Login

त्या वळणावर

निनाद चे डोळे पाहून प्राजक्ता चमकली,
भाग पहिला विषय –*त्या वळणावर*

*ते सर्व तू विसरून जा*


आज शाळेतून पियूला घ्यायला जात असताना प्राजक्ताला वाटेत पूनम तिची मैत्रीण भेटली . पूनम समोरच्या मल्टी मध्ये राहते. पूनम ला या सोसायटीत रहायला यैऊन चार सहा महिने च झाले होते, पण या अल्प कालावधीतच दोघींचे सूर जुळले होते आणि घट्ट मैत्री झाली
"एक काम करशील प्राजक्ता! माझ्या निनाद ला घेऊन येशील ?"
‘हो पण् निनाद कोणत्या सेक्शनला आहे?'

‘ के.जी टू बी मध्ये , पियू ओळखते त्याला.'

बरं, पण ते स्कूल वाले पाठवतील कां?'


' अग मी गेले असते पण आज कामवाली आली नाही, आणि ह्याचे बाबाही इथे नाही.'

बरं आणते.

स्कूल मधे पियू वाटच पाहत होती, पियू ' निनाद कोण गं 'विचारताच, धावत जाऊन त्याला घेऊन आली.प्राजक्ताने मॅडमशी पूनम च फोनवर बोलणं करून दिलं.

निनाद आणि पियू दोघ धावतच स्कूटर जवळ आले.निनाद ला पाहून प्राजक्ता चमकली. ह्याचे डोळे--- कुठेतरी पाहिल्यासारखे कां वाटतात आहे? घरी पोहचेपर्यंत प्राजक्ता हाच विचार करत होती.
पण घरी गेल्यावर ती सर्व विसरली

मम्मा ऐकना, पुढच्या आठवड्यात आमची पिकनिक आहे टैगोर गार्डन ला, पियू नेसांगितलं आणि बरोबर काय काय द्यायचे याची लिस्ट दिली.
मम्मा आमच्या दोन्ही सेक्शन ची पिकनिक आहे मला चार सॅन्डविच दे. मी आणि निनाद शेयर करु.

पिकनिक हूनआल्यावर पियूची मनीष जवळ बडबड चालू होती "बाबा आम्हाला शाळेत निनाद चे पप्पा घ्यायला आले होते .त्याच्या बाबांचे नाव प्रशांत आहे".


किचन आवरता आवरता प्रशांत नाव कानांवर पडताच , प्राजक्ता चमकली, तिला निनाद चे डोळे आठवले, प्रशांत ….मनाचा डोह ढवळून निघाला. जुन्या आठवणी, वर येऊन तिच्या समोर फेर धरून नाचू लागल्या.


काॅलेजकन्या प्राजक्ता बराच वेळ झाला प्रशांत ची वाट पाहत तलावा काठी बसली होती. आज ती जरा लवकर आली होती.

सूर्य पश्चिमेकडे नुकताच झुकला होता पक्षी गण थव्याथव्याने घरट्याकडे परतत होते.

बराच वेळ ती बसून होती. प्रशांत आजही आला नव्हता. गेले तीन-चार दिवस झाले रोज ती तलावाकाठी त्याची वाट पाहत असे. आज त्याने येतो असे फोन वर सांगितले होते.हे त्यांचे भेटण्याचे स्थान होते.
बसल्या बसल्या तिने पाण्यात एक खडा टाकला तशी पाण्यात एका मागून एक वलय येऊ लागली त्यांकडे पहात प्राजक्ताला तिची आणि प्रशांत ची पहिली भेट आठवली.

कॉलेजच्या पहिल्या वर्षाला प्राजक्ता होती. त्या दिवशी प्राजक्ताला घरून निघायला उशीर झाला होता , वाटेत तिच्या सायकलची चेन निघाली खाली बसून ती चेंन ला फ्री व्हील मध्ये अडकवायचा प्रयत्न करत होती पण ते काही जमत नव्हते. त्यात ओढणी पण व्हील मध्ये अडकली होती.
'मी काही मदत करू का?' आवाजाच्या दिशेने तिने पाहिले मोटरसायकल वर एक तरुण उभा होता स्मार्ट सावळा ,कुरळ केसांचा.
'नको ,मी करते' म्हणत प्राजक्ता परत सायकलचे पेडल उलट फिरवू लागली,तेवढ्यात सायकल स्टॅन्ड वरून घसरली व तिच्या अंगावर पडली.
तिच्यावर पडलेली सायकल त्या तरुणाने उभी करून तिची ओढणी अलगद सोडवली व चेन लावून प्राजक्ताला हात देऊन उभ केलं.

झाल्या प्रकाराने प्राजक्ता खूपच भांबावून गेली तिला साधं थँक्स म्हणायचं ही सुचलं नाही तेवढ्यात तो तरुण गाडी घेऊन निघूनही गेला.


घरी पोहचल्यावर कपड़े बदलून घडी करताना तिच्या लक्षात आले ओढणीला तेलकट डाग लागले आहेत आई विचारेल नवीन ड्रेस पहिल्यांदा घातला आणि हे काय झाले? तिने पट्कन घडी घालून अलमारीत लपवून ठेवले.

दोन-चार दिवसांनी कॉलेजात मैत्रिण सोनाली सोबत कॉरिडोर मध्ये बोलत असताना तो दिसला.

बोलू कि नको प्राजक्ता च्या मनात चलबिचल होत होती शेवटी हिम्मत करूनतिने पुढे जाऊन त्याला 'थँक्स त्या दिवशीच्या मदतीसाठी 'म्हटले.

' अरे वा-- बरीच मजल मारली सोनाली ने तिला चिमटा काढत म्हटले.'
'अगं मी ओळखत ही नाही ,नांव ही नाही ठाऊक.
' प्रशांत आहे तो, फायनल ईयरचा , बऱ्याच मुलींचा डोळा आहे त्याच्यावर. बडे बाप का बेटा, पण चांगला आहे.

पुढे पुढे तिची व प्रशांत ची काॅलेज मधे भेट होत गेली . लवकरच तिला जाणवलं की प्रशांत प्राजक्ताच्या घाऱ्या डोळ्यात बंदिस्त आहे तर प्राजक्ता त्याच्या कुरळ केसांच्या झुपक्यांमध्ये आपले मन हरवून बसलीआहे.

दोघं आता नियमित भेटत असत एक दिवस हीभेट नाही झाली तरी दोघांना करमत नसे.एक वर्ष असेच निघून गेले प्रशांत चे फायनल झाले त्याला पुढच्या शिक्षणाकरता बाहेर जावे लागणार होते, जायच्या आधी घरी बोलून ठेवतो म्हणाला होता

प्रशांत कां नाही आला ?
क्रमशः….
—----------------------------------------------