसिकली येत असेलच." मागून टिचरचा मंजूळ आवाज त्याच्या कानी पडला. तो आवाज त्याला ओळखीचा वाटला. तो मागे वळून पाहणार तोच तिचा आवाज आला,"लेट्स स्टार्ट नाऊ ! "

त्याने वळून बघणे कॅन्सल करत पटपट चाॅपिंग करायला सुरुवात केली. तो एखाद्या मुरलेल्या शेफ सारखं पटपट, सफाईने भाज्या कट करू लागला. ते पाहून ती टिचर त्याला म्हणाली," व्हेरी गुड मिस्टर."

तिने असे म्हणायला आणि तो हसत "थॅंक्यू मॅम" म्हणत मान वर करायला एकच गाठ पडली.

"ओह ! तुम्ही ? " दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहत पुन्हा एकसाथ म्हणाले.

त्या वळणावर भेटलेली तीच मुलगी आज त्याची टिचर होती.

"अम्म, मी ईशा, इथे शिकवायला आहे, हे तर तुला कळलेच असेल. बाय द वे. थॅंक्यू वन्स अगेन, त्या दिवशी हेल्प केल्याबद्दल." ती हसत म्हणाली.

" काय मॅम? किती वेळा थॅंक्यू म्हणणार आहात. तुमच्या जागी कोणी असलं असतं तरी मी तेच केलं असतं." तोही हसत म्हणाला.

"नाही रे, अशी माणुसकी आजकाल कोणी दाखवत नाही. ते पण एका अनोळखीसाठी. म्हणून थॅंक्यू म्हणाले.‌ असो कर तुझं काम." असे म्हणत ती पुढच्या स्टुडंट्सकडे वळली.

तो गालात हसत त्याचं काम करू लागला.

रमण आणि ईशा यांची क्लास दरम्यान रोज भेट होऊ लागली. तो दररोज न चुकता काॅलेजला जाऊ लागला.

हळूहळू रमणच्या मनात ईशाबद्दल एक वेगळीच फिलिंग निर्माण झाली. तिचं हसणं, बोलणं, शिकवण त्याला आवडू लागलं.

क्रमश:

रमणच्या मनातले ईशाला कळेल का?

जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे. कथेतील घटना, पात्र, स्थान यांचा वास्तवाशी, जीवीत अथवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही. तसे आढळून आल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.


0

🎭 Series Post

View all