राधा सुस्वभावी मुलगी. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाय ठेवला आणि ती खऱ्या प्रेमात पडली. किशोर तिच्या आयुष्यात आला. किशोरने तिला खूप स्वप्न दाखवली होती. ती स्वप्न तो पूर्ण करणार ह्याची तिलाही खात्री होती. राधा दिसायला सुंदर होती, पण हुशार देखील तितकीच. किशोर आणि राधा दोघांनी संसाराचे स्वप्न पाहिले होते.
राधा आणि किशोर दोघांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले.
दोघेही कामाला लागले. दोघांनी घरी एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगितले..
दोघेही कामाला लागले. दोघांनी घरी एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगितले..
राधाच्या घरच्यांना अजिबात मान्य नव्हते. राधाने आई वडिलांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही केल्या आई वडील तयार होत नव्हते.
तिला काहीच सुचत नव्हते. एकीकडे खरं प्रेम आणि एकीकडे जन्मदाते.
जणूकाही आयुष्य थांबले होते.
जणूकाही आयुष्य थांबले होते.
एक दिवस राधा किशोरला म्हणाली,
"किशोर, माझे आई बाबा ह्या लग्नाला तयार होत नाहीये, तू दुसरी मुलगी बघ आणि लग्न कर."
"राधा, तू वेडी आहेस का? काहीही काय बोलतेय. लग्न करणार तर तुझ्याशी. आई बाबा जर लग्नाला तयार झाले नाही तर मी देखील लग्न करणार नाही, मला माझ्या आयुष्यात तूच हवी आहेस. पुन्हा असं काही बोलायचं नाही."
हे ऐकून तिला रडू आले.
"आई बाबांना कधी कळणार हे सर्व."
"जेव्हा कळायचे तेव्हा कळेल, पण मला इतकं माहीत आहे मी तुझ्या सोबत जगणार आणि मरणारही."
"हे असं अभद्र बोलू नको. मरणाच्या वार्ता कशाला करतोस?" तिने एक हात त्याच्या ओठावर ठेवला आणि दुसऱ्या हाताने डोळ्यातील पाणी टिपले.
"राधा, असं लहान मुलींसारखं का रडते?"
तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत विचारले.
तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवत विचारले.
"तुझ्यापासून विरह सहन नाही होणार. स्वप्नातही विचार करू शकत नाही." राधा.
"मी देखील तुझ्यापासून दूर राहू शकत नाही."
एक दिवस राधाचा फोन आला. तिच्या आईला अटॅक आला होता, बाबा कामानिमित्त बाहेर होते.
किशोरने प्रसंगावधान दाखवलं. त्याचा एक मित्र राधाच्या घराजवळ राहायला होता. त्याला फोन करून लगेच हॉस्पिटलमध्ये भरती केले.
तो देखील थोड्यावेळात आला.
राधाला तर काहीच सुचत नव्हते. किशोरचाच तिला आधार होता.
वातवरण गंभीर झालं होतं. राधा देवाचे नामस्मरण करत होती.
"राधा, आईला काही होणार नाही. सगळं ठीक होईल. " किशोर.
"किशोर, खूपच भीती वाटतेय. काहीच सुचत नाहीये." राधा रडवलेल्या आवाजात म्हणाली.
"राधा, देवावर विश्वास ठेव. आई ह्यातून सुखरुप बाहेर पडतील."
आणि तसंच झालं. संकट टळलं. सर्वांचा जीव भांड्यात पडला.
त्या काळात किशोर कसा आहे हे राधाच्या घरच्यांना समजले.
त्या काळात किशोर कसा आहे हे राधाच्या घरच्यांना समजले.
लग्नाला विरोध करणारे राधाचे आई वडील आता मात्र तयार झाले होते. त्यांना खात्री पटली होती की राधा त्याच्यासोबत खुश राहील.
किशोरचे आई बाबा तर तो लहान असतांना दगावले होते, तो मामाकडे राहायला होता. त्याचं जवळचं कोणी होतं तर मामा.
मोजक्या माणसात किशोर राधा दोघांचं लग्न लावलं.
दोघेही खूप खुश होते. सगळं मनासारखे घडलं होतं. दोघांनाही आयुष्यात आता काहीच नको होतं.
दोघेही खूप खुश होते. सगळं मनासारखे घडलं होतं. दोघांनाही आयुष्यात आता काहीच नको होतं.
किशोर राधाला खूप खुश ठेवत असे. दोघेही एकमेकांसोबत खुश होते, त्यात तिला आई होण्याची चाहुल लागली.
दोघांचा आनंद गगनात मावत नव्हता. आई बाबा जे होणार होते.
किशोर तिची खूप काळजी घेऊ लागला.
दोघांचा आनंद गगनात मावत नव्हता. आई बाबा जे होणार होते.
किशोर तिची खूप काळजी घेऊ लागला.
पण काळाने वेगळाच डाव मांडला होता, पाहू पुढच्या भागात.
क्रमशः
अश्विनी ओगले.
अश्विनी ओगले.
