Login

उचल पत्रावळी म्हणे जेवणारे किती ? भाग -1

कौटुंबिक
उचल पत्रावळी, म्हणे जेवणारे किती? जे काम करायचे ते सोडून देऊन भलत्याच चौकशा करणे.

गीता काकू आज जरा घाईतच होत्या, कमरेत साडी अर्धी खोचलेली आणि हातात कापडी पिशवी लावून पळत पळत बिल्डिंग चे जिने उतरत होत्या..

" अहो... गीता काकू.. अहो गीता काकू.. " पाटील वहिनी त्यांना आवाज देत होत्या..

मध्येच गीता काकू थांबल्या.. " काय गं पाटील वहिनी आज कसा काय आवाज दिला..? नाही म्हटलं एरवी तुम्ही कामात असतात ना.. म्हणुन म्हटलं... " गीता काकू घाईघाईने जात असताना पाटील वहिनी थांबवतात..

" छे ओ.. आज काम नव्हतं आणि म्हटलं तुमची खुशाली घेऊया... मग काय म्हणता...? " पाटील वहिनी बोलल्या..

" वाजले किती..?" गीता काकू विचारतात..

" आता शी अकरा वाजलेत... " पाटील वहिनी बोलतात...

" अरे माझ्या कर्मा.. पाहिलं... बोलतं बसल की असा उशीर होतो.. " गीता काकू बोलतात..

गीता काकू ह्या त्यांच्या एरियातील घरकाम करण्याचं काम करतात.. त्यांना कुठे काय शिजतंय... कुठे कुणाची उणी धुनी निघालीत असं सर्व त्यांच्या मेंदू नावाच्या डायरीत फिक्स असत..

गीता काकूंचा स्वभाव तसा चांगला होता, प्रत्येक घरात कुठे ना कुठे गीता काकू कामाला जायच्या. मग धुनी भांडी असदे किंवा लादी कपडा, गीता काकू करायच्या.. जर कधी गीता काकूला यायला उशीर झाला तर, बिल्डिंग मधल्या बायका तिला दहा फोन करायचे..

गीता काकू मोरेंच्या घरी जातात आणि डोर बेल वाजवतात, मोरे वहिनी दार खोलताच गीता काकू आत प्रवेश करतात..

" अगं हो... हो... किती धावपळ करशील...? " मोरे वहिनी सोफ्यावर येऊन बसतात, तितक्या वेळात गीता काकूनीं हातात झाडू धरला.. आणि मोरे वहिनींच्या घरातला प्रत्येक कोणा कोणा साफ करायला घेतला..

" अगं आल्या आल्या... झाडू कशाला धरला हातात... जरा बसं की पाणी तर प्यायचं.." मोरे वहिनी बोलतात..

" छे... ओ.. वहिनी, आता ही काय वेळ आहे.. अजिबात नाही.. कामं बघा आणि अजुन सात आठ घरची कामं बाकी आहेत की.. " गीता काकू चेहऱ्यावर आलेला घाम पदराने फुसते..

" बरं बाई तुला जमेल तसं पण हा जाताना चहा प्यायला विसरू नको.. " मोरे वहिनी बोलतात..

" आज साहेब घरी नाही का..? " गीता काकू विचारतात..

" छे... नाही गं.. आज कुठे त्यांना वेळ... " मोरे वहिनी बोलतात...

" अहो पण आज शनिवार ना... त्यांच्या सुट्टीचा वार...म्हणुन आपलं सहज विचारलं.. " गीता काकू बोलतात..

" बरं मि भांड्यावर हात मारून घेते... हे घर झालं की दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे मला... " गीता काकू बोलतात..

बराच वेळ गेल्या नंतर..

" गीता... ऐक ना... तु आता मीनाच्या घरी जातेस ना..? " मोरे वहिनी बोलतात..

" अरे बापरे आता ह्या मीना बद्दल काय विचारतील काय माहित.. काय करू.. काय करू... " गीता काकू मनातल्या मनात कुजबुजत होत्या.

" अगं कुठे हरवलीस..? गीता... अगं गीता.. " मोरे वहिनी तिला आवाज देतात..

" ह्म्म्म हो... जातेय... का ताई ...? म्हणजे रोजच जाते ना.. काय झालं..? " गीता काकू विचारतात...

" अगं काही नाही सहज.." आणि मोरे वहिनी गप्प बसतात..

" आज काल मीना ताई खुप फॉम मध्ये आहेत..इंग्रजीत तेच म्हणतात ना..? " गीता काकू पुन्हा मुद्दाम विषय काढतात..

" हो मि सुद्धा ऐकलंय..पण मला कळत नाही ती लग्न का करत नाही.. तुला तर माहित असेलचं ना.. गीता...? " मोरे वहिनी बोलतात..

" हा म्हणजे.. असं ऐकण्यात आल आहे की.. त्यांचं लफड चालु आहे कुठे तरी.. " गीता काकू चावत चावत बोलतात..

" हम्म्म्म... तुला काय वाटतं कोण असेल..? " मोरे वहिनी विचारतात..

" साहेब... सुद्धा..!" गीता काकू मध्येच थांबते...

साहेब नाव काढताच मोरे वहिनींना जरा धक्काच बसतो, " काय साहेब काय...? "

" अहो म्हणजे साहेब आणि त्या एकाच ऑफिस ला आहेत ना...? असं म्हणाली मि.. " गीता शब्द चावते..

गीता काकू सोसायटीत त्या एकमेव अशा व्यक्ती होत्या की त्यांना घरात कोणाच्या काय शिजतंय सगळं माहित असत.

" हुश्श... बाई मला तर भलतच वाटलं..!" मोरे वहिनी एक लांब श्वास घेत.

गीता काकूंचा एक शब्द ऐकुन मोरे वहिनींना घाम फुटतो.

" अहो इतकं घाबरायला काय झालं..? " गीता काकू विचारतात..

" काही नाही कर तु कामं तुझं.. आणि जरा कामात लक्ष द्या. नसत्या चौकशा कशाला.. " मोरे वहिनी विषय बदलण्यासाठी बोलतात...

" बघा.. विचारलात तुम्ही म्हणुन आपलं सांगितलं.. " आणि गीता काकू मोरे वहिनीच्या घरातुन बाहेर पडतात..

" साहेबांवर आणि मीना ताईंवर बारीक लक्ष ठेवायला हवं.. " गीता काकू मनातल्या मनात पुटपुटतात..