उजळल्या ज्योती
भाग २
मागील भागात आपण पहिले कि सायलीला पणत्या रंगवण्यासाठी हव्या होत्या म्हणून ती आई आणि आजी च्या मागे लागली होती . आजी म्हणाली आपण शोधू अन् आई म्हणाली आता कशाला पाहिजे ? असं बोलून दोघीनीही तो विषय टाळला . पण आजी ला चा काय वाटलं काय माहित ती सायली शी बोलायला
"सायली , ए सायली काय करते ग ? "
" काही नाही . आजी तुला माहितीय . मी सांगितलेला अभ्यास वेळेवर करते त्यामुळे माझा अभ्यास पण झालाय . तुला आणि आईला पणत्या मागितल्या तर तुम्ही देत पण नाही . मग अजून काय करता येईल याचा विचार करतीय .
बरं झाली तू आलीस , चल आपण शोधूया पणत्या . "
' थांब . मी काय म्हणतीय . आपण दुसरे काय करता येईल का तो विचार करू या का ?"
तोंड वाकड करत सायली म्हणाली , " सांग काय करायचं ते ."
" चल आपण जरा बाहेर फिरून येऊ आणि येताना नवीन पणत्या पण आणू चालेल का ?"
" हो चालेल चलं ."
आजी ने जाता जाता सुनबाईंना आवाज देउन सांगितलं कि आम्ही जरा बाहेर जाऊन येतो ग .
आजी नातीला घेऊन कुंभार आळीत आली . " आजी आपण इथे का बर आलोय ? "
" अगं तुला पणत्या हव्यात ना म्हणून इथे आलोय . "
" अगं इथे कुठे बाजार तर तिकडे आहे ना ?"
" हो आहे ना . पण इथे त्या पणत्या तयार करतात . चल आपण बघूया कसे करतात ते ?"
"आजी येऊ का ?"
" आहो ताई तुम्ही इकडे कुठे ?"
" आहो ताई तुम्ही इकडे कुठे ?"
" अगं नातीला पणत्या कसे तयार करतात बघायचंय म्हणून आलोय . तुम्ही दाखवलं का ?"
" अहो ताई मी आता डोळ्यांमुळे नाही कर पण माझी नातं करते . थांबा तिला बोलावते ? ए सुमे , सुमे "
" काय ग आजे . मी काम करतीय ना ."
" हे बघ , ह्या मुलीला पणत्या कश्या तयार करायचे ते बघायचे आहे ?"
" कशाला . ह्या शिकतील आणि त्याचा व्हिडिओ बनवतील आणि टाकतील सगळी कडे मग आपल्या पोटावर पाय . "
हे ऐकून सायली चिडली पण स्वतः च शांत होऊन म्हणाली , " मी नाही व्हिडिओ बनवणार . तुझी इच्छा नाही ना मग नको दाखवू . चल आजी जाऊया . "
आजी आणि सायली तिथून बाहेर आल्या आणि घराकडे निघाल्या . रस्त्यात सायली शांत च होती . आजी पण विचार करत होती . आजीला समोर एक बाक दिसला त्यावर ती सायलीला घेऊन बसली .
सायली म्हणाली , " आजी जग मोबाईल ने जवळ आलयं ग पण तेव्हढंच लांब पण गेलय ना ?"
" हो खरंय ग . पण जग कितीही प्रगती करु पण ते माणसे मनापासून एकमेकांना जोडून नाही ठेऊ शकत . पण आता काय करायचं त्याचा विचार करावा लागेल .
"हो आजी खरंय पण आता काय करायचं याचा विचार करावा लागेल ना ? . समोर भेळी ची दुकान पाहून म्हणाली भेळ खाऊया का ग म्हणजे ते खाता खाता काही आठवलं तर "
" हो चालेल . जा तू सांगून ये . "
सायली भेळ आणायला गेली तर आजी विचार करत होती . तिला विचार करता करता तिला एक कल्पना सुचली . ती सायलीचा वाट बघत होती . तिला कधी सांगतोय असं झालं होत
बघूया पुढच्या भागात काय कल्पना सुचली आजीला ते ?
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा