Login

त्याचे तुटक वागणं भाग दोन

Will Raj Know Truth


राधालाही पूर्णपणे अमोलचे म्हणणे पटले होते. राजचे अमोलशी वागणे राधाला अजिबात आवडले नव्हते . संध्याकाळी राज काकाच्या पार्टीसाठी कामावरून लवकर आला.

राज फारच उत्सुक होता. त्याने काका काकीसाठी छान भेटवस्तू घेतली होती . राधा आणि अमोल त्याचा आनंद पहात होते ; पण काहीच बोलले नाही. राजने राधाला विचारले “आई कमीत कमी तू येते आहेस की नाही?”


राधा “ राज तू जाऊन ये , मला जरा काम आहे.”

राजला कळून चुकले होते की , आईला सुद्धा यायची इच्छा नाही . तो पुढे काहीच बोलला नाही . त्याने गाडीची चावी घेतली आणि येतो म्हणून निघाला.

राज गाडीत बसला आणि आई बाबासुद्धा यायला हवे होते हा विचार करू लागला.

कधी नव्हे ते त्याला आई बाबांच्या वागण्याचा राग आला . आपल्याला जर
अमेय काकाने, बाबा आई का आले नाही हे विचारले तर काय कारण देऊ हा विचार करू लागला?

तो त्याच्या destination वर पोहोचला. सुंदर हॉटेल होते. रोषणाई , सजावट पाहून राजचे डोळे दिपुन गेले. सगळे हाय सोसायटीची माणसं . तो सर्वांना पहातच बसला. तोच कोणीतरी खांद्यावर हात ठेवला . राजने मागे वळून पाहीले . अमेय होता.
अमेयला पाहून राज खुष झाला . लगेच तो अमेय काकाच्या पाया पडण्यासाठी झुकला.


अमेयने त्याला थांबवले .

अमेय “असू दे राज, माझा पुतण्या मोठा झाला. किती लहान होता तू, तेव्हा शेवटचे पाहीले होते.”

राज “काका आज मी तुम्हाला पहिल्यांदा पहात आहे , यू लुक हॅंडसम ”

अमेय “तुझ्यापेक्षा कमीच हा. यू लुक मोर हॅंडसम दॅन मी माय बॉय ”

राजच लक्ष अमेय कडून हटता हटत नव्हते . हातात महागडे वॉच , branded कपडे. त्यांच्या बोलण्यात एक वेगळीच अदा होती.

त्यांची श्रीमंती झळकत होती.
राजला फार कौतुक वाटले.
अमेय “ बाकी काय करतोस तू ?”

राज “काका , मी एमबीए केला आहे आणि आता multinational कंपनीत अॅज अ मॅनेजर आहे.”

अमेय “ग्रेट , प्रॉउड ऑफ यू माय सन राज, तू पुढेही अशीच छान प्रगती कर. चल ये मी सर्वांशी ओळख करून देतो”


अमेय राजला पुढे घेऊन गेला .

एक सुंदर ड्रेस परिधान केलेली स्त्री होती.सुंदर मेक अप. गळ्यामध्ये डायमंडचा नेकलेस. क्लास लुक होता.

अमेय “ अश्विनी , स्वीट हॉर्ट मीट राज”

अश्विनी “ हा आपला राज ?”

अमेय “हो , आपला राज”

अश्विनी : “ राज , तुला पाहून खूप आनंद झाला . शेवटचं पहिले होते तेव्हा किती लहान होतास. खरंच खूप आनंद झाला. बरे झाले तू आलास. घरी कसे आहेत सर्व.? आई बाब कसे आहेत? ते नाही आले. ?


राजला माहीत होते , हा प्रश्न विचारणार म्हणून . त्याने आई बाबांची तब्येत बरी नाही म्हणून वेळ मारून नेहली. .

अश्विनी : “ओहह, बरं बरं .”
अमेय : “ मी आलोच”
काकीने राजचा हात पकडला आणि एका मुलाला आवाज दिला . काकीने हात पकडला तेव्हा राजला खूप छान वाटले. किती तो आपलेपणा . किती वर्ष आपण ह्या प्रेमाला मुकलो . त्याला माहितच कोठे होते की ही तीच काकी आहे जिला आपल्या आवाजाने देखील त्रास होत होता. माहीत पडायला आई बाबाने विषय काढलाच नव्हता. त्याला फक्त इतके सांगण्यात आले की काका आणि त्याचा परिवार हा कामानिमित्त बाहेरगावी गेले आहे. बस इतकीच काय ती माहिती.

त्याला खूप काही गमावले आपण ह्याची खंत वाटली.


“मनोहर”

समोरून हातात ड्रिंक घेवून बावीस एक वर्षाचा मुलगा आला.

अश्विनीला म्हणाला : “मॉम , कितीदा सांगीतले मला मनोहर नको म्हणू.”

अश्विनी त्याचा रूसवा काढत त्याला म्हणाली “बरं बरं मेडी”

मेडी meet your brother , raaj.
मनोहरने राजकडे कटाक्ष टाकला.

मनोहर : “ हॅलो राज”

अश्विनी : “ राज काय ? तुझा मोठा दादा आहे राज . त्याला दादा म्हण .”


मनोहरला राग आला हे त्याच्या चेहर्‍यावरून स्पष्ट दिसत होते.

मनोहर : “काय मॉम , तुला माहीत आहे ना मला हे असे बोलायला आवडत नाही. समोर ६० वर्षाची जरी व्यक्ती असली तरीदेखील मी नावाने हाक मारतो. I don’t like all this formalities , u know very well .

राज ; “काकी , असू द्या . मला आवडेल त्याने नावाने हाक मारलेली. Even I डोन्ट लाइक फॉरमॅलिटीज.

मनोहर : “ग्रेट”


अश्विनी : “ बरं तुम्हा दोघांच्या गप्पा चालू द्या. मी जरा गेस्टकडे बघते. राज तूसुद्धा घे काहीतरी.”

राज : “ हो काकी”


मनोहर : “ राज बोल, काय घेणार रम ,व्हिस्की , वोडका ?”

राज : “ मेडी , wait मी असले ड्रिंक नाही घेत.”


मनोहर : “ आर यू kidding ?”

राज : “ खरंच नाही घेत मी असले काही, आय प्रेफर सॉफ्ट ड्रिंक”


मनोहर : “ तू at least टेस्ट केली की नाही”

राज : “ नेवर”
मनोहर ; “ आय डोन्ट belive”


राज : “नाही रे , खरंच हे सर्व मला आवडत नाही”

मनोहर; “ हे वेटर , सॉफ्ट ड्रिंक प्लीज”


वेटरने सॉफ्ट ड्रिंक आणली.

राजने ग्लास घेतला .
राज आणि मनोहर दोघं गप्पा मारू लागले.

राजने विषय काढला “ मेडी मग काय करतोस तू ? शिक्षण वगैरे ?

मेडी : “ राज सध्या तरी मी काही करत नाही . फेल झालो मी दोन वर्ष झाले . आणि आता काही अभ्यासात मन लागत नाही. सो आता ब्रेक घेतला . असंही माझे अभ्यासात मन कधीच लागले नाही. बघू डॅडचा बिझनेस आहे तोच करेल. सध्या फक्त एंजॉय करतो. तू बोल तू काय करतोस ?

राज : “ मी मॅनेजर आहे कंपनी मध्ये .”

मेडी : “ कूल”
राज पाहिल्यांदाच मेडीला भेटला होता.

मेडी: “ राज, मग कोणी गर्लफ्रेंड आहे की नाही”

राजला हसू आले .
राज: “नाही रे , कोणी नाही”

मेडी: “ काय हे राज , किती बोरिंग लाइफ जगतोस ? नो ड्रिंक, नो गर्लफ्रेंड ..

राज : “ नाही रे, आय अॅम हॅप्पी विथ माय लाइफ”


मेडी: “ हे फक्त तूच करू शकतोस, तुला सांष्टांग दंडवत ”
राज : “ तू ही जगू शकतोस”

मेडी: “ नो वे , मी स्वप्नात देखील असे जगू शकत नाही, छान वाटलं भेटून . निघतो मी , माझे फ्रेंड्स वाट बघत आहेत.


मेडीने हात मिळवला आणि तो निघून गेला.

राजला फारच छान वाटत होते . काका , काकी, आणि मेडीला भेटून. शेवटी ती रक्ताची माणसं होती , त्याची माणसं”

राजच्या हातात ड्रिंक पाहून त्याला एक प्रसंग आठवला .
एक दिवस चित्रपट पाहत असताना एक सीन आला. ज्यात एक व्यक्ति दारू प्यायला होता आणि झिंगत होता. राज लहान होता . अवघे पाच वर्षाचा.
राज त्या व्यक्ति प्रमाणे करू लागला. तो ही नाटक करू लागला . ते पाहून आईने त्याला दम भरला . राज रडू लागला .थोड्यावेळाने आईने त्याला समजावले की दारू , व्यसन हे शरीरासाठी खूप वाईट असते.
तेव्हा ती आईने सांगितलेली गोष्ट लहानग्या राजच्या मनात नेहमीसाठी बिंबवली गेली.
राज अश्या संस्कारात वाढला होता जिथे थोरा मोठ्यांचा आदर केला जातो. व्यसनांपासून लांब. स्वत:चे आयुष्य योग्य मार्गाने जगावे. मेडी म्हणजे मनोहर हा अगदी विरुद्ध होता. दोघे भाऊ पण जमीन असमानचा फरक.

राजही आई बाबा म्हणतील तसाच वागत आला . शाळा , महाविद्यालय नेहमीच चांगले गुण मिळवून अव्वल राहीला. उत्कृष्ट खेळाडू , उत्कृष्ट वक्ता. सर्वच बाबतीती निपुण होता. आता कामात देखील तो सर्वांचा लाडका होता.

त्याचे संस्कार होते जे आज त्याला काकाच्या पार्टीत घेऊन आले होते.

त्याला खंत लागून राहिली की आई बाबा दोघांनी यायला हवे होते. पण नाही आले.

अमेय आला
अमेय : “चल राज , डिनर करून घे.”

वेगवेगळे पंचपक्वान होते. राज पोटभरून जेवला. नंतर अमेयसोबत गप्पा झाल्या. अमेय त्याच्या बिझनेस विषयी राजला सांगू लागला . किती विस्तार केला. कसा केला सर्व काही सांगत होता. राजही अमेयची यशोगाथा मन लावून ऐकत होता. त्याला काकाचे फार कौतुक वाटले. काकाने खूप प्रगती केली होती. काकाचे बोलणे फक्त ऐकत राहावे असेच होते. त्याला फार अभिमान वाटत होता अमेय सारखी यशस्वी व्यक्ती आपला काका आहे.

अमेय सांगू दोन दिवासाने बिझनेसच्या निमित्ताने बाहेर जावे लागेल. एक दिवस येईल वेळ काढून दादा , वहिनीला भेटायला.

राज समजू शकत होता की काका किती बिझी असतात , त्यातून वेळ काढणे मुश्किल आहे. अमेय राजला स्वताच्या फोनमधुन मोठ्या मोठ्या माणसाचे फोटो दाखवत होता. सगळेच आपल्याला ओळखतात , हेच सांगायचे होते. मोठे मोठे नेते , अभिनेत सगळेच ओळखतात . राजला अप्रूप वाटले.

राजने काका काकीला निरोप दिला आणि घरी येण्याचे निमंत्रण दिले.

राज निघाला .
ड्राईव करत असताना त्याला काका काकीने केलेला पाहुणचार आठवला. किती आपुलकी., किती प्रेम. आज राज भारावून गेला. घरी आल्या आल्या तो आई बाबांना सर्व काही सांगू लागला. अमेय काका किती मोठे बिझनेस मन झाले आहे. किती लोकांशी ओळख आहे.

हे सर्व सांगत असताना , राजच्या चेहऱ्यावर एक वेगळी प्रसन्नता होती.

अमोल आणि राधा दोघेही फक्त ऐकत होते.


अमेय जे वागला होता. ते आजही दोघे विसरले नव्हते.
आई त्याला इतकंच म्हणाली. “झोपून घे, उद्या कामाला जायचे आहे तूला ”

राजला वाटले होते;आई बाबा खुश होतील; पण तसलं काहीच नाही. उलट ऐकून न ऐकल्यासारखे केले . राजला वाईट वाटले. भावाने इतकी प्रगती केली आहे तरी बाबांना काहीच वाटले नाही. चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते.राज शांत बसला. रूमध्ये निघून गेला.

अमोल आणि राधा फक्त एकमेकांकडे पहात होते. राधा स्वामी चरणी प्रार्थना करत होती. राजच्या डोळ्यावर जी पट्टी आहे ती निघून जावो.

त्याच्या मनात अमोलविषयी जी शंका कुशंका आहे ती , लवकरात लवकर दूर होवो.

दुसऱ्या दिवशी राज कामाला गेला.
दिवसभर राजच्या डोक्यात तेच विचार चालू होते.
अमोलच्या खास मित्राच्या मुलाचे लग्न होते.
राधाने राजला फोन केला आणि आम्ही लग्नाला जाणार आहोत हे सांगितले.

आता मात्र राजला राहवले नाही , तो लगेच आईला म्हणाला. “काय आई , काल काकाची पार्टी होती तर तुम्हा दोघापैकी कोणीही आले नाही आणि आज दोघेही लग्नाला चालले आहात . तुम्ही आला असता तर काका काकी किती खुश झाले असते .

राधाला माहीत होते राज असेच काहीसे बोलणार .

“चल आम्हाला उशीर होतो आहे , आल्यावर बोलते.”

असे म्हणत राधाने फोन ठेवला.

बाजूलाच अमोल उभा होता.

“काय म्हणत होता राज”

राधा “तो म्हणत होता, आज तुम्ही दोघेही लग्नाला चालला आहात , काल काकाच्या पार्टीला आला नाही”

अमोलचा चेहरा उतरला.

“असू द्या ,नका नाराज होऊ. तुम्हीच म्हणाला ना त्याला एक न एक दिवस कळेल म्हणून . माझेही मन म्हणतंय. त्याला खरे काय ते लवकरात लवकर कळेल.”


डोळ्याच्या कडेवर आलेले पाणी पुसत अमोल म्हणाला “ नक्कीच कळेल”


दोघेही निघाले.

रात्र झाली.

अमोल घरी आला . दाराला कुलूप होते. आई बाबा अजून आले नव्हते.

त्याने आईला फोन लावला . आईने काही फोन उचलला नाही.
बाबाना फोन लावला . फोन उचलला नाही.

एक अनामिक भीती दाटून आली. अस्वस्थ वाटू लागले .
अनोळखी नंबर वरुन फोन आला . ह्या नंबर वरुन अनेक मिसकॉल आले होते. त्याला डाऊट आला . राजने लगेच फोन उचलला .

“राज मी राकेश बोलतोय, तुझ्या बाबांचा मित्र.”
राज : “ बोला काका”

राकेश : “ तूला मी कधीपासून फोन करतो आहे, तू फोन उचलला नाही .”

राज : “ सॉरी काका , बोला”

राकेश जे काही बोलला ते ऐकून राज सुन्न झाला .
काय झाले असावे ?

क्रमश:


वाचकहो तुमच्या आग्रहाखातर कथा पुढे लिहीत आहे.भाग आवडला असेल तर लाइक कमेन्ट ,शेअर करा.

अश्विनी ओगले .

🎭 Series Post

View all