उजळल्या ज्योती
भाग ३
सायली म्हणाली , " आजी जग मोबाईल ने जवळ आलयं ग पण तेव्हढंच लांब पण गेलय ना ?"
" हो खरंय ग . पण जग कितीही प्रगती करु पण ते माणसे मनापासून एकमेकांना जोडून नाही ठेऊ शकत . पण आता काय करायचं त्याचा विचार करावा लागेल .
"हो आजी खरंय पण आता काय करायचं याचा विचार करावा लागेल ना ? . समोर भेळी ची दुकान पाहून म्हणाली भेळ खाऊया का ग म्हणजे ते खाता खाता काही आठवलं तर "
" हो चालेल . जा तू सांगून ये . "
सायली भेळ आणायला गेली तर आजी विचार करत होती . तिला विचार करता करता तिला एक कल्पना सुचली . ती सायलीचा वाट बघत होती . तिला कधी सांगतोय असं झालं होत
सायली आल्या बरोबर आजी म्हणाली मला एक युक्ती सुचलीय . आधी समूशी बोलते मग तुला सांगते . आपण भेळ खाल्यावर तू घरी जा मी येते . नाहीतर आई ओरडेल किती वेळ गेल्यात म्हणून . "
" आजी मी जाते पण काय सुचलय ते सांग की . "
" ते मी सांगते घरी आल्यावर . "
असं म्हणून आजी परत कुंभार आळीत गेली तर सायली घरी गेली .
" अहो ताई . मघा बद्दल माफ करा . जरा नातं ..... "
" असू दे . मला जरा तिच्याशी बोलायचे बोलावते का ?"
" थांबा बोलावते . "
" आजी मी मगाशी .... "
" असू दे बाळ . मी काय विचारील त्याचे उत्तर देशील का ?"
" हो देईन . तू शाळा शिकते का ? "
" हो शिकते . पण मी अभ्यास करत नाही म्हणून शाळेत ओरडा खाते . "
" का ग अभ्यास करत नाही . "
" नाही करत . "
" अगं पण का ?"
" खरं सांगू का मला मराठी वाचायला , राजांचा इतिहास वाचायला काही नाही वाटत पण ते गणित करायचे जीवावर येते . मला ना त्यातील कधी काय करायचे तेच कळत नाही . "
" असं होय . "
" पण आजी तुम्ही मला हे का विचारतायत . "
" अगं समजा जर माझ्या नातीने तुला गणित सोपं करून शिकवलं तर चालेल. का ?"
" हो का नाही . चालेल. पण तिला जमेल का ?"
" हो जमेल की . मी तिला उद्या पाठवते . "
" हो चालेल . परत एकदा माफ करा आजी . " मायाने आजीने तिच्या डोक्यावर हात ठेऊन घरी निघाल्या .
बघूया पुढच्या भागात सायली तयार होते का ते ? तुम्हाला काय वाटते ते मला नक्की कमेंट करून सांगा .
क्रमश :
सौ . चित्रा अ . महाराव
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा