भाग 4
सुनेचा उपकार नसतो
सुनेचा उपकार नसतो
राखीने आईची इच्छा म्हणून दोन दिवस येऊन नवसाच्या सुवासिनी आणि त्यांचा स्वयंपाक करायला हवा होता...पण तसे न करण्यासाठी सासूच्या परवानगीचे कारण सांगून फोन कट केला.
आईला तरी ही आपल्या लेकीच्या हेतुवर शंका आली नाही...तीच मदतीला येणार..तिलाच माझी काळजी..लेकी त्या लेकी शेवटी..किती गुणाची अशी सून मिळाली तिच्या सासूला ,की सासूच्या परवानगी शिवाय पाऊल उचलत नाही.. नाहीतर ही माझी सून..
पुढे पाहू ......
"तू सासूला कधी पासून विचारायला लागलीस..?" आई
"मी त्यांना सगळ्या गोष्टी विचारून करायच्या ठरवल्यात आणि त्यांनी ही हे ठरवलंय की जे काही आयोजन नियोजन करायचे असेल तर सासू सुनेने मिळून करायचे...तर ह्या दहा दिवसांत मी त्यांच्या माहेरच्या लोकांना जेवायला बोलवायचे ठरवले आहे...त्या म्हणत होत्या काल की मी वहिनी आणि दादाला बोलवू इकडे..."राखी छान सबब सांगून मोकळी झाली होती
आईला कळले होते आज ही सबब सांगत आहे ,पण उद्या आणि सलग फोन करून तिला तयार करू...माझ्या सुनेची चांगली जिरवू..
इकडे दुसऱ्या दिवशी ,सून आठवण करत उभी होती...मागच्या वर्षी ह्याच दिवसात सासूबाईने सुवासिनींना बोलवायला सुरुवात केली होती ,त्यांना फोन करत होत्या..आणि ह्या वेळी अजून ही कोणाला ही बोलावले नाही..असे का झाले..
ती नवऱ्याच्या फोन वर फोन करते...तो कामात व्यस्त असतो...तिचा फोन घेऊ शकत नाही..
ती सासूबाईंच्या रूमकडे जाते ,आणि त्यांचा कारण विचारू म्हणते...त्या तिला बघून तोंडावर चादर ओढून घेतात...
"आई काय हो बरं वाटत नाही का तुम्हाला..काय होतंय तुम्हाला ..चहा करून देऊ का जरा मग बरं वाटेल?"
सासूबाई गप्प गप्प ,जणू काहीच ऐकले नाही.
"बरी आहे मी, मला काय होतंय माझ्या देवी आईची कृपा आहे...ती मला काही ही होऊ देणार नाही..."
निशा लगेच पुढे म्हणाली ,"विचारायचे होते आई एक म्हणून आले होते.."
"नको विचारू ,तुझी गरज लागेल तर सांगते.."
"नाही म्हणजे तुमचा नवस त्याचे नियोजन करायला सुरुवात करावी लागणार आत्ता पासून.." निशा हळूहळू बोलत मूळ विषयाकडे आली
"मागच्या वेळी झाले ते खूप झाले ,देवी अगदी प्रसन्न झाली...झाली कसली केलीस तू.."
तिला कळले होते मागच्या वर्षी आपण म्हणालो होतो सुवासिनी पाचच असलेल्या बऱ्या... सगळे कसे सोपे होते ,त्यात सासूबाई फक्त नको तितक्या सूचना देणार ,आणि सांगणार हे माझे पुण्य कर्म हो...मी करते म्हणून देवीला पोहचते.. त्यात सगळ्या आलेल्या कागाळ्या करणाऱ्या ,इतरांची उनी धुनी करणाऱ्या...घराला निरखून बघणाऱ्या...सून अजून कशी सासूच्या विरुद्ध वागत नाही...किती सासूचा त्रास तिला ,आणि सासूला सांगणार...तुम्ही सहनशील आहात म्हणून सून टिकली...नाहीतर तिने तुम्हाला चांगलेच नाचवले असते... बायका कसल्या त्या सुवासिनी...त्यात तर आग लावून जाणार आणि लांबून गम्मत बघणार...म्हणूनच निशाला त्या आवडत नसे...निदान देवीच्या विधी साठी येऊन असे वागणे शोभत नाही...म्हणून ठरवले मी गरीब अनाथ मुलांसाठी जेवण बनवेल पण ह्यांच्यासाठी नाही...
"तुला तर आठवत असेलच चांगले तुझे शब्द आणि माझ्या लेकाने मला ऐकवलेले बोल.." सासू
"ते होय..आठवतात तर..चांगलेच.." निशा
"मग कश्याला नाक खुपसतेस मध्ये..मी आणि माझी लेक बघून घेऊ.."
निशा निघून गेली होती ,इकडे तिला राखीचा फोन आला होता..
"वहिनी काय हे आता नवीन.." राखी त्रासून म्हणाली
"काय झाले ताई ,का त्रासल्यात तुम्ही इतक्या..?'
"तुम्ही दोघी सासू सुना ,तुमच्या घरातील देवीच्या विधीला कमी पडतात का सांगा..?" राखी प्रश्न विचारत म्हणाली
"नाही ओ ,आम्ही ठरवले होते खूप नको पण पाच जणी बोलवू घरी.." निशा
"मग काय झालं ,कुठे खटकलं ." राखी
"तुमच्या आईला आता 20 हव्यात..दरवर्षी 5 वाढवायच्या हा नवस बोलल्या त्या "
"कमाल आहे आईची तर...मग आता किती ह्या वर्षी म्हणते..." राखी डोक्यावर हात मारून घेत
"आता वीस सुवासिनी बोलवायच्या आहेत, आणि सोबत साडी ही द्यायची इच्छा आहे..." निशा
"मी तर अजिबात येणार नाही मदतीला, तुम्ही तुमचे घर तुमच्या सासूबाई आणि तिचे नवस काय करायचे ते करा.. मला गोत्यात आणू नका...मी सरळ केरळला जाणार आहे माझ्या सासूबाईंना लेकीकडे ठेवून..." राखी
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा