उंबरठा (भाग ३ ) अंतिम भाग

उंबरठा ही एक रहस्यमय कथा आहे.
ती खूप घाबरली होती, तिला रात्रभर झोप आली नाही आणि पवन सुद्धा रूममधे आला नाही.

सकाळ झाली, रोजप्रमाने ती रुमच्या बाहेर आली. नवरा सोफ्यावर झोपलेला होता. तिची स्वयंपाक घरातली काम सुरू झाली होती. भांड्याच्या आवाजाने पवन गडबडीने उठला.

" प्रेरणा, अगं आज लवकर उठली का ?"

प्रेरणा बाहेर हॉलमध्ये आली आणि म्हणाली,

" सोफ्यावर का झोपलात?"


पवन न बोलता निघून गेला. आता मात्र प्रेरणाला जरा जास्त संशय येवू लागला. तिने तेव्हापासून त्याच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली.

तो जास्तीत जास्त फोनवर असायचा. साधारण आठ दिवस झाले असतील रोज रात्री त्यांच्या घरी गर्दी असायची. काही बायका पण असायच्या.दिवसभर मात्र कुणीच यायचे नाही.

एक दिवस ती वर कपडे टाकायला गेली आणि रूम जवळ जावून कानोसा घेतला तर तिला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज एकू आला. ती खूप घाबरली.पळतचं खाली आली.

" आई..बाबा..आई बाबा...अहो वर रूममध्ये कुणीतरी आहे."

तेवढ्यात सासूबाई ओरडल्या...

" बरी आहेस ना गं... अगं वर रूम कुठे आहे?"


"अहो आई चला मी दाखवते"

" बस झाला हा बावळटपणा...चल आवर पटकन भूक लागली आहे."

" आई पण..."

" आता एक शब्द जरी काढला ना तर बघच तू."


सासूबाईंचा हा विचित्र अवतार बघून प्रेरणाला
काही सुचेना.सासूबाईंनी तिच्या जवळचा फोन हिसकावून घेतला.

" आई, अहो आई...हे काय करत आहात?"

तेवढ्यात पवन आला आणि म्हणाला,

"मी कालच म्हणालो हिला लगाम घालायचा हवा ,आता किती दिवस नवी नवरी राहणार आहे काय माहीत. हिला पण लावा धंद्याला नाहीयेत माझे कर्ज कसे फेडणार."

हे ऐकल्याबरोबर बरोबर तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिला काय करावे काहीच सुचेना. तिने काही विचार करण्याअगोदर तिच्या डोक्यात काठीने वार झाला आणि ती खाली कोसळली.

तिला जेव्हा शुद्ध आली तेव्हा एका रूममधे  होती. तिथे काळोख होता आणि सोबत होती एक बाई .

प्रेरणाला काहीच सुचत नव्हते. तिने दरवाजा खिडकी उघडण्याचा प्रयत्न केला. तिला बघून ती बाई म्हणाली,

" गेली दोन वर्ष मला इथे डांबून ठेवलं आहे."

"तुम्ही प्रयत्न नाही केला बाहेर निघण्याचा."

"केला ना...पण"

"पण, काय झालं ?"

"अगं हा उंबरठा ओलांडून या घरात आले आणि कैदच झाले. मी अनाथ असल्यामुळे माझी चौकशी कुणीही केली नाही. आत अजून एक रूम आहे. ती बघ..तिथे प्रत्येक रात्री.... छी...."

"काळजी करू नका....काही तरी मार्ग काढू आपण ह्यातून."


रात्र झाली. त्या वेळी एक सोडून दोन जणं रूममधे आले. बाहेर पवन त्याचा भाऊ दारू पित बसले होते.


इकडे आत एक बाई आणि एक माणूस गेले. आता  दोघी एकाच रूममध्ये होत्या. त्यांनी आतल्या रुमला बाहेरून बंद केले .जसा एक कस्टमर आला तसं त्याला दोघींनी बाधून ठेवले आणि मग दुसऱ्यालाही बांधले .

दार उघडुन दोघी बाहेर आल्या.ते दोघे पिवून पडलेले होते .तेवढ्या रात्री दोघी घराबाहेर पडल्या.  प्रेरणाने तिच्या आत्याला कॉल केला . आत्याने त्या दोघींना घरी आणले.


दुसऱ्या दिवशी दोघींनी पोलिस कंप्लेंट केली आणि पवनच्या घरी पोलिस घेवून गेले. प्रेरणाच्या घरी कुणालाच काही माहिती नव्हती .


"प्रेरणा आता तू घरी जावू शकते बाळा आणि तुझे नाव काय गं?"

"मी मैथिली. मी आधीच्या अनाथ आश्रमात जाते. तिथे काही तरी व्यवस्था करतील माझ्यासाठी."


"आत्या पण आता घरी काय सांगायचे?"

"काहीच नाही. हे जे काही घडलं हे रहस्य रहस्य राहू दे. जे काही घडलं ते काय सांगायचं बघते मी. "


दोन दिवसानंतर आत्या प्रेरणाला घेवून तिच्या माहेरी गेली. तिला बघून दोघे आश्चर्यचकित झाले.

दोघी घरात आल्या.

" ही घ्या तुमची मुलगी. त्या घराचा उंबरठा आता तिने ओलांडू नये एवढीच माझी इच्छा आहे"

"तू कोण गं सांगणार? "बाबा मोठ्याने ओरडले.

तेवढ्यात प्रेरणा बाबांना म्हणाली,


"बाबा ,कृपा करून काहीच बोलू नका. काही गोष्टी ह्या तशाच सोडून द्याव्या .मी तुम्हाला जिवंत हवी असेल तर मला परत तिकडे पाठवू नका ."

तिच्या डोळ्यात ती भीती, तो राग अजून बरच काही दिसत होत.

त्या दोघांना शिक्षा झाली, त्याचे आईवडील काहीही करू शकले नाही. प्रेरणा काही दिवसांनी नोकरी करू लागली.

" आई अगं एक विचारू का?"

" विचार ना!"

"मी तुझ्या सारखी किंवा बाबासारखी नाही दिसत ना!"

आईने बाबांकडे बघितलं....

" हा..हा...हा..हे काय वेड्यासारखं बोलत आहेस."

बाबा उठले आईच्या खांद्यावर हात ठेवला .

" कविता बस्स आता .आता नाही लपून ठेवता येत मला .सांगून टाक तिला की ती आपली मुलगी नाही .ती पल्लवीची मुलगी आहे ."

"का sss य?"

"हो हे खरं आहे .आम्हाला मूल होणार नाही हे पल्लविला माहिती होत. म्हणून तू झाल्यावर तिने तुला आम्हाला दिलं.मला नेहमी भीती वाटायची तिने तुला सांगितलं तर म्हणून तिचं येणं बंद केलं मी. तुझ्या सोबत काय घडलं मला माहित नाही, पण एक आई म्हणून तिने आजही तिचं कर्तव्य पार पाडलं .मी खरंच खूप स्वार्थी आहे."


"आई बाबा ,तिला आता राहू देत इथे."

बाबांनी ते मान्य केले. आई असल्यावर सुद्धा आत्या म्हणून तिने शेवटपर्यंत सोबत सोडली नाही.

प्रेरणाने आयुष्यात  परत कधी लग्न केले नाही  तिच्यासोबत काय घडले ते तिने कुणालाही सांगितले नाही. ते रहस्य तिने रहस्यच ठेवले.

समाप्त...
©®कल्पना सावळे

🎭 Series Post

View all