प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक: उगाच त्रागा भाग-१
पहाट झाली होती आणि नेहमीप्रमाणे मोकाशी काका त्यांच्या झाडांना पाहण्यासाठी बाहेर आले होते. त्यांची मुले आणि नातवंडे दुसऱ्या शहरांमध्ये राहत असल्यामुळे निवृत्तीनंतर मोकाशी आजोबा आणि आपल्या पत्नीसह राहत होते.
अचानक पानांचा सळसळ करणारा आवाज यायला लागला.
" यांना थांब आता पकडतोच. चोरटे कुठले, मी एवढं व्यवस्थित सगळी माझी झाडे सांभाळतो आणि हे लोक माझी नजर चुकवून लगेच आपलं काम करून निघून जातात." असे ते बोलतात काठी घेऊन ते कंपाऊंडच्या बाहेर बघायला आले.
सुंदर असे एक मोगऱ्याचे झाड आणि त्याच्या बाजूलाच झेंडूचे छोटेसे झाड कंपाऊंडच्या बाहेर आलेले होते. संरक्षण म्हणून सळ्या घातलेल्या असल्यामुळे कोणीही सहज हात काढून ती फुले तोडायचे.
" काय रे चोरट्यांनो ? माझ्या फुलांना तोडून चोरून नेता. त्यांना खत आणि पाणी मी घालतो ना आणि तुमची काय सगळी नाटकं चालू आहेत? एवढेच आहे तर तुम्ही झाड विकत घ्या. त्यांना वाढवा आणि मग काय हवे ते तुम्हाला तुम्ही वाढवलेल्या झाडांमधून घ्या ना. फुले नेता ते नेता वरून पानेसुद्धा ओरबाडता. काहीच कसे वाटत नाही ?" आजोबा रागवत त्यांना ओरडत होते.
त्यांचा आवाज ऐकून मोकाशी आजी बाहेर आल्या.
" असू द्या हो. लहानच तर आहेत आणि तशी आपल्याकडे फुले जास्त असल्यामुळे आपल्या देव्हाऱ्यात पण आपण मोजकीच फुले ठेवू शकतो, पण देव्हाऱ्यात आपण हार आणि देवाजवळ फुले वाहून सुद्धा खूप फुले उरतात. मग त्यातली काही खाली जमिनीवरच पडतात तर काही झाडावरच कोमेजतात. त्यापेक्षा घेऊन जात आहेत तर चांगलीच गोष्ट आहे ना?" त्या म्हणाल्या.
" अगं या फुलांच्या झाडांना मी किती जपतो तुला माहीत आहे ना ! वरून हे असं चोरासारखं येऊन घेऊन जातात. काय रे मुलांनो तुमच्या घरच्यांनीच सांगितलं असेल ना अशी ही फुलं तोडून आणायची म्हणून?" ते आजोबा त्या शाळेत शिकत असलेल्या मुलांना ओरडत होते.
" आजोबा तुमच्याकडची फुले खूपच छान आहेत आणि हा मोगरा तर ह्याचा वास खूपच छान येतो, म्हणूनच आम्ही इथे फुले तोडण्यासाठी येतो; पण तुम्ही आम्हाला ओरडा म्हणून घाबरून आम्ही घाई गडबडीत जशी तोडता येईल तशी तोडतो आणि त्यामुळेच ती पाने सुद्धा तोडली जातात. " त्या तीन मुलांमधला एक मुलगा दबकतच म्हणाला.
" तुम्ही काय मास्तरांसारखे या मुलांना जाब विचारत आहात ? काही नाही रे मुलांनो तुम्ही आजोबांकडे काही लक्ष देऊ नका. बरं आता येता का ? मी थोड्याच वेळापूर्वी चहा बनवला आहे." आजींनी आधी आजोबांवर खेकसत मग मुलांना प्रेमाने विचारले.
चहाचं नाव घेताच त्या तिघांचा चेहरा खुलला आणि आजी स्वतःहूनच आमंत्रण देत आहेत, तर आजोबांच्या ओरडण्यापासून सुटका होईल म्हणून तिघांनी आजी सोबत आत मध्ये जायचे ठरवले.
' माझी बायको ही आयुष्यभर भोळीचा राहणार वाटते. तिला कधीच समजत नाही की आपण एवढी मेहनत करायची त्यांना जपायचं आणि मग या फुलांना सुद्धा हे लोक घेऊन जातात आणि मग काय हे झाड तसेच एकटे राहून जाते.' असा मनाशी विचार करत त्यांना त्यांच्या मुलांची आणि नातवंडांची आठवण यायला लागली होती.
तिघेजण घरात येताना घरातील वस्तूंमध्ये नजर फिरवत येत होते. पहिल्यांदाच घर बघत असल्यामुळे त्यांना कुतूहल पण होते आणि आजोबा अजून काहीतरी बोलतील म्हणून थोडे घाबरतच ते एका जागी उभेच राहिले होते.
" अरे, तुम्ही तिकडे उभे का ? बसा मी तुम्हाला खायला सुद्धा देते." असे म्हणून आजी हळूहळू चालत स्वयंपाकघरामध्ये गेल्या.
तिघांनी मस्त आल्याच्या चहाचा आस्वाद घेतला आणि आजींनी त्यांना त्यांनी घरी बनवलेले लाडू आणि चिवडाही खाण्यासाठी दिला होता.
धपकन काहीतरी पडल्याचा आवाज आला आणि या तिन्ही मुलांसह आजींच्या काळजाचा ठोका चुकला.
क्रमशः
काय झाले असेल ?
© विद्या कुंभार
कथेचा भाग कसा वाटला हे लाईक आणि कमेंट करून नक्की सांगा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा