उजळल्या ज्योती
भाग ५
" हे बघ बाळा , आपल्याजवळ जे ज्ञान आहे ना ते दुसर्यांना द्यावे त्यामुळे ना आपल्याकडील पण वाढते आणि समोरच्याला त्याचे ज्ञान होते . तू असं वागल्याने तुझं काही नुकसान आहे का ? त्यामुळे तू समाजाचं देणं एक प्रकारे पूर्ण करते आणि म्हणतात कि नाही एक बाई शिकली तर घराची प्रगती होते .
आई म्हणाली , " आणि नुसत्या पणत्या रंगवून आपल्याच घरात उजेड पडण्यापेक्षा तू जर तिला शिकवलं तर तिच्याही घरी शिक्षणाची पणती पेटेल कि नाही ?"
आजी लगेच म्हणाली , " हो अगदी बरोबर पणत्या उजळायला आपण थोडी मदत केली तर काय झालं ?"
असं म्हणून सायलीला विचार करायला वेळ देत आजी, आई घरात काम करायला निघून गेल्या .
असं म्हणून सायलीला विचार करायला वेळ देत आजी, आई घरात काम करायला निघून गेल्या .
जाता जाता आई म्हणाली , " हे मला नाही सुचलं . मी नुसतं चिडचिड करत बसले . यामुळे तिचा अभ्यास पण होईल आणि तिला शिकवणं . फक्त ती आता तयार होईल पाहिजे ."
" बघूया काय करतीय ते ?"
तेवढ्यात सायलीने दिलेला आवाज ऐकत आजी बाहेर आली , " काय ग ?"
" अगं तुला माहितीय . आज मी सामू चा पूर्ण अभ्यास करून घेतला . उद्या तिचा पेपर आहे . तो पेपर कसाही जाऊदे पण तिच्या चेहऱ्यावर आज आपल्याला येतंय हा आत्मविश्वास होता ना तो बघून मला खूप समाधान मिळालंय . आजी खरचं खूप खूप धन्यवाद . तुझ्यामुळे या समाधानाचा अनुभव घेता आला . आयुष्यात असं पण समाधान मिळू शकतं हे समजलं ग . खरचं तुम्ही या गोष्टीतून समाधान मिळवता त्यामुळे तुम्हाला आमच्यासारखं मोबाईल ची गरज लागत नाही . आजी पुन्हा एकदा धन्यवाद ." असं म्हणत सायलीने आजीला मिठी मारली .
हे सगळं बोलताना तिच्या चेहऱ्यावरून जो आनंद वाहत होता तो बघून आजीच्या डोळ्यात पाणी आली .
" आजी , तुला हीच पणती मला रंगवायला देयची होती ना म्हणून तू हे केलं ना सगळं . आजी तुझ्या मुळे हि पणती रंगवून दोन्हीही घरी उजेड पडला ग ..
अश्याच पणत्या रंगवून उजळावायचं काम मी या पुढे नक्की करीन . असा शब्द मी देते . ''
आजीच्या मनात आले खरचं उजळल्या पणत्या .
समाप्त
तुम्हाला कथा कशी वाटली ते नक्की सांगा .
सौ . चित्रा अ . महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा