Login

उजळल्या ज्योती भाग १

एका पणतीची कथा
उजळल्या ज्योती

भाग १

" आई ए आई , अगं पणत्या कधी रंगवायला घेऊ ग दिवाळी येईल ना ?"

" अगं अजून महिनाभर अवकाश आहे . उगाच आता पासून मागे नको लागू. अजून तुमची परीक्षा पण नाही संपली . "

" परीक्षा काय अशी जाईल . लगेच म्हणू नको अभ्यास कर . माझा अभ्यास झालाय म्हणून विचारतीय ."

" आता काय अभ्यास झालाय म्हटल्यावर काही बोलायलाच नको . "

अश्या आणि अशाप्रकारचे वेगवेगळे संवाद आपल्याला परीक्षा आणि सणांच्या आधी प्रत्येक घरात ऐकायला मिळतात. कारण हि तसाच आहे आपल्या संस्कृतीमध्ये मोठ्या सणांच्या आधी शाळांच्या परीक्षा ठरलेल्या असतात . घरात उत्साहाचे वातारण असून सुद्धा बिचारी मुलं आपला अभ्यास करतात आणि त्यांनतर सण पण साजरे करतात .

असो तर सायली आईला पणत्या रंगवायला मागतीय . पण तिची आई काही तयार होत नाही म्हणून ती आवाज देत आजीकडे गेली ," ए आजी . ए आजी "

पोथी वाचत बसलेल्या आजीने खुणेनेच विचारले , " काय "

अगं तुझी पोथी ठेव खाली असं म्हणत तिने खरंच पोथी खाली ठेऊन म्हणाली , " मला ना आता पणत्या हव्यात रंगवायला . दे ना ."

" अग मला काय माहिती कुठे आहे ते ? तू आईला विचार . "

तोंड वाकड करत सायली म्हणाली , " ती देत नाही . सारखी अभ्यास करायला सांगते . आता तूच सांग किती अभ्यास करू ? "

" बरं . मी एवढी पोथी वाचते मग आपण दोघी मिळून शोधूया . फक्त दहा मिनिट थांब . चालेल ना ?"

" चालेल म्हणतं सायली निघून गेली . ती तिच्या खोलीत आली खरी पण तिला आजीचं होईपर्यत थांबू वाटत नव्हतं . आता काय करावं याचा विचार करत बसली होती .

इकडे आजी पोथी वाचून स्वयंपाक घरात आली आणि मीना ला म्हणाली , " काय ग आज सायली ने मध्येच हे काय काढलंय ?"

" काय माहित ? अजून परीक्षा बाकी आहेत . आता काय करायचे ?"

" थांब . मी बघते . " असे आईला म्हणून ती सायली ले आवाज देत तिच्या खोलीत आली . " काय ग सायली काय करतेस . ?"

" काही नाही . आजी तुला माहितीय . मी सांगितलेला अभ्यास वेळेवर करते त्यामुळे माझा अभ्यास पण झालाय . तुला आणि आईला पणत्या मागितल्या तर तुम्ही देत पण नाही . मग अजून काय करता येईल याचा विचार करतीय . "

बघूया पुढच्या भागात आजी आणि नातीचा संवाद कुठे जातोय ते ?"

क्रमश :

सौ . चित्रा अ . महाराव

जलद कथा.लेखन स्पर्धा जुलै २०२५
0

🎭 Series Post

View all