Login

उडदाचे पापड Recipe In Marathi

उन्हाळा स्पेशल वाळवणाचे पदार्थ अचूक प्रमाणासहित
उडदाचे पापड

साहित्य- सव्वा किलो उडीद डाळ, एक वाटी मुगाची डाळ, रामबंधू मसाला पाकीट एक आणि तेल.

कृती-
१) दोन्ही डाळी मिक्स करून दळून घेणे.

२) एका पातेल्यात ग्लासभर पाणी घेऊन त्यात रामबंधू मसाला घालून पाणी गरम करून घेणे.

३) आता हे पाणी जरा कोमट झाल्यावर पीठ मळून घेणे.

४) पीठ मळायच्या आधी त्यातून वाटीभर पीठ काढून ठेवणे पापड लाटताना लावण्यासाठी.

५) पीठ मळतानाच जरा सैलसर मळावे जेणेकरून जास्त कुटायला लागत नाही.

६) पीठ थोडावेळ भिजू द्यावे.

७) आता हे पीठ पाट्यावर कुटून घ्यावे आणि छोट्या छोट्या लाट्या करून घ्यायच्या.

८) पोळपाटावर लाटण्याच्या साहाय्याने पातळ पापड लाटून घेणे.

९)घरातच हे पापड फॅन खाली वाळवून घेणे.

१०) नंतर फक्त पाच ते दहा मिनिटे उन्हात वाळवून घेणे आणि त्यानंतर डब्यात भरून ठेवणे.

घरातल्या सगळ्या छोट्या मोठ्यांना लाटायला बसवावे म्हणजे पापड लवकर होतात.


🎭 Series Post

View all