त्यांचा संसार त्यांना करू दे भाग २
गेल्या भागात आपण पाहिले की राधाने जे पार्सल मागवलं त्यावर सुधा बोलते पैसे जपून वापरावे. राजला माहीत असतं राधाने काय मागवलं आहे. आता पाहू पुढे.
राधा राजच्या खांद्यावर विसावली.
"थँक्स राज समजून घेण्यासाठी." राधा म्हणाली.
"थँक्स टू यु. मला काही लक्षात राहत नाही; पण तू सगळं काही लक्षात ठेवते."
तर हे असे दोघे एकेमकांना समजून घेत संसार करत होते.
दुसऱ्या दिवशी राधा कामाला गेली. राज देखील तयारी करत होता.
सुधाने विषय काढला
"राज, काल राधाने दोन पार्सल मागवलं."
"हो आई मला माहित आहे."
"इतका खर्च बरा नव्हे."
"आई, ती अनावश्यक खर्च करत नाही."
"सुधा, पुन्हा तोच विषय? त्यांची त्यांना करू दे संसार." सुधीर रागातच म्हणाला.
सुधा नाराज झाली.
राजही ऑफिसला निघून गेला.
सुधा सुधीरशी दिवसभर बोलली नाही.
रात्री झोपताना देखील शांत होती.
रात्री झोपताना देखील शांत होती.
बारा वाजले.
"सुधा, झोपली का?"
"नाही."
" माझ्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा." त्याने शुभेच्छा दिल्या.
"तुम्हालाही लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा."
त्याने तिच्यासाठी सोन्याच्या बांगड्या आणल्या होत्या.
"अहो, हे काय?"
"माझ्या सोन्यासारख्या बायकोसाठी."
तिच्या डोळ्यात पाणी आलं.
"सॉरी, मी तर तुमच्यासाठी काहीच आणलं नाही. खरंतर मी विसरूनच गेले आज आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे."
"अजूनही एक गिफ्ट देऊ शकते."
"काय?"
"वचन."
"कसलं वचन?"
"ते मी सांगतो, पण तुला ते वचन द्यायचं आहे."
"ठीक आहे."
"सुधा, तू मला खूप साथ दिली आहेस. काटकसरीने संसार केला. राजला चांगलं वळण लावलं. सर्वांना जोडून ठेवलं. आधीचे दिवस आठवले तरी मन भरून येतं. तू होती म्हणून मी होतो."
स्वतःचं कौतुक ऐकून ती भारावून गेली.
तो पुढे बोलू लागला.
"आपली परिस्थिती वेगळी होती. दोघेही कमावतात. त्यांना अधिकार आहे कुठे आणि किती पैसा खर्च करायचा. आपला राज गुणी आहे. तो माणसं ओळखतो. राधा देखील सुस्वभावी आहे. सगळं छानच चाललंय. राज आणि राधा दोघेही मिळून घर चालवतात. राज जसा कामाला लागला तसा त्याने एकही रुपया खर्च करू दिला नाही. त्याला जबाबदारीची जाणीव आहे. आता एकच वचन दे राज आणि राधाच्या संसारात आपण लुडबुड करायची नाही. त्यांना जसा संसार करायचा आहे तो करू दे."
"बरं ठीक आहे ह्यापूढे मी काही बोलणार नाही, करू दे त्यांना संसार."
तितक्यात राज आणि राधा आले.
राधाच्या हातात गिफ्ट होतं.
दोघांनी सुधीर आणि सुधाला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
सुधासाठी साडी होती आणि सुधीर साठी कपडे.
"सुधा, पाहिलंस का? दोघांना आपल्या लग्नाचा वाढदिवस लक्षात होता."
सुधा हळवी झाली.
"आई, साडी आवडली का? तुमच्याकडे हा रंग नव्हता ना? म्हणून मी ही विकत घेतली." राधा म्हणाली.
"राधा, सुरेख आहे साडी."
साडीवर अलगद हात फिरवत म्हणाली.
क्रमशः
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
शेवटचा भाग जरूर वाचा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा