त्याला आवडलेली ती भाग :- 7
त्या दोघांना हसताना पाहून ती एकदम उखडली आणि खुर्चीवरून उठली. ती उठल्यावर नैना एकदम म्हणाली "ए कुठे निघालीस?"
"जाऊ द्या तुम्ही दोघे एकत्र एकमेकांशी मिसळलेले आहेत मला एकटे पाडलं मी जाते!"
हे ऐकल्यावर तो एकदम हसायला लागला.
त्याला हसताना पाहून ती म्हणाली " तू का हसतो आहेस?"
"हसू नको तर काय करू! तुझ्याइतकी चाईलडिश मुलगी तर मी पहिली नाही."
"मी चाईलडिश?"
"तू नाही तर दुसरं कोण?"
"काय वागले मी चाईलडिश साखे?"
"जेव्हा पासून भेटलीस तेव्हापासून तसंच वागते आहेस!"
"तू प्रश्नाचं उत्तर देत नाहीस! तू विचारले ते सांगत नाहीस! तुझ्या मागे मागे करावं लागतं! त्याच्यावर तुझे नखरे! तुझा अटीट्युड! आणि मी चाईलडिश!"
"मी सांगितले का विचारायला? मागे मागे करायला? माझा अटीट्युड सहन करायला? "
"अरे पण एखादी मुलगी विचारते आहे तर तुझी का दातखिळी बसली आहे?"
"ए, दातखिळी बसणे आणि मौन धारण करणे यात खूप फरक असतो."
"अच्छा तर तू मुद्दामून माझ्याशी मौन धारण केले आहे का?"
" केलं ही असेल!का सांगावे?"
"अरे तू तर मला साधे नाव सुद्धा नाही सांगितलंस!"
"आणि सांगितले ही नसते! ही तुझी मैत्रीण आहे ना म्हणून सांगितले!"
" तेच ना! तुझ्या दृष्टीने माझे काही महत्व नाही."
"का असावे?"
" कसला खडूस आहेस तू!"
"फक्त खडूस नाही अजून बरंच काही आहे!"
"तुझे इतर गुण कळायचे आहेत अजून!"
" तेही कळतीलच! मी दाखवायलाच बसलोय!"
"तू मला अशी तशी समजू नकोस हां! मी खूप डेंजर मुलगी आहे!"
"हो आणि मी तर बोळ्याने दूध पिणारा आहे!"
"ए थांबा थांबा ! दोघेही थांबा!" नैना दोघांच्या मध्ये पडत म्हणाली.
ती असं बोलल्यावर दोघेही शांत झाले.
" तुम्हाला कल्पना आहे का तुम्ही दोघे कसे भांडता आहेत?"
"भांडतो आणि आम्ही? आम्ही तर जस्ट डिस्कस करतोय! हो ना ग ऋचा?"
" हो मग! आम्ही तर डिस्कस करतोय!"ती पण त्याची री ओढत म्हणाली.
त्या दोघांच्या बोलण्यावर नैना थक्क झाली!
"अरे मग इतका वेळ तुम्ही दोघे काय करता आहेत?"
"गप्पा मारतोय" तो म्हणाला.
"हो गप्पाच मारतोय..." ऋचा पण म्हणाली.
त्यांचे बोलणे ऐकून नैनाने वेटर ला हाक मारली, "वेटर! एक स्ट्रॉंग कॉफी"
"काय चालले काय आहे तुमचे?आधी बोलत नव्हते आणि आता असे बोलत आहेत की तुमच्या दोघात मीच 'ऑड वुमन आऊट' वाटते आहे!"
"म्हणजे नैना तु मला सांगते आहेस की मी ऋचाशी बोलु नको."
"नैना तू असे सुचवते आहेस त्याला? माझी मैत्रीण असून!"
"अग मी कधी सुचवले त्याला? मी कधी म्हणले?"
"मग तो का असे म्हणतो आहे?"
"अग तो जनरल म्हणतो आहे! तुम्हाला दोघांना समजावणं अशक्य कोटीतील घटना आहे!"
"मी काहीच बोललो नाही बर का नैना! उगीच माझं नाव कशाला घेतेस!"
"मग आत्ता कोण बोलले"
"ऋचा"
"तुम्ही दोघे मला वेडे कराल!"नैना वैतागून म्हणाली.
"म्हणजे, तू वेडी नाही आहेस का? मला तर हिने सांगितले की तू वेडी आहेस!" तो म्हणाला.
" मी कधी तुला सांगितले? तू तर आज माझ्याशी पाहिल्यांदा बोलत आहे?"
"अग हो, पण तू तर माझ्याशी बोलत होतीस ना! गाडीवर मागे बसली होतीस तेव्हा!"
"नैना तू यांच्याकडे लक्ष देऊ नकोस! मी तुझ्याबद्दल याच्याशी कधीच बोलली नाही."
" जर तू मला नैना बद्दल काहीच सांगितले नाही तर मला हिचे नाव कसे कळले?"
नैना ने ऋचा कडे पाहिले तसे तिने खांदे उडवले!
"ओ गॉड! जाते मी!" नैना म्हणाली.
"तुम्ही दोघे भांडायचे तर भांडा! डिस्कस करा किंवा मौन धारण करा."
"आणि तू मागवलेली कॉफी!"
"प्या तुम्ही दोघं हाफ हाफ करून!"
असे म्हणून नैना तिथून उठून गेली.
ती गेल्यावरती ऋग्वेद, ऋचा कडे पाहून म्हणाला
"आवडलं का?"
"काय".
"तिच्या नकळत तिला कटवलेलं!"
" म्हणजे?"
" अग आपल्याला बोलता यावं म्हणून मी तिला शिस्तीत कटवले आहे!"
"काय सांगतोस?"
"मला वाटलं तुला कळलं असेल!"
"खरंच नाही कळले!"
"अग बेंच वर आपण बसलो तर ती आपल्या मागे! कॅन्टीन मध्ये बरोबर! अजून कुठे गेलो तरी ती तुला चिकटलेली!"
"ए हॅलो ती मला चिकटली नाहीय!मी तिला बोलावले आहे!"
"कशाकरिता? आपले बोलणे तिला ऐकवायला?"
"अरे पण तू तर माझ्याशी बोलत नव्हतास!"
"आता बोलतो आहे ना!"
"हो पण, तू बोलत नसताना ती मला किती मदत करत होती माहिती आहे का?"
"कशासाठी? मुलगा कसा पटवावा यासाठी?"
"ए हॅलो, ती तशी नाही आहे, ती तर मला सांगत होती की सोड तुझा नाद म्हणून"
"मग, का नाही सोडला माझा नाद?"
"अरे ती सांगेल ती प्रत्येक गोष्ट मी केली पाहिजे का?"
"चला बरे झाले..."
"काय बरे झाले?"
"तिचे ऐकून तू माझा नाद नाही सोडलास"
त्याचे ऐकून ती एकदम प्रसन्न हसली.
"का हसत आहेस?"
"तू माणसाला बरोबर शब्दांत पकडतोस ना"
"मग अजून कशात पकडायला हवे? हातात? का मिठीत?"
"ए हॅलो, मी कौतुक करत आहे तुझे आणि तुला मजा सुचत आहे"
"कर बरं जरा कौतुक! खूप दिवसांत कोणी केले नाही"
"नको, राहू दे!"
"का? येत नाही"
"येते, पण तू लगेच शब्दांत पकडून चेष्टा उडवतोस माझी"
"बरं, नाही उडवत! तू सांग तर"
"खरं सांगू कौतुक....
"आता हा कौतुक कोण?"
"अरे ते वाक्य आहे...तुझे नव्हते का ते जीवन पासून सुरू होणारे वाक्य, तसे.."
"ऑल राईट, बोल!"
"जाऊदे परत कधी...."
"म्हणजे तुला कौतुक करायचे नव्हतेच , हो ना?"
ती फक्त हसून म्हणाली, "ऋग्वेद, चल आपण जायचे?"
"कुठे?"
"तुझ्या बुलेट वर बसून...लांब?
"आणि"
"आणि आपण खूप गप्पा मारुयात, मस्त लांब जाऊन काहीतरी पाहुयात, काहीतरी खाऊयात, मज्जा करूयात"
"आणि?"
"आणि काय? फोटो काढुयात"
"आणि?"
"आणि गाणी म्हणूयात"
"आणि?"
"ऋग्वेद तुला न्यायचे नसेल तर सांग, मी जाते बाय"
"एकटी जाणार आहेस?"
"नाही, इथून जाणार आहे"
"ओके"
"व्हॉट ओके? नेतो आहेस की नाही?"
"जबरदस्ती आहे?"
"हो आहे"
असे म्हणून तिने त्याच्या जर्कीनला ओढून खेचले...
"अगं बिल तर देऊ दे"
"माझ्या अकाऊंट मध्ये लिहेल तो"
त्याचा हात धरून पार्किंग मध्ये ती त्याला नेत असताना सारे कॉलेज त्याच्याकडे असूयेने पाहात होते.
क्रमशः
©®अमित मेढेकर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा