Login

उजळल्या ज्योती भाग ४

एक प्रेरणादायी विचार
उजळल्या ज्योती

भाग ४

अगं समजा जर माझ्या नातीने तुला गणित सोपं करून शिकवलं तर चालेल. का ?"

" हो का नाही . चालेल. पण तिला जमेल का ?"

" हो जमेल की . मी तिला उद्या पाठवते . "

" हो चालेल . परत एकदा माफ करा आजी . " मायाने आजीने तिच्या डोक्यावर हात ठेऊन घरी निघाल्या .

घरी सायली आजीची वाट बघत येरझाऱ्या घालत होती . आजी ला काय सुचलं असेल याचाच विचार चालू होता ना आजी आली . सायली आजी आल्या आल्या म्हणाली , काय करत होतीस ? कुठे गेलेली . ? तुला काय कल्पना सुचली . "

" अगं सांगते मला बसू तर दे . "

" थांब मी पाणी आणते मग सांग ."

" आणलंय मी . आई आजीला पाणी देत म्हणाली , " आई कुठे गेलेलता दोघी ? हि पण आल्या पासून नुसत्या फेऱ्या मारतीय विचारलं तर सांगत पण नाही . आता तुम्हीच सांगा . "

" सांगते ऐक . मी आणि सायली कुंभार आळीत गेलेलो . तिथे पणत्या कश्या बनवायच्या त्या सायलीला दाखवायला . पण तिथली मुलगी चिडून म्हणाली ,
....... .. .. " आजीने तिच्याशी झालेले सगळं बोलणं सांगितलं . पण सायली चिडून म्हणाली , " मी का ?"

" हे बघ बाळा , आपल्याजवळ जे ज्ञान आहे ना ते दुसर्यांना द्यावे त्यामुळे ना आपल्याकडील पण वाढते आणि समोरच्याला त्याचे ज्ञान होते . तू असं वागल्याने तुझं काही नुकसान आहे का ? त्यामुळे तू समाजाचं देणं एक प्रकारे पूर्ण करते आणि म्हणतात कि नाही एक बाई शिकली तर घराची प्रगती होते .

आई म्हणाली , " आणि नुसत्या पणत्या रंगवून आपल्याच घरात उजेड पडण्यापेक्षा तू जर तिला शिकवलं तर तिच्याही घरी शिक्षणाची पणती पेटेल कि नाही ?"

आजी लगेच म्हणाली , " हो अगदी बरोबर पणत्या उजळायला आपण थोडी मदत केली तर काय झालं ?"

असं म्हणून सायलीला विचार करायला वेळ देत आजी, आई घरात काम करायला निघून गेल्या .

जाता जाता आई म्हणाली , " हे मला नाही सुचलं . मी नुसतं चिडचिड करत बसले . यामुळे तिचा अभ्यास पण होईल आणि तिला शिकवणं . फक्त ती आता तयार होईल पाहिजे ."

" बघूया काय करतीय ते ?"

तुम्हाला काय वाटतंय ते मला नक्की कमेंट करून सांगा .