उतावळा नवरा -
दमुचे म्हणणे ऐकून घेऊन यशोदा त्याला एक सल्ला देते त्यानुसार तो वागण्याचे नाटक करतो. चला तर मग आता पुढे काय घडते पाहूया
भाग ३ ( अंतिम भाग)
यशोदा थोडी आवाज चढवून म्हणाली, “नायतर काय रं? काय करणार हायेस?”
“मी कायबी करीन बग आयं.” असे म्हणून दामू फुगून बसला.
लय शाणा झालास काय? लगीन म्हंजी काय खेळ वाटतूय का तुला?
“जाऊ दे मग, मी आता जीवच देतो.” म्हणत तावातावाने तिथल्या शेताजवळच्या विहिरीकडे तो पळत सुटला. यशोदा घाबरली आणि तीही त्याच्यामागे पळू लागली. पण बिचारीचे वय झालेले त्यामुळे तिला काही जोरात पळता आले नाही म्हणून ती जमेल तसे चालत त्याच्या मागे जाऊ लागली.
दामू आपले सुटलेले पोट घेऊन टूनटुन उड्या मारत सुसाट पळत गेला आणि थोड्या वेळात विहिरीतून धपकन् पडल्याचा आवाज आला. त्यांच्यासोबत असणाऱ्यांची घाबरगुंडी उडाली. दामूला पोहता येत नाही हे लक्षात येताच यशोदा खूप घाबरुन जोरात चालण्याचा प्रयत्न करु लागली. दामूने खरोखरंपच पाण्यात उडी मारली की काय म्हणून मोठ्याने ओरडू लागली, “आरं दाम्या, काय करतूस ही. आरं जरा तरी शाण्यागत वागत जा की रं!”
तिच्या आवाजाने आजूबाजूचे आणि तिच्या सोबत आलेले शेतमजूर धावतच विहिरीकडे आले. विहिरीत डोकावून पाहिले तर पाण्यात दामू कुठे गायब झाला कुणालाच कळेना. सगळेजण त्याला शोधू लागले.
तेवढ्यात सुजाताचे लक्ष विहिरीच्या पायऱ्या जवळीच्या पाणी काढायच्या मोटारीच्या फुटबॉलकडे गेले. हा बहाद्दर शेवटच्या पायरीवर त्या फुटबॉलला धरुन अंग चोरुन लपून बसलेला.
सगळ्यांची पाचावर धारण बसलेली पण दाम्या त्यांची मजा बघत होता.
दामू दिसताच हायसे वाटून सुजाता मोठ्याने म्हणाली, “आरं त्यो बगा तिथं बसलाय दामू! त्यानं हिरीत उडी मारलेली न्हाई. कायबी झाल्याल नाय त्येला.”
सुजाताचे बोलणे ऐकून सगळ्यांच्या जीवात जीव आला. सगळेजण दामूला बाहेर बोलवू लागले.
“मी न्हाय येणार जा.” तोंड फुगवून म्हणत दामू हटकून तिथेच बसला.
“मी न्हाय येणार जा.” तोंड फुगवून म्हणत दामू हटकून तिथेच बसला.
बाकीच्या लोकांनी पायरीवरून विहिरीत जाऊन दामुला विहिरीबहेर काढले.
सर्वजण त्याच्याजवळ जात म्हणाले, “आरं तू तर उडी मारलीच न्हाईस मग पाण्यात धापकन आवाज कसाला आला रं?”
“आगं आयं.. मला काय याड लागलंय का? पाण्यात उडी माराया. मला पवता कुठं येतंय. माझा जीव काय लय वर आलाय काय. म्या जीव बिव काय देत नस्तू. फकस्त तुला भ्या दाखवायला हिरिकडे आलो हुतो. हितलाच यक दगुड घेतला नि पाण्यात टाकला त्याचाच आवाज आला तुमास्नी. कशी गंमत कीली!” म्हणत वाकडं तोंड करत हसून पळू लागला.
आरं मुडद्या… हीतं आमचा जीव जायाची येळ आली आन् तुला गंमत सुचतीय व्हय. कवा सुधारायचास?” म्हणत यशोदा दगड घेऊन त्याच्या मागे लागली.
—------------------------
—------------------------
समाप्त.
©® सौ. वनिता गणेश शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा